विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>टेस्ला माबोवर असता तर मायबोली वाचून तडक नर्मदा परिक्रमेला गेला असता सगळ्यात आधी.
>>>>टेस्ला माबोवर असता तर
असा एक धागा काढायला पाहिजे.

Happy

माझ्या दोन पोस्ट आहेत कालच्या. कोणत्या पोस्टबद्दल म्हणता? मी पडताळणी केल्याशिवाय लिहीत नाही. पण तरीही एखादा मुद्दा, त्याचा सोर्सच चुकीचा असल्यास सुटून जाऊ शकतो. क्वचित घडते असे. स्पेसिफिकली सांगितलेत तर मी सांगू शकेन.

वयाच्या अखेरच्या टप्प्यात त्याचे बहुतांश दात पडले होते. >>> As against, other people that had full teeth till the end? Happy टूथपेस्टच्या जाहिरातीकरता काय जबरी स्लोगन आहे! दात घासा नाहीतर वयाच्या अखेरच्या टप्प्यात तुमचे दात पडतील Happy That will do it Happy

अतुल. - हे मूळ पोस्ट मधले वाक्य विनोदी वाटले म्हणून Happy

मी पडताळणी केल्याशिवाय लिहीत नाही. >>>
तुम्ही लाख कराल हो. आमच्या इंटरनेट मधे गुगलच नाही. गुगल मागितले तर ते रिकामेच दिले.

सामो Lol

वीरू अगदी बरोबर.
फेसबुक, यू ट्यूब WhatsApp ,विविध वेब पेजेस,विविध न्यूज चॅनल ल access, इत्यादी इत्यादी खूप मोठी लिस्ट आहे

फुकट ह्या सेवा दिल्या जातात ते भंडारा आहे म्हणून नाही.
ह्या सर्व माध्यमातून च गूगल सर्च इंजिन ला माहिती मिळत असते आणि तीच माहिती थोडी तपासून Google स्वतःचे नाव वापरून परत जनतेलाच देत असते.
ती माहिती खरीच असेल ह्याची 1 रुपयाची कायदेशीर garanti गूगल देत नाही.

तुम्ही वाचलेली माहिती खरी समजायची की खोटी हे सर्व तुमच्या वर अवलंबून आहे

आपली स्मरणशक्ती:

मानवी मेंदूच्या स्मरणशक्तीची क्षमता अफाट आहे. त्याबाबत अजूनही संशोधक संशोधन करत आहेतच. पण आजवर जितकी संशोधने झाली आहेत त्यानुसार हि क्षमता तब्बल एक ते अडीच पेटाबाइट्सच्या दरम्यान आहे (एक पेटाबाइट् म्हणजे १०२४ टेराबाइट्स, ज्यामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लायब्ररीतली सारी पुस्तके चित्रे आणि व्हिडीओज सामावू शकतात). पण इतकी सारी क्षमता आजवर पूर्णपणे कुणीच व कधीच वापरलेली नाही.

आजवरच्या सर्वाधिक स्मरणशक्तीच्या जागतिक नोंदी:

१. म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश) येथे Mingun Sayadaw नावाचे एक प्रसिद्ध बौद्ध भिख्खू होऊन गेले. त्यांनी सोळा हजार पाने मुखोद्गत केल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. हि संख्या साधारण ८ ते १२ मिलियन (म्हणजेच १ कोटी २० लाख) अक्षरे इतकी आहे.

२. Dr. Yip Swee Chooi या मलेशियास्थित व्यक्तीने १७७४ पानांचा अख्खा चीनी-इंग्लिश शब्दकोश पाठ केल्याची नोंद आहे. हि संख्या साधारणपणे सतरा लाख अक्षरे इतकी भरते.

याच्या व्यतिरिक्त सुध्दा अनेक उदाहरणे सापडतात. धर्मग्रंथ आणि प्राचीन ग्रंथ मुखोद्गत असल्याची उदाहरणे आहेत.

त्यामुळे आता इथून पुढे "इतके सारे कसे लक्षात ठेवणार?", "एव्हढे मोठे पाठांतर कसे शक्य आहे?" इत्यादी सारखे प्रश्न मनात येऊ देऊ नका Biggrin

आपण सहा वर्षाचे असल्या पासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत सर्व काही मेंदू मध्ये साठवलेले असते..
सहावी मध्ये कोणती शिक्षिका किंवा शिक्षक होते हे आपण सांगू शकतो.
इतकी सर्व माहिती मेंदूत असते .

म्हणजे किती टेराबाईट्स असतील विचार करा.

मला मध्ये एक प्रश्न पडायचा आपण मुंबई राहतो ,समजा आपण झोपेत असताना सर्व मुंबई मधील इमारती,सर्व रस्ते, अगदी सर्वकाही नष्ट झाले आणि सर्व परिसर फक्त झाडांनी वेढला गेला तर आपण आपल्या घरापासून आपले ऑफिस ज्या ठिकाणी आहे त्या जागे पर्यंत जावू शकू का?

>>Dr. Yip Swee Chooi या मलेशियास्थित व्यक्तीने १७७४ पानांचा अख्खा चीनी-इंग्लिश शब्दकोश पाठ केल्याची नोंद आहे. हि संख्या साधारणपणे सतरा लाख अक्षरे इतकी भरते.

हे वाचून एक आठवण झाली. विक्रम वगैरे नाही पण नव्वदीच्या दशकात मी जपानी शिकत होते तेव्हा एका कुलकर्णी नावाच्या माणसाचे उदाहरण आमच्या जपानीच्या सरांकडून एकले होते. जपानी भाषेच्या चार लेव्हल्स असायच्या तेव्हा, चौथी (योन्क्यू) सर्वात सोपी आणि पहिली (इक्यू) सर्वात कठीण. बहुतेक लोक ४-३-२-१ या क्रमानेच द्यायचे या परीक्षा. तर या कुलकर्ण्यांनी ठरवलं की द्यायची परीक्षा तर एकदाच आणि सर्वात कठीण म्हणजे पहिल्या लेव्हलची परीक्षाच द्यायची डायरेक्ट . पहिली लेव्हल जाम किचकट आणि कठीण आहे. त्यांनी म्हणे डीक्शनरीच पाठ केली होती. अर्थातच इक्यू ते पहिल्याच प्रयत्नात पास झाले. वरील बातमी वाचून त्यांचीच आठवण झाली.

पॅटा सिका: आफ्रिकन गुलामांचा ब्रीडर

मेरीकेच्या इतिहासात गुलामगिरीचे काळे पर्व आहे. त्याबाबतच्या कैक कहाण्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. खालील माहिती ही यासंदर्भातच आहे आणि कदाचित ती आपणास विचलित करू शकते. कृपया स्वत:च्या जबाबदारीवर वाचा.

ठराविक जातीच्या चांगल्या ब्रीडच्या पाळीव प्राण्यांची पैदास करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय आजच्या जगात राजरोसपणे केला जातो. आणि हे सर्वश्रुतच आहे. कुत्रे, मांजर, गायी, म्हैशी, बोकड इत्यादी पाळीव प्राण्यांच्या नामवंत ब्रिड्सविषयी आणि त्यांच्या किमतींविषयी आपण अनेकदा ऐकतो व चर्चाही करतो. या प्राण्यांची विक्री करणारे व्यापारी, त्यातील ठराविकच निरोगी नर आणि मादी यांना वेगळे काढून त्यांचा फक्त पुनरुत्पादनासाठी वापर करत असतात. त्यांना ब्रिडर म्हणतात.

अमेरीकेत एकेकाळी कृष्णवंशीय माणसांच्या बाबतीत हा व्यवसाय केला जात असे यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे भीषण सत्य आहे. गुलामांच्या आयातीवर कायद्याने बंदी आल्याने काही मालकांनी अमेरीकेत "गुलामांचे ब्रिडिंग" करायला प्रारंभ केला होता. मोजक्याच पण धष्टपुष्ट आफ्रिकन गुलामांना जबरदस्तीने व प्रसंगी पाशवी अत्याचार करत शेकडो गुलाम स्त्रियांसोबत संबंध ठेवायला लावून भरपूर मुले जन्मास घालण्यास भाग पाडायचे व जी संतती निर्माण होईल त्यांची काही वर्षांनी गुलाम म्हणून विक्री करायची असा हा अमानुष व्यवसाय होता.


मागचे काही महिने सोशल मिडीयावर Roque José Florêncio नामक व्यक्तीची माहिती सांगणाऱ्या पोस्ट्स बऱ्याच व्हायरल झाल्या आहेत. १९ व्या शतकाच्या सुरवातीला जन्मलेला आणि "पॅटा सिका" असे टोपणनाव असलेला हा मनुष्य असाच एक गुलाम होता, ज्याचा उपयोग त्याच्या मालकाने फक्त गुलामांच्या पुनरुत्पादनासाठी केला होता असा दावा या पोस्ट्समध्ये केला गेला आहे. मजबूत शरीरयष्टीच्या पॅटा सिकाची उंची तब्बल सात फूट होती, असंख्य स्त्रियांपासून पॅटा सिकाला २०० मुले झाली ज्यांची नंतर गुलाम म्हणून विक्री केली गेली इत्यादी दावे करण्यात आलेले आहेत. या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की १८८८ मध्ये गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर पॅटा सिकाने Palmira नावाच्या स्त्री सोबत लग्न केले व तिच्यापासून त्यास ९ मुले झाली. तसेच तो तब्बल १३० वर्षे जगला आणि १९५८ मध्ये त्याचा मृत्यू झाला असाही दावा करण्यात आला आहे.

पॅटा सिकाच्या व्हायरल पोस्ट्सच्या सत्यतेबाबत काहींनी शंका व्यक्त केल्या आहेत. पण अमेरीकेत "गुलामांचे ब्रिडिंग" करण्याचा व्यवसाय एके काळी अस्तित्वात होता याबाबत मात्र कुणाचे दुमत नाही.

संदर्भ:

१. Roque José Florêncio, also known as Pata Seca, c. 1850s

२. Slave breeder' had more than 200 children and lived 130 years, says family

३. Pata Seca: The Enslaved African Breeder

४. The story of Roque José Florêncio (Pata Seca)

टेट्रेशन - Tetration ( 4th hyperoperation )

गणितातील बेसिक ऑपरेशन म्हणजे बेरीज - addition. म्हणजे कोणतेही दोन नंबर्स एकत्र करणे. या addition च्या आधीही एक ऑपरेशन आहे. ते म्हणजे succession - कोणत्याही आकड्यात अधिक १ मिळवणे.

succession आणि addition नंतर येते multiplication (गुणाकार = एखाद्या संख्येत तीच संख्या पुन्हा पुन्हा अधिक करत राहणे) आणि मग येतं exponentiation ( एखाद्या संख्येचा घात = एखाद्या संख्येला त्याच संख्येनं पुन्हा पुन्हा गुणत राहणे)

आपल्याला गणितात या लेवलपर्यंतच शिकवतात. पण यापुढेही ऑपरेशन्स आहेत. त्यातून मिळणार्‍या संख्या इतक्या प्रचंड आहेत की त्यांचा आपल्या जीवनात काही उपयोग नाही. पण त्यांची ओळख करून घेऊया. रोचक आहेत संकल्पना.

तर exponentiation नंतर येतं tetration म्हणजेच repeated or iterated exponentiation. टेट्रेशन ऑपरेशन लिहिताना घाता सारखंच आकड्याच्या डोक्यावर पण डावीकडे लिहितात.

Tetration table.png

या कोष्टकावरून टेट्रेशन ऑपरेशन वापरून संख्या किती झपाट्यानं वाढतात हे लक्षात येईल.

याहीपुढचे हायपर ऑपरेशन्स आहेत - (यांच्यातर वाट्याला जायचा प्रश्नच नाही. तरीपण.....)
pentation (5th hyperoperation) = repeated tetration
hexation (6th hyperoperation) = repeated pentation
Heptation or septation (7th hyperoperation) = repeated hexation
Octation (8th hyperoperation) = repeated septation
Enneation or nonation (9th hyperoperation) = repeated Octation
इ.इ.

अधिक माहिती हवी असेल तर गुगल करा. भरपूर लिंका सापडतील. काही सोईसाठी देत आहे.

Why you didn't learn tetration in school[Tetration] : https://www.youtube.com/watch?v=Ea1_1aVfwl4

Numbers too big to imagine : https://www.youtube.com/watch?v=u1x_FJZX6Vw&t=35s

Tetration - https://en.wikipedia.org/wiki/Tetration

Where is Factorial in all this? >>>> Factorial म्हणजे गुणाकारच. एक स्पेशल केस फक्त.

अच्छा, याचा अर्थ exponentiation आणि tetration म्हणजे गुणाकारच. एक स्पेशल केस फक्त. Wink

वाह. नवीन संज्ञा कळली.
multiplication --> exponential --> tetration

उदाहरणार्थ
2x2x2x2 असे लिहावे लागू नये म्हणून (2 exp 4)
आणि
2^2^2^2 असे लिहावे लागू नये म्हणून (4 tetr 2)

1984 च्या निवडणुकीत अलाहाबाद मतदार संघातून अमिताभ बच्चन विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. त्यातही त्यांची चार हजार मतं एका विचित्र कारणामुळे बाद झाली होती. ते कारण म्हणजे या चार हजार मतपत्रिकांवर महिलांनी शिक्का मारण्याऐवजी अमिताभ यांच्या नावासमोर ओठ टेकवून करून लिपस्टिकचे निशाण उमटवले होते!

(खालील किस्सा दंतकथा असू शकते. कारण काही हिंदी बातम्यांची संकेतस्थळे वगळता त्याची अधिकृत नोंद अन्यत्र कुठे आढळत नाही)

१९५२ मध्ये उत्‍तर प्रदेशातील फतेहपुर इथं पंडित नेहरूंचे भाषण होते. संध्याकाळी उशीर झाला होता. आजूबाजूच्या झाडांवरून वटवाघळे उडायला लागली होती. आवाज करू लागली होती. त्यांच्या आवाजात इतर काही नेत्यांनी आपापली भाषणं कशीबशी उरकली. नेहरू भाषण करायला उभे राहिले पण तोवर वटवाघूळांच्या आवाजाचा त्रास इतका वाढला की नेहरूंना बोलता येणे अशक्य झाले होते. तेंव्हा त्यांनी हात जोडले आणि वटवाघूळांना उद्देश्यून आवाज चढवून दरडावून बोलले "आता जरा शांत बसाल का? आधी मी बोलतो मग तुम्ही तुमचे मत मांडा". यावर सगळे पब्लिक फिदीफिदी हसू लागले. स्टेजवर बसलेल्या नेत्यांची घाबरून पाचावर धारण बसली. पण त्यांनंतर विषेश घडले. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा. वटवाघूळांचा आवाज त्यांनंतर खरंच बंद झाला. नेहरूंचे भाषण होईतोवर ती चिडीचूप बसली होती. त्यानंतर कित्येक वर्षे फतेहपुर भागात "नेहरू पक्षांशी संवाद साधू शकतात" अशी वदंता पसरली होती. आजही या घटनेची तिथे लोक चर्चा करतात.

Lol शिवाय वटवाघळांचा "आवाज" हा मानवी कानांना ऐकू येण्यापलीकडच्या ध्वनीलहरी असतात हासुद्धा भाग आहे. सुरवातीचे चित्कार फक्त ऐकू येतात म्हणे.

Pages