विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एवढे ठाम पने लीहले आहे रूनमेश तुम्ही.
तुमचा काही अभ्यास आहे का ह्या विषयात .
अभ्यास असेल असंख्य प्रसंगाची चिकिस्ता करून मत व्यक्त केले असेल तर ठीक आहे .
पण काहीच अभ्यास नसताना,कोणतीच चीकिस्ता केली नसताना मत व्यक्त करणे ते पण ठाम पने हे शहाणपणाचे लक्षण नक्कीच नाही.>>>
कोण बरं म्हणुन गेलंय हे?
मत ठोकायला कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः xxxx महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे, अमेरिकेची आर्थिक आघाडी- ठोका.

छान धागा.
रोचक माहिती. प्रतिसाद पण भारी

त्या प्रवीण चा लेटेस्ट व्हिडीओ आलाय... त्याला यु ट्यूब बॅन करताय.... ----> एवढे चांगले रिसर्च करून टाकलेले विडिओ युट्युब एकतर बॅन करत आहे किंवा डीमॉनेटाईझ करत आहे त्यामुळे बिचारा फ्रस्ट्रेट झालाय.

पाहिला तो त्याचा लेटेस्ट व्हिडिओ. काय कोणाला कधी प्रोब्लेम होईल सांगता येत नाही. बिचारा. किती मेहनत घेतो आणि एकदम वेगळीच माहिती देतो दुर्लक्षित देवळांबद्दल. कोणाच्या तरी पोटात दुखलं असेल.

कोणाच्या तरी पोटात दुखलं असेल.

कोणाच्या तरी पोटात दुखलं असेल हे नक्की जाणुन घ्यायच असेल तर जर्मन फिलॉसॉफर "मॅक्स म्युलर" चा ईतिहा स जाणुन घ्यावा लागेल !!

जगात पाचव्या नंबरचा धर्म : ह्या धर्माचे लोक त्यांच्या स्वःताच्या देवळाच्या संशोधनाबद्दल ईतके असंवेदन शील असतील तर दुसर्याकड बघुन काय फायदा ? आपल्या हिंदु देवळात संशोधन करण्या ईतके मटेरीयल आहे हे धर्माच्या अंध विश्वासातुन बाहेर आले तरच जाणवू शकेल.

यु ट्युबला पर्याय शोधायची वेळ आलेली आहे हे प्रकर्शाने जाणवु लागलेले आहे.

जगात पाचव्या नंबरचा धर्म : ह्या धर्माचे लोक त्यांच्या स्वःताच्या देवळाच्या संशोधनाबद्दल ईतके असंवेदन शील असतील तर दुसर्याकड बघुन काय फायदा ?>>>

Happy Happy

काही वर्षांपुर्वी एक पुस्तक जर्मन भाषेत प्रसिद्ध झाल ज्याच नाव होत
Gesundheit in Ihren Händen
(आपले आरोग्य आपल्या हाती) ह्या पुस्तकातल्या हस्त मूद्रांचा आविष्कार ह्या पुस्तकाचे लेखक श्री विंडर सिल्फा यांनी केलेला आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे
Gesundheit in Ihren Händen ह्या पुस्तकात दाखवलेल्या व पुस्तकाच्या लेखकानेच प्रचंड संशोधनातुन बनवलेल्या हस्तमुद्रा भारतीय प्राचिन पुस्तकात अगोदरच दाखवलेल्या आहेत. २० व्या शतकात शोधलेल्या हस्तमुद्रा बद्दलची माहीती हजारो वर्षापुर्वीच्या पुस्तकात कशी काय आली ह्या बद्दल आश्चर्य वाटते.
https://youtu.be/dDXXt-Y2NdY

विवेक नाईक, मला याबद्दल फार माहित नाही पण जर्मनीमध्ये संस्कृत ग्रंथ, पुस्तकं यांच्यावर बरंच संशोधन होतं असं ऐकलंय. यातूनच ही माहिती त्या लेखकाकडे गेलेली असू शकते.

ह्या प्रकाराला Digestion Process म्हणतात, हे लोक भारतात येतात, भारतीय गुरु कडुन विद्या शिकतात मग युरोप , अमेरिकेत जाउन तिच विद्या आपल्या नावावर कॉपी राईट्स सकट विकतात.
योग निद्रा, विपश्यना सारख्या विद्या ह्या लोकांनी आपल्या नावाखाली करुन घेतल्या.
आपले उच्च शिक्षित भारतीय लोक मात्र माध्यमात कोणी दुसर्याच्या कविता, फोटो वापरले तर अश्या फुटकळ गोष्टीसाठी त्या लोकांना कॉपी राईट्स वर दुसर्याला ज्ञान देत असतात.

भारताच्या ज्ञानाच्या चोरीवर व अश्याच अनेक प्रकारांवर अनेक वर्ष जन जागृृृृृती करण्याच काम श्री राजिव मलहोत्रा करत आहेत. अमेरीकेत गेली ४०-४५ वर्षे रहाणार्या कँप्युटर ईंजिनीयर ने स्वःताच्या २० कंपन्या दुसर्याला चालवायला देउन स्वःता भारता बद्दलच्या कार्याला वाहुन घेतलेले आहे !!

ईनफिनीटी फांउडेशन

माझा सर्वात आवडता Youtube channel..
Vsauce
अतिशय मनोरंजन पद्धतीने complex problem explain केले आहेत. जवळपास सगळे व्हिडीओ बघून झालेत. पुन्हा बघायला ही मजा येते.
e.g हा आणि बाकीचे सगळेच व्हिडीओ.
https://youtu.be/G5s4-Kak49o

हो जव्हेरगंज याचे व्हिडिओ पण मस्त असतात. पण इथे या धाग्यावर नुसत्याच जनरल व्हिडिओची लिंक देण्यापेक्षा एखाद्या रोचक व्हिडिओ बद्दलची माहिती दिलीत तर उपयोगी होईल. तुम्हाला यातला सगळ्यात आवडलेल्या व्हिडिओबद्दल आणि त्यातील माहितीबद्दल थोडक्यात लिहा ना कृपया.

धन्यवाद जव्हेरगंज, मुलाला नक्कीच आवडणार हे.
धन्यवाद विवेक नाईक व मामी , रोज थोडे थोडे वाचत / बघत आहे .

खूप वर्षा पूर्वी एक नवीन चॅनल सुरू होणार होता झी चा.
तो चालू झाला नाही .
तो फक्त भारतीय प्राचीन ज्ञान गूढ ठिकाणे ह्या विषया वर चालू होणार होतं
तेव्हा जी प्राचीन पुस्तक विविध विषय वरची ही ग्रेट ब्रिटन मधून मागवली जायची त्यांनी त्या पुस्तकांचे इंग्लिश मध्ये भाषांतर करून अभ्यास करून लिहिलं होती

आणि जवळ जवळ ९ ते १० लोक ब्रिटन मधून आली होती ती जाणकार आणि अभ्यासू होती

आपण आपल्या प्राचीन पुस्तकं विषयी , ज्ञान
विषयी अभ्यास केला नाही उदासीनता दाखवली.
आणि हेटाळणी करत राहिलो .

*पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत*

*1. चातक पक्षी -*

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

*2. पावशा पक्षी -*

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

*3. तित्तीर पक्षी -*

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

*4. कावळा -*

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

*5. वादळी पक्षी -*

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

*6. मासे -*

पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

*7. खेकडे -*

तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

*8. हरीण -*

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.

*9. वाघिण -*

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

*10. वाळवी -*

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

*11. काळ्या मुंग्यां -*

हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

*मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.*

*खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.*

*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.*

*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.*

*आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.*

सौजन्य- whatsapp

सौजन्य- whatsapp>>>>> यातली बरीच माहिती मारुती चित्तम्पल्ली यांच्या लेखाणातील आहे.

छान माहिती मिळत आहे .
प्रतिसाद मधून.> > +१०

एकपेशीय प्राण्यांचे जीवन कसं असतं? मायक्रोस्कोपमधूनच केवळ दिसणार्‍या विचित्र आकारांच्या विविध प्राण्यांबद्दल आपण कधी विचारही करत नसतो. या प्राण्यांबद्दल उत्सुकता असेल तर इथे मस्त व्हिडिओज आहेत ...

Journey to the Microcosmos : https://www.youtube.com/channel/UCBbnbBWJtwsf0jLGUwX5Q3g

फेसबुकवर विनीत वर्तक ह्यांचे लेटेस्ट ( आजचे ) फेबु लाईव्ह पहाच. मंदिरांमागील विज्ञान ह्या विषयावर आहे. खूप ऱोचक माहिती.

विज्ञानाचा आधार घेऊन धार्मिक गोष्टींचा प्रसार प्रचार करणे म्हणजे भोंदुगिरी आहे. रोचक माहिती नव्हे. त्याला pseudoscience अर्थात छद्मविज्ञान म्हणतात. वरच्या काही पोष्ट अशा छद्मविज्ञानाने प्रेरित आहेत. धर्मप्रसार करण्यासाठी हे पसरवण्यामागे काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक प्रवृत्ती कार्यरत असतात. त्यांचा तो अजेंडाच आहे (racket). मग तो "पृथ्वीवर माणूस उपराच" या भाषांतरित पुस्तकाचा मूळ लेखक Erich von Däniken असो किंवा आपल्याकडले "मंदिरामागचे विज्ञान" वाले छद्मविज्ञानीष्ट. सगळे एकाच माळेचे भोंदूमणी.

बर्म्युडा triangle हे सत्तर च्या दशकात काही अमेरिकन माध्यमांनी एकत्र येऊन बनवलेले कांड होते. असल्या भाकडकथा पसरवून त्यांनी त्याकाळात प्रचंड पैसा कमवला. नियतकालीकच्या पहिल्या दर्शनी पानावर Bermuda Triangle छापले कि झाले. लोक ते विकत घेणारच. त्याकाळात सोशल मिडिया नसल्याने त्यांना हे कांड घडवणे सहज शक्य झाले. वास्तविक तिथे असे काहीही घडलेले नाही. तिथे ज्या काही कथित घटना घडल्याचे सांगितल्या गेले त्याची पोलखोल या शतकाच्या सुरवातीलाच झालेली आहे. आपल्याच एका आयआयटीयन चा याबाबत एक विस्तृत ब्लोग पण आहे. लिंक मिळाली कि देतो.

तीच गोष्ट crop circle ह्या प्रकारची. त्यामागे जे लोक होते त्यांनी इस २००० च्या आसपास मुलाखती देऊन आपणच ते करत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी crop circle कशी केल्यात याचे डेमो पण करून दाखवलेत. बाकी त्याला चटपटीत मसाला लावून बातम्या बनवण्याचे काम माध्यमांनी इमानेइतबारे केले. सनसनाटी पसरवून पैसा व प्रसिद्धी मिळवणे हा हेतू. crop circle पाहण्यासाठी लोक रांगा लावून तिकिटे खरेदी करीत.

तात्पर्य: दुनिया उल्लू बनती है, बनानेवाला चाहिये.

बाकी चालू द्या.

Pages