विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच एका मंदिराचे अवशेष सापडले आहेत मी सायन्स अलर्ट वर ते आर्टिकल वाचले आहे.
त्या मंदिराचे जे बांधकाम आहे ते आताच्या स्थापत्य शास्त्र समोर आव्हान आहे..जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत त्या मागची कारणे शोधणे माणसाला शक्य झाले नाही.
जगात अशी अनेक मंदिर ,pyramid aahet त्यांचे बांधकाम कसे केले असेल ह्यांची उकल होत नाही ( दुर्दैवाने मशीद किंवा बाकी प्रार्थना स्थळे त्या लिस्ट मध्ये नाहीत.)

What are those floaty things in your eye? - Michael Mauser : https://www.youtube.com/watch?v=Y6e_m9iq-4Q

मस्त माहिती आहे ही. आपल्याला डोळ्यासमोर काहीतरी तरंगताना दिसतं ना ते काय असतं हे कळेल.

मामीने दिलेली मंदीराचा व्हिडीओ पाहिला. भारतातल्या जुन्या मंदीरांबद्दल मला नेहमीच विलक्षण कुतुहल वाटतं. कशी बांधली असतील इतकी प्रचंड, भक्कम व प्रचंड कलाकुसर करुन. १०००-१२०० वर्षानंतरही पडत नाहीत. आतला आल्हाददायक गारवा कोणत्याही गर्मीत तसाच टिकतो, एकही पंखा नसताना... काय असतील त्यांनी वापरलेली गणितं , अवजारे त्यावेळी? काय कमालीचे आर्किटेक्ट असतील ते बांधणारे?
टू बॅड, ते लिहुन ठेवले गेले नाही कुठे.

खरं आहे सुनिधी. आपल्याला अजून आपल्या इतिहासाबद्दल पुरेशी माहिती नाही असंच दिसतंय यावरून. मानवाच्या इतिहासाचा एक मोठा कालखंड आपल्याला अजून अपरिचीत आहे.

प्रविण मोहनचे सर्व व्हिडिओज मस्त असतात.

आपल्याला अजून आपल्या इतिहासाबद्दल पुरेशी माहिती नाही असंच दिसतंय यावरून. >> खरंय.

जुन्या मंदीरांबद्दल मला नेहमीच विलक्षण कुतुहल वाटतं. कशी बांधली असतील इतकी प्रचंड, भक्कम व प्रचंड कलाकुसर करुन. १०००-१२०० वर्षानंतरही पडत नाहीत. आतला आल्हाददायक गारवा कोणत्याही गर्मीत तसाच टिकतो, एकही पंखा नसताना... काय असतील त्यांनी वापरलेली गणितं , अवजारे त्यावेळी? काय कमालीचे आर्किटेक्ट असतील ते बांधणारे? ~~ +१२३४५६
अचंबित होते मी पण नेहमी. खरच कमाल!!

Usually halophilic ( means salt loving) microbes like Archea, and others when over grow, this can happen. As you know the Lonar lake is highly saline, so this growth must have happened. It will subside and the lake will again be green soon, once rainy season starts
These produce a pink colour pigment, so lake looks pink. This is a different population of microbes than the usual halophilic microflora of the lake.

ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या एका तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर.

फेसबुक वर काही मंडळींना (फेबु इन्फ्लूएन्सर्स म्हणायचं का) त्यांच्या लिखाणासाठी फॉलो करते त्यात लंडनच्या संकेत कुलकर्णींचा पहिला क्रमांक लागतो. ब्रिटीशकालीन भारतात घडलेल्या घट्नांविषयी त्या त्या संदर्भातील कागद पुराव्यांसकट (लंडनमध्ये जतन केलेले इ.) वाचायला अतिशय रोचक वाटते. नक्की बघा.

*एक वेगळी माहिती......*

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखविलेल्या या धर्यामागे ‘नवीन पिढीने तरी जगावे’ हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहानलाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो. पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृतीत आणली जाते. माणसांसारखीच वानरेदेखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही, तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली, हे जाणून घेतलं तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात, असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. ‘वानरांची लाकडे, चुलीला साकडे’ ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी.

प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या, तर काहींची माहिती गोळा केली. आणि ती या प्राणीकोशाच्या निमित्तानं छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून लोकांसमोर येणार आहे.

मुंगसाला पिलांसह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिलांना कशा पद्धतीनं रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो. त्या पिलांची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळे ते त्यांच्या वाटय़ाला जात नाहीत आणि मुंगूस त्याच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात.

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेला होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधी तज्ज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसाने रात्री एक वाजता मला पाडय़ावर बोलावलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक-एक कणीस होतं. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी करण्यास शिकवलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचे अंडे होते. तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदीरही फार हुशार! अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदराच्या उंचीएवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रूपक्षी आहे का, हे पाहतो. शत्रूपक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच तो बाहेर पडतो. ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.

मोराला पिसारा असतो. पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला ‘मुकना मोर’ म्हणतात. मोरनाचीमध्ये या मुकन्या मोराला प्रवेश नसतो.

हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात.

सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास-दौऱ्यांत हे अनुभवायला मिळालं.

‘मुकना’ हा शब्दही त्यातूनच कळला. हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागे चालतात.

काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो.

आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याचजणांना माहिती नाही.
लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.

मारुती चितमपल्ली ,
लेखक,मराठी वन्यजीव अभ्यासक,
पक्षितज्ज्ञ व निर्सग लेखक आहेत.
(WhatsApp forward)

Navajo Ranger Jonathan Dover (04-16-19) Skinwalkers, UFOs, Bigfoot & Paranormal Exploits : https://www.youtube.com/watch?v=oMhIaLvlw1E

अमेरीकेतील मूळ रहीवासी असलेल्या नेटिव अमेरीकन जमातीतील लोकांना त्यांच्या संस्कृती आणि राहणीनुसार राहता यावे याकरता ठिकठिकाणी रिझर्वेशन्स केलेली आहेत. असंच एक अ‍ॅरिझोना राज्यातील नवाहो रिझर्वेशन. इथे अनेकानेक गूढ घटना घडतात. युएफओ, यती दिसल्याच्या घटना आहेतच पण त्याबरोबरच तेथील नवाहो जमातीच्या आख्यायिकांनुसार इथे अत्यंत खतरनाक असे स्कीनवॉकर्स आहेत. (स्कीनवॉकर्स ही संकल्पना आपल्यासाठी नवी आहे. )

या रिझर्वेशनच्या संरक्षणासाठी नेमलेल्या एका रेंजरनं अशा घटनांचे त्याला स्वतःला आलेले अनुभव इथे सांगितले आहेत. व्हिडिओ मोठा आहे पण भारी रोचक घटनांनी भरलेला आहे. अनेक ठिकाणी फोटो इ आहेत.

या व्हिडिओखाली जे लिहिलं आहे ते इथे देते.
The Navajo Reservation in Arizona had long had reports of all manner of strange goings-on beyond the scope of what ordinary law enforcement is trained to deal with, including ghosts, Bigfoot, UFOs and the shape-shifting creatures known as Skinwalkers. Rather than dismiss these cases, the Navajo Reservation assigned a special branch of their police department to look into them, consisting of a group of specially trained federal officers who also handle more mundane matters. Although paranormal reports account for less than 1% of cases, they are taken seriously and recognized as worthy of investigation.

हे प्रविण मोहनचे व्हिडिओज पाहिले. फारच रोचक आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

) In Search of the Forbidden Past : Kullar Caves - http://y2u.be/1tfz4Wni-v8
2) In Search of the Forbidden Past : Blood Stone - http://y2u.be/TTCWEst943o
3) Anunnaki Found in Hindu Temple? - http://y2u.be/84ct0y02Tc0

सध्या नेफिवर कलर्स (निसर्गातील रंग) या विषयावरची डेव्हिड अ‍ॅटनबरोची डॉक्यु सिरीज पहात आहे. (नाव - लाईफ इन कलर) पहिला भाग बघितला, दुसरा अर्धा झालाय. अर्थात आवडलीच.
त्यातून प्राप्त झालेली माहिती. माझ्यासाठी तरी नवीन.
माणसांच्या फिंगरप्रिंटप्रमाणे प्रत्येक झेब्राच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात!

गेल्याच महिन्यात रेडीओवर झेब्र्याच्या पाठीवरील पट्ट्यांत जनुकीय बदलांमुळे फरक पडतोय बाबत बातली ऐकली.
https://www.cbc.ca/radio/thecurrent/the-current-for-april-1-2021-1.59723...
याचं कारण एकाच कुटुंबात ब्रिडिंग असावं. आणि हे होण्याचं कारण अर्थात मानव. आपण महामार्ग, रस्ते इ. मुळे झेब्र्यांच्या नैसर्गिक हालचालींवर बंधने आणली आणि एकाच कुटुंबात ब्रिडिंग अधिक होऊ लागलं.

सध्या नेफिवर कलर्स (निसर्गातील रंग) या विषयावरची डेव्हिड अ‍ॅटनबरोची डॉक्यु सिरीज पहात आहे. (नाव - लाईफ इन कलर) पहिला भाग बघितला, दुसरा अर्धा झालाय. अर्थात आवडलीच. >> हो ही पहायची आहे.

माणसांच्या फिंगरप्रिंटप्रमाणे प्रत्येक झेब्राच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात! >> हो हे माहित होतं.

झेब्र्याच्या पाठीवरील पट्ट्यांत जनुकीय बदलांमुळे फरक पडतोय .... इंटरेस्टिंग. वाचते बातमी.

>>याचं कारण एकाच कुटुंबात ब्रिडिंग असावं. आणि हे होण्याचं कारण अर्थात मानव. आपण महामार्ग, रस्ते इ. मुळे झेब्र्यांच्या नैसर्गिक हालचालींवर बंधने आणली आणि एकाच कुटुंबात ब्रिडिंग अधिक होऊ लागलं.
धन्यवाद अमित. वाचली बातमी. वाईट वाटले.

इनब्रिडिंग असू शकेल. पण रस्ते महामार्ग वगैरे त्याचे कारण असणे जरा शंकास्पद आहे. मानवी अतिक्रमण असे जनरलाइज्ड म्हणता येइल. झेब्रा हा प्राणी आफ्रिकेतच जास्त असतो (असे वाचले आहे). तेथे रस्ते, महामार्ग मुळात इतके बांधले जात आहे का इथेच शंका आहे. आणि त्या मानाने मोकळी जमीन अजूनही प्रचंड आहे.

या निमित्ताने ही अफलातून क्लिप पाहा
https://www.youtube.com/watch?v=Avo0-8GvBlA

जी पार्क विस्तिर्ण आहेत तिकडे हा प्रॉब्लेम जाणवत नाही. जी मानवी वस्तीने सराउंड झालेली आहेत किंवा हॅबिटॅट फ्रॅग्मेंटेशन झालं आहे तिकडे हे दिसतं असं म्हटलं आहे.
If you think about Etosha National Park in Namibia, which has probably 30,000 zebras, you can go on a trip and spend a week, as I have done, going throughout the entire park and see one or two. Whereas … you could go to a park in Uganda called Lake Mburo, which has maybe about 150, 200 zebras, and see five or six of them, you know. So you've got maybe five per cent of the population. And there's one in Rwanda that maybe has 10 per cent of the population with these spotted types of patterns.
सीजे Biggrin

Pages