२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डिबेटच्या वेळेस जी काही दोन तीन मिनिटे म्हातारा काहीसा शुद्धीवर होता तेव्हा त्याने अनेक खोटारड्या गोष्टी सांगितल्या.
उदा. पुटीनला पुन्हा एकदा सोव्हिएत साम्राज्य उभे करायचे आहे आणि म्हणून तो युक्रेनशी युद्ध करतो आहे. नंतर पोलंड, बेलारुस अशा सगळ्या देशांना तो गिळंकृत करणार आहे. ह्याला कुठलाही पुरावा नाही. अब्जावधी डॉलर शस्त्र लॉबीला देण्यासाठी एक सबब आहे. आणि त्यात लाखो युक्रेनी आणि रशियन लोकांचा बळी जातो आहे ह्याची कुठलीही पर्वा नाही. समेट, सामोपचार अशी कुठलीही भाषा बोलली जात नाही.

मी कारभार करत असताना कुठलाही सैनिक मेला नाही असा खोटा दावा म्हातारबाने केला. अफगाणिस्तानात, सिरियात, इराकमधे विविध मंडळींनी विविध प्रकारे सैनिकांना आणि अन्य अधिकार्यांना मारले आहे. तेरा सैनिक तर अफगाणिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात मेले.

पण अर्थात सध्या मिडिया नॅरेटिव्ह असा चालू आहे की ट्रंप खोटारडा आहे आणि बायडन जवळपास कॉफिनवासी झाला आहे. आणि समस्त (बिगर फॉक्स) वाहिन्या हीच पोपटपंची एकमुखाने करत आहेत.
बहुधा अनंतकोटी ब्रह्मांडनायक ओबामाने म्हातारबाला हटवायचे मनावर घेतलेले दिसते!

https://youtu.be/0wDfYzmjt1Q?feature=shared

हा बायडन अवतार डिबेटच्या दिवशी जगाने पाहीला पाहीजे होता! हे बायडन स्पिच.. डिबेटच्या २ दिवसांनंतर.. नॉर्थ कॅरोलायना रॅली मधले!

बायडनच्या वाइट डिबेट परफॉर्मंसनंतर निराश झालेल्या बायडन सपोर्टर्सनी हे स्पिच नक्की बघाच!

हे स्पिच बघीतल्यावर एक गोष्ट नक्की की ज्यांनी बायडनला डिबेट तयारी साठी मदत केली दे ओव्हरप्रिपेअर्ड हिम अँड टोटली कन्फ्युस्ड हिम अँड जंबल्ड हिज थॉट प्रॉसेस! ही इज अ‍ॅट हिज बेस्ट व्हेन ही इज लेफ्ट अलोन! त्या दिवशीच्या त्याच्या आवाजानेही त्याला दगा दिला होता.

फारएंड.. खुप मस्त समजवुन सांगीतलेस. कुडंट हॅव्ह एक्स्प्लेन्ड बेटर!

पण तरिही या अवस्थेत अजुन ४ वर्श देण हे जास्तच आहे...जि ७ ला कुठलही डिबेट नव्हत पण तिथेही तो लॉस्ट वाटत होता..एकदा तर चक्क झोपला होता मग युक्रेनच्या प्रेसिडेन्ट ने जावुन उठवल..फोटो काढायला आला तर दिसेल त्याला सॅल्युट करत होता..
हा बायडन अवतार डिबेटच्या दिवशी जगाने पाहीला पाहीजे होता!>>> बुन्द से गयी वो हौद से नहि आती...डॅमेज इज ऑलरेडी डन.

मला मुळात बायडनची रीइलेक्शन- सेकंड टर्मसाठी उमेदवारी हेच झेपले नव्हते. असो, आमचे रेड स्टेट असल्याने माझ्या मताला तशी काही किंमत नाही.

बायडनने कमलाला मुद्दाम 'नो-विन' सरहद इश्यू देऊ केला. त्याने मुद्दाम अवघड आणि अक्षरक्षः काहीही सोल्युशन नसलेला इश्यु तिच्या गळ्यात घातला. आणि ना कोणाला पुढे जाउ दिलं. म्हातारा अजुनही खुर्ची सोडत नाही.

फा, चार वर्षांपूर्वी हाऊस आणि सिनेट मध्ये कायदे पास करण्यासाठी निगोसीएशन किंवा लॅक ऑफ इट करून तात्याने काय दिवे लावलेले?

चीन, रशिया, नॉर्थ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, युके, कॅनडा, जपान, युक्रेन, साऊथ कोरिया लिस्ट गोज ऑन यांच्या लीडर्स बरोबर कुठल्या लेव्हलची डिप्लोमसी केलेली आणि त्याची निस्तरपट्टी करताना व्हा हा स्टाफ च्या कसे नाकीनऊ येत हे आठवलं..... आणि गेल्या चार वर्षात असे किती प्रसंग आले आठवलं की बायडन अमेरिकेचे हीत बघेल की ट्रम्प स्वतःचे ते उघड आहे. कुठल्या प्रेसिडेंट बरोबरचा स्टाफ अमेरिकेचं हीत बघणारा असेल, आणि कुठला प्रेसिडेंट इव्हील नसेल हे ही कुंपणावरच्या लोकांना समजलं नाही तर मग!
बाकी लेसर ऑफ एव्हिल कोण हाच फक्त निवडणुकीत निकष असतो.
मी डिबेट पाहिली नाही, थोड्या क्लिप्स फक्त पाहिल्या आहेत आणि कल्पना आली.

कितीही खोटारडा खोटारडा म्हणून आक्रस्ताळी शिवीगाळ केली तरी एक गोष्ट सत्य आहे.
ट्रंप अध्यक्ष असताना रशियाने युक्रेनचा कुठलाही भूभाग बळकावला नाही.
बुश, ओबामा आणि बायडन हे सगळे कसे आंतरराष्ट्रीय राजकारणातले महाथोर, धुरंधर, मुत्सद्र, धोरणी, कमालीचे चतुर वगैरे म्हणवले जाणारे नेते
राज्य करत असताना पुटिनने बिनदिक्कत युक्रेनवर हल्ले करुन जमीन बळकावली.

ट्रंप तर म्हणे पुटिनच्या ताटाखालचे मांजर, त्याच्यासमोर शेपूट हलवणारे श्वान वगैरे होते. मग तो सत्तेत असताना पुटिनने कुठलाही हल्ला का नाही केला?

तीच गोष्ट इस्रायल पॅलेस्ताईनबद्दल. ट्रंप सत्तेत असताना अहिनकुल सदृश वैर असणारे इस्रायल आणि सौदी अरेबिया अब्राहम समझौता करून वाटाघाटी करत होते. हमास, हेजबुला वगैरे दैत्यगणांनी ७ ऑक्टोबर स्टाईल कुठलाही हल्ला केला नाही. हौती वगैरे बंडखोर तांबड्या समुद्रातील जहाजांवर क्षेपणास्त्रे डागू धजत नव्हते. इराण बर्यापैकी दबून होता. सुलेमानीला अमेरिकन हल्ल्यात मारूनही तिसरे महायुद्ध तर सोडाच पण मोठ्या चकमकीदेखील झाल्या नाहीत.

पण अर्थात ट्रंप हा काळ्याकुट्ट रंगात रंगवायचा शेंदरी राक्षस आहे असे धोरण असल्यामुळे ह्या गोष्टी पूर्ण दुर्लक्षित रहाणार.

डेमोक्रॅट पक्षाची मोठी पंचाईत झालेली आहे. बायडन हे एक प्रेत आहे हे सगळ्या लोकांना कळलेले आहे. उपराष्ट्रपतीपदावर नेमलेली बाई ही केवळ तिचे लिंग आणि तिच्या त्वचेचा काळा वर्ण पाहून निवडलेली आहे त्यामुळे जवळपास दिवंगत राष्ट्रपतीचा उत्तराधिकारी म्हणून तिला नेमायला फार पसंती नाही. पण एका काळ्या स्त्रीला डावलून न्यूसमसारखा कुणी श्वेतवर्णीयातील श्वेतवर्णीय नेमणे हे पुरोगामीत्वाचा डंका पिटणार्‍या पक्षाला लाजिरवाणे ठरू शकेल.
दुसरीकडे बायडनच्या मढ्याआडून कारभार करणारी आनंदीबाई उर्फ लेडी मॅकबेथ उर्फ जिल बायडनबाई बायडनला पाय उतार होऊ द्यायला जिवापाड विरोध करणार. प्रायमरी वगैरे लोकशाही प्रक्रिया पूर्ण होऊन बायडनचे कलेवर निवडले आहे. त्यामुळे लोकशाहीची ध्वजा खांद्यावर घेतलेले आता ह्या लोकशाही प्रक्रियेला धुडकावून परब्रह्मस्वरूप ओबामाजींच्या पसंतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब कसे करणार, त्या नव्या उमेदवाराचा कसा प्रचार करणार, त्याआधी ट्रंपला फायरिंग स्क्वॉड बोलावून निकाल लावणार का की कुठल्याशा सैनिकी तळावर नेऊन त्याचा निकाल लावणार (आता तर अध्यक्षाला इम्युनिटी मिळाली आहे मग काय मज्जाच मज्जा!) वगैरे बघणे मनोरंजक असणार आहे.

आता तर अध्यक्षाला इम्युनिटी मिळाली आहे >>> Lol जसे काही बायडेनच गेला होता मागायला. तात्यानेच मागितली ना? जरा सहा महिने थांबून मग स्वतः निवडून आल्यावर मागायची.

इम्युनिटी ट्रंपने नाही तर कोर्टाने दिली आहे. ट्रंपने काय केले?
म्हातार्या मढ्याला मिळालेल्या सोयीचा फायदा करून आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावून लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाल्याची दवंडी पिटण्याची सुवर्णसंधी आहे. निदान प्रेताआडून कारभार चालवणारी पाताळयंत्री आनंदीबाई तरी ह्यात लक्ष घालेल अशी आशा!

बायडनप्रेमात न्हाऊन गेलेल्या काही चाहत्यांनी असे शोधले आहे की म्हातार्यात सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत थोडी धुगधुगी असते. तो बोलू शकतो. इतकेच नाही तर जवळपास १५% बोलणे सुसंगत असते. चांगली उपकरणे असतील तर ह्या वेळात त्याची नाडी, हृदयाचे ठोकेही ऐकू येतात म्हणे! ऐकावे ते नवलच!

आता फक्त विविध शत्रूराष्ट्रांचे हल्ले, आण्विक शस्त्र हल्ले, दहशतवादी हल्ले, आर्थिक संकटे, विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय गुंतागुंतीच्या उलाढाली हे सगळे अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील वेळेप्रमाणे १० ते ४ ह्या काळात बसवले की कुशाग्र बुद्धीचा म्हातारा ह्या सगळ्या संकटांना कुंच्याने कोळिष्टके झटकावीत तसे झाडून टाकेल ह्याची खात्रीच बाळगा!

>>तात्यानेच मागितली ना?
हो. लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आपल्या राजकीय विरोधकाला खर्‍या खोट्याची तमा न बाळगता संपवायला निघाले आहेत. आणि त्याकरता ट्रंपने दाद मागितली. कोर्टाने काहीसे समाधानकारक उत्तर दिले. हे करताना अमेरिकन संविधान वाचून हा निर्णय दिला असेल असा समज आहे. निव्वळ ट्रंप मागतो आहे म्हणून द्या असा विचार नसेल अशी आशा.

आता हे उत्तर वापरून ट्रंपचाच निकाल लावून आपण किती महाथोर लोकशाहीवादी आहोत हे मृतप्राय म्हातारा दाखवून देणार का? की आम्ही मागितले नाही म्हणून आम्हाला नक्को असा पवित्रा असणार आहे?

वर न्यूक बटनचा उल्लेख वाचला. अध्यक्षाने एक कळ दाबली आणि जगांत कुठेतरी फटाके फुटणार असे होत नाही. न्यूक संबंधातला निर्णय घेण्याचे काम अध्यक्षाचे आहे, घेतलेला निर्णय अमलांत आणायचे काम लष्करी अधिकार्‍यांचे ( किमान दोन असावेतच ) आहे.

अध्यक्षा सोबत नेहेमी एक काळी सुटकेस ( nuclear football) असते. त्या काळ्या सुट केस मधे आपत्कालीन प्रसंगी अध्यक्षाने काय करायला हवे, कुणाशी संपर्क करायला हवा या संबंधातले मॅन्युअल आहे. सुरक्षित आसर्‍यासाठी बंकरमधे जायला हवे का वर उंच आकाशांत ( ९-११ नंतर अध्यक्ष बुश यांचे air force 1 काही तास आकाशांत होते) अशा संबंधातली माहिती आहे. अध्यक्षच दुसर्‍या बाजूला आहे, तोच आदेश देत आहे याची खातरजमा नॅशनल मिलीटरी कमांड सेंटरचे ( पपेंटॅगॉन) अधिकारी कशी करतील या संबंधातली माहिती तसेच पासवर्ड आहेत.

https://www.businessinsider.com/mysterious-black-briefcase-follows-us-pr...

बायडन व न्युक बटनच्या संदर्भात माझा मुद्दा( की बायडन डझ नॉट लुक मेंटली काँपिटंट इनफ टु हँडल द इंपॉर्टंट अँड क्रिटिकल डिसीजन्स ) अधोरिखीत करण्यासाठी इथे काही जणांना मी अतिशयोक्ती अलंकार वापरला आहे हे समजलेले नाही हे दिसत आहे. असो.

मी परत सगळा डिबेट बघीतला. आय अ‍ॅम अ‍ॅब्स्युल्युटली कन्व्हिंस्ड दॅट ( बोथ मेंटली अँड फिजीकली) बायडन इज डेफिनेटली अनफिट फॉर द यु एस प्रेसिडेंसी फॉर द नेक्स्ट ४.५ यिअर्स! ही विल बी इनकॅपेबल ऑफ डुईंग द जॉब ऑफ द प्रेसिडेंसी . ही मस्ट स्टेप असाइड!

प्रश्न हा आहे की जर त्याने त्याचे नाव मागे घेतले तर मग त्याच्या जागी उमेदवारीसाठी डेमॉक्रॅटिक पार्टीकडे कोणते पर्याय आहेत?

कॅलिफोर्निया गव्हर्नर गॅव्हिन न्युसम?( पण कॅलिफोर्निया सारख्या एक्स्ट्रिम लिबरल स्टेट चा गव्हर्नर सध्याच्या पोलराइज्ड पॉप्युलेशनमधे नॅशनल स्टेजवर कितपत पॉप्युलर होउ शकेल याबाबत मी जरा साशंकच आहे)

मिशिगन गव्हर्नर ग्रेचन व्हिटमर? ( व्हॉट्स हर बॉडी ऑफ वर्क?)

व्हाइस प्रेसिडेंट कमला हॅरीस?( मोठे प्रश्नचिन्ह!)

का अजुन कोणी?

का यंदाची प्रेसीडेंसी आत्ताच ट्रंपला बहाल करुन टाकायची?

बाय द वे, डिबेट मधे ट्रंप जे काही थोडस खर बोलला त्यात त्याने जे बायडनला सांगीतले की तो ( पक्षी: बायडन) ५० यार्ड पेक्षा जास्त लांब गॉल्फ बॉल मारु शकणार नाही ते मात्र ( बायडनच्या स्टिफ व थरथरणार्‍या बॉडीकडे बघुन) खरच वाटत होते!

त्यावर बायडन काहीतरी निरर्थक उत्तरला.. तुझे वजन काय व उंची काय? व मी जेव्हा व्हाइस प्रेसिडेंट होतो.. ( म्हणजे १६ वर्षांपुर्वी!) मी ७ का ८ हँडीकॅप होतो. “. बायडनचे ते उत्तर व एकुणच कोण गॉल्फ चांगला खेळु शकतो याबद्दलचे त्या दोघांमधले पोरकट अ‍ॅर्ग्युमेंट बघुन ही दोन ( एवढी म्हातारी पण पोरकटपणे गॉल्फवरुन भांडणारी! ) माणसे यु एस प्रेसिडेंटचे उमेदवार आहेत याचा विचार करुन डोके एकदम सुन्न झाले व मनातल्या मनात मीच म्हटले.. मे गॉड ब्लेस अमेरिका अँड मे गॉड सेव्ह अमेरिका( फ्रॉम हुएव्हर विन्स धिस यिअर्स इलेक्शन!)

माझ्या मते डेमोक्रॅट्सनी पहिल्या टर्मचे एक वर्ष पूर्ण झाल्या झाल्या दुसरी टर्म नाही असे धरुन उमेदवार निवड सुरु करायला हवी होती. ६ जाने वारीचा तमाशा, सत्ता हातात ठेवण्यासाठी रिपब्लिकन्सनी केलेला सर्व प्रकारचा खोटपणा या पार्श्वभूमीवर देशाच्या हिताच्या दृष्टीने 'मी सेकंट टर्मसाठी उमेदवार नसेन' असे म्हणणे हे पीआर म्हणूनही चांगले दिसले असते. त्याचा फायदा डेमोक्रॅट्सना मिळता. त्याशिवाय दुसरी टर्म नाही म्हणजे नव्या उमेदवाराला बर्‍यापैकी कोरी पाटी, जी ट्रंपकडे नाही याचाही फायदा मिळता.

<<का यंदाची प्रेसीडेंसी आत्ताच ट्रंपला बहाल करुन टाकायची?>>

आताच देउन टाका प्रेसिडेन्सि त्रम्प्याला.
बायडेन नि डेमोक्रॅट्स आता संपल्यातच जमा आहेत.
आता काँग्रेसमधे कुणाला मेजॉरिटी मिळणार आहे ते बघायचे. रिपब्लिकनांना मिळाली तर पहिली चार वर्षे डेमोक्रॅट्स ना तुतुंगात टाकण्यात किंवा ठार मारण्यात जातील. त्रंप्याला राजा म्हणून घोषित करतील नि तो जिझिया कर लावेल जे गोरे नाहीत त्यांच्यावर.

'आ बैल मुझे मार' ही बायडेन कँपेन ची टॅग लाईन असवी.
मुळात डिबेट ला आपण लायक नाही हे बायडेन ने ( व हँंडलर्स नी) समजून घ्यायला हवे होते व 'मी कन्व्हिक्टेड फेलन शी डिबेट करणार नाही' ही सबब देऊन पळवाट काढायला हवी होती. इथे बायडेननेच डिबेट चे आव्हान दिले. बरं डिबेट मध्ये माती खाल्यावर मोठा गाजावाजा करून ए बी सी ला मुलाखत ( तीही लाईव्ह नव्हे) दिली, तिथेही तेच. ट्रम्प पेक्षा मी जास्त गर्दी जमवू शकतो - इती बायडेन.

सत्ता हातात ठेवण्यासाठी रिपब्लिकन्सनी केलेला सर्व प्रकारचा खोटपणा या पार्श्वभूमीवर देशाच्या हिताच्या दृष्टीने 'मी सेकंट टर्मसाठी उमेदवार नसेन' असे म्हणणे हे पीआर म्हणूनही चांगले दिसले असते.>>> पण बायडेनची दिवसे दिवस खराब होणारी परिस्थिती दिसत असतानाही त्याच्या टिमने आणी डेम्सने सगळ लपवुन त्यालाच पुढे आणण्यासाठी केलेला आटापिटा हाही एक प्रकारचा खोटारडेपणाच होता...त्यापेक्षा परिस्थिती आधिच मान्य करुन दुसरा उमेदवार देण जास्त सोयिस्कर होत...आता म्हणतायत की दुसरा उमेदवार द्या...ज्या साठी मला नाही वाटत कुणी तयार होइल...४ महिन्यावर निवड्णूका असताना कुणी कशाला हि रिस्क घेइल्?

<< त्यापेक्षा परिस्थिती आधिच मान्य करुन दुसरा उमेदवार देण जास्त सोयिस्कर होत...आता म्हणतायत की दुसरा उमेदवार द्या...ज्या साठी मला नाही वाटत कुणी तयार होइल...४ महिन्यावर निवड्णूका असताना कुणी कशाला हि रिस्क घेइल्? >>

----- आज निर्णय घेतला तरी चालण्यासारखे आहे. दिवसांदिवस परिस्थिती आणाखीनच बिकट बनत आहे.

बायडन महाशय ३६ वर्षे सिनेट मधे होते ( १९७३- २००९), १२ वर्षे व्हाईटहाउस ( व्हाईट हाऊस मधे होते... दैदीप्यमान कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय एव्हढा कठिण का वाटत आहे?
अनेक पात्र उमेदवार आहेत आणि अजूनही वेळ गेलेली नाही.

अनेक पात्र उमेदवार आहेत आणि अजूनही वेळ गेलेली नाही.>>> ओके! अनेक उमेदवार असले तरी पार्टी ने ठरवल आणि झाल इतक सोप आहे का? प्रत्येक पार्टीची प्रोसेस असणार..त्यालाच महिना-२ महिने लागतिल मग प्रचार करणार कधी?जेमतेम ४ महिने उरलेत राष्टिय निवडणूकाच्या स्ट्रॅतर्जिच वर्श वर्श आधी ठरतात .त्यातुन उमेदवार देण हे बायडन पर्यायाने पार्टच्च कमजोर असल्याच जाहिर करण आहे...मतदाराला इतकही ग्रुहित धरता येणार नाही...
त्यातही जो उत्सुक असेल त्याचे चान्सेस पुढ्च्या वेळेस जास्त आहेत हे नक्की अस असताना हरण्याचि नामुष्की का कोण घेइल...

कमला हॅरिसला कर्तुत्वशून्य म्हणात तुम्ही लोकं पण बायडनने तिच्या गळ्यात बांधलेली धोंड ती कशी मनुव्हर करु शकली असती? जर सीमा बंद करा म्हटलं तर डेम्सना ते नको असतं कारण मग ट्रंप्यात आणि त्यांच्यात फरक काय उरला? त्यांच्याही व्होट बँकला धक्का. अशा वेळीतिने करायला काय हवं होतं?

हा आलेल्यांना?अमेरीकेने, स्वखर्चाने डिपोर्ट करणं? किती खर्चिक काम आहे ते.

दगडाखाली हात आला तिचा. नो-विन जॉब. अर्थात मला तिचा पुळका नाही. जस्ट माबोकरांची मते ऐकण्याकरता ...

जर सीमा बंद करा म्हटलं तर डेम्सना ते नको असतं कारण>>> त्याची वोट बॅन्क आहे ती..
यावर एक पोल घेतला तर मिशेल ओबामा निवडून येण्याचे चान्सेस आहेत म्हणे पण तिला निवडणूक्च लढवायची नाहिये...मला वाटत आता खुप उशिर झालाय कुणी बदली पर्सन द्यायला...(ट्रम्प किवा रिपब्लिकन आवडतो अस नाहिच्चे )खरतर मला या बाय पार्टिझमचाच कटाळा आलाय...दोन्ही पार्ट्या डिप डाउन सारख्याच वाटतात मला.

अहो इतक्या आयत्या वेळी कामवाल्या बाईला बदली देणे सुद्धा कठिण, मग प्रेसिडेंटला?

अमेरिकेच्या पुराणमतवादी कोर्टाने राष्ट्रध्यक्ष राजा असतो अश्या तर्हेचा निर्णय दिला आहे. अवघड आहे.

And simultaneously GOP wants us to believe that they want to limit power of government, while giving umlimited immunity to president.

Pages