Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक्स वर बायडन बद्दल लिहिले
एक्स वर बायडन यांच्या तब्येतीबद्दल लिहिले जात आहे ते खरंय का ?
सम्राज्ञी मिशेलजी कृपावंत
सम्राज्ञी मिशेलजी कृपावंत झाल्या तर चित्र बदलू शकेल. म्हातार्याला जाण्यासाठी दबाव आणला तसा कदाचित सम्राज्ञींवर येण्यासाठी दबाव टाकला जाईल आणि मग त्या आपला जमिनीवरून दशांगुळे वर चालणारा रथ खाली उतरवून सामान्यांच्या उद्धारासाठी आणि ट्रंपासुराच्या निर्दालनासाठी येतील कदाचित!>>आज तर शेंडेंच्या जीभेवर सरस्वतीने क्लास उघडल्याचे फिल आले
https://x.com/KamalaHarris
https://x.com/KamalaHarris/status/1814752157838499923
Kamala Harris
@KamalaHarris
Let’s be clear: Donald Trump would sign a national abortion ban and restrict access to contraception if given the chance.
That is what’s at stake in November.
We will stop him.
https://x.com/carolinecwilder/status/1814752670990717139
ट्रंपचं वक्तव्य (व्हिडियो क्लिप )
To put it simply, its now upto the states. I am a believer of the expections -the three expections as you know - rape , incest, life of the mother - the danger for the life of the mother.
हे राज्यांनीच ठरवायचं आहे, असं तो पुन्हा पुन्हा म्हणतोय.
No I wont support a national ban.
हे राज्यांनीच ठरवायचं आहे,
हे राज्यांनीच ठरवायचं आहे, असं तो पुन्हा पुन्हा म्हणतोय. >> तो ह्या क्षणी जे बोलतो ते पुढच्या क्षणी बदलतो हे अजून ध्यानात नाही आलेय का ? मूळात राज्यांकडे पाठवणे हीच ह्या लबाड लोकांनी चोरवाट शोधून काढलेली आहे.
>>हे राज्यांनीच ठरवायचं आहे,
>>हे राज्यांनीच ठरवायचं आहे, असं तो पुन्हा पुन्हा म्हणतोय.
No I wont support a national ban.>> राज्यांनी ठरवायचे परीणाम आम्ही ऑलरेडी भोगत आहोत. ट्रंपची वोट बॅक विचारात घेता नॅशनल लेवलवर अपवादासह कायदा करणे परवडणार तर नाहीच, खूप महागातच पडेल तेव्हा ही पळवाट. आमच्या भागात जननक्षम वयोगटातल्या स्री च्या आरोग्याची एकंदरीतच परीस्थिती फार बिकट आहेच पण त्यापुढील वयोगटालाही कठीण जात आहे.
ते नो फॉल्ड डिवोर्स रद्द करायचे पण प्रयत्न सुरु आहेत ना!
मी ऐकलेले की चिक-अ-फिले फार
मी ऐकलेले की चिक-अ-फिले फार रिपब्लिकन आणि फॅनॅटिक आहेत. ते जो इन्श्युरन्स देतात, त्यात म्हणे ते गर्भनिरोधक, अॅबॉर्शन वगैरे कव्हर करत नाहीत.
https://en.wikipedia.org/wiki/Chick-fil-A_and_LGBT_people
एलजीबीटी च्याही विरोधात आहेत.
कमलाबाई आल्या तर मूल
कमलाबाई आल्या तर मूल एलेमेंटरी स्कूलमधे असेपर्यंत मुलाचा "गर्भपात" करता येईल असा नवा कायदा आणेल बहुधा! महिलावर्गात आनंदीआनंद. पोरगे रडके आहे? करा गर्भपात. बेबी फूड संपले? करा गर्भपात. आणि मग स्त्रीमुक्तीचा झेंडा उत्तुंगपणे फडकू लागेल!
गर्भपाताला पूर्ण मुभा मिळाली की देशाची भरभराट होणार. दक्षिण सीमेवरील बेलगाम घुसखोरीचा काही वाईट परिणाम नाही. विविध जागतिक युद्धे आपोआप बंद होणार.
कमलाबाई ह्या सगळ्या समस्यांचा रामबाण उपाय बनल्या? इतके दिवस त्यांच्या लोकप्रियतेचे आकडे पार गाळात गेलेले होते. सगळ्यात कमी लोकप्रिय उपराष्ट्रपती असा बहुमान ह्या बाईंच्या नावावर होता. एका रात्रीत ह्या बाईंनी असे काय कर्तृत्व गाजवले की त्या आता लोकप्रियतेच्या पार शिखरावर जाऊन पोचल्या?
आणि म्हातारबा कुठल्याशा कारणाने नव्याने निवडणूक लढवत नाही हे स्पष्ट झाले आहे. पण तेच कारण वापरून त्याला राष्ट्रपतीपदावरून पाय उतार व्हायला का लावत? जर म्हातार्याला निवडणूकीचा प्रचार झेपणार नसेल तर पुढील ७ महिने राष्ट्रपतीपद तरी कसे झेपणार? कमलाबाईला राष्ट्रपती बनवून निदान ७ महिने तरी एक महिला राष्ट्रपती नेमल्याची टिमकी डेमोक्रॅट मंडळींना वाजवता येईल.
सामो,
सामो,
सुप्रीम कोर्टाने ट्रंप अॅडमिनिस्टेशनच्या बाजूने निकाल दिला त्यामुळे प्रिवेंटिव केअर मधले गर्भनिरोधकाचे कवरेज धर्म विरोधी असे म्हणत कंपन्या इंशुरन्समधून नाकारु शकतात. त्यामुळे हॉबी लॉबी, चिक फिले वगैरे कवरेज द्यायला बांधील नाहीत- कवरेज देत नाहीत.
अह्ह्ह ओके. होय हॉबीलॉबी ही.
अह्ह्ह ओके. होय हॉबीलॉबी ही.
गर्भनिरोधकाचा वापर काय किंवा
गर्भनिरोधकाचा वापर काय किंवा गर्भपाताबाबतचा निर्णय काय यात वैद्यक क्षेत्रातील व्यक्तींचे मत महत्वाचे असायला हवे. माझे धार्मिक मत काहीही असो दुसर्या व्यक्तीच्या आरोग्या संबंधी निर्णय हा माझ्या धार्मिक मतावर असणे हे मला गैर वाटते.
गर्भ निरोधकाचा वापर आणि सुरक्षित गर्भपाताची सोय हा मुद्दा जरी वरवर बघता स्रीदेह आणि त्याचे आरोग्य या बद्दल असला तरी विवाहित स्त्रीच्या बाबतीत अॅक्सेस नसण्याचे परीणाम सर्व कुटुंबालाच भोगावे लागणार आहेत. अविवाहित स्त्रीच्या बाबतीतही स्त्री, तिचे कुटुंब, जोडीदार आणि त्याचेही कुटुंब असे सगळेच ओढले जातात. स्त्रीमुक्तीशी गर्भपाताचा संबंध लावणे मला अजिबात मान्य नाही.
विवाहित स्री, २-३ मुले आहेत, मात्र ४०+ नंतर वापरत असलेली रिदम मेथड फसली आणि नको असलेले मातृत्व अशा बर्याच केसेस होतात. अशावेळी त्या कुटुंबावर आर्थिक ताण येतोच जोडीला नात्यांवरही खूप ताण येतो. कुटुंबातल्या मोठ्या मुलांवर अचानक भावंड संगोपनाची जबाबदारी येणे देखील होते.
गर्भपात केवळ संतती नको म्हणून केला जात नाही तर बरेचदा संतती हवी असूनही वैद्यकीय कारणास्तव 'कमी दु:खाचा पर्याय' म्हणून आवश्यक असतो.
>>> पोरगे रडके आहे? करा
>>> पोरगे रडके आहे? करा गर्भपात. बेबी फूड संपले? करा गर्भपात. आणि मग स्त्रीमुक्तीचा झेंडा उत्तुंगपणे फडकू लागेल!

काय लिहिलंय त्याचा अर्थ लागला तर नीट चिडता तरी येईल!
आता प्रेत इतर बोलणे बंद
आता प्रेत आणि इतर बोलणे बंद झाल्याने तारतम्य राहिलेले नाही. असंही कधी होतं!
अमितव +१
अमितव +१
>>आता प्रेत आणि इतर बोलणे बंद
>>आता प्रेत आणि इतर बोलणे बंद झाल्याने तारतम्य राहिलेले नाही.
अहो ते प्रेत भूत बनून पुढील ७ महिने अमेरिकेन लोकांच्या मानगुटीवर बसलेले असणार आहे. इतकी घाई नको. अजून तरी पुरते शवपेटिकेत गेलेले नाही.
>>
काय लिहिलंय त्याचा अर्थ लागला तर नीट चिडता तरी येईल!
<<
किती मर्यादेपर्यंत गर्भपात केला तर त्याला कायद्याची संमती असावी ह्यावर पुरोगामी डावे लोक हिरिरीने भांडत असतात.
वर्जिनियाच्या एका माजी गवर्नरने असा विचार मांडला होता की बालकात काही दोष असेल आणि डॉक्टर आणि आईची संमती असेल तर बालकाचा जन्म झाल्यावरही त्याला ठार करायला हरकत नसावी.
https://www.cnn.com/2019/01/31/politics/ralph-northam-third-trimester-ab...
हाच विचार पुढे नेऊन आणखी काही वर्षापर्यंत स्वतंत्र विचाराच्या, स्वतःच्या शरीरावर पूर्ण मालकी हक्क असणार्या मातेला ती मुभा (अर्थातच परमेश्वररुपी डॉक्टरच्या परवानगीने) दिली जावी ह्या अपेक्षेत वावगे काय?
शेंडे, हा इतका पराकोटीचा
शेंडे, हा इतका पराकोटीचा तिरस्कार डोक्यात घेऊन तुम्ही रोज सकाळी उठता?? राजकीय मतभिन्नता असणं आणि ‘तरसासारखं हासणं’, ‘प्रेत’ वगैरे शब्द एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत सातत्यानं वापरणं ह्यात बराच फरक आहे.
बाकी जो निरर्थक शब्दिक कचरा इथे टाकता त्यासाठी काही विशेष प्रशिक्षण घेतलंय का ‘झरा मूळचाच‘ आहे?
शेंडेंच्या गर्भपातावरच्या
शेंडेंच्या गर्भपातावरच्या तद्दन अडाणी बडबडीला पूर्वी व्यवस्थित लॉजिकल उत्तरे दिलेली आहेत इथे सगळ्यांनी पण मग ते सोयिस्कर रित्या काढता पाय घेतात किंवा दुर्लक्ष करतात. मग थोडा वेळ जाऊ देऊन पुन्हा परत येऊन पुन्हा तीच ती स्त्री मुक्ती , हत्या, बालकाला ठार मारणे वगैरे वायफळ पोस्टी लिहितात.
ट्रंपचा वोटर बेस सगळा असलाच , हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत.
अवघड आहे.
सिक्रेट सर्विसच्या डी ई आय
सिक्रेट सर्विसच्या डी ई आय कोट्यातून घुसलेल्या प्रमुख चितळेबाईंनी राजीनामा दिल्याचे समजते.
डी ई आय ही विचारसारणी किती प्रचंड प्रमाणात यशस्वी होते हे बाईंनी दाखवून दिले!
असेही म्हणतात की लेडी मॅक्बेथ अर्थात जिल बायडन ह्यांची ही चितळेबाई लाडकी होती म्हणूनच तिला ह्या पदावर नेमले होते.
कालच्या हियरिंगमधे दोन्ही पक्षांनी हिला मनसोक्त शिव्या घातल्या तेव्हाच ह्यांची गच्छंती होणार ह्याची चुणुक दिसली होती.
खरे तर हिच्यावर ढिसाळपणा करून लोकांचा जीव धोक्यात घातला म्हणून गुन्हा दाखल केला पाहिजे. निव्वळ रा़जीनामा पुरेसा नाही.
हिने बटलरच्या सभेच्या वेळेसच होणार्या जिल बायडनच्या कार्यक्रमाला ट्रंपच्या तिप्पट लोक सुरक्षा रक्षक म्हणून पाठवले. तिथली गर्दी ट्रंपच्या कार्यक्रमाच्या एक शतांश इतकी प्रचंड होती!
>>वर्जिनियाच्या एका माजी
>>वर्जिनियाच्या एका माजी गवर्नरने >> पुन्हा तेच! एका व्यक्तीचे चुकीचे मत! स्वतंत्र विचाराच्या, स्वतःच्या शरीरावर पूर्ण मालकी हक्क असणार्या मातेला ती मुभा असे म्हणून मुद्दाम विपर्यास करणारच असाल तर चालू दे!
आणि त्या व्यक्तीचेही
आणि त्या व्यक्तीचेही संदर्भाला सोडून कोट केलेले मत.
मला खात्री आहे त्यांनीच दिलेली लिंक त्यांनी पूर्ण वाचलेली नाही.
शेंडेनक्षत्र यांचा इन्सेंटिव
शेंडेनक्षत्र यांचा इन्सेंटिव काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्या इतका प्रामाणिक जीव तोडून काम करणारा एंप्लोई/कार्यकर्ता / फ्रीलांसर माझ्य पाहण्यात नाही. रिपब्लिकन काहीतरी बरोबर कपेन्सेशन देतायत त्याना. कोणाला यांची काम करण्याची पद्धत माहित असेल तर ऐकायला आवडेल.
राज्यानुसार अॅबॉर्शन संबंधीत
राज्यानुसार अॅबॉर्शन संबंधीत कायदे/ अपवाद वगैरे
गर्भधारणेनंतर नक्की किती
गर्भधारणेनंतर नक्की किती महिनेपर्यंत महिलेला गर्भपाताची कायदेशीर संमती असावी?
ह्या प्रश्नाचे कुठलाही डेमोक्रॅट सरळ उत्तर देत नाही. ह्याचे काय कारण?
>>आणि त्या व्यक्तीचेही संदर्भाला सोडून कोट केलेले मत.
मला खात्री आहे त्यांनीच दिलेली लिंक त्यांनी पूर्ण वाचलेली नाही.
<<
कुठला संदर्भ सोडला? मुलाला दोष असेल, आईची मंजूरी असेल, डॉक्टरची संमती असेल तर जन्म झाल्यावर बाळाला ठार करायला हरकत नाही असे मत ह्या गव्हर्नरने मांडले नाही का? नेहमीचा "संदर्भ सोडून" वगैरे कांगावा करू नका. कुठला मुद्दा चुकीचा आहे?
>>
>>
शेंडेनक्षत्र यांचा इन्सेंटिव काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्या इतका प्रामाणिक जीव तोडून काम करणारा एंप्लोई/कार्यकर्ता / फ्रीलांसर माझ्य पाहण्यात नाही. रिपब्लिकन काहीतरी बरोबर कपेन्सेशन देतायत त्याना. कोणाला यांची काम करण्याची पद्धत माहित असेल तर ऐकायला आवडेल.
<<
हो, हो, मला भरपूर "कपेन्सेशन" मिळते. काळजी नसावी!
शेंडेंच्य पोस्ट्स ट्रंप च्या
शेंडेंच्य पोस्ट्स ट्रंप च्या वरताण मिसोजिनिस्ट आहेत. एक बाई सिक्रेट सर्विस ची इन चार्ज होती म्हणजे " डिईआय कोट्यातलीच असणार " ???
खुद्द ट्रंप ने देखिल असले दावे केलेले (दिसले) नाहीत!
आतापर्यन्त अमेरिकेच्या सिटिंग प्रेसिडेन्ट वर किती प्राणघातक हल्ले झालेत हे माहित असेलच. त्यातल्या प्रत्येक वेळी बायकाच असतील ना सिक्युरिटी च्या कामावर ?
" बाई आहे म्हटल्यावर वशिल्यानेच आली असणार आणि केपेबल तर नसणारच" ही गलिच्छ विचारसरणी आणि वर ती उघडपणे मिरवायची हौस !! धन्य आहे सर्व!!
शेंडेंच्या पोस्ट वाचून
शेंडेंच्या पोस्ट वाचून कुणाचाही समज होईल की एनाराय महिला फोनवर बोलताना 'अय्या आपण कित्ती दिवस भेटलो नाही, शनीवारी ओक ट्री वर भेटू, पाणीपुरी, आयब्रो व गर्भपात करून घेऊ !' असे बोलत असतील !
>>
>>
शेंडेंच्या पोस्ट वाचून कुणाचाही समज होईल की एनाराय महिला फोनवर बोलताना 'अय्या आपण कित्ती दिवस भेटलो नाही, शनीवारी ओक ट्री वर भेटू, पाणीपुरी, आयब्रो व गर्भपात करून घेऊ !' असे बोलत असतील !
<<
गर्भपात ही एक कायदेशीर पण अपवादात्मक, अपरिहार्य गोष्ट असावी हा विचार मागे पडून आता तो स्त्री मुक्तीचे प्रतीक आहे. आई आणि डॉक्टरची परवानगी असेल तर वाट्टेल तेव्हा वाट्टेल तसा गर्भपात करता आलाच पाहिजे. असा अट्टाहास पुढे येतो आहे.
अनेक लोक विनोद म्हणून गर्भपात हा विषय घेतात. हे हळूहळू भिनणारे विष आहे. इथे एका अर्भकाला ठार केले जात आहे ह्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होईल आणि एखादा दात काढला, चामखीळ काढली इतके सहज ते केले जावे असा विचार पुढे येतो आहे. तो मला पटत नाही.
असो. आपला काल्पनिक संवाद हा निव्वळ एन आर आय महिलाच बोलेल असे नाही. कुणीही पुरोगामी स्त्री बोलू शकेल. असो.
>>
>>
शेंडेंच्य पोस्ट्स ट्रंप च्या वरताण मिसोजिनिस्ट आहेत. एक बाई सिक्रेट सर्विस ची इन चार्ज होती म्हणजे " डिईआय कोट्यातलीच असणार " ???
खुद्द ट्रंप ने देखिल असले दावे केलेले (दिसले) नाहीत!
<<
खुद्द ट्रंपने दावे का करावेत? त्याच्या हितचिंतकांनाही करू द्या की! सगळ्या गोष्टी ट्रंपच्या तोंडातून वदवायची गरजच काय? उगीच काहीतरी फडतूस सबबी सांगू नका.
अहो ह्या चितळे बाईंनी आपले डी ई आय विषयक उदार विचार मांडले आहेत. त्यांना आपल्या खात्यात ३०% स्त्रिया भरती करायच्या होत्या. लायकी न बघता किंवा लायकीशी तडजोड करून लिंग, लैन्गिक कल, त्वचेचा रंग अशा गोष्टींकडे लक्ष देणे आणि त्या पाहून भरती करणे तेही अशा कामासाठी जिथे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे लाजिरवाणे आहे.
चितळे बाईंच्या कालच्या जबानीतून ती एक सर्वथा नालायक बाई आहे हे स्पष्ट झाले आहे. अगदी साध्या प्रश्नांना उत्तर देता आले नाही तिला. आणि प्रत्येक वेळी दुसर्याकडे बोट दाखवणे. आमचे लोक तपास करत आहेत वगैरे वगैरे. स्वतः प्रमुख असून ती काहीही करताना दिसत नाही.
एकंदरीत शनिवारी जो ढिसाळपणा झाला तो पहाता ह्यात डी ई आयचा मोठा सहभाग असण्याची शक्यता आहे किंवा म्हातार्याने सुपारी देऊन सिक्रेट सर्विस वाल्यांना काणाडोळा करायला लावले. म्हणजे एक तर वोक किंवा कमालीचे भ्रष्ट.
त्यावर लगेच स्त्री द्वेष्टा वगैरे निरर्थक आकांडतांडव करू नये.
गर्भधारणेनंतर नक्की किती
गर्भधारणेनंतर नक्की किती महिनेपर्यंत महिलेला गर्भपाताची कायदेशीर संमती असावी?
ह्या प्रश्नाचे कुठलाही डेमोक्रॅट सरळ उत्तर देत नाही. ह्याचे काय कारण?
>>>$$
या प्रश्नाचे उत्तर डेमोक्रॅटस् किंवा रिपब्लीक यांनी का ठरवायचे, का द्यायचे? गर्भवती स्त्रीची इच्छा आणि तिची फिजीकल व मानसिक कंडीशन (फक्त) याबाबतचा डॉक्टरी सल्ला एवढ्या गोष्टी पुरेशा नाहीत? जर बाईला प्रेग्नन्सी फुलटर्म कॅरी करून मुल जन्माला घालायचे नसेल तर इतर कोणाचा काय संबंध? ज्या निर्णयाने तिची शारिरीक व मानसिक अवस्था कायमस्वरूपी बदलणार असेल त्या निर्णयात तिला ‘से’ नाही कारण कुठल्या तरी रॅंडम माणसाच्या धार्मिक भावना दुखावतात?
१९६९ पासून कॅनडात गर्भाच्या
१९६९ पासून कॅनडात गर्भाच्या कुठल्याही अवस्थेतील गर्भपात कायद्याने संमत आणि स्टेट इंशुरन्स मध्ये कवर्ड आहे. ५० + वर्षे गर्भपाताचा दर बदललेला नाही. https://en.wikipedia.org/wiki/Abortion_in_Canada
घरी गोळ्या घेऊन केलेले गर्भपात यात धरले जात नाहीत पण ते गर्भधारणेनंतर लगेच होतात. काही क्लिनिक्स मधले काही राज्यांतील रिपोर्ट होत नाहीत. पण गर्भपात कायदेसंमत आणि तुमच्या भाषेत फुकट आहे. त्यामुळे मुद्दाम जी क्लिनिक्स रिपोर्ट करत नाहीत (कारण अगदी टिपिकल सरकारी आहेत. ज्युसी काही नाही त्यात) तिकडे जाऊन कोण कशाला गर्भपात करेल? जवळच्या हॉस्पिटलातही फुकटच होतो. आणि प्रो लाईफवाले पोस्टर बिस्टर घेऊन गिल्ट देत नाहीत तुमच्या सारखे. पण तरी रांग लागलेली काही दिसली नाही बुवा!
इथे राज्यांनुसार आणि गर्भ वयानुसार डेटा ही मिळेल. https://www.arcc-cdac.ca/media/2020/07/statistics-abortion-in-canada.pdf
गर्भपात ही एक कायदेशीर पण
गर्भपात ही एक कायदेशीर पण अपवादात्मक, अपरिहार्य गोष्ट असावी >>> बहुतांश लोक इतकेच म्हणत आहेत. जे काय ५-१० टक्के टोकाचा विचार करणारे असतील त्यांना विरोध करायला ९०% स्त्रियांवर अन्याय का करायचा? स्त्रियांनाच ठरवू देत की.
ही सगळी चर्चा काही महिन्यांपूर्वी झालेली आहे.
Pages