२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>. .त्याची ओळख पटणार नाही इतपत त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवणे वगैरे नियोजन करत नाही. तो फक्त बुल्स आय वगैरे उद्दिष्ट सांगतो. उरलेले काम त्याच्या हाताखालच्या यंत्रणा चोख करणार.<<
पॉइंट आहे. इंटरेस्टिंगली, दोज हु ब्लेम्ड ट्रंप फॉर ऑर्केस्ट्रेटिंग जॅन ६ एपिसोड, कन्विनियंटली इग्नोर्ड, वेंट रेडियो साय्लंट ऑन बाय्डन्स इन्स्टिगेटिंग कामेंट अबौट ट्रंप अ‍ॅज ए बुल्साय. गो फिगर..

शेवटि काय, तर एखादा माथेफिरु अशा प्रकारच्या डॉगविसलची वाटंच बघत असतो. या हल्ल्याकरता बाय्डनला जबाबदार धरता येइल? डेम्सनी प्रिसिडंस ऑलरेडि पाडलेला आहे...

https://x.com/Iyervval/status/1812472056820195676
हे मत ऐका.
मारेकर्याने एक मोठी, लांबलचक स्नायपर बंदूक वापरली. तो शांतपणे आपली मोठी बंदूक घेऊन त्या इमारतीजवळ पोचला, छतावर चढला. त्या छताचा रंग पांढरा होता आणि मारेकर्‍याने गडद रंगाचा शर्ट घातला होता जो उठून दिसत होता.
हळूहळू रांगत तो इप्सित स्थळी पोचला आणि आपले काम केले. सिक्रेट सर्विसच्या लोकांना हे बघणे आणि त्यावर उपाय करणे शक्य होते पण त्यांनी ते केले नाही. त्याला कुणी पोलिस वा अन्य सुरक्षा यंत्रणानी कुठलही अटकाव केला नाही.
अधिकृत रित्या ह्या मारेकर्याची जी ओळख, वय वगैरे सांगितले जात आहे ती तरी खरी मानायची का हाही प्रश्नच आहे.
स्नायपर बंदूक इतक्या लांबच्या अंतरावरून अचूक चालवणे ह्याला उत्तम प्रशिक्षण, दीर्घ सराव आणि सखोल ज्ञान लागते (वार्याची दिशा आणि गती, गोळीचा वेग आणि लक्ष्यापासूनचे अंतर वगैरे वगैरे). २०-२२ वर्षाच्या मुलाने हे हत्यार आणि प्रशिक्षण कुठून मिळवले हे रहस्य आहे (आणि ते बहुधा रहस्यच रहाणार!)
हा ढिसाळपणा आहे की नियोजनबद्ध दुर्लक्ष आहे? आपणच ठरवा.

>>> २०-२२ वर्षाच्या मुलाने हे हत्यार आणि प्रशिक्षण कुठून मिळवले हे रहस्य आहे

रहस्य काय आहे त्यात?!
>>> The AR-15 rifle, billed as “America’s rifle” by the National Rifle Association, has been commonly used by mass shooters and is one of the most ubiquitous weapons in the United States.

फार अभिमान आहे ना गन्स बाळगता येण्याचा?!

>>फार अभिमान आहे ना गन्स बाळगता येण्याचा?!
तुम्हाला फार शल्य आहे ना लोकांकडे बंदुका आहेत म्हणून? मग तुमच्या लोकांच्या हातात सत्ता असताना सगळ्यावर सरसकट बंदी का नाही घातली बंदुकांवर?
सदर नेमबाजाने इतक्या प्रदीर्घ अंतरावरून अचूक मारा करण्याचे शिक्षण कुठे घेतले? कुठुनतरी बंदूक मिळवली तर आपोआप अचूक नेमबाजी वगैरे अवगत होते असे आपण नवे संशोधन केलेत का?

त्याने सदर बंदूक कायदेशीररित्या नियम पाळून विकत घेतली का चोरली का कुण्या सरकारी अधिकार्याने आणून दिली हे अजून उलगडलेले नाही. त्यामुळे लगेच रिपब्लिकन पक्षाला शिव्या द्यायची घाई करू नका.

मग तुमच्या लोकांच्या हातात सत्ता असताना सगळ्यावर सरसकट बंदी का नाही घातली बंदुकांवर? >> हो ना, हा कळीचा प्रश्न आहे खर तर. या डेमोक्रेट्स ना तुमच्या गन्स केव्हाच्या काढून घ्यायच्या आहेत. "अनंत कोटी ब्र्ह्मांडनायकां"नी पण जंग जंग पछाडून प्रयत्न केले... पण घेता का आल्या नसव्यात बरं? यांना सगळ्या सिस्टेम्स मॅनिप्युलेट करता येतात, इलेक्शन चोरतात, प्रतिस्पर्ध्यावर स्नायपर अटॅ़क करतात पण गन्स वर बंदी का बरं घालता आली नसेल?

>>
पण घेता का आल्या नसव्यात बरं? यांना सगळ्या सिस्टेम्स मॅनिप्युलेट करता येतात, इलेक्शन चोरतात, प्रतिस्पर्ध्यावर स्नायपर अटॅ़क करतात पण गन्स वर बंदी का बरं घालता आली नसेल?
<<
कारण उघड आहे. तसे करण्याची डेम्स्ची काडीचीही इच्छा नाही. बंदुका वापरुन केलेल्या हिंसाचाराबद्दल ठो ठो बोंबा मारायच्या आणि प्रत्यक्ष कारवाई काही नाही.
आपला बंदूकविरोध हा केवळ हे राजकीय हत्यार आहे रिपब्लिकन पक्षाला "बुल्स आय" बनवण्यापुरते.

अनेक डेमोक्रॅट्सच्या मनात असलेली खंत एका काँग्रेसमनसाठी काम करणार्‍या एका स्त्रीने आपल्या ट्वीटमधे व्यक्त केली
जॅकलीन मॉर्सॉ हे तिचे नाव. ती बेनी थॉम्सन नामक थोर (अर्थातच डेमोक्रॅट) काँग्रेसमनच्या सेवेत नोकरीत आहे.
“I don’t condone violence but please get you some shooting lessons so you don’t miss next time ooops that wasn’t me talking.”
अर्थात मी अशा हिंसेचे समर्थन करत नाही. पण पुढच्या वेळी गोळी झाडताना आधी थोडे प्रशिक्षण घे. असा नेम चुकता कामा नये! अर्रर चुकून बोलले!
किती छान भावना आहे ना?
लाजेकाजेस्तव, नाईलाजाने सदर काँग्रेसमनने त्या स्त्रीला काही काळाने नोकरीतून मुक्त केले आहे असे समजते.

गनमॅन रजिस्टर्ड रिपब्लिकन होता. ऐतेन!

शेंडे, हे बाकी तुमचं आवडतं मला - डेम्सनी निषेध केला की तो तोंडदेखलाच आहे म्हणायचं आणि नाही केला तर ‘बघा बघा यांना हेच हवं आहे’ म्हणायचं! Proud

>>

>>
शेंडे, हे बाकी तुमचं आवडतं मला - डेम्सनी निषेध केला की तो तोंडदेखलाच आहे म्हणायचं आणि नाही केला तर ‘बघा बघा यांना हेच हवं आहे’ म्हणायचं!
<<
धन्यवाद!
खरोखर ह्या हत्येबद्दल वाईट वाटत असते तर यापुढे आम्ही ट्रंपला हिटलर म्हणणार नाही. ट्रंप सत्त्तेत येताच सगळ्या विरोधकांना भट्टीत घालून जाळून मारणार आहे असले बिन्बुडाचे आगलावे आम्ही बोलणार नाही असे म्हटले तर कदाचित मनापासून खंत व्यक्त करत आहेत असा भास झाला असता. पण वापरून गुळगुळीत झालेली निरर्थक "आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत" "ही आपली परंपरा नाही" वगैरे वाक्ये फेकून निषेधाच्या भोज्याला स्पर्श करून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरु होतात. ते एक ढोंग आहे.

उलट जेव्हा मारेकर्याचा नेम चुकायला नको होता असे वाक्य बोलले जाते त्यात निदान काही प्रमाणात प्रामाणिक भाव दिसतो.
परिणाम काय होईल ह्याची पर्वा न करता निर्लज्ज, धीट, निगरगट्ट असे काहीतरी बनून हे बोलले जाते त्यात खरेपणा जाणवतो बुवा!

खरोखर ह्या हत्येबद्दल वाईट वाटत असते तर>>> हत्या? Uhoh भ्रमिष्ट म्हातारा असे काही बोलला असता तर एक वेळ ठीक होते हो. असो.
निषेधाच्या भोज्याला स्पर्श करून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरु होतात. >>> हे बाकी समजले नाही - निषेध करणार तो फक्त हल्ल्याचाच ना? व्हॉट एल्स हॅज चेन्ज्ड? की केवळ त्याच्यावर तो हल्ला झाला होता म्हणून आता गंगेत न्हाला ट्रंप / सगळी पापं धुतली असे काही आहे का? Lol
त्यामुळे त्याच्याबद्दलची इतर प्रेमळ ओपिनियन्स म्हणा की शेरे -ताशेरे म्हणा ते चालू राहतीलच चिंता नको.

>>
खरोखर ह्या हत्येबद्दल वाईट वाटत असते तर>>> हत्या? Uhoh भ्रमिष्ट म्हातारा असे काही बोलला असता तर एक वेळ ठीक होते हो.
<<
केवळ नशीबाने ट्रंप वाचला आहे. आमच्यासारख्यांच्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने तो अजून जिवंत आहे. पण हा प्रयत्न हत्येपासून काही मिमी अंतरावर आहे. माझ्या लेखी ही हत्याच आहे. तुमचे समाधान व्हावे म्हणुन हत्येचा प्रयत्न अशी दुरुस्ती करतो. उगीच तुम्हाला दु:खाचे कढ नको यायला!
असो.

>>
त्यामुळे त्याच्याबद्दलची इतर प्रेमळ ओपिनियन्स म्हणा की शेरे -ताशेरे म्हणा ते चालू राहतीलच चिंता नको.
<<
जरूर. मग त्याला दुसरा हिटलर म्हणा. त्याला तिसरे महायुद्ध सुरु करणारा म्हणा. तो विरोधकांना भट्टीत जाळणार म्हणा, काळ्यांना जाळणार, गे लोकांना जाळणार असे म्हणा आणखी काय काय म्हणत रहा. कारण मग पुढच्या खुन्याला स्फूर्ती येईल आणि त्याचा प्रयत्न कदाचित जास्त यशस्वी होईल आणि आपण ट्रंपासुराला ठार केल्याचा आनंदोत्सव साजरा करा. गावजेवण घाला. लोकशाहीचा विजय साजरा करा.
ह्या मारेकर्याने काय काय चुका केल्या आणि त्या पुढच्या मारेकर्याने कशा सुधारायच्या ह्यावर आपण चर्चा करालच. चालू द्या!

दिवसातून १८ तास कोम्यात असणार्‍या थेरड्याने वोकनेसच्या हव्यासपायी सिक्रेट सर्विस विभागाची वाट लावली आहे. त्याचा प्रत्यय ट्रंपची राजकीय हत्या करण्याच्या प्रयत्नाच्या वेळी आला.
ह्या लोकांची अत्यंत ढिसाळ कामगिरी दिसली. जर गोळीबार करणारे एकाहून जास्त लोक असते तर ट्रंपची तिरडी निघालीच असती. (किंबहुना म्हातारबाची तीच इच्छा असवी)
आपल्या कट्टार विरोधकाला असले गलथान आणि ढिसाळ लोक संरक्षक म्हणून देणे हे बायडनच्या लोकशाहीप्रेमाचे प्रतीक समजावे का?
त्यापेक्षा ह्या सिक्रेट सर्विस वाल्यांना पुढच्या ट्रंप सभेच्या वेळेस सरळ आपली पिस्तुले झाडून ट्रंपला ठार करा अशा सूचना का देत नाहीत? उगीच कुठला तो मारेकरी नेमायचा, तो काहीतरी गफलत करणार, मग त्याला ठार करायचे, लोक त्याच्या तो कोण होता, त्याने का मारले वगैरे नको त्या चांभारचौकशा करणार. नस्ती डोकेदुखी!
https://www.youtube.com/watch?v=BcoySfnBw6I
इथे काही सिक्रेट सर्विसच्या बायकांना पिस्तुल केसच्या बाहेर काढायचे का आत घालायचे ह्या घालमेलीत पहा. ह्या नक्की डी ई आय कोट्यातील आहेत!

<<<की केवळ त्याच्यावर तो हल्ला झाला होता म्हणून आता गंगेत न्हाला ट्रंप / सगळी पापं धुतली असे काही आहे का? >>>
अर्थातच! उघड आहे.
<<तुमचे समाधान व्हावे म्हणुन हत्येचा प्रयत्न अशी दुरुस्ती करतो.>> धन्यवाद.
तसे दुरुस्ती करण्याजोगे बरेच काही काही तुमच्या लिखाणात असते. पण एक एक करून सांगण्यापेक्षा, तुमचे सगळेच लिखाण उडवावे अश्या मताचा आहे मी.
पण मग मजा नाही. नि मजा नाही तर इथे कशाला यायचे? तुम्ही लिहा, नि लोक उत्तरे देतात. म्हणून मज्ज, नाहीतर राजकारणावर काही परिणाम होणार नाहीये!

:-ड
परफेक्ट, पूर्ण जगताचे सार एका पोस्टीत

आरोग्याचे कारण सांगून बायडन यांनी माघार घ्यायला हवी. बराक ओबामा, नॅन्सी पेलोसी सारखे समर्थक पण खासगीमधे बायडन यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. पुढिल महिन्यांत होणार्‍या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रिय अधिवेशनांत त्यांनी स्वत : च दुसर्‍या कुणाचे नाव सुचवायला हवे. पक्ष / डेलीगेटस त्यांना दूर करु शकतो पण प्रक्रिया किचकट आहे.

बायडन उमेदवार राहिल्यास पराभव अटळ दिसतो, दुसरा कुठला उमेदवार पुढे केला तर निदान थोडी तरी आशा राहिल.

नंद्या, सौ सुनारकी, एक लोहारकी! Biggrin

“तुमच्या सारखे लोक नीट निषेधही करायला तयार नाहीत. लोकशाहीला कलंक आहात”

मैत्रेयी, स्वाती नीट निषेध करायचा म्हणजे यांच्यासारखे कंबरेवरचे सोडुन डोक्यावर बांधायचे , मर्कटाच्या हाती लेखणी दिल्यासारखी व थयथयाट करत काय वाट्टेल ते लिहायचे . मनात येईल तशी मूर्खासारखी फुकटच्या संकेतस्थळावर येऊन असंबद्ध बडबड करायची वा बायडनच्या नावाने सदैव शिमगा करत, त्याच्यावर काहीबाही बिनबुडाचे आरोप करत, बोंबलत फिरायचे अशी काहीतरी त्यांच्या अल्पमतीची भाबडी कल्पना असावी. Proud

जानेवारी ६ चे समर्थन करणारे दुसऱ्यांना लोकशाहीला कलंक आहात असे म्हणत आहेत.

ऐकावे ते नवलच! चोराच्या उलट्या बोंबा! का उचलली जीभ लावली टाळ्याला? ( बाकीच्या सगळ्या तुमच्या पोस्टी याच म्हणींच्या लायकीच्या असतात म्हणा!)

उदय, तुमच्या पोस्टशी सहमत.

फारेंड, तो निकाल निव्वळ घृणास्पद आहे. ट्रम्पने लोकशाहीची प्रक्रिया बळकावण्याचा प्रयत्न केला, त्यात कोर्टाने त्याला दोषी ठरवले पण दर वेळी प्रमाणे सु्प्रिम कोर्टाने वाचवले. कोअर ऍक्ट इत्यादी पूर्णपणे नवीन कायदेशीर संज्ञा खास ट्रम्पला वाचवण्यासाठी तयार केल्या.

पेलोसीच्या नवऱ्यावर हल्ला झाला तेव्हा हसणाऱ्यांनी थोबाड बंद ठेवावे.
बाकी गोळी मारणारा तुमचाच माणूस होता.

खरोखर ह्या हत्येबद्दल वाईट वाटत असते तर यापुढे आम्ही ट्रंपला हिटलर म्हणणार नाही.
>>>
जरूर म्हणणार. त्याने लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. तो गोळी लागोन मेला असता तरी हे म्हणायचे थांबणार नाही, सत्य बदलणार नाही.

>> रन अवे ज्युरी मध्ये सिगरेट लॉबी आहे
नाय वो , गन लॉबीच आहे .आपला Gene hackman पण आहे. सिगारेट लॉबी साठी "Thank You For Smoking" बघा . अमेरिकन लॉबी इंडस्ट्री वर आहे . मागे हॉटस्टार वर बघितला होता

<<२०-२२ वर्षाच्या मुलाने हे हत्यार आणि प्रशिक्षण कुठून मिळवले हे रहस्य आहे >>
हत्यार मिळवणे सोपे आहे, ते त्याच्या वडिलांचे होते.
प्रशिक्षण काय, साधे नेम धरण्याचे शिक्षण सुद्धा घेतले नव्हते हे उघड आहे.
बाकी उघड आहे तो मुलगा रजिस्टर्ड रिपब्लिकन होता. त्या लोकांना एकहि काम धड करता येत नाही - नुसत्या खोट्या अफवा नि बोंबाबोंब नि इतरांना शिव्या, या पलिकडे येते काय त्यांना!
जॉन विल्क्स बूथ व ली हार्वी ओस्वाल्ड यांनी बंदुक वापरण्याचे चांगले शिक्षण घेतले होते, त्यांचा नेम बरोब्बर लागला.
जॉन हिंकले नि थॉमस मॅथ्यू क्रूक्स यांनी बंदुक नीट चालवण्याचे शिक्षण घेतले नव्हते, म्हणून त्यांचा नेम चुकला!!!

फारेंड, तो निकाल निव्वळ घृणास्पद आहे. ट्रम्पने लोकशाहीची प्रक्रिया बळकावण्याचा प्रयत्न केला, त्यात कोर्टाने त्याला दोषी ठरवले पण दर वेळी प्रमाणे सु्प्रिम कोर्टाने वाचवले. >>> कॉमी मला तसे वाटत नाही. एकतर कोर्टाने त्याला ६ जानेवारीच्या आरोपातून मुक्त केलेले नाही. इम्युनिटीची केस स्वतंत्र होती.

एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने जर ठरवले की एखादी केस ही त्याच्या घटनात्मक अधिकारांशी संबंधित नाही, तर त्याला इम्युनिटी लागू होत नाही.

यातून ट्रम्प किंवा कोणी व्यक्ती बाजूला काढून हा प्रश्न बघितला तर साधारण सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या जवळ जाणारेच उत्तर मिळते. पण तरीही इथे कोर्टाचा निकाल काय असायला हवा होता असे तुम्हाला वाटते?

सुप्रीम कोर्ट आरोपातून मुक्त करू शकत नाही. पण, जर ट्रम्प फेक इलेक्टर नेमण्याबाबत convict झाला आहे - तर त्याला एकही कायदेशीर परिणामला समोर जावे लागणार नाही हे अत्यंत संतापजनक आहे. इन्सरेक्शन करणाऱ्याला निवडणुकीत उभा होता येणार नाही ही संविधानिक तरतूद सुप्रीम कोर्टाने फेकली. काही शिक्षा होणार नाही ही काळजी सुप्रीम कोर्टाने घेतली. सुप्रीम कोर्ट अत्यंत एकतर्फी प्रकारे ट्रम्पला बचावण्यासाठी वाट्टेल ते निर्णय देत आहे असे वाटतं आहे. ह्यातला टेकवे हा कि तुम्ही लोकशाही खेचण्याचा प्रयत्न करू शकता. जर राष्ट्रध्यक्ष असाल तर तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. पहिला फसला तर पुन्हा प्रयत्न करा.

आणि त्या निर्णयाबाबत. एफबीआय तर्फे लोकांना डिटेन करणे, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सैन्य दलाला हल्ला करण्यास सांगणे या गोष्टी सुद्धा राष्ट्राध्यक्षाच्या पावर खाली येतात. या सर्व गोष्टींमध्ये इम्पिचमेन्ट शिवाय कोणतीही क्रिमिनल कारवाई होणार नाही हा निर्णय चिंताजनक आहे.

https://x.com/TheNewsAgents/status/1813628114775519453?t=6xBIL8B-UhB56mO...
हि बाई अजूनही इलेक्शन मध्ये फ्रॉड होता म्हणतीये.
बास आता. ह्या लोकांलाडून अहिंसा आणि सिव्हिलिटीच्या उपदेशचे डोस अजिबात ऐकन घेणार नाही. एक येड्या रिपब्लिकन पोराने ट्रम्पवर गोळी झाडली म्हणून दुसऱ्यांना उपदेश देत आहेत. इलेक्शन नाकारणे हि सुद्धा एका प्रकारची हिंसाच आहे. सगळे पुरावे देऊन, कोर्टातून सगळीकडून मार खाऊन झाला तरी आपले तुणतुणं वाजवत राहायचं? आणि वर दुसऱ्यांना ट्रम्प विरुद्ध जास्त वाईट बोलू नका म्हणून सल्ले द्यायचे!

म्हणे "लिबरेल लोकांनी राजकीय तापमान वाढवले आहे"
हो का?
ट्रम्पची सुरुवात "लॉक हर अप" आणि त्याच्या विरोधकांना टोपणनावं पाडून झाली. ओबामा अमेरिकेत जन्माला नाही इत्यादी अफ़वा पसरवून झाली. "ओनिंग द लिब्स" ह्या एकमेव गुणामुळे ट्रम्प सारख्या भंकस माणसाला राष्ट्रध्यक्ष केले. त्याने फेक इलेक्टर नेमून खरोखरी इलेक्शन फ्रॉड केला. आणि वर आता वातावरण थंड करायचा सल्ला मात्र लिब्रल लोकांना! वा!

कोर्टाची भिती ट्रम्प ला नाहीच आहे. सुप्रीम कोर्टात एक दोन नव्हे तर ३ इमानी बाहुल्या बसवण्यात तो यशस्वी झाला ज्या इमाने इतबारे उपकाराची परतफेड करत आहेत आणि राहतील. एकूण सध्याचे सुप्रीम कोर्ट इन्क्लिनेशन बघता कायद्याने त्याला काही कॉन्सिक्वेन्सेस मिळतील याची आशा सोडा. लोअर लेवल्स ची कोर्ट्स किती का जंग जंग पछाडू देत इटस जस्ट वेस्ट ऑफ टाइम.

Pages