चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँकी, पूर्ण पाहिला?पेशन्स ला साष्टांग नमस्कार.
आम्ही असह्य होऊन लघुशंका सिन ला बंद केला.पहिल्या 5 मिनिटातच असह्य झाले होतेच.
ड्रीम गर्ल 1 अचाट होता पण तरी आवडला होता.2 इतका वाईट असेल अशी अपेक्षा नव्हती.

पेशन्स ला साष्टांग नमस्कार
>>
हिमेश रेशामिया चे सिनेमे सहन केलेत तर ये किस झाड का बैंगन...
बैंगन नही, मूली होता है.. मिसाल तो ठीक से दिया करो..
दी है ना.. उतना काफी है...
#दूल्हेराजा

यावरून आठवलं
रंगीला राजा पण पाहिलाय अन् आ गया हीरो ही...

कारण हमारी भी कुछ बुरी आदतें है... >>> हाहाहा. अशी बुरी आदत बाकीच्यांसाठी चांगली. सावध करता आणि वेळ वाचवता. ती अस्मिता पण तसंच करते. तिने खुप डोक्याचा ताप आणि वेळ वाचवते.

अनन्या कमेंट भारीच.

रंगीला राजा पण पाहिलाय अन् आ गया हीरो ही...

खर्‍याची दुनिया नाही राव ! नाहीतर गोविंदाने तुम्हाला घरी बोलवून सुनीता वहिनींकडून ओटी भरली असती .

खर्‍याची दुनिया नाही राव !
>>
आम्हीही नाही पाहिले तर कोण बघणार त्याचे सिनेमे??

नित्यं कर्म करत्वामी चपाटम चपाटम
प्रत्यक्ष प्रकट करस्वामी अचूक बाणं प्रयोजन प्रयोगम्
घुसाणम् च बांबू तो निकलम् आवाजम
समझम के ना समझम
और ना समझम तो ऐसा समझावम्
के तोहरा बाप पुकारं काहां तम कहां तम काहां तम कहां तम

असे संवाद एका दमात फायर होत असताना चिकाटीनी पुढे सिनेमा बघणं आताशा कॉमन नसल्याने गोविंदाचे सिनेमे चालत नाहीत.

ड्रीमगर्ल-१ म्हणजे फोनवर बायकी आवाजात बोलणारा हिरो, त्या आवाजामुळे त्या काल्पनिक बाईच्या प्रेमात पडणारा आणखी कुणीतरी, अशी काहीतरी स्टोरी आहे ना?
मला असा एक ट्रेलर पाहिल्याचं आठवतंय. Lol

त्या आवाजामुळे त्या काल्पनिक बाईच्या प्रेमात पडणारा >> ही फार्सिकल कल्पना किती जुनाट आहे. निव्वळ बाईचा आवाज ऐकून लट्टू होणे इतिहासजमा झालेय असे यांना वाटत नाही. आता मार्केटिंग मुळे बायकी आवाजाचा त्रास होऊ लागला आहे. एका बाईने इन्शुरन्स साठी आगाऊ फोन केला तेव्हा मी तिला माझ्याकडचे पोटॅशियम फॉस्फेट एक टन खरेदी केलेत तर १५० रूपये किलो या दराऐवजी १४९ दराने देऊ आणि बदल्यात विमा घेऊ अशी उलट ऑफर दिली होती. तिने मला मूर्ख म्हणत फोन आदळला होता.

गावात वगैरे असतीलही असे लोक, अजून इंस्टा फेसबुक किंवा मेट्रिमोनि साईट्स वरून फक्त चॅट करत प्रेमात पडून अनेक लाख रुपये प्रियकराला ट्रान्स्फर करणाऱ्या बाया आहेतच ना, मग आवाज ऐकून प्रेमात पडणे अशक्य नाही Happy

क्रू अगदीच फालतू. काहीही लॉजिक नाही.मला तर शेवट पण नीट झेपला नाही. दलजित दोसांज ला वाया घालवलेय!>>> अगदीच मला तर त्यांचे प्रॉब्लेम्स पण झेपत नव्हते..अर्रे हे तर सर्व साधारण सर्वांचेच कॉमन प्रोब आहेत म्हणुन काय स्मगलिंग कराल? Angry
कंपनी बँकरप्ट झाली तर सॅलरीज अडकतिल पण पीएफ का अडकेल बरं? बँक तोट्यात गेली तर पीएफ बुडेल ना? काही गफलत झालिये का माझी?
आणि ती भारतातली सफाई कामगार जिला करीना सतत नोटा देत असते ती तिकडे दुबई च्या अयरपोर्ट स्टाफ ला कशी खोलीत अडकवते? काहिही काय....

ती दुबईत अडकवते ती बहुतेक तब्बू ची भावाशी भांडून दुबईत नोकरीला गेलेली वहिनी आहे.पण तरीही पिक्चर प्रचंड अचाट अतर्क्य आहेच.3 छान बायका घेऊ वेगवेगळ्या एज च्या, कथेत दारू आणि एअरहोस्टेसेस असे फॉरेव्हर ग्लॅम विषय आणू, आणि मग बाकी गाणी आणि कथेची जमेल तशी भेळ बनवू असा मूळ प्लॅन असावा.अर्थात यशस्वी झाला.

Crew is based on the downfall of kingfisher Airways and mallaya running away. The employees suffered. Middle class and upper middle class people. Some committed suicide due to financial pressure. Emis etc. PF is stuck because mallaya did not make company contribution. Which is must. Aging air hostess is a comment on the Air India aunties very ageist.

Jet Airways employees also suffered similar fate. I have flown both airlines many times before they went bust. And indigo was the only option . Film is more about employees pain and how working people have fantasies of getting their complete dues from a bad management.

प्राज्ञ परिक्षा Happy lol...
क्र्यू.. अशक्य आणि अचाट... Purse विकून दुबई ला जाता येत.. आणि बाकी सगळे प्रसंग इतके लुतूपुटू आहेत की बास.
करीना छान दिसते as usual . क्रिती कायतरी वेगळंच पद्धतीने बोलते .. तब्बू आवडते so she is bearable.
पण प्लॉट च इतका मिळमिळीत आहे की थोड्या illogical करमणुकीसाठी बघायला हरकत नाही.

मंजुंमल बॉईज - Hotstar
खूपच thrilling, gripping आणि मस्त सिनेमा. एकाच गावातली, आधी टाईमपास वाटणारी मैत्री कित्ती घट्ट / deep असते याच उदाहरण. नक्की नक्की बघा.

Purse विकून दुबई ला जाता येत..
>>
इथे बघा
सेकंड्स मार्केट मधे सव्वातीन लाखाला आहे ती पर्स.
नक्की जाऊन येता येईल अल् बुर्ज ला...

ती दुबईत अडकवते ती बहुतेक तब्बू ची भावाशी भांडून दुबईत नोकरीला गेलेली वहिनी आहे.>>> ती तर वालिया ची रूम की मिळवून द्यायला मदत करते..ते तरी ठीके.
जुन्या क्रू ला कोणत्या तरी खोलीत डांबून त्यांचे आयडी घेऊन ह्या तिघिंना देताना ती सफाई कर्मचारी दाखवलिये Lol आणि कहर म्हणजे पायलट पुरुष असतो, पण सीक्युरीटी वाला माणुस मख्खपणे क्रिती सनोन ला तो पुरूष पायलट वाला आयडी बघून आत पर्सनल प्लेन मधे जाऊ देतो Rofl लॉल,,

सगळंच लॉल आहे
(नटसम्राट मोड ऑन)
"जिथे आभाळालाच भगदाड पडलंय तिथे ठिगळ लावणार किती आणि कसं?"

अमा ते सर्व ठिकाय पण त्यांच दु:ख पब्लिक पर्यंत पोहोचत नाही.. लोन हफ्ते फेडणे मुश्किल होणे, महागड्या पर्सेस न घेता येणे, पायलट न होता हवाईसुंदरी होणे ही काय स्मग्लींग ची कारणं नाहीत.

किती त्या अपेक्षा क्रू कडून
अचाट आणि अतर्क्य आहे तो सिनेमा

लुटकेस कोणाचा?
बहुतेक पाहिलाय आधी आणि आवडलेला.
विनय पाठक वै

Pages