Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्मिता...Submitted by
अस्मिता...Submitted by अस्मिता. on 19 April, 2024 - 21:08.. page ४२ . +१२३४५६७८
ए दिलं है मुश्किल बद्दल मला ही सेम असच वाटत आणि म्हणूनच आवडलेला.. पण एवढं नीट यासारखं लिहिता येत नव्हतं..
ऐश्वर्या कमालीची सुंदर ही दिसली आहे यात..त्यामुळेच असेल की ती त्या भूमिकेत छान फिट बसली आहे.. एरवी सारखी नाही.
रणबीर तर आवडतोच.. ती खरंच खूप चांगली ॲक्टिंग करतो..
माबो वाचक, जॉनी इंग्लिश
माबो वाचक, जॉनी इंग्लिश रीबोर्न बघा, तिन्ही भागात जास्त छान आहे.
माबो वाचक, जॉनी इंग्लिश
माबो वाचक, जॉनी इंग्लिश रीबोर्न बघा, >>> हो, तो अगोदरच पहिला आहे. तो मालिकेतील दुसरा, २०११ साली आलेला.
तिन्ही भागात जास्त छान आहे. >>> सहमत.
https://www.rediff.com/movies
https://www.rediff.com/movies/review/the-boy-and-the-heron-review-miyaza...
मंजुलिका बॉईज पाहिला.
मंजुलिका बॉईज पाहिला.
मला एका सौथेंडीयन मित्राने मागेच याबद्दल सांगितले होते. तो तेव्हा थिएटरमध्ये बघून आलेला. स्टोरी सांगितली नव्हती. पण त्याच्या बोलण्यावरून मला वाटलेले की खूप अदभुत अविश्वसनीय आणि वेगवान घटना घडतात ज्या एकापाठोपाठ एक आपल्याला धक्के देत सुटतात. पण तसे नव्हते. मैत्री + रेस्क्यू ऑपरेशन असा आहे.
चांगला होता. पण माझ्या अपेक्षा वेगळ्या होत्या.
बाकी ते लोकेशन आणि त्याचे चित्रण भारी आहे. थिएटर मध्ये आणखी भारी वाटत असेल म्हणा.
शैतान पाहिला मी. भीती काही
शैतान पाहिला मी. भीती काही वाटली नाही. मला खरे सांगू का ती अजय देवगण फॅमिलीच खूप आवडली. मी एकटीच राहात असल्याने त्यांचे एकत्र वागणे प्रेम हे खूप गोड वाटले. आमचे अहो होते तेव्हा आम्ही असेच कार ट्रिप ला जायचो बारकीला घेउन व धाब्यावर थांबायचो खायचो मस्त पैकी. मुलां चे बारके बारके नखरे. लई ग्वा ड. पोरे पण दोघे ही गोड आहेत. माधवन किळस वाणा जास्त वाटतो. भीती दायक नाही.
मुलगीचे फार्म हाउस वरचे चाळे बिचारी ती प्रभावाखाली असल्याने आहेत म्हणून वाइटच वाटत राहिले तिच्या बद्दल. आईबापांचे प्रेम जेनुइन वाटले. फार्म हाउस मस्तच आहे. क्लायमॅक्स मध्ये त्या मुली बघून पण वाइटच वाट्ते. माधवन काही भीतिदायक दिसत नाही. अमरीश पुरीची
आठवण आली. नगिना, करण अर्जुन मध्ये त्याने इव्हिल मस्त साकार केले आहे. माधवन मध्ये ती डेप्थ नाही.
शेवटी अजय देवगण ने मुलींना मुक्त करायला जी युक्ती वापरली आहे ती फार पूर्वी खिचडी मालिकेत वापरलेलीच आहे. गुज्जू म्हणजे फार काय सेरे ब्रल नसणार हा होरा बरो बर निघाला. शैतान ची शेवटची महत्वाकांक्षा ऐकून . अरे त्यासाठी इतके कराय ची काय गरज एक इलेक्षन तर घ्यायची बाकी आहे असा खट्टा विचार आलाच डोक्यात. पण देवगण चा उपाय लै भारी व्ह.
शैतानच्या साइडचे कोणीतरी त्याला नक्की सोडवेल व सिक्वील पण येउ शकतो.
इतक्या गुज्जु मुली त्या वयात
इतक्या गुज्जु मुली त्या वयात तरी शैतान सोडा इन्स्टाग्राम प्रभावाखाली नक्की आहेत. ते धोकादायक किंवा कसे ते बघा बुवा.
खिचडी मालिकेत वापरलेलीच आहे.
खिचडी मालिकेत वापरलेलीच आहे. गुज्जू म्हणजे फार काय सेरे ब्रल नसणार हा होरा बरो बर निघाला.

>>>>
ते फार्महाऊस लंडनमधले आहे असे 'मोस्टली सेन'वर माधवन आणि अजय देवगण यांच्या मुलाखतीत सांगितले. तिने यांना फुळकावणी चहा दिला. सगळं शूटींग तिथलंच आहे.
शैतान पाहिला - टेन्शन चांगलं
शैतान पाहिला - टेन्शन चांगलं ठेवलंय >>> +१ एन्गेजिंग आहे नक्कीच. पण त्या हातात घुसलेल्या सुर्यासकट बाइक राइडिंग इ. स्टन्ट ची गरज नव्हती. सामान्य माणूस असतो ना तो. आणि त्या शेवटच्या गुहेतल्या सीक्वेन्स ची तरी काय गरज ? सामान्य माणूस कुणाला असले टॉर्चर , त्याला खेळवणे वगैरे ( वर्षभर तेही?) करणे अनलाइकली. उगीच कुठल्या तरी वेस्टर्न थ्रिलर चा सीन आवडला म्हणून कॉपी केला असे वाटते.
अजय देवगण ने आणि ज्योतिकाने काम चांगले केलेय. लहान मुलगा आगाऊ वाटतो. माधवन ओके आहे पण त्याला फार क्रेडीट द्यावेसे वाटत नाही. त्याचा रोल सोप्पा आहे. तसे लाउड क्रीपी अॅक्टिंग सहसा नॉन अॅक्टर्स ना पण जमते.
>>> त्या शेवटच्या गुहेतल्या
>>> त्या शेवटच्या गुहेतल्या सीक्वेन्स ची तरी काय गरज ? सामान्य माणूस कुणाला असले टॉर्चर , त्याला खेळवणे वगैरे ( वर्षभर तेही?) करणे अनलाइकली
हो हो, अगदी!
बायदवे, नाही म्हटले तरी त्या
बायदवे, नाही म्हटले तरी त्या सीन मुळे ब्रेबॅ मधल्या वॉल्टर च्या पहिल्या किल ची आठवण आलीच. क्रेझी ८ !
पण तो पूर्ण सीक्वेन्स काय आहे! विसरणे अशक्य!!
पण तो पूर्ण सीक्वेन्स काय आहे
पण तो पूर्ण सीक्वेन्स काय आहे! विसरणे अशक्य!! >> टोटली. फुटक्या बशीचे तुकडे ट्रॅश मधे टाकणे. नंतरचा एक पॉज, एक शंका. आणि त्यातून पुढचा सगळा प्लॉट निर्माण होणे. जबरी आहे ते. बाय द वे, तो दुसरा किल ना? एक आधीच मरतो. त्याची विल्हेवाट हा आणखी एक अतरंगी प्रकार आहे. मी ही सिरीज पाहताना या एपिसोडला पूर्ण "हुक्ड" झालो होतो.
शैतानच्या शेवटला पुर्ण सीन,
शैतानच्या शेवटला पुर्ण सीन, अजय देवगण घरातुन मुलीला आणायला बाहेर पडतो तो अचाट आहे खरं. त्यामुळे माझ्याकरता, माधवन त्यांना भेटतो ते तो त्या घरातुन कायमकरता बाहेर पडतो तितकाच सिनेमा होता. तिथेच संपला सिनेमा माझ्याकरता. माधवन ने भारी काम केलंय, कंट्रोलमधे केलंय, नाहीतर त्याचा बटबटीत अमरीश पुरी झाला असता.
पण पुन्हा पाहवणार नाही हा सिनेमा.
"स्वरगंधर्व सुधीर फडके"
"स्वरगंधर्व सुधीर फडके" पाहिला. मला आवडला. बराच मोठा पिक्चर आहे. पण ज्यांना सुधीर फडक्यांची गाणी आवडतात त्यांना आवडेल. फ्लॅश बॅक-अॅण्ड-फोर्थ बराच आहे. सुरूवातीचा स्ट्रगल खूप फुटेज खातो. मध्यंतरापर्यंत तेच आहे. या स्ट्रगल बद्दल ऐकलेले आहे पण डिटेल्स माहीत नव्हते त्यामुळे इंटरेस्ट राहिला. त्यात तरूणपणीचे काम केलेल्या आदिश वैद्यच्या कामामुळेही ते अस्सल वाटते. पिक्चर थोडा पुढे गेल्यावर मात्र एकदम रंगत जातो. गीतरामायणाच्या रेकॉर्डिंगचा भाग हा सर्वोच्च बिंदू आहे. तो भाग बघताना आपणही दंग होउन जातो.
त्यांची गाणी आवडणारे किंवा एकूणच जुनी मराठी गाणी आवडणारे - अशांना इतर काही नाही तरी निव्वळ त्या गाण्यांच्या अनुभवाकरता हा पिक्चर बघण्यासारखा आहे. बरीच गाणी सीन्सच्या संदर्भात पेरली आहेत आणि कोणतेच गाणे पूर्ण घेतलेले नसले, तरी त्याचा इफेक्ट आला आहे. बहुतांश लोकांची कामे चांगली झाली आहेत. सुनील बर्वे, सागर तळाशीकर, आदिश वैद्य (तरूणपणीचे सुधीर फडके), मृण्मयी देशपांडे हे मुख्य. हृषिकेश जोशीने दोन मिनिटांच्या अटलबिहारी वाजपेयींच्या रोल मधे एकदम चपखल बेअरिंग घेतले आहे. राजा परांजपेंच्या रोलला त्यामानाने कमी वाव आहे. आशा भोसलेचे (अपूर्वा मोडक) व माणिक वर्मांचे (सुखदा खांडकेकर) काम केलेल्या अभिनेत्रींची कामेही चांगली आहेत.
सुरूवातीला टायटल्सच्या वेळी त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांवर काढलेली रेखाचित्रे व त्यांच्याच गाण्यांतील संगीताचे तुकडे २-३ मिनिटांत सुंदर वातावरण निर्मिती करतात.
सुधीर फडक्यांबद्दलचा आदर, त्यांची कारकीर्द, त्यांची गाणी, गदिमा, आशा हे सगळे संदर्भ बाजूला ठेवून एक चित्रपट म्हणून बघितले तर अनेकदा चित्रीकरण अगदी बाळबोध वाटते. विशेषतः स्ट्रगलच्या काळातील त्यांचे मित्र वगैरेंचे सीन. तसेच हा चरित्रात्मक चित्रपट असल्याने गाण्यांशी संबंध नसलेले काही सीन्स आहेत. त्यांच्या अडचणीच्या वेळेस संघाकडून मदत मिळणे, त्यांचे त्यांच्या मित्रांना भेटायला अंबाल्याला जाणे, दादरा नगर-हवेली मुक्तिसंग्रामात त्यांचा सहभाग - हे सगळेही आले आहे. ते बहुतांश सीन्स डॉक्युड्रामा सारखे आहेत.
संघ, सावरकर यांच्याबद्दलही बरेच सीन्स आहेत. ते सर्वांनाच आवडतील असे नाही. पण ते बहुधा जसे घडले तसे दाखवले आहेत.
मी वाचलंय त्यावरून गदिमा हे काँग्रेसवाले होते. तर सुधीर फडके संघाचे. या दोघांनी मिळून इतक्या उच्च दर्जाच्या रचना तयार केल्या, आणि त्यांची मैत्रीही घट्ट होती. त्याकाळी हे शक्य असावे. आजकाल शक्य वाटत नाही
त्या मुक्ता बर्वेचा अभिनय
त्या मुक्ता बर्वेचा अभिनय एकदमच तोच तोच आहे.
ओठ दुमडून बोलणे, एकच सुर लावून बोलणे.
जराही जमला नाही अभिनय. त्यात तो येडपट सारंग भाडिपच्या सेटवरून उचलून आणल्यासारखा अभिनय.
कामवाली बाई किंवा मदतनीसची सवय भारतात ज्यास्त असते एकंदरीतच बर्याच कारणाने असे पाहिलेय. परदेशात ती कारणं जरा वेगळी असतात;
जसे की, भारतात रोजच डस्टींग करावेच लागते कारण येणारी धुळ.
अजुनही स्वंयपाक रोजचा रोज करतातच. वगैरे वगैरे..
प्रत्येकाची निकड सुद्धा वेगळी असते.
पण, मला परदेशात मदतनीसची गरज कमी भासायची कारण, रोजच्या रोज काही बाथरूम धुवा, डस्टींग करा, वगैरे वगैरे.
असो, पण मूवी गंडलाय..:
त्या मायरा ह्या लहान कलाकार मुलीची, तिच्या आई वडिलांनी पुर्ण वाटच लावलीय.
शाहीर साबळे यांच्यावरचा
शाहीर साबळे यांच्यावरचा सिनेमा मी पूर्ण पाहू शकलो नाही. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. पण आता बायोपिकचा कंटाळा आलेला आहे.
प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्याची सक्सेस स्टोरी ही चित्रपटाची "कथा" होऊ शकत नाही. सुधीर फडके यांना लहान असताना टिव्हीवर ऐकलेले आहे. अलिकडे त्यांच्याबद्दलचे माहितीपट पाहण्यात आले. त्यामुळे बायोपिक पाहण्यात रस नव्हताच. फारेण्डने खूप सटीक परीक्षण दिले आहे.
उद्या लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्यावर सिनेमा आलाच तर त्यांच्या आयुष्याची कथा चित्रपटासाठी कितीशी उत्कंठावर्धक ठरेल ? कदाचित किशोर कुमारवर त्याच्याच गमत्या स्वभावाप्रमाणे मिश्कील शैलीत आलेला चित्रपट पाहणेबल होऊ शकेल.
@ फारएण्ड,
@ फारएण्ड,
मी पण पाहिला काल आणि मलाही आवडला. सुनील बर्वे आणि गदिमांचं काम करणारा कलाकार सागर तळाशीकर यांचं काम सुरेख झालं आहे. अपूर्वा मोडकनं आशा भोसलेचं गाणं गातानाचं बेअरींग फार मस्त पकडलंय. तीच गाणं म्हणतीये असं वाटतं. बाकी कलाकारांची कामंही चांगली आहेत.
बाळबोध चित्रीकरणाबाबत अगदीच सहमत. विशेषतः दादरा- नगर हवेली मुक्ती संग्रामाबाबतची दृष्य. सुरवातीचे अती अलंकारीक संवादही खडे लागल्यासारखे आहेत. इतकं कृत्रीम कोण बोलतं? सुरवातीच्या कपडेपटावर अजून लक्ष द्यायला हवं होतं. उदा. बाबूजींच्या वडीलांची कोरी करकरीत पगडी! आईची नथ इत्यादी.
तरीही, सगळे दोष दुर्लक्ष करून एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे. मला आवडला. माझ्याबरोबर ज्येष्ठ नागरीक होते, त्यांना तर फारच आवडला. गाणी ओरीजनल आवाजात ठेवल्यानं चित्रपटामधला इंटरेस्ट टिकून राहिला.
घरी येऊन पुढचे दोन तास बाबूजींच्या आवाजातली गाणी ऐकली परत
घरी येऊन पुढचे दोन तास
घरी येऊन पुढचे दोन तास बाबूजींच्या आवाजातली गाणी ऐकली परत >>> मी पण
नंतर रात्री.
अपूर्वा मोडकबद्दल मलाही तसेच वाटले (तरूणपणीच्या आशाशी साम्य वाटले) पण बरोबरच्या इतरांना वाटले नाही. ती कोरी करकरीत पगडी मलाही सारखी खटकत होती
आज पुन्हा आठवताना काही सीन्स मधे सागर तळाशीकर काकणभर जास्तच उठून दिसला आहे असे वाटले. सुनील बर्वेचे सादरीकरण मुळात थोडे subdued आहे. कोठे जास्त आरडाओरडा, आक्रस्ताळेपणा नाही. टक्केटोणपे खाउन आलेला शांत/समंजसपणा वगैरे. बहुधा फडक्यांचे व्यक्तिमत्त्वच तसे होते. पण त्यामानाने गदिमांचे पात्र एकदम पॅशनेट वाटते. त्यामुळे काही सीन्स मधे ते जास्त लक्षात राहतात.
गाणी ओरिजिनल आवाजात ठेवणे हा फार चांगला निर्णय होता. त्यामुळे ओव्हरऑल अनुभव भारी येतो.
र.आ. - बरोबर आहे. एखाद्या थोर गायकावरचे बायोपिक तितके भारी असेल असे नाही. पण इथे त्यांनी अनेक प्रसंगात काही चपखल तर काही बादरायण संबंध लावून त्यावरची फडक्यांची लोकप्रिय गाणी तेथे लावली आहेत. त्यामुळे सीन कसाही असला, तरी आपण एंगेज्ड राहतो.
सिनेमॅटिक मूमेण्ट्स म्हणतात तशा दोन - एक खटकलेली आणि एक जमलेली
फडके आपल्या मित्रांना भेटायला अंबाल्याला जातात. तेथे नदीच्या बाजूने रस्त्यावरून यांची गाडी चालली आहे. पार्श्वभूमीवर गाणे "संथ वाहते कृष्णामाई". आता पंजाबातील/हिमाचल मधल्या नद्या संथ वगैरे नसाव्यात. मी बियास तेथे पाहिली आहे ती चांगली डोंगरदर्यांतून खळाळून वाहते. तेथे हे गाणे बसत नाही
दुसरा प्रसंग त्यांच्या पुण्यातील सत्काराचा. (इथे दोन मिनीटे पुलंही आहेत. कोणी रोल केला आहे माहीत नाही). तेथे वाजपेयी येतात व भाषण देतात. तेथे गाणे चालू आहे "दशरथा, घे हे पायसदान". साधारण वाजपेयी येताना त्या गाण्यातील ओळ "तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो, हा माझा सन्मान" ऐकू येते. हे आवर्जून जमवले आहे का माहीत नाही पण सुधीर फडक्यांच्या सत्काराला वाजपेयी येताना ही ओळ चपखल वाटते.
छान लिहिले आहे फारएण्ड, अंजली
छान लिहिले आहे फारएण्ड, अंजली. उत्सुकता वाटते आहे. शांतचित्ताने वाचले


"संथ वाहते कृष्णामाई". आता पंजाबातील/हिमाचल मधल्या नद्या संथ वगैरे नसाव्यात. मी बियास तेथे पाहिली आहे ती चांगली डोंगरदर्यांतून खळाळून वाहते. तेथे हे गाणे बसत नाही>>>
या दोघांनी मिळून इतक्या उच्च दर्जाच्या रचना तयार केल्या>>> म्हणजे इथले राजकारणाचे धागे 'उच्च दर्जाच्या रचना' नाहीत म्हणायचेय की काय तुला
गीतरामायणाच्या रेकॉर्डिंगचा भाग हा सर्वोच्च बिंदू आहे. तो भाग बघताना आपणही दंग होउन जातो.>>> काहीतरी दैवी आहे गीतरामायणात, नेहेमी काटा येतो अंगावर. त्यासाठी तरी बघेनच.
सुनील बर्वे मला कायम subdued वाटतो, लो एनर्जी. राग आला तरी पटकन शांत होऊन सावरून घेणारा, तडजोडी वगैरे. पण इथे संयत भूमिका असल्याने ते जुळलं असेल.
या स्ट्रगल बद्दल ऐकलेले आहे>>> घरच्यांनी त्यांचे आत्मचरित्र वाचून भारावून जाऊन मलाही काहीबाही सांगितलं होतं. असामान्य संघर्ष आणि झंझावातासारखे कार्य करूनही शांत तेवणाऱ्या नंदादीपासारखी निरलस प्रतिमा माझ्या मनात आहे. कधीकधी त्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणूनही बायोपिक नको वाटतात.
---------------
आचार्य, शाहीर साबळे बाबत मम. मला त्यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हते तरीही आवडला नव्हता.
पिकू, आता बघितली पोस्ट.
सविस्तर अभिप्रायाबद्दल
सविस्तर अभिप्रायाबद्दल धन्यवाद फा. मला आजकाल बायोपिकांचा वीट आल्याने सुधीर फडके कितीही अतिप्रचंड आवडत असले तरी (किंवा त्यामुळेच) मी हा चित्रपट सध्या बघीनसं वाटत नाही. विशेषतः अश्या चरित्रपटात टिपिकल जे असतं ते यातही आहे, तुझ्याच शब्दात <<सुधीर फडक्यांबद्दलचा आदर, त्यांची कारकीर्द, त्यांची गाणी, गदिमा, आशा हे सगळे संदर्भ बाजूला ठेवून एक चित्रपट म्हणून बघितले तर अनेकदा चित्रीकरण अगदी बाळबोध वाटते. विशेषतः स्ट्रगलच्या काळातील त्यांचे मित्र वगैरेंचे सीन. तसेच हा चरित्रात्मक चित्रपट असल्याने गाण्यांशी संबंध नसलेले काही सीन्स आहेत. त्यांच्या अडचणीच्या वेळेस संघाकडून मदत मिळणे, त्यांचे त्यांच्या मित्रांना भेटायला अंबाल्याला जाणे, दादरा नगर-हवेली मुक्तिसंग्रामात त्यांचा सहभाग - हे सगळेही आले आहे. ते बहुतांश सीन्स डॉक्युड्रामा सारखे आहेत.>> . हे असलं काही असलं की मी खच्चीच होतो.
शाहीर साबळे ट्रेलरच फार बाळबोध वाटला होता. अगंबाई अरेच्चासारखा नितांत सुंदर चित्रपट देणार्या केदार शिंदेने निदान स्वतःच्या आजोबांवर उच्च प्रतिचा सिनेमा काढावा अशी अपेक्षा होती. असोच.
सुधीर फडके कितीही अतिप्रचंड
सुधीर फडके कितीही अतिप्रचंड आवडत असले तरी (किंवा त्यामुळेच) मी हा चित्रपट सध्या बघीनसं वाटत नाही. विशेषतः अश्या चरित्रपटात टिपिकल जे असतं ते यातही आहे, >>> हपा अगदी तसे नाही. मध्यंतरापर्यंत "तरूण" फडके आहेत. त्यांचे मित्रांबरोबरचे सीन, त्यांच्या लहानपणचे बरेचसे सीन व संवाद बाळबोध आहेत. सुनील बर्वेचे सीन्स सुरूवातीला आहेत पण तो पहिला सगळा भाग फ्लॅशबॅक आहे. नंतर सुनील बर्वेचा रोल मध्यंतरानंतर सुरू होतो. तेव्हापासून पुढे पिक्चर बहुतांश चांगला आहे. दुसरे म्हणजे कोठे त्यांचे अनावश्यक उदात्तीकरण व इतरांना कमी लेखणे/दाखवणे वगैरे प्रकार यात नाहीत.
गाणी आवडत असतील त्यांची तर एंगेजिंग वाटेल हे नक्की.
अच्छा. त्यांची गाणी मला
अच्छा. त्यांची गाणी मला 'आवडतात' हे म्हणणं अंडरस्टेटमेंट होईल. तू एवढं म्हणतोच आहेस, तर पुढेमागे बघीन मग. "कोठे त्यांचे अनावश्यक उदात्तीकरण व इतरांना कमी लेखणे/दाखवणे वगैरे प्रकार यात नाहीत." >> हे वाचून डोळे औत्सुक्याने विस्फारले.
“ अगंबाई अरेच्चासारखा नितांत
“ अगंबाई अरेच्चासारखा नितांत सुंदर चित्रपट देणार्या” - ‘अगंबाई अरेच्चा’ ला मुळातच ‘What women want’ ची भक्कम चौकट लाभली होती. तरी शेवटी जिथे स्वतःची क्रिएटीव्हिटी दाखवत तो दहशतवादी बाईच्या स्टोरीचं ठिगळ लावलंय तिथे गंडलाय तो मूव्ही. ‘शाहीर साबळे‘ बघायचा प्रयत्न केला पण नाही आवडला. अंकुश चौधरीत संपूर्ण सिनेमा कॅरी करायची ताकद नाही वाटत.
गॉडझिला-मायनस वन बघितला. जबरी
गॉडझिला-मायनस वन बघितला. जबरी आहे.
Toho ही जापनीज कंपनी गॉडझिला, काँग इत्यादी पात्रांची मालक आहे. त्यांनी हॉलिवूडला (मॉनस्टरव्हर्स साठी) सिनेमांची परवानगी दिली आहे तरी त्यांचे स्वतःचे सिनेमे सुद्धा येत असतात. शिन गॉडझिला आणि २०२३ चा गॉडझिला मायनस वन हे टोहोचे मॉडर्न गॉडझिला सिनेमे आहेत. हॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा कथेवर जास्त भर देणारे सिनेमे आहेत.
मायनस वन - दुसऱ्या विश्वयुद्धातल्या पराभवानंतर जपान अनेक बाबीत देशाच्या इतिहासातील सर्वात खालील पातळीवर होता - शून्य पातळीवर. ह्याच परिस्थितीत गॉडझिला टोकियो वर चालून येतो - म्हणून गॉडझिला मायनस वन.
शिकिशिमा हा एक तरुण कामिकाझे पायलट असतो - शत्रूच्या जहाजावर धडकून विस्फोटात ठार होणे ही त्याची ऑफिशियल जबाबदारी असते. तो शेवटच्या क्षणी मागे फिरून एका बेटावर उतरतो. तिथे असलेले जपानी सैन्य कर्मचारी त्याच्याकडे आपले कर्तव्य चुकवणारा म्हणून बघत असतात. खोल समुद्रात राहणारे मासे मृतावस्थेत मोठ्या प्रमाणावर त्या बेटाच्या आसपास तरंगू लागतात आणि ह्या कॉलिंग कार्डच्या पाठोपाठ खुद्द गॉडझिला अवतरतो. मोक्याच्या वेळेस गॉडझिलाकडे बघून विमानातला शिकिशिमा स्तब्ध होतो, आणि त्याच्यासमोर बेटावरील जवळपास सगळे गॉडझिलाकडून मारले जातात.
युद्ध संपते. शिकिशिमा बॉम्बिंग मध्ये उद्ध्वस्त टोकियोत परत येतो. घर, आई वडील - काही शिल्लक नसते. "सरव्हायव्हर्स गिल्ट"ने त्याची मनस्थिती विदीर्ण असते. आपण ड्युटी चुकवणारे कामिकाझे पायलट आहोत, आपल्या मुळे अनेक लोकं गॉडझिलाकडून मारली गेली हे विचार त्याला पोखरत असतात. निव्वळ योगायोगाने त्याला एका परिवाराची जबाबदारी मिळते, आणि तो युद्धात अमेरिका आणि जपानने समुद्रात पेरलेल्या अगणित सुरुंगांना शोधून निष्फळ करण्याची धोकादायक नोकरी घेतो. नवीन कामात आणि घरात थोडी स्थिरता येत असते तोच त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खोल समुद्रात गॉडझिलाशी संपर्क होतो. गॉडझिला टोकियो वर चालून येणार हे समजल्यावर शिकिशिमाचा भूतकाळ परत त्याला छळू लागतो.
व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर मिळालेला. खरेतर व्हिज्युअली सिनेमाचे कमी बजेट जाणवते पण कुठेही वावगे वाटत नाही. कथेतली पात्रं मस्त लिहिली आहेत. पाहण्यासारखा सिनेमा.
(बघण्यासाठी दोन पर्याय - अमेझॉन प्राईम vpn करून जपान. किंवा पायरसी. तिसरा पर्याय सध्या उपलब्ध नाही.)
What women want >> हो, ते
What women want >> हो, ते माहिती आहे, पण ह्यात बगाड वगैरे जे दाखवलंय ते अफलातून आहे. मल्हार वारी गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण आपल्याला एका झोनमध्ये घेऊन जातं. पावसाळी हवा, बैलांवर केलेली रंगरंगोटी, जत्रा, लेझीम आणि अश्या वेळी असणारा उत्साह पुरता त्यात अर्काप्रमाणे उतरलाय. दहशतवादी बाई वगैरे गंडलंय (माझ्या मते ते भारती आचरेकरचं कॅरॅक्टर पण प्रिन्सिपली गंडलंय), पण ते चालून जातं इतकं बाकीचं जमलंय.
बरेच पिक्स न पाहता आल्या ने
बरेच पिक्स न पाहता आल्या ने नुसतेच वाचत आहे. इथल्या रेको प्रमाणे आता इंस्प. रीषी बघायला घेतलाय. रहस्य बरे वाटतेय..
'नाच गं घुमा 'सारखा भयानक
'नाच गं घुमा 'सारखा भयानक सिनेमा परेश मोकाशींनी काढलाय , मधुगंधा-परेश मोकाशींनी लिहिलाय यावर विश्वास बसत नाही !
कसले ते महाफालतु लेव्हलचे जोक्स (!), काय ती स्टोरी, काय ते ओव्हर अॅक्टिंग मुक्ता बर्वे आणि सारंग साठ्येचं, बघवत नाही , ती मायरा एक नंबरची आगाऊ आकाली प्रौढत्त्व आल्यासारखी वागते, लोकांना लहान मुलींचं असं अॅक्टिंग आवडतं ?
मुक्ता बर्वे तर इतकी भयंकर वाइट अॅक्टिंग करेल, इतकी लाउड असह्य होईल असं वाटलं नव्हतं !
तिचं कॅरॅक्टर अॅब्युजिव, मेन्टल हेल्थ इश्युज असलेलं तयार झालय असं दिग्दर्शकाला, तिला स्वतःला ,ऑडियन्सला वाटलं नाही का ? तरी आपलं उगीच सिंपथी घ्यायचे रडण्याचे सीन्स कि बायकांची स्वप्नं कशी अपुरी रहातात वगैरे.. तिचं कुठलं स्वप्नं भंग झालं ? एक नंबरची स्वार्थी दाखवली आहे ती, तिच्या मैत्रीणीचा पाय तुटला त्याचे काही वाईट वाटत नाही तिला, स्पर्धेत भाग घेता येणार नाही आणि कामवाली मनासारखी नाही कि लग्गेच हिची स्वप्नं अपुरी
आधी ती कामवालीला टॉर्चर करते, फिजिकली अँड व्हर्बली, मग बाई नाही मिळाली कि ही बिचारी ! रिअली ?
अशा अॅब्युजिव बायका नाहीच डिझर्व करत काही अॅचिव्ह करणे , ज्या बाईला एम्लॉइज, कलिग्ज कोणाला रिस्पेक्ट देता येत नाही, नीट बोलता येत नाही ती नाहीच करु शकणर कधी प्रोग्रेस !
योगासनात नाव मिळवायचय तर एकच बँकेची स्पर्धा आहे का ? त्यासाठी वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करावी लागते !
या सगळ्या गोंधळात बिचारी नम्रता ही एकच उत्तम अभिनय करते आणि शेवटपर्यन्त सिनेमा बघायला भाग पाडते !
असे सिनेमे आजकाल कमर्शिअल सक्सेस मिळवतात, खरच कठिण आहे !
या सगळ्या गोंधळात बिचारी
या सगळ्या गोंधळात बिचारी नम्रता ही एकच उत्तम अभिनय करते आणि शेवटपर्यन्त सिनेमा बघायला भाग पाडते !>>> हे वाचून छान वा
टले. तिची अभिनयातली तडफ हास्यजत्रेत दिसली.
वरील रेव्हू सारखेच रीव्ह्यू ऐकीवात येत आहे घुमा विषयी.. पण १ वेळ बघायला बघावा मराठी चित्रपटाला हातभार म्हणुन का होईना
हे वाचून छान वा
हे वाचून छान वाटले. तिची अभिनयातली तडफ हास्यजत्रेत दिसली.
>>>>> +१११
>> मायरा एक नंबरची आगाऊ आकाली
>> मायरा एक नंबरची आगाऊ आकाली प्रौढत्त्व आल्यासारखी वागते, लोकांना लहान मुलींचं असं अॅक्टिंग आवडतं >> असेल कल्पना नाही. ती मायरा भयंकर आगाऊ वाटते रियल लाईफमध्येही. ज्या आईवडिलांनी पैसे आणि प्रसिद्धीच्या मोहाने लहान वयात मुलांची युट्युब चॅनल्स काढली आहेत त्यांची हीच गत असावी. सुरबातीला केया इंगळे आवडायची पण ती ही सासूसुना रिल्स करत बालपण हरवून बसणार.
Pages