चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Srikanth बघितला. आवडला!
श्रीकांत बोल्ला यांच्या आयुष्यावर based movie आहे.
Visually impaired मुलांसाठी भारतात सायन्स स्ट्रीमचा ऑप्शन नाही, म्हणून केस करून हट्टाने सायन्स घेत, जन्मापासून दृष्टिहीन असून सुद्धा प्रॉब्लेम्स वर मात करत पुढे Massachusetts Institute of Technology (MIT) इथून शिक्षण घेऊन भारतात परत आले आणि बोलांट इंडस्ट्रीज सुरू केली.
राजकुमार रावने खूप छान काम केलंय, खरंच अंध व्यक्ती समोर आहे असं वाटत राहतं.

सायो , मायरा आणि केया बद्दल अनुमोदन.
त्या प्रार्थना बेहरेच्या सिरियलमध्ये आली तेव्हा तीचे YouTube channel बघितले होते. तिच्या पेक्षा जास्त तिची आई नाही आवडली. आतातर तिचे normal reels पण overreacting ki dukaan वाटतात.

राजकुमार राव Trailer madhyech खूप आवडला. एका अंध व्यक्तीला मी ओळखते , अगदी जवळून पाहिलं आहे. रारा ची देहबोली योग्य वाटली.

श्रीकांथ मुलांना घेऊन बघायचा आहे, पण इथे फक्त रात्री १०:१५चा शो आहे. आणि एकाच थिएटरला एकमेव शो आहे म्हणजे वीकेंड पर्यंत टिकेल का माहित नाही. बघुया कसं जमतंय.

सायो , मायरा आणि केया बद्दल अनुमोदन.
केयाला किती तरी वेळा प्रत्यक्ष बघितलं आहे घराजवळ रहात असल्याने. ती आणि तिचं संपुर्ण कुटुंबच हवेत उडायला लागलं आहे हे दिसतं आहे. एका चष्माच्या दुकानात मागच्या महिन्यात आलेली तेंव्हा कोणी ओळख देत नाहीये आपल्याला यासाठी चिडचिड करत होती. मुलगी लहान आहे पण मोठ्यांनी समजवायला नको? आई तिला म्हणत होती की अग हे लोकं नसतील इन्स्टावर म्हणुन माहीत नसशील तू. हे दुकान जरा खेडवळच आहे तसं (लेन्सकार्टमधे होतो आम्ही)

मला या दोन्ही मुली, त्यांचे व्हिडीओ चॅनल आणि त्या काम करत असलेल्या मालिका असल्या तरी माहीत नाहीत.
युट्युबर्स ना कोणी ओळखावं हे ज्याच्या त्याच्या आवडीच्या सेक्टर वर असेल.

मायराचे एखादे रील पाहिले गेले तेव्हापासून इंस्टाग्रामने 'भोग आपल्या कर्माची फळं' म्हणून तिला दाखवण्याचा सपाटा सुरु केला. आता जातच नाही मेले तिचे रील्स माझ्या फीड वरून. मला ती कधीच आवडली नाही. ओव्हरऍक्टींग ची दुकान. आता तर लोकही कंटाळले आहेत, तेही तिच्यावर टीका करत आहेत.
बरं अल्गोरिथम म्हणतो की मायराला पाहिलेस ना मग ती नुसती इंस्टाचं नाही, फेसबूक वरही बघ, युट्यूबच्या शॉर्ट्समध्येही तिलाच बघ. तिच्या संदर्भात जे असेल ते बघ. आणि थांब हा..तूला अजून लहान मुले दाखवतो ! मग केयाचे रील्स दिसणे सुरु. आधी तिचे ऍक्टिंग चांगले वाटले, कंटेंटही बरा वाटला पण आता तीही तिच्या क्यूटनेस सह असह्य होते.

बाकी मराठी चित्रपट पूर्वी सासर माहेर, सासूचे छळणे, नवऱ्याला संकटातून सोडवणारी बायको असे विषय घेऊन महिलांना आकर्षित करत असत. आता विषय थोडे आधुनिक पद्धतीने दाखवतात. शहरी मॉडर्न स्त्रिया आणि त्यांना भेडसवणारे रोजचे प्रॉब्लेम घ्यायचे, एखादी मॉडर्न म्हातारी नाचबीच करताना दाखवायची, मग ते प्रॉब्लेम्स सिनेमा संपताना सुखद करायचे, झाला मराठी सिनेमा. स्त्रिया भरभरून गर्दी करणारच. आणि मराठी सिनेमा आहे म्हणून सपोर्ट आपण करणारच.

आयपीटीव्हीवर 8 am metro बघितला. सयामी खेर आणि गुलशन देवैयाचा. छान आहे. बहुतेक फार काही गाजावाजा झाला नाही . थोडा ऑफ बीट टाईप्स वाटला.
काही कारणाने मेट्रोच्या प्रवासात भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्ती कशा एकमेकांच्या ओळखीच्या होत जातात, स्वभाव, आवडणार्‍या कॉमन गोष्टी यासकट! दोघांनाही आपापल्या आयुष्यातले काही इमोशनल बॅगेज असून एकमेकांना जज न करता फक्त सोबतीने हिम्मत मिळते किंवा त्यातून बाहेर पडता येते हे फार सुंदर दाखवलंय.
एका स्त्री पुरूषात निव्वळ मैत्री होऊ शकते का? त्यात आकर्षणाचा भाग जराही न येता किंवा आला तरी ते तसं चालू ठेवणं किती जिकिरीचं आहे हे ओळखून कुठे थांबायचं हे समजणं महत्वाचं ते आवडलं.
दोघांनी फार मस्त काम केलंय. गुलशन तर बापमाणूसच वाटतो अशा प्रकारच्या मुव्हीज मधे. त्याचं रडणं, हसणं, फॅमिलीसाठी विकल होणं हे फार नॅचरल वाटलंय.
सयामी गॄहिणी रोलला सुटेबल नाही वाटलीये. काम केलंय छान पण समहाऊ तिची पर्सनालिटी घुमरसारख्या रोलमधे जास्त उठावदार दिसते. तिच्या बहिणीचं काम केलेली अ‍ॅक्टर पण आवडली. छान दाखवलंय बहिणींमधलं बाँडींग. एक सरप्राईज फॅक्टर वॉज उमेश कामत. सयामीचा नवरा. छोटा रोल आहे पण चांगलाय.
सिनेमात येणार्‍या काही कविता छान वाटल्या, गुलजार यांनी लिहिलेल्या आहेत.

लापता लेडीज कुणीतरी youtube वर टाकलेला, आता गायब. बघणे योग्य की नाही ते समजेना तरी starting थोडा बघितला. ट्रेनमध्ये ती पुष्पा खिडकीजवळ बसलेली असते, नंतर तिचा नवरा असतो. त्याच्या डाव्या बाजूचे शेजारी उतरून गेल्यावर तो फुलला तिथे बस सांगतो आणि ती बसते. फुलचा नवरा गाव आलं म्हणून पटकन त्या पुष्पा (जया) च्या नवऱ्याच्या डाव्या बाजूचीचाच हात पकडून नेतो, खरं तर ती फुलच असायला हवी होती, खिडकीजवळ बसलेली पुष्पा का जया कशी निघते, त्या दोघींनी जागेची अदलाबदल केलेली दाखवली नाही.

Btw फुल फार गोड आणि निरागस वाटली, लहान आहे तशी. दुसरी matured.

‘क्र्यू’ पाहिला. कुठेच काही कन्व्हिंन्सिंग नाही, कनेक्ट होत नाही. कटरिना कैफ, अमिताभ बच्चन चा एक ‘बूम’ नावाचा सिनेमा होता, त्याचा रिमेक आहे (ह्यावरून ‘प्राज्ञ परिक्षेची पातळी झटकन लक्षात यावी‘).

फेफ Lol

क्रू अगदीच फालतू. काहीही लॉजिक नाही.मला तर शेवट पण नीट झेपला नाही. दलजित दोसांज ला वाया घालवलेय!

क्रू मलाही आवडला नाही. करीना तर लहानपणापासून भुरट्या चोऱ्या करते. विचित्र कपडे घालून फिरते. तब्बुचं काम चांगले आहे पण पात्रात दम नाही. कपिल शर्मा तब्बुला विमानातल्यासारखे 'दो द्वार आगे दो द्वार पिछे' करायला लावतो. हा ह्यांचा रोमॅन्स झाला. क्रिती घरी पायलट असल्याची थाप मारत असते पण टॉप्पर असते. दलजित तर फ्लर्ट पुरताच आहे.‌ छोट्या छोट्या गोष्टींवर तिघीही अतिशय गंभीर होतात आणि मोठेमोठे तमाशे मात्र ठुमक्याने सहज मात करतात. Lol

वरच्या सर्वांना मम.
प्राज्ञ परीक्षा आणि बूम>>>> Lol

Lol अत्यंत बकवास आहे.
क्रिती माबोकरांना आवडलेली म्हणून कोण म्हणून बघितली. ती पण बंडलच दिसते की! काही तरी विचित्रच चेहेरा आहे.

अमेरिकन हार्टलॅण्ड मधल्या कथा असलेले दोन पिक्चर्स - दोन्ही नेफिवर

द हिलबिली एलिजी - हा आधीही बघितला होता पण सहज लावला आणि इंटरेस्ट राहिला पूर्ण बघायला. सध्या युएस सिनेटर असलेल्या जे डी व्हान्सच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे. नक्कीच बघण्यासारखा आहे. यावर मी पूर्वी जास्त डिटेल लिहीले आहे.

द जज - रॉबर्ट डाउनी ज्यु, रॉबर्ट डुवाल आणि बिली बॉब थॉर्न्टन व इतर २-३ चांगले कलाकार. हा ही जबरदस्त ग्रिपिंग आहे. नायक हा निष्णात वकील आहे - बहुधा शिकागो मधे दाखवला आहे. इण्डियाना मधल्या एका कोर्टात जज असलेल्या त्याच्या (संबंध दुरावलेल्या) वडिलांवर खुनाचा आरोप होतो व आधी आईच्या मृत्यूनंतर तेथे गेलेला तो त्यात त्यांची केस घेतो. हा ही पिक्चर बघण्यासारखा आहे.

गॉलायाथ सारख्या सिरीज मधे बेवडा वकील म्हणून सहज खपून जाणारा बिली बॉब थॉर्न्टन इथे अपटाइट सरकारी वकील्/प्रॉसीक्यूटर आहे आणि वाटतोही. दोन्ही रॉबर्ट मधली सततची जुगलबंदी भारी आहे. त्याचे दोन भाऊ, आधीची गर्लफ्रेण्ड व्हेरा फार्मिगा - सर्वांचीच कामे मस्त आहेत.

ही पोस्ट डेजाव्हू होते आहे फा. काल वाचली होती आणि 'द जज' नोट केला होता. रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर आवडतो पण कोर्टरूम ड्रामा अतिशय संथ वाटतात. पण ह्या रेको मुळे बघेन. 'द हिलिबिली एलिजी' बघितला आहे बहुतेक/ नक्की आठवत नाही.

आधी चिकवा ६ वर दिली होती बहुतेक ही पोस्ट. Happy
चिकवा ६- चकवा ६ झाला आहे.

मी पण दोन वाईट सिनेमा बघितले.
Madam Webb
Dakota Johnson
अजिबात आवडला नाही. डकोटा मख्ख आहे. व्हिलन आपल्याच नादात वाटतो. तिला NDE येऊन premonition येतात आणि व्हिलन कोळी चाववून लोकांना मारतो. तीन शाळकरी मुली आहेत त्या बावळट आहेत. कशाचा पायपोस कशाला नाही.‌ शेवटही बंडल आहे. मार्व्हलचं थ्रील तीळमात्र नाही. बघू नका.

Noah
रसेल क्रो, जेनिफर कॉनली, एमा वॉटसन, ॲन्थनी हॉपकिन्स
दणदणीत कलाकार आहेत. हा केवळ नेटफ्लिक्सवरून जातो आहे म्हणून बघितला. नोवा'ज आर्क ला ट्रान्सफॉर्मरचे ग्राफिक्स जोडून काहीतरी भव्यदिव्य केले आहे पण प्रभावी वाटले नाही. बायबलमधली असूनही भिडली नाही किंवा काही तरी वेगळीच वाटली. बायबलपासून थोडीशी प्रभावीत असलेली वाटली. भारतीय मनू आणि नोआ मधे फार साम्य वाटतं. याआधीही माहिती असलेली वेगळ्या रूपात (Evan Almighty) मधे आवडली होती पण हा चित्रपट आवडला नाही. ॲन्थनी हॉपकिन्स मात्र आवडला.

Crew
अ आणि अ सिनेमा आहे. Uhoh केवळ त्या तिघीही आवडतात म्हणून शेवटपर्यंत पाहिला.
त्या तिघींचं राहणीमान कुठेही पैशाची चणचण असणारं वाटत नाही. तेच डेस्परेशन पोचत नसेल तर पुढचा डोलारा काय कामाचा. फक्त नानू की अंगूठी, पीएफ, लोनचा हप्ता हे शब्द वारंवार संवादांत टाकून काय होणारे!
बाकी मूव्ही-मेकिंग क्राफ्ट सगळं चकाचक आहे, बॉलिवूडमध्ये ते आजकाल असतंच.

-----

मोनिका, ओ माय डार्लिंग (नेटफ्लिक्स)

पहिला अर्धा भाग चांगला आहे, डोकेबाजपणे लिहिलेला थ्रिलर वाटतो. अपेक्षा वाढतात.
पुढच्या अर्ध्या भागात अपेक्षाभंग !

क्रिती माबोकरांना आवडलेली म्हणून कोण म्हणून बघितली. ती पण बंडलच दिसते की!
>>>>

यात ती तितकी छान दिसली नाहीये.
कधी कधी फसतो एखादा लूक. पण आहे ती छान दिसायला.
करीनाला त्यात आंटी आंटी करतात. पण ती त्यामानाने छान वाटली आहे. आणि तब्बू खूप वयस्कर वाटली आहे.

अरे अदलाबदल ही एक कल्पना आहे. ती काही फार आउटऑफ द वर्ल्ड ग्रेट वगैरे नाही >>> तिकडे कुलूप लागल्याने (धन्यवाद अ‍ॅडमिन) अमितची पोस्ट इथे आणत आहे.

देल्ही बेली व डम्ब अ‍ॅण्ड डम्बर आठवले लगेच अदलाबदल कल्पने वर Happy दोन्ही ऑटाफे.

लापता लेडीज वर स्वतंत्र धागाच काढा कोणीतरी. मी पुन्हा एकदा पूर्ण पाहिला. एक तो नेत्याचा सीन सोडला तर फ्रेम बाय फ्रेम सुंदर आहे पिक्चर. ते सुरूवातीचे लग्नासंबंधी "मोटिफ" व शेवटची रेखाचित्रे पहिल्यांदा पाहताना निसटली होती. ती ही मस्त आहेत.

का ते विचारू नका पण ड्रीमगर्ल 2 पाहिला.
चांगल्या ॲक्टर ना वाया कसं घालवायचं याचं उत्तम उदाहरण. कथा या नावाखाली जे काही आहे ते जे काय फुंकून बनवलं आहे ते अत्यंत सुमार दर्जा चं असावं.
आयुष्मान चं वय (आणि इतर सवयींचे परिणाम) चेहेऱ्यावर दिसतंय. अनन्या पांडे नी तिला घेण्यासाठी पैसे दिले असावेत असं मानायला वाव आहे.
इतकं असूनही ड्रीमगर्ल 3 आला तर तो बघणार...

कारण हमारी भी कुछ बुरी आदतें है...

Pages