Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडते किन्वाची nutty चव.
मला आवडते किन्वाची nutty चव.
आवडते म्हणजे आवडते. मग मिलॉर्ड काहीही म्हणोत.
अमित, तुला आवडत नसेल चव तर
अमित, तुला आवडत नसेल चव तर तसं म्हण पण समोरच्याला खोटारडं म्हणायचा हा अट्टहास (की आगाउपणा की बालीशपणा) का?
(No subject)
मला किन्वा आवडतो कारण थंडीत
मला किन्वा आवडतो कारण थंडीत गरम पदार्थ म्हणून देशी, टेक्समेक्स पद्धतीने शिजवून खाता येतो आणि उन्हाळ्यात नुसताच शिजवून ठेवला की सॅलड करता येते. फक्त सॅलड ड्रेसिंग आणि इतर घटक बदलायचे. एकंदरीत लंचसाठी शाकाहारी पर्याय होतो आणि नॉन वेज हवे असल्यास त्यातच चिकन, कोलंबी वगैरे घालून वेळ भागते.
फॉरेन बिरेनचा काही संबंध नाही
फॉरेन बिरेनचा काही संबंध नाही हो. चवीबद्दलच म्हटले.
मला किन्वा आवडतो म्हणजे आवडतो. ओट्स आवडत नाहीत म्हणजे आवडत नाहीत.
किन्वा प्रकारात बहुतकरून उपमा, खिचडी होतात नेहमी आणि कधीतरी नारळी किन्वा. किन्वादाणा रेसिपी वाचुनच आवडली आहे, लौकरच करण्यात येईल.
किन्वा असलेले buddha/ veggie
किन्वा असलेले buddha/ veggie bowls मी नेहमी करते. इन्स्टावरच्या एका आजींच्या रिलनुसार केल्यापासून मस्त मऊ , व्यवस्थित शिजलेला , मोकळा किन्वा जमायला लागल्यावर आवडायला लागला. नुसता बेचवच लागतो अर्थात, इतर गोष्टी घालून नटवणे आवश्यक.
हो बरोबर.
हो बरोबर.
श्रीखंडासाठी आणलेला चक्का
श्रीखंडासाठी आणलेला चक्का जास्त वाटला म्हणून एक=दीड वाटीभर बाजुला काढुन ठेवला आहे.
त्याचे काय करता येईल ? कशात वापरुन संपवु ?
युक्ती सुचवा लोकहो.धन्यवाद
BBQ मॅरीनेशन साठी. चिकन,
BBQ मॅरीनेशन साठी. चिकन, पनीर ई ई. त्यात सगळे इतर मसाले ऍड करा. चक्का लागतोच ह्यासाठी.
काही सॅलड्समध्ये हंग कर्ड
काही सॅलड्समध्ये हंग कर्ड वापरतात. माबोवरील सॅलड्सचा धागा चेक करा. ग्रीक योगर्टवाल्या रेसिपीमध्येही वापरता येईल.
सॅन्डविच सुरेख होते. चक्क्यात
सॅन्डविच सुरेख होते. चक्क्यात गाजर किसून, कांदा- टोमॅटो -काकडी -हिरव्या मिरच्या बारीक चिरून, थोडे मीठ मिरपूड टाकून ब्रेडवर लावून. मी क्रीम चीजचे असेच करते पण चक्क्याचे जबरदस्त लागते. फॅट किती आहे, छान का नाही लागणार. ऋषी कपूर कुठल्याही स्वेटर मधे गोंडसच दिसायचा.
दही कबाब करून बघा.
दही कबाब करून बघा.
सँडविच म्हटल्यावर
सँडविच म्हटल्यावर मेडिट्रेनिअन सँडविच मध्ये चक्काच असतो की काय असं आता वाटतंय. पांढरं असं काही असतं, पण ते चीज किंवा पनीर नसतं. मला वाटतं पनेरा ब्रेडच्या मेडिट्रेनिअन व्हेजी रॅप/ सँडविचमध्ये असावं.
मेडीट्रेनिअन मधे फेटा चीज
मेडीट्रेनिअन मधे फेटा चीज वापरतात ना मोस्टली.
अरे हो. बरोबर! फेटाच असणार.
अरे हो. बरोबर! फेटाच असणार. सॅंडविच मध्ये फेटा फार भारी लागतं. किंवा कुठल्याही सॅलेडवरही. फक्त ते आणलं की लगेच संपवायला लागतं आणि ते लक्षात रहात नाही.
पण मी म्हणते असा जास्त कसा
पण मी म्हणते असा जास्त कसा वाटतो चक्का?
आमच्याकडे वट्ट 3 लिटर फुलक्रीम दुधाला विरजण लावून त्या दह्याचा चक्का करून, वर दुधात फेटलेला घरचा आटवलेला आमरस घालून ती आम्रखंड क्वांटिटी बघितल्यावर लेकीने "मला डब्यात न्यायला उरेल का?" हे विचारून मला भोवळ आणली!! मी मोजकं खाते, साबांना शुगर आहे म्हणून मनाविरुद्ध का असेना त्या मोजकं खातात. सासरे जेवताना व्यवस्थित खातात, बाकी 2 मेंबर्स येताजाता चमचाभर श्रीखंड खातात. :कपाळावर हात:
श्रीखंडावरून मला अचानक
श्रीखंडावरून मला अचानक लहानपणी मिळणारी श्रीखंडाची वडी (गोळी नव्हे) आठवली.
कोणाला आठवते का? कुठे मिळायची की कोणाकडे बनलेली खाल्ली आहे आठवत नाही.
पण ती आंबटगोड रवाळ वडी मस्त लागायची.
अजूनही मिळते, खाऊवाले पाटणकर
अजूनही मिळते, खाऊवाले पाटणकर आणि बऱ्याच ड्रायफ्रुट दुकानात.
हो का? आता पुढच्या भेटीत घेईन
हो का? आता पुढच्या भेटीत घेईन नक्की
ऋषी कपूर कुठल्याही स्वेटर मधे
ऋषी कपूर कुठल्याही स्वेटर मधे गोंडसच दिसायचा. >> हा हा हा... अस्मिता...
रेसिपी साठी धन्यवाद. काल चक्का सँडविच करुन झाली. घरच्याना खुप आवडली.
काय म्हणायचं या सँडविच ला असा प्रश्ण विचारला तेव्हा... "ऋषी कपूर सँडविच" असं सांगितलं
ऋषी कपूर सँडविच >>>
ऋषी कपूर सँडविच >>>

ऋ क सॅ >> to be more fancy
ऋ क सॅ >> to be more fancy
स्मिता, मस्त वाटलं वाचून. ऋषी
स्मिता, मस्त वाटलं वाचून. ऋषी कपूर सॅन्डविच पर्फेक्ट.
ऋषी कपूर सॅन्डविच>>>
ऋषी कपूर सॅन्डविच>>>
ऋषी कपूर सँडविच
ऋषी कपूर सँडविच
अर्धी वाटी केप्र कैरी लोणचे
अर्धी वाटी केप्र कैरी लोणचे मसाला शिल्लक आहे.यावर्षीचे काम झाले आहे.. पुढच्या वर्षीपर्यंत expiry होऊन जाईल..कशात वापरून संपवता येईल?
आवळा लोणचे, भाज्यांचे लिंबू
आवळा लोणचे, भाज्यांचे लिंबू पिळून लोणचे, अचारी आलू !
तिखट मिठाच्या पुऱ्या करताना
तिखट मिठाच्या पुऱ्या करताना मिक्सर मधून काढून कणकेत.
अचारी मठरी !
अचारी मठरी !
जास्त खटाटोप + तळणे + मैदा - चविष्ट अनहेल्दी ऑप्शन
लोणचे नको आहे.. आचारी आलू आणि
लोणचे नको आहे.. आचारी आलू आणि तीमिपू चांगला option वाटतोय..thnank you सगळ्यांना..
अनिंद्य
खिचूबरोबर तेल आणि लोण्च्याचा
खिचूबरोबर तेल आणि लोण्च्याचा मसाला भारी लागतो
पान्ढर्या ढोकळ्यावर पण भुरभुरता येतो
लोणचं नको म्हणालीस तरी लिहीते
लोणचं नको म्हणालीस तरी लिहीते, येत्या पावसाळ्यात किंवा थंडीत खजुर मनुका किंवा नुसत्या खजुराचं लोणचं करु शकतेस.
खजुर मनुका किंवा नुसत्या
खजुर मनुका किंवा नुसत्या खजुराचं लोणचं>> यांचं लोणचं असतं हे आताच कळतंय.
फू.स. :
फु.स. :
खजूराचे लोणचे करायचे असेल तर सप्टेंबरपर्यंत थांबा. तोवर असे सुंदर सुकुमार ओले खजूर येतील.
त्यांचे पोट फाडून त्यात आपला उरलेला मसाला कोंबून कमी तेलात चविष्ट लोणचे तयार होईल.
त्यात हिरव्या मिरीची (हिरवी मिरची नाही मिलॉर्ड, ते डोक्यावर वगैरे वाटतात ते मिरे / मिरी) संगत लाभली तर अहाहा ! रूप रंग रसनेची बहार
आलू पराठ्याच्या सारणात
आलू पराठ्याच्या सारणात नेहमीच्या मसाल्याऐवजी लोणच्याचा मसाला छान लागतो.
तुरीच्या डाळीचे वरण करून
तुरीच्या डाळीचे वरण/ आमटी करून त्यात लोणचे मसाला घालता येतो..मस्त लागतो.
यांचं लोणचं असतं हे आताच
यांचं लोणचं असतं हे आताच कळतंय. >>> मि पा वर वाचलेले. तेव्हापासून करते थंडीत, मनुका किंवा बेदाणे ही माझी अॅडीशन.
अनिंद्य मस्त आयडीया, ह्या ओल्या खारका आहेत ना, कच्छी लोकं ह्याचं खूप छान लोणचं करतात, लहान असताना आमच्या जुन्या शेजाऱ्यांना गावाहून यायचं. ते त्यातलं आम्हाला द्यायचे. जाम टेस्टी असायचं.
करायलाच हवे हे लोणचे.
करायलाच हवे हे लोणचे. माहितीतील लिंक सहज देण्यासारखी असेल तर द्या.
काही वर्षांपुर्वी वाचलेलं आणि
काही वर्षांपुर्वी वाचलेलं आणि तेव्हा केलेलं, त्यानंतर करते दरवर्षी. मिळाली तर देईन लिंक.
अरे वा बऱ्याच idea मिळाल्या .
अरे वा बऱ्याच idea मिळाल्या ..अंजू ताई थोडेसे लोणचे करून बघते...पराठा आणि आमटी मध्ये वापरते ..thank you परत एकदा
मानव,खजुराचे लोणचे
मानव,
खजुराचे लोणचे
स्वाती२ मस्त काम.
स्वाती२ मस्त काम.
करून बघतो!
करून बघतो!
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.
तीन चार मेथी दाणे फोडणीत
तीन चार मेथी दाणे फोडणीत घालून त्यात बटाट्याच्या फोडी ,हळद, मीठ, लोणचे मसाला, थोडे खोबरे व दोन च. चमचे पाणी घालून भाजी करायची. वर ताटलीत पाणी ठेवून शिजवून शेवटी कोथिंबीर घालायची. मस्त भाजी होते.
लोणचे मसाला घालून भात करता
लोणचे मसाला घालून भात करता येईल काय? किंवा कैरी भात?
खजुराचे लोणचे युनिक आहे, करुन
खजुराचे लोणचे युनिक आहे, करुन बघते...लोणचे मसाला आहे बहुतेक..
इथेच कोणीतरी सखूबत्ता नावाची
इथेच कोणीतरी सखूबत्ता नावाची रेसिपी लिहिली आहे ती पण छान होते पण साधारण लोणच्यासारखाच प्रकार आहे तो.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/25081 मी दरवर्षी करते.
सखुबत्ता झाला करून..
सखुबत्ता करून झाला
Pages