वाशीत डब्बा पुरवणारी अथवा जेवण करून देणारी बाई हवी आहे तातडीने

Submitted by मनःस्विनी on 16 December, 2009 - 01:12

एक विनंती आहे इथे वाशीमधील रहण्यार्‍यांपैकी कोणाला माहीती असल्यास, माझ्या ओळखीतल्या जवळच्या काकांची अपघातामूळे जेवण करू शकत नाहीत. हॉटेलमधील तिखट,तेलकट खाणे पचत नाही.
खूपच वाईट अवस्था आहे त्यांची जेवण्याची. कोणी सांगू शकेल का कुठे साधे शुद्ध शाकाहरी जेवण/डबा मिळेल वाशीत? नाहीतर कोणाला अशी काही कंपनी माहीती आहे का जी जेवण करणारी बाई उपलब्ध करून देतात?

कुठे लिहायचे नक्की कळले नाही व हे खास वाशी मधील साठी होते म्हणून इथे लिहिले. मला ई-मेल केले तर चालेल. धन्यवाद.

मला व माझ्या कुटींबीयाना वाशीतली काहीच माहीती नाही व आता आम्ही मुंबईतच रहात नाही तेव्हा कसे कळणार.
काका एकदम अंथरुणात पडून. रोज काहीतरी फोनवरून ऑर्डर करतात, बायको महिन्यापुर्वीच गेली. आता ह्या वयात कुठे व काय शोधणार. कामवाल्या हा बायांचा भाग. एक अतिशय जुन्या ओळ्खीतले काका आहेत पप्पांच्या. आजच पप्पांकडून एकले नी वाईट वाटले ह्या वयात असा प्रसंग. एक वेळचे धड जेवण नाही मिळत. त्यात ट्रीटमेंट चालू असल्याने हजार गोळ्या व त्यांची अ‍ॅसीडिटी.

कोणी माहीती असल्यास मिळाली पत्त्यासकट नाहीतर बाईच मिळेल तर बरे होइल.
त्यांचा एकुलता एक मुलगा इथे अमेरीकेत.( आई-बापाला कधीच बघितले/बघत नाही. ... असो तो दुसरा विषय होइल).
सध्या त्यांची जेवणाची व्य्वस्था होइल तर बरे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाशीत कुठे राहतात? कोपरखैरणेमध्ये एक बाई आहे माहितीची. तिचा फोन न. उद्या सांगते.

मामी धन्यवाद. ह्म्म.. काय असते बघा ना.. इतके श्रींमत आहेत पण कोणी नाही बघायला.
बायकोही नुकतीच आजारने गेली त्यामूळे तसेही थकले होते. पाय घसरला घरातच व पडले. घरातील बाईमाणूस गेले तसे प्रत्येक कामासाठी ठेवलेल्या बाया पण त्रास द्यायला लागल्या. एक दिवस येतात, दोन दिवस सुट्टी. पैसे घेवून जातात. मुंबईत कामवाल्यांचा खूप त्रासच आहे.
ह्या काकांना कोणी जेवण घरी येवून बनवणारी/घालणारी बाई मिळेल विश्वासाची तरी बरी.

जुन्या मायबोलीवर बोम्बे व्हायकिंग नावाचा आय्डी होता, त्यांच्या आई डबा पुरवण्याचे काम करत असत.
एक दोन दिवसात कळवतो.

धन्यवाद सर्वांना. सेक्टर १७ वाटते. मी विचारते पप्पांना उद्याला. आता नूजर्सीत वरीच रात्र झाली.
पण सगळ्यांचे खूप आभार.
मलाच झोप येइनाशी झाली हे एकून....

धन्यवाद मामी. मला हे काकांचे हाल एकूनच झोप उडाली. मी उद्या सकाळी चेक करेन. होपफुली कोणी मिळेल तर बरे.

मी एकले मुंबईत आता संस्था निघाल्यात ज्या अश्या जेवणकाम/घरकाम करणार्‍या बाई पुरवतात. कोणाला माहीती आहे?

(इथे मध्यरात्र झाली...)

काकांचा फोन नं. किंवा कुठे राहतात ते कळले तर बरे होईल. माझ्या कलिगच्या घरी काम करणा-या बाई आहेत, मराठी सैपाक करतात. पण त्यांच्याकडे मोबाईल नाहीय आणि लँडलाईनवर नेहमीच मिळतील असे नाही. काकांचा नंबर मिळाला असता तर मी कलिगला देऊन बाईंना सांगितले असते चौकशी करायला. बाई स्वतः किंवा त्यांच्या ओळखीतुन नक्की कोणीतरी मिळेलच.

http://www.maidservices.in/about.html या लिन्क्वर पहाल का? येथून आलेल्या बाई माझ्याकडे (ठाण्याला) दीड वर्ष आहेत. संस्था बॅकग्राउंड चेक करते. आणखी काही माहिती हवी असेल तर अवश्य संपर्क करा.

Vital Foods ही डबा सर्विस बरी आहे. ऑफीस मध्ये लोकं बोलवतात. स्वच्छ पंजाबि पद्धतीचे घरगुती जेवण असते. काही दिवस ट्राय करायला हरकत नाही.

तसेच Calorie Care ची सर्विस. चव जरा बोर असते पण कॅलरीच्या गरजेनुसार जेवण पुरवतात. एखाद महिना तरी निघेल. हे जरा महाग प्रकरण आहे.

धन्यवाद सगळ्यांना. नंबर विचारते व देते. पप्पांकडे आहे. ते सेकटर १७ मध्ये रहातात वाशीला.
ते पंजाबी जेवण त्यांना आवडत नाही हाच प्रॉबलेम आहे ना. पचत नाही सांगत होते.

वैजयन्ती, त्यांच्या संस्थेतुन पुण्यात काम करणारी बाई मिळेल का?
किंवा अशी एखादी संस्था पुण्यात आहे का? कोणाला माहिती असल्यास प्लीज सांगा.

मनु, माझी मैत्रीण सेक्टर १७ च्या जवळच आहे रहायला. तिने आत्ताच एक फोन नंबर दिला आहे तो घे. देशपांडे नाव आहे त्या बाईंच - २७८२३४२४ ह्या घरी डबे पोहचवतात. दुसर्‍या एक वयस्कर बाई आहेत त्या घरी येऊन करुन देतात. त्यांचाहि नंबर मिळाला कि देते. Happy

मनु, त्यांना रेडी डबा दिला तरच बरं पडेल. कुणी घरी येऊन करुन दिलं तरी सामान तर यांनाच आणून द्यावं लागेल ना?

प्रतिभा,
त्या देशपांडे बाई म्हणे आता डब्बा करून देत नाहीत बिलकूल तब्येत चांगले नसल्याने.(इती काकांच्या पुतणीने का कोणीतरी फोन केला तेव्हा समजले).

ह्या वरच्या जोशींचा नंबर तोच आहे का? कारण लागतच नाही..

असो तरी कोणाला आणखी कोणी माहीती असल्यास बरे होइल.

मग मी माझीवाली बाई आज बघते परत. मला वाटले मिळाले म्हणुन मी सांगितले नाही तिला.. तशी ती राहते कोपरखैरणेला पण कदाचित वाशीलाही येईल. तसे अंतर फार नाहीय. बसने ५-१० मिनिटांत पोचायला होतेच.

अग डब्बा बनवून देणारीच बरी असे काकांना वाटते. रोज एकेक बायका येतात व विचारून जातात.
म्हणे एका माणसाचे जेवणात काय फायदा नाही एवढे लांब येवून. पैसे ज्यास्त घ्या म्हटले तरी नाटके त्यांची कारण आजूबाजूला त्यांच्या मैत्रीणीत कळले तर इश्शु? Sad हे काय मलाच कळले नाही ह्या बायांचे.. (इति काका--> माझी अई--> मी अशी माहीती पास झाली अगदी अमेरीकेपर्यन्त).

मी आज चौकशी करते. से. १७ ला माझी एक मैत्रिण राहते तिला विचारते डब्बेवाली/पोळी-भाजी केंद्र वगैरे काही आहे का ते.

प्रिया, अग ते वेस्ट साईडचे लोक येतात का? हे वाशीमध्ये काका रहातात. बर्‍याच अश्या वेस्ट मधील लोकांनी हेच कारण सांगितले व जे तयार होते ते म्हणाले ९:३० येणार. तो खूप उशीर आहे कारण काकांना नाश्ता कोण देणार. बिचारे काका....

पण तुला धन्यवाद आवडीने मदत केल्याबद्दल. Happy

मनु, "धवणे" म्हणुन बाई आहेत, त्या डबे देतात, मी त्यांच्याशी फोनवर बोलले तर त्यांनी माझा नंबर घेऊन दुसर्‍या एका बाईला दिला, जी घरी येऊन बनवते (तिचा फोन मला आला होता परंतु तिच्याकडे फोन नाहिये.), दुर्देवाने माझ्याकडे कोणताहि संपर्क नंबर नव्हता म्हणुन त्या बाईला मी काहिच माहिती देऊ शकले नाहि. तेव्हा मी तुला धवणेंचाच नंबर देते तो घे २७८८१३०४

Pages