वाशीत डब्बा पुरवणारी अथवा जेवण करून देणारी बाई हवी आहे तातडीने

Submitted by मनःस्विनी on 16 December, 2009 - 01:12

एक विनंती आहे इथे वाशीमधील रहण्यार्‍यांपैकी कोणाला माहीती असल्यास, माझ्या ओळखीतल्या जवळच्या काकांची अपघातामूळे जेवण करू शकत नाहीत. हॉटेलमधील तिखट,तेलकट खाणे पचत नाही.
खूपच वाईट अवस्था आहे त्यांची जेवण्याची. कोणी सांगू शकेल का कुठे साधे शुद्ध शाकाहरी जेवण/डबा मिळेल वाशीत? नाहीतर कोणाला अशी काही कंपनी माहीती आहे का जी जेवण करणारी बाई उपलब्ध करून देतात?

कुठे लिहायचे नक्की कळले नाही व हे खास वाशी मधील साठी होते म्हणून इथे लिहिले. मला ई-मेल केले तर चालेल. धन्यवाद.

मला व माझ्या कुटींबीयाना वाशीतली काहीच माहीती नाही व आता आम्ही मुंबईतच रहात नाही तेव्हा कसे कळणार.
काका एकदम अंथरुणात पडून. रोज काहीतरी फोनवरून ऑर्डर करतात, बायको महिन्यापुर्वीच गेली. आता ह्या वयात कुठे व काय शोधणार. कामवाल्या हा बायांचा भाग. एक अतिशय जुन्या ओळ्खीतले काका आहेत पप्पांच्या. आजच पप्पांकडून एकले नी वाईट वाटले ह्या वयात असा प्रसंग. एक वेळचे धड जेवण नाही मिळत. त्यात ट्रीटमेंट चालू असल्याने हजार गोळ्या व त्यांची अ‍ॅसीडिटी.

कोणी माहीती असल्यास मिळाली पत्त्यासकट नाहीतर बाईच मिळेल तर बरे होइल.
त्यांचा एकुलता एक मुलगा इथे अमेरीकेत.( आई-बापाला कधीच बघितले/बघत नाही. ... असो तो दुसरा विषय होइल).
सध्या त्यांची जेवणाची व्य्वस्था होइल तर बरे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिभा नी प्रिया धन्यवाद मनापासून. अग मला वेळच नाही मिळालाय आईलाच फोन करायला. मग आई इथून फोन लावेल हा बायांना. पुन्हा थँकू. Happy

Pages