भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा , पुन्हा एकदा ती क्लिप पाहिली व तुझे परिक्षण वाचले ! ट्रंप चा मुलगा व बायडेन ची मुलगी यांचा साखरपुडा झाला तरी न्यू यॉर्क टाईम्स च्या पहिल्या पानावर बातमी येणार नाही !

वावे, मी_अनु Lol

विकु Happy हो. त्यात इथे न्यू यॉर्क टाइम्स हा ते लॉस एंजेलिस्/हॉलीवूड की कोठेतरी राहात असताना "शहर के सबसे पडे पेपर मे" असतो.

अनु Lol

ढेकूण मारायचा जालिम उपाय

चिमटीत ढेकूण पकडून तो मग रुईचं पान आणून त्यात गुंडाळून देवळात जाऊन मारुतीरायाच्या पावलाखाली सरकवायचा. मनोभावे सांगायचं
"मारुतीराया, माझ्या घरातले सगळे ढेकूण जाऊ दे"

घरातले ढेकूण नाहीसेच होतात.

असंच मुंग्या टीप पण आहे ना, वारुळाशी किंवा घरात एन्ट्री पॉईंट शी हळदी कुंकू वाहून जा अशी मनोभावे प्रार्थना करायची म्हणे.अजून करून पाहिलं नाही.

Lol मी लवंग आणि मिरे ऐकलं आहे. लवंग, मिरे, हळद, घातलंच आहे तर तेल, कांदा- बटाटाही घालून वारूळावरच चूल मांडून भाजी करायची. ते बघून मुंग्यांना 'आम्ही तुमच्या घरात पंक्तीला यायचं की तुम्ही आमच्या' असं वाटून अतिच कन्फ्यूज होऊन- आयडेंटिटी क्राईसिस येऊन त्या सरळ वारूळच सोडून निघून जातील.

Submitted by अमितव on 23 May, 2024 - 17:30 >> मी विनोद नव्हता केला पण हसायला हरकत कसली? Lol

जोक आहे खरा Happy पण हे मी खरोखरच वाचलंय(मेबी ज्यात वाचलं ते 'माहेर/गृहशोभिका/चारचौघी/श्री आणि सौ' सारखं मासिक असेल आणि त्यात पण विनोद म्हणून हे लिहिलं असेल)

तू जोक न्हवता केलास, आणि इनोसंटली म्हणाली आहेस समजुनच जास्त हसायला आलं. हळदीचं माहित होतं, पण प्रार्थनेचं न्हवतं. जणू गेल्यावेळेला हळद टाकलेली पण प्रार्थना राहिली बहुतेक असं काही तरी इम्याजिन करुन. त्यात तू किंवा इथलं कुणीही मुंग्यांची प्रार्थना करणार नाहीत ह्या खात्रीची भर पडली. Lol

मुंग्यांना मुंग्या येतील हळदी मुळे!>>शेवटचे शेवटचे प्रतिसाद म्हणजे कहर आहे. सगळ्यांनी हात धुवून घेतले आहेत. पण काहीही असो माझा प्रार्थनेवर भक्कम भरोसा आहे. एखादे वेळेस ट्राय करायला काय हरकत आहे?

(हे फॉरवर्ड नाही, सहज आठवलं म्हणून:)
बऱ्याच घरात सापाचं नाव घेत नाहीत.नाव घेतलं की येतो समजतात.मग सापाला लांबडं, जनावर,इतर प्राणी,किडेमुंग्यासोबत आणि काही,बेडकाचा शिकारी असे उल्लेख करतात बोलताना.
साप लोकांमध्ये आता वर्षांनुवर्षे अनुभवाचं ज्ञान असेल 'हे बघा अमुक अमुक शब्द त्या माणसांच्या बोलण्यात आले तर ते आपल्या बद्दल बोलत असतात'.

सापाचं नाव जनावर म्हणून घेणाऱ्यांना नागिन मूव्ही पहायची इच्छा झाली तरी जानवर मूव्ही असलेल्याच थिएटर मध्ये जावं लागेल. बिच्चारे प्रोड्युसर

Pages