चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सॅम बहादूर पाहिला. विकी कौशल ने कमाल केलीय. तो कुठेच विकी वाटत नाही, सॅमच वाटतो.
साना मल्होत्रा पण खूप छान. तिचा वयानुसार बदलत जाणारा look व्यवस्थित दाखवलाय.
पण मग त्याच टीमने फातिमा सना खानचा look आणि मेकअप आणि कपडेपट इतका महाभयानक का केलाय??? काही दृश्यात तिच्या डोळ्यात चक्क वेडसरपणाची झाक दिसते. सिनेमाभर ती असह्य झाली...
त्यापेक्षा 83 सिनेमात इंदिराजींचा रोल खूपच चांगल्या प्रकारे चित्रीत केलाय.

army of thieves - मस्त entertaining , heist movie .
खुदकन हसवणारे विनोद आहेत.
Its not intelligent heist movie its entertaining heist movie .

विधू विनोद चोप्राचा, निव्वळ त्याच्या नावामुळे, 12th Fail पाहिला आणि तुम्ही जरूर बघा अशी शिफारस करीन. कठीण परिस्थितीतून आयपीएस बनलेल्या मुलाची गोष्ट आहे आणि सत्यकथेवर आधारित आहे. सिनेमा मुंबईत थिएटरमध्ये बघता येईल किंवा २९ डिसेंबरला OTT वर येणार आहे, असे ऐकून आहे.

पण मुळात पटकथा आणि दिग्दर्शन यातच दम नसेल तर जगातला कुठलाच अभिनेता चित्रपटाचे कलात्मक मूल्य वाढवू शकत नाही किंवा तुम्हाला थिएटरमध्ये खेचून आणून चित्रपट बघायला लाऊ शकत नाही.
>>
कलात्मक मूल्य जाऊदे
पण कित्येक सिनेमे हे बकवास दिग्दर्शन अन् रद्दी पटकथा असूनही केवळ मेन ॲक्टर च्या स्टार पॉवर वर थेटर. मधे गर्दी खेचतात
भाई चे बरेच सिनेमे, शाहरुखचे कम बॅक नंतरचे सिनेमे, साऊथ चे बरेच सिनेमे हे याच गटात मोडतात... याच्या ऑडीयंस ला ही केवळ व्यक्ती पूजेत इंटरेस्ट असतो, पटकथा - दिग्दर्शन वगैरे जाऊ द्या

शाहरुखचे कम बॅक नंतरचे सिनेमे....
>>>>>>>

यातच प्रत्युत्तर दडले आहे...
कम बॅक नंतरचे सिनेमे... तर आधीचे का नाही Happy
शाहरूख मधल्या काळात कोणाला आवडतं नव्हता आणि आता अचानक आवडू लागला असे आहे का?
जवान तुम्हाला बंडल वाटत असेल कारण त्या जॉनरचे चित्रपट तुमच्या आवडीचे नाहीत. आमच्या कडे त्याला रिपीट value आहे. मास साठी बनवलेला चित्रपट आहे आणि त्याची भट्टी जमल्याने मासला तो आवडला आहे. Happy

या विषयावर अनेक धागे आहेत. कृपया ही चर्चा तिकडे हलवली तर बरे होईल ही नम्र विनंती.

आज दृश्यम २ बघितला. मस्त आहे. आवडला. शेवटपर्यंत उत्सुकता टिकून राहिली. सगळ्यांचे अभिनय चांगले झालेत.

यातच प्रत्युत्तर दडले आहे...
>>
सिलेक्टिव्ह रीडिंग...
भाई चे ही वॉन्टेड च्या आधीचे सिनेमे बेकार पडत
नंतर ड्रीम रन झाली. त्यात दिग्दर्शक अन् पटकथेचा काहीही वाटा नव्हता
कमबॅक नंतर शाहरुख ची नव्याची नवलाई चालू आहे इतकं च

#CinemaGully
#Dunki

मी काल डंकी पाहीला. कुठलंही परिक्षण किंवा ट्रेलर तसंच कथा न वाचताच बघीतला. पण चित्रपटाकडून विशेषत: राजकुमार हिरानींकडून असलेल्या किमान अपेक्षा मनात होत्याच. पण सुरवातीलाच शाहरूखच्या रेड चिली चं नाव वाचताच बहुधा आपला अपेक्षाभंग होणार अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. आणि पुढे तसंच घडत गेलं. संपुर्ण चित्रपटात मनाला भावेल असा एकही प्रसंग नसावा ? अगदी फेरारी की सवारी देखील यापेक्षा उजवा होता. त्यांनी गुंडगीरीला, टपोरीगीरीला glorify केलं ते प्रेक्षकांनी हसतहसत स्विकारलं, त्यांनी प्रत्यक्षात नसलेल्या गांधीगीरीला प्रेक्षकांच्या माथ्यावर मारलं, फक्त "हिंदु" धर्मातल्याच अनैतिक रूढी परंपरांवर चाबकाचे फटके ओढले इ. सगळं सगळं प्रेक्षकांनी स्विकारलं कारण त्या सादरीकरणात दम होता. इथे नेमका त्याचाच अभाव आहे. अत्यंत सपक व कंटाळवाणा चित्रपट. शाहरूख दिवसेंदिवस "कुरूप" दिसतोय पण तो व त्याचे चाहते हे मान्य करत नाहीयेत. आणि सर्वात न पटलेली गोष्ट म्हणजे "घुसखोरीला glorify करायचा प्रयत्न". हे सर्व का चाललंय हे न कळण्याइतके प्रेक्षक दुधखुळे नाहीत. घुसखोरीला प्रोत्साहन द्यायचं, त्यांना आपले नागरिकत्व मिळवून द्यायचं व त्यांची एकगठ्ठा मतं मिळवायची हे खेळ एक पक्ष अनेक वर्षांपासून करतोय. जगातल्या सर्व देशांनी आपल्या border खुल्या करायला हव्यात असला दळभद्री संदेश हा कुठल्या मानसिकतेचा propaganda आहे ? स्वत: हिरानी किंवा शाहरूख स्वत:च्या बंगल्यांची दारं तरी उघडी ठेवतात का ? यातली पात्रं सरळसरळ "रोहिंग्यांची" भाषा बोलतात. देश दुसरा असला तरी जमिन तर सगळ्यांची आहे, मग आम्हीपण तिथे राहीलो तर काय बिघडतं ? असलं तत्वज्ञान सांगतात.

"म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतोय" तद्वत चित्रपट अगदी भरभरून चालला तर मला वाईट वाटणार नाही पण हे असलं तत्वज्ञान धोकादायक आहे असं वाटतं.

From face book by Mr sathe cinema gully page.

अमा मी तुमचे परीक्षण म्हणून वाचत होते. तुम्ही पहिला असाल तर लिहा ना परीक्षण.>> मी नाही बघितला पण लेकी ने बघितला आहे व बेकार आहे असा रिव्यु. तिने दिलेला आहे. मला तर तो आमिर खान वाला एलिअन वाला पिक्चर पण आव डलेला नाही. दिग्दर्शकामधली दारु सादळली आहे
फुसका फटाका कोण बघेल.

जगातल्या सर्व देशांनी आपल्या border खुल्या करायला हव्यात असला दळभद्री संदेश हा कुठल्या मानसिकतेचा propaganda आहे ? स्वत: हिरानी किंवा शाहरूख स्वत:च्या बंगल्यांची दारं तरी उघडी ठेवतात का ?
>>बंगला आणि देश ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रिव्ह्यूचा लेखक सगळ्या भारतीयांना त्याच्या बंगल्यात यायची परवानगी देतो का ?

. घुसखोरीला प्रोत्साहन द्यायचं, त्यांना आपले नागरिकत्व मिळवून द्यायचं व त्यांची एकगठ्ठा मतं मिळवायची हे खेळ एक पक्ष अनेक वर्षांपासून करतोय.
>>> कोणता पक्ष करतोय ? किती घुसखोरांना नागरिकत्व दिले आणि एकगठ्ठा मते मिळवली ? पुरावे आणि आकडेवारी ?

जगातल्या सर्व देशांनी आपल्या border खुल्या करायला हव्यात असला दळभद्री संदेश हा कुठल्या मानसिकतेचा propaganda आहे ?
>>> हा अत्यंत स्टॅन्डर्ड लिबरल विचार आहे. ह्यात काहीही दळभद्री नाही. प्रोपोगंडा हा शब्द तर खुळखुळा झाला आहे. हा रिव्ह्यू पण प्रोपोगंडाच आहे. पब्लिक मध्ये कोणत्याही विचारांचा प्रसार हा प्रोपोगंडाच असतो.

तो रिव्ह्यू मी सुद्धा तिथे वाचला होता.
ही वेगळ्याच जग दुनियेत राहणारी पब्लिक आहे.. ती चित्रपट प्रेमी जनता नाही.. प्रश्न असे विचार चूक की बरोबर हा नाहीये, पण असे अजेंडा असलेले रिव्ह्यू घेऊन या चित्रपट धाग्यावर चर्चा न झाली तर बरेच आहे. पण स्वतंत्र धाग्यात चर्चा करायला हरकत नाही असे मला वाटते.

अमा, माझा कुठलाही पॉलिटिकल, धार्मिक अँगल नाही. पण सिनेमात बेकायदेशीर इमिग्रेशनची बाजू घेतल्यासारखी भलामण केल्यासारखी वाटली आणि नाही पटली.

सामो, Happy

फेफ, सिनेमा बघताना तुमचा रिव्ह्यू आठवला होता. तुमची बाजू पण योग्य आहे.
तसेच दिग्दर्शकाचे म्हणणे जास्त लिबरल आणि वैश्विक असल्याने आज आदर्शवादी असले तरी भविष्यात ते योग्यच आहे. दोन्ही बाजू आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. शेवटी जी माहिती येते त्या वेळी प्रेक्षक उठून जातात. त्यामधे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना सीमा खुल्या आहेत, गरीबांना बंधनं आहेत अशी एक बाजू येते. अनेक गरीब देशातून पोट भरण्यासाठी लोक श्रीमंत देशात जातात. हे बिहारातून गुजरात,महाराष्ट्रातल्या स्थलांतरासारखे आहे किंवा बांग्लादेश निर्वासितांप्रमाणे.

आचार्य, तुमचा रिव्ह्यू वाचला. खूप संतुलित लिहिलाय. रिव्ह्यू आवडला. काही गोष्टींचा पुनरावलोकन सुद्धा केलं. तुम्ही मांडलेली पंजाब/हरियाणा मधली सत्य परिस्थिती माहित नव्हती. त्या अँगलमधूनही पुन्हा विचार केला आणि काही बाजू पटल्या. I can objectively see the side of illegal immigrants but cannot agree with it.

इल्लिगल इमिग्रंट्समुळे समाजव्यवस्थेवर येणारा ताण, त्यातून उद्भवणारा संघर्ष, आणि मुळातच कायदे/नियम धाब्यावर बसवण्याची वृत्ती हे माझ्या समजूतीच्या परिघाबाहेर आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या इंडियन/पाकिस्तानी लोकांच्या बाबतीत तर ‘गरिब लोक, पोट भरायला आले आहेत‘ अशी सुद्धा परिस्थिती सरसकट नाहीये. त्या बेकायदेशीरपणे येण्यासाठी सुद्धा बराच खर्च केला जातो. असो. ह्या विषयाला बरेच कंगोरे आहेत आणि माझा त्याविषयी खूप अभ्यास किंवा आकलन नाही. त्यामुळे मी फक्त माझ्या मर्यादित अनुभवावरून माझं मत मांडू शकतो. माझ्या समजूतीच्या परिघाबाहेर एक अनलिमिटेड जग आहे ह्याची मला जाणीव आहे.

फेफ, आभार.
सेपरेट रिव्ह्यू का लिहीला असे आता वाटते.

कडकसिंग पाहिला. सुपर्ब.

इंडियन/पाकिस्तानी लोकांच्या बाबतीत तर ‘गरिब लोक, पोट भरायला आले आहेत‘ अशी सुद्धा परिस्थिती सरसकट नाहीये.
>>>>>

+७८६

चित्रपट जेवढा मला कळला त्यात हेच दाखवले आहे की काही लोक परदेशाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत, काहींची पैश्याची गरज जास्त आहे त्यांना असे वाटत आहे की तिथे गेल्यास पौंड मध्ये कमवून झटपट परिस्थिती बदलेल, तर काहींना फक्त यात प्रतिष्ठा वाटत आहे..

आता यातले जे तिथे जाऊन पैसे कमावण्यास पात्र आहेत ते लीगल मार्गाने सहज जात आहेत. जे बेकायदेशीर मार्गाने जात आहेत ते मुळात तितके पात्र नसल्याने तिथे जाऊन देखील त्यांचे पैसे कमवायचे वांधे होत आहेत.

चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटात त्यांचे तसेच हाल दाखवले आहेत. एखादी पात्र नसलेली व्यक्ती बेकायदेशीर मार्गाने जाऊन तिथे कोणी मोठी हस्ती झाली असे दाखवले नाहीये.

(तिथे ही टाकतो माझी पोस्ट)

भलामण केल्यासारखी वाटली >> अशी भलामण कुठेच वाटली नाही. उलट असे जाणे किती अवघड आहे हेच दाखवले आहे. वर तिकडे जाऊन भिक मागायला लागते आहे हेही दाखवले आहे. सिनेमा मध्ये कुठेही तिकडे गेलेल्यांचे खूप भारी झालेले आहे असेही दाखवले नाही. त्यांचे illegally जाणे हे त्यांच्या विसा न मिळण्याच्या frustration मधून आलेले दिसते. त्याचेही हिरानी समर्थन करत नाही.

कडकसिंग कुणी बघत नाहीये का इथे ?
तपासाची उकल वगैरे भाग प्रेडीक्टेबल आहे. विशेष आहे ती पटकथा. ज्या पद्धतीने सिनेमा उलगडतो, त्याची स्टोरी टेलिंग, प्रत्येक पात्राची एक कहाणी, त्यातून उलगडणारे कडकसिंग उर्फ ए के श्रीवास्तव हे व्यक्तीमत्व हे अफलतून आहे. घट्ट बांधीव पटकथा काय कमाल करू शकते ते दिसतं. साधारण असाच प्रकार एक रूका हुआ फैसला मधे आहे. पण फरक सुद्धा आहे.

पंकज त्रिपाठी आता मॅनरिजम्ससहीत पाठ झालाय असे वाटत असतानाच हे पात्र त्याने ताकदीने उभे केले आहे. काही काही प्रसंगात तो टिपीकल पंकज त्रिवेदीच असतो, पण एखाद्या अभिनेत्याच्या अदांचे चाहते असलेल्यांना ती पर्वणीच असते. मेथड अ‍ॅक्टींगचे मस्त प्रदर्शन.

इतर सर्व कलाकारांनी त्याला उत्तम साथ दिली आहे. हेड नर्स झालेल्या अभिनेत्रीने पण सुंदर काम केले आहे.

मी पाहिला, पण मस्त कथाबीज आणि पंकज त्रिपाठी असूनही मला कंटाळवाणा वाटला. ही कथा कितीतरी चांगली फुलवता आली असती असं वाटत राहिलं.
त्याची ती क्रश आणि मुलगी दोघींचेही शब्दोच्चार अस्पष्ट आणि सदोष होते, त्यानेही रसभंग होत होता.

स्वातीला अनुमोदन.
मी तुम्ही रेको दिल्याने सुरू केला होता पण फारच संथ वाटला. त्या मुलीचे उच्चार आवाज मोठा करूनही कळले नाही, भावनिक प्रसंगात( भररस्त्यातला वादाचा सीन) फाटून काहीच्या काही होतो. पंकज मैत्रिणीसोबत politically incorrect पापड खाईपर्यंत Lol बघितला मग थांबवला. आधी अब्यूजिव्ह दाखवून दिशाभूल करण्याचा उद्देशही नीट कळला नाही किंवा उगाच वाटला. सगळ्यात जास्त नर्स (करीब करीब सिंगल मधली जया) आवडली. वाईट नाही पण कंटाळवाणा वाटला. आज पूर्ण करेन जमलं तर.

>> त्याची ती क्रश आणि मुलगी दोघींचेही शब्दोच्चार अस्पष्ट आणि सदोष होते, त्यानेही रसभंग होत होता.>> अगदी. तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलत रहातात. बंगालीही आहे मधेच. आणि सबटायटल्स नाहीत त्यामुळे इंटरेस्टच निघून गेला.

फुलवता आला असता तर पटकथा सैल करावी लागली असती. कदाचित नाटकासारखी घट्ट स्क्रिप्ट असल्याने एका "नाटकी" माणसाने रिकमेण्ड केला होता. संथ हाताळणीचे रूका हुआ फैसला आणि थोडासा रूमानी हे पण आवडले होते.

ते दोन्ही आवडते आहेत - हा संथ असण्याचा प्रॉब्लेम नाही.
बाय द वे, ‘रुका हुआ…’ आवडला असेल तर तो ज्यावरून घेतला आहे तो Twelve Angry Men ही बघा. Happy

Pages