वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलियाला सोडवून आणण्याच्या प्लॅनमध्ये तिच्यासारख्या दिसणार्‍या त्या डुप्लिकेट मुलीला आणण्यामागे काय प्रयोजन होते?
>>
पुढच्या सीझन मधे तो डूप्लिकेट सोबत फिरणारा आलिया भोगासी च्या मागे लागणार / आतंकवादी लोक त्या दुसऱ्या मुलीच्या...

फ्री लान्सर काय आहे. टीव्ही उघडला की त्यात पहिले ह्याचे प्रोमो फोटो दिसतो. व खाली सर्व चॅनेल ची लिस्ट येते. त्या प्रोमो फोटोत सर्वात वर एक माणूस आहे तो त्या नर्मदा परिक्रमा वाल्यासारखा दिसतो असे आपले मला वाटते. एकदा बघुन घ्या स्टिल फोटो आहे.

साउथ च्या डब्ड मूवीज/ मालिकात घोष, कपूर आडनावाचे लोक पण दाक्षिणात्य फीचर्स वाले असतात. डब्ड वर्शन मधे चेन्नई / हैद्राबाद मधल्या ठिकाणांना मुंबई , पुण्यातली नावे असतात. यात घोष आडनावाचा माणूस पक्का साऊथवाला दिसतो. उद्या कहानी टॉम अल्टरकी / राज कपूरकी नावाचा सिनेमा बनवला तरी त्यात मुख्य भूमिकेत योगीबाबूला घ्यायला कमी करणार नाहीत.

अजिंक्यराव आणि आचार्य,
तुमची चर्चा आवडल्याने 'दूत' शोधलं पण ते अमेरिकेत अजून उपलब्ध दिसलं नाही. पण जेव्हा होईल तेव्हा बघण्यासाठी नोंदवलं आहे.

फ्रीलान्सर नीरज पांडे लिखित वेब सिरिज आहे. सिरीयात फसवून नेलेल्या मुंबईतल्या मुलीच्या सोडवणूकीची गोष्ट आहे. आधी चार-पास भागच रिलिज झाले होते. अलिकडे शेवटचे तीन रिलीज झालेत.

'दूत' शोधलं पण ते अमेरिकेत अजून उपलब्ध दिसलं नाही.>>>> Dhootha नावाची मालिका दिसते आहे प्राईमवर. ते आणि हे एकच असावे.

दूत चं धुथा वगैरे काय, आधी काहीच समजलं नाही. रघु आचार्य यांच्या पोस्ट मुळे दूताचं धुथा कसं झालं ते समजलं.

प्राईम वर आहे का, मग दिसेल आमच्याकडे.

स्कूप (नेटफ्लिक्स) बघितली. आवडली.
मात्र खूप पात्रं, वेगवेगळ्या शाखांचे पोलीस अधिकारी, कोण कुठला, कुणी काय केलं - याचा खूप गोंधळ उडाला.

जे-डे खून झाला त्यानंतर काही दिवस त्याच्या बातम्या फॉलो केल्या होत्या. नंतर सोडून दिलं होतं. त्यामुळे जिग्ना व्होरा या नावापलिकडे काही लक्षात नव्हतं. त्यामुळेच केवळ शेवटपर्यंत उत्सुकता टिकून राहिली.

हरमन बावेजाला बघून धक्का बसला Lol तो हिरो म्हणून आला तेव्हा कायम आपण कसे हृतिक रोशनसारखे दिसतो यातच मश्गूल असायचा, त्याचीच नक्कल करायचा (ट्रेलर्स, गाणी पाहून हे कळलं. त्याचा एकही सिनेमा पाहिलेला नाही.) पण स्कूपमध्ये त्याचा खरा चेहरा (अ‍ॅक्टिंग फारसं न जमणारा) दिसला. Biggrin
बॉबी देओलप्रमाणे त्याची सेकंड इनिंग ओटीटीच्या कृपेने फळफळू शकतेच.

आलियाला सोडवून आणण्याच्या प्लॅनमध्ये तिच्यासारख्या दिसणार्‍या त्या डुप्लिकेट मुलीला आणण्यामागे काय प्रयोजन होते?

अजून तिसरा भाग पाहिला नाही पण असे वाटते की डुप्लिकेटला दुबईला घेऊन गेले आहेत (वेगळ्या नावाने). परत येताना ती डुप्लिकेट तिच्या खर्‍यानावाने येईल आणि आलिया वेगळ्या विमानातून डुप्लिकेटच्या खोट्या नावाने भारतात परत येईल. पासपोर्टमधली शिक्के मॅच करण्यासाठी व अतिरेकी लोकांना फसवायला हा प्लान असावा असे वाटते.

>>आलिया वेगळ्या विमानातून डुप्लिकेटच्या खोट्या नावाने भारतात परत येईल.
हे मलाही वाटलेलं पण तसं दाखवलेलं दिसलं नाही की मी मिस केलं कुणास ठाऊक

गन्स अ‍ॅन्ड गुलाब्ज (नेटफ्लिक्स)
डार्क ह्युमर, हिंसा, quirky वागणारी पात्रं - हे सगळं चालत असेल तर नक्की बघण्यासारखी सीरीज आहे.
मला खूप मजा आली.
सिरीज लिखाणातच जमलेली आहे.
मोबाइल-पूर्व काळातली, (बहुतेक) युपी/बिहारमधल्या एका खेड्यातली, अफीमच्या काळ्या बाजाराच्या भोवती बांधलेली गोष्ट आहे.
शाळकरी मुलांचं उपकथानक कशाकरता टाकलेलं आहे असा आधी प्रश्न पडतो, पण शेवटी मुख्य कथानकात ते सहजगत्या मिसळलं आहे, ते आवडलं.
राजकुमार राव, दलकेर सलमान, अशी मोठी नावं आहेत. त्यांनी आपलं ग्लॅमर बाजूला ठेवून मस्त काम केलं आहे.
आणि मुख्य व्हिलन - जुगनू ऊर्फ छोटू - तो सुद्धा लक्षात राहतो.
शिवाय इतर पात्रंही (इंग्रजी शिक्षिका), टिपूचा गुंडगिरीतला मित्र (बंटी), सगळी झकास.
प्रत्येक पात्राचे बारकावे, कथानकातलं डिटेलिंग फार आवडलं.
आत्मारामचं पात्र मला जरा बोअर झालं, पण त्याचे सीन्स, संवाद सगळं सीरीजच्या टोनमध्ये नेमकं बसतं.

पुढच्या सीझनची सोय करून ठेवली आहेच.

>>रिचर दुसरा सिझन आला, पण अपूर्ण.. पुढचे भाग कधी प्रसारित होतील काही कल्पना आहे का कुणाला

दर आठवद्याला एक भाग येणार आहे

बहुतेक तेजश्री आहे ती. आम्ही दोघं राजाराणी सिनेमात त्याचीच हिरॉईन होती. त्यात ते ' अंडी द्या नाहीतर खुराडी सोडा ' गाणं होतं.

दूता पाहून संपवली. खरंच खिळवून ठेवणारी आहे. पुढे पुढे थोडी प्रेडीक्टेबल आहे पण त्याने काही फरक पडत नाही. शेवटी सगळे डॉट्स छान कनेक्ट केले आहेत. मालिकाभर सतत बदाबदा पडणारा पाऊस ताण जास्त वाढवतो असं वाटलं.

फ्री लांसर 4 भाग सलग पाहिले.
उद्या सकाळी बाहेर जायचे नसते तर पहाटेपर्यंत संपवली असती..
उत्कंठावर्धक आहे.. मजा आली.

थँक्स rmd

हल्ली काही भाग वेबसिरीजचे अविभाज्य घटक असल्यासारखे असतात, त्यातला रक्तरंजितपणा हा एक भाग, थोडं पुढे ढकलेन.

Pages