चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy
तुम्ही नॉर्वे किंवा तत्सम देशात राहताय का ? >>> हो, ओस्लो - नॉर्वे

अरे सगळेच काय मस्त नजारे आहेत.

नॉर्दर्न लाईटस वर फिदा! घरातून नॉर्दर्न लाईट्स म्हणजे फारच चैनीत राहता तुम्ही मंदार.

. आमच्या भागात हरणे, ससे, कायोटी, कोल्हे , रॅकून, स्कन्क्स, समर मधे कासवं हे कॉमन आहे. क्वचित अस्वल दिसते.>>> मस्त.

शेजारधर्म म्हणून येणे जाणे दिसतेय. Wink

सगळ्यांना धन्यवाद!

नेहमी दिसु शकतात का मंदार? किती वाजता दिसले हे? >>> हे साधारणपणे रात्री १०.३० च्या सुमारास दिसले होते. हे म्हणजे जंगलात वाघ दिसण्यासारखंच आहे, नशीब असेल तर कुठेही दिसतील नाहीतर कितीही भटकल्यावरही दिसणार नाही. Aurora Forecast चं एक अ‍ॅप आहे, त्याच्या नादी लागून अनेकदा रात्री अपरात्री थंडी/वार्‍यात आमचं निरर्थक भटकून झालं होतं, त्यामुळे त्या दिवशी प्रेडीक्शन्स असूनही मी ढारढूर झोपलो होतो. मग बायको आणि मुलगा इतक्या जोरात किंचाळले की कुंभकर्णाचा अवतार असूनही मी जागा होउन बाहेर आलो. व त्यानंतर चिडलोही नाही, ही सुद्धा नॉर्दर्न लाईट्स दिसण्याइतकीच दुर्मीळ घटना घडली Happy

सगळेच फोटो एकसे एक
ॠ, बोरीवली माझ्या बाल्कनीतून दिसतात ते ओबेरॉय टॉवर्स

थँक्यू ऋ, सामो,
आमच्या गॅलरीला बर्ड नेट आहे त्यामुळे ते टाळून फोटो काढणं कठीण होत. त्यात माझी अगाध फोटोग्राफी. Happy . तसेच जास्त वेळ ही मिळत नाही अगदी पाच दहा मिनिट च असा शेंदरी दिसतो सुर्य. नंतर बघवत ही नाही एवढा प्रखर होतो.
एरवी इथली कबुतरं म्हणजे मोठाच व्याप आहे पण फोटोत छान दिसतय. फोटो ला जिवंतपणा आलाय अस वाटत.

पावसाळे दुपार

Screenshot_2023-09-27-01-22-42-41_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

सुंदर फोटो मंदार, मैत्रेयी, सामो, ममो आणि ऋ.
सगळेच आवडले.
माझ्या बहिणीच्या घरामागचा व्ह्यू, लॉन्ग आयलन्ड आहे सामो. Happy माझ्या घरासमोरचा फोटो काढेन. सध्या हा चालवून घ्या.
IMG-20230926-WA0002.jpg

घरातून नॉर्दर्न लाईट्स म्हणजे फारच चैनीत राहता तुम्ही मंदार. <<<<+++११११११

ह्या धाग्यावर नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळेल अस अज्जिबात वाटलं नव्हतं
ते बघण्यासाठी कुठे कुठे जाय्चे प्लान्स करुन झालेत.पण जमलंच नाही कधी ..

सामो हो खरीच आहेत गं हरणं. रोजच दिसतात. आमच्या भागात हरणे, ससे, कायोटी, कोल्हे , रॅकून, स्कन्क्स, समर मधे कासवं हे कॉमन आहे. क्वचित अस्वल दिसते.
>>> किती छान

मंदार : तुम्ही काढलेले फोटो बघून नॉर्वे आता बकेट लिस्टमधून मस्ट वोच लिस्ट मध्ये आलेय.

सायो : किती सुंदर

सगळेच फोटो एकसे एक
ॠ, बोरीवली माझ्या बाल्कनीतून दिसतात ते ओबेरॉय टॉवर्स

Submitted by देवरूप on 26 September, 2023 - 13:41
ते गोखले कॉलेज आहे का ????तुम्ही MHB त राहता का ????

खूपच सुंदर फोटोज आहेत सर्वांचे.

काही मायबोलीकर जंगली प्राण्यांच्या सहवासात राहतात ही आनंदाची गोष्ट आहे. हरणांचे फोटो खूपच सुरेख आहेत.

गार्डन फर्निचर पण आवडले.
अशा वातावरणात कट वडा रस्सा + पाव + लिंबू + शेव + वडाबुंदी + चिरलेला कांदा काय मस्त लागेल. सोबत आवडीप्रमाणे पेय..
हा उपक्रम सर्वात आवडला. तुफान पळतोय हा धागा...

काय मस्त।फोटो आहेत
एकसे बढकर एक.
आम्ही खिडकीतुन नजर टाकली की दिसतात बेसुमार वाढलेली अनधिकृत बांधकामाची जंगलं.
त्यामुळे फोटो काढतच नाही Happy

भारी आहेत सगळे फोटोज!

मला उगाचच हा सीन आठवला >>> फा Rofl Rofl Rofl

अशा वातावरणात कट वडा रस्सा + पाव + लिंबू + शेव + वडाबुंदी + चिरलेला कांदा काय मस्त लागेल. >>> क्या बात है रघू आचार्य! हे वाक्य अनेकांकडून ऐकल्यावर (आणि घरी ऐकवल्यावर Wink ) एकदा मुद्दाम तसा फोटो काढला होता त्याच बाल्कनीमधून:

IMG_8666.JPG

Pages