चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताबाहेर राहणारे माबोकर हेवा वाटण्याजोग्या कसल्या भारी जागी राहताहेत.
खूपच छान फोटो.
मंदारच्या फोटोकरता एजोटाझापा

भारताबाहेर राहणारे माबोकर हेवा वाटण्याजोग्या कसल्या भारी जागी राहताहेत.
+७८६
सगळे जणू पिकनिक स्पॉट आहेत Happy

फार सुंदर नजारे..
सायो, मैत्रेयी आणि मंदार चे फोटो तर फार आवडले.

हा आमच्या बेडरूम मधून दिसणारा चेरी ब्लॉसम
2022-04-07 18.06.49.jpeg

IMG_20230927_162919.jpg

हा फोटो माझ्या आजोळच्या घरचा चेंबूरचा. अजून तरी रिडेव्हलमेंट न झाल्याने जुन्या खुणा अंगावर वागवणारा. बऱ्याच ओल्या सुक्या आठवणी आहेत याच्याशी जोडलेल्या, इतक्या की अजूनही स्वप्न या घरातच असल्याची पडतात मला.

कविन दोन्ही फोटो भारी. आजोळचा तर मस्त आहेच. पण तो वरकरणी फक्त झाडाचा वाटणारा फोटोही त्यातली पाने ऑइल पेस्टल कलर्स ई म्हणतात तशी रंगवलेली वाटतात Happy

मंदार - उत्तरेकडचे रंग आम्हाला दाखवण्याबरोबरच उत्तरेला दक्षिणेकडचे रंग दाखवलेले दिसत आहेत Happy

आचार्य - आधी काहीतरी चकना म्हणून काहीतरी लिहायला गेलो, आणि तेच इतके डीटेल झाले की बरोबरचे पेयच दुय्यम झाले असे काहीतरी लिहीताना झाले काय? Happy

भारताबाहेर राहणारे माबोकर हेवा वाटण्याजोग्या कसल्या भारी जागी राहताहेत.....अगदीच....
@Ajnabi नाही. ते bmc garden आणि school आहे
बोरीवली इस्ट.
मुंबईत असा view ....Damm lucky ...

धन्यवाद! सगळेच फोटोज भारी आहेत.

उत्तरेकडचे रंग आम्हाला दाखवण्याबरोबरच उत्तरेला दक्षिणेकडचे रंग दाखवलेले दिसत आहेत >> फा Happy

भारताबाहेर राहणारे माबोकर हेवा वाटण्याजोग्या कसल्या भारी जागी राहताहेत. - पूर्णतः अनुमोदन हर्पेन
हा आत्ताच काढलेला ताजा ताजा - पाऊस पडताना
Screenshot_20230927_173442_Gallery.jpg

मंदार, कसलं भारी नॉर्दन लाईट्स घरबसल्या दिसणं.
ऋन्मेषच्या सोसायटीचा पूल रिसॉर्टचा वाटतोय.

आधी काहीतरी चकना म्हणून काहीतरी लिहायला गेलो, आणि तेच इतके डीटेल झाले की बरोबरचे पेयच दुय्यम झाले >>>> Rofl

>>स्वरूप - दोन्ही फोटो साधारण एकाच ठिकाणचे आहेत का? तसेच वाटतात

हो!!
एक खिडकीतून आणि एक टेरेसमधून काढलाय..... व्ह्यू साधारणपणे तोच आहे

भारताबाहेर राहणारे माबोकर हेवा वाटण्याजोग्या कसल्या भारी जागी राहताहेत......अगदी सहमत

सगळ्यांचे फोटो अप्रतिम....

Pages