चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी Lol
हे माझं अमेरिकेतलं सासर -मागचं अंगण California.
IMG-20230927-WA0010.jpg

उपक्रम संपेपर्यंत मातीचं घर बांधून होत नाही. पटकन होईल म्हणता म्हणता वर्ष झालं डिझाईनच फायनल होत नाही. तर भविष्यातल्या घराचा परीसर. इथे बाग, बगिचा, फुलांचे ताटवे, हौद, आंबे, नारळ असे कल्पून बघा. हिडन आहे. (विना कष्ट)
Screenshot_20230928_071220_Gallery_1.jpg

र.आ. - शुभेच्छा हे लौकर होण्याकरता. वेळोवेळी फोटो काढा. नंतर ते बघायला मस्त वाटते.

अवल - "लेकाच्या घरातून" सिरीज भारी:)

अस्मिता - गझिबो तुम्हीच बांधून घेतला? स्लोपचा वापर मस्त केला आहे.

फा, मामी, अवल ,अस्मिता धन्यवाद.
अवल मस्त आलेत फोटो.

अस्मिता मागच्या जन्मी मुघल बादशहा किंवा बेगम असणार. शालिमार गार्डनचं आरेखन या जन्मीही लक्षात राहिलेलं दिसतंय. ( पिंजोर गार्डनची आठवण आली).

तर भविष्यातल्या घराचा परीसर. इथे बाग, बगिचा, फुलांचे ताटवे, हौद, आंबे, नारळ असे कल्पून बघा. हिडन आहे. (विना कष्ट) >>> सही आहे, शुभेच्छा तुम्हाला.

अस्मिता अस्सं सासर सुरेख बाई गाणं गात असेल.

अवलताई लेकाच्या घरातून दिसणारे सर्वच भन्नाट आहेत, एन्जॉय.

कलाकार तुमच्या आजुबाजुची निसर्ग कलाकारीही सॉलीड आहे.

माझं नाही घर लोकहो, काका काकूंचं आहे. पण आम्हाला आमचं वाटावं इतका मोकळेपणा आहे नात्यात. Happy ते फार यशस्वी बिझनेसकपल होते. धन्यवाद सर्वांना.
फा, कल्पना नाही. त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी घेतले आहे. Happy

IMG_20230928_092430.jpg

बेडरुमच्या दारातून काढलेला सख्ख्या शेजाऱ्याचा फोटो

8E79B7B7-F1F9-45F3-B223-CD38CD659D9E.jpegमाझ्या घरातून.

एकसे एक भारी फोटोज आहेत!

Looks like Northern Lights is the new normal. >> मामी Lol

हा आमच्या नॉर्वेतल्याच जुन्या घरातून काढलेला फोटो. नाताळसाठी लाईट्स आणि हरणं लावली होती डेकोरेटीव्ह. खरी हरणं पण यायची रोज. हे खरं हरीण त्यानंतर पहील्यांदा आलं तेव्हा खोट्या हरणाला बघून कंफ्यूज झालं वाटतं एकदम, कदाचित "तेजा मै हू मार्क इधर है" सारखं काहीतरी मनात म्हणत असेल Happy

AAA.jpg

आहाहा, कसल्या एकेक नेत्रसुखद परीसरात रहाणारी लकी, पुण्यवान लोकं आहात तुम्ही.
माझं काही डेरींग नाही आजुबाजुच्या परीसर दाखवायचं, हाहाहा. >>> +1
मी सहज घरासमोर,मागे बघितलं फोटोजेनिक काही आहे का तर काय सांगू . मागच्या मोकळ्या प्लॉटचा मालक फिरकलेला नाहीये त्यामुळं बाभळीचं रान माजलय. त्यापुढे अपार्टमेंटचं बांधकाम अर्धवट अवस्थेत पडलेलं आहे.
घरासमोर पाईपलाईन घालायला रस्ता उकरून ठेवलाय, त्यात पावसाने चिखल झालाय.
परदेशी मंडळी राहणारे परिसर तर एकसे बढकर एक आहेत.
आचार्य हिडन झाडं, हौद कल्पून पाहिलं Lol आधीचा परिसर - आताचा परिसर कोलाज झब्बू उपक्रम येईल तेव्हा वापरा हा फोटो.

अंजू आणि वर्णिता - अगदी सेम feelings
परदेशी राहणाऱ्या मायबोलीकरांचे फोटो पाहून आपण कशाला इथे झब्बू दिला असं झालं खरं माझं...
आचार्य, तुम्हाला शुभेच्छा. डिझाईन फायनल करताना असे काय काय विषय येऊ शकतात याचा अभ्यास करून फायनल करा बरं का.

Pages