वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बघतेय मेड इन हेवन. छान आहे! एंगेजींग.
तारा खूपच छान. बोलक्या डोळ्यांची, फॅशनेबल ही.
हे फार वेगळे जग आहे. उच्चभ्रू, अल्ट्रा मॉडर्न लोकांचे. पण सुंदर सेट्स, डेकोरेशन्स, कलात्मक पेहेराव..पाहायला छानच वाटते.
मला बुधिस्ट वेडींग फार आवडले. शुभ्र कमळे फुललेल्या पाण्यातून वधू चालत येते ते...... !!
करण पण फार सेंसिबल दाखवलाय तसा........त्या छोट्या मुलाला फार छान समजून घेतले त्याने.
आणि मजा म्हणजे..मीही त्या कबीर ला उपेंद्र लिमयेच समजत होते.......... तरीच म्हटले हा इतका तरुण कसा दिसतो!
Happy
तो शेफ फार क्यूट दिसतो.

तिथे पाळणा असतो नव्या खोलीच्या कामात, तारा ला वाईट वाटेल पाळणा बघून(ते कपल आधी सर्व ठीक असताना फर्टिलिटी प्रयत्न करत होते आणि इथे चिटर कडून प्रयत्न यशस्वी म्हणून) म्हणून सासूला आवर्जून दाखवायचा नसतो.तारा ने व्हिडीओ लिक केला हे स्वतःच्या आईला सांगितलं नाही हा जिमी चा एक प्रकारे चांगुलपणा(नंतर रागाच्या भरात सांगितलं असेल पण, घर गेल्यावर)

जिमी म्हणजे जिम सरभ म्हणताय का. त्याच्या दृष्टीने ते घर म्हणजे फक्त विटा असतात. ते नवीन काम आणि पाळणा वगैरे तोडून टाकलेलं पण दाखवलंय शेवटच्या भागात. प्रत्येक भागाच्या शेवटी कबीरचा मोनोलॉग आहे ते आवडलं ऐकायला. कबीर प्रत्येक जोडप्याचा कधी भेटले वगैरे निर्वीकार चेहऱ्याने विडिओ बनवत असतो, त्यातच ते जोडपं आणि त्यांचे आईवडील यांचे संबंध एकमेकांशी कसे आहेत ते उलगडून जातं. नीलमचा मुलगा तिच्याबद्दल म्हणजे होणाऱ्या बायकोबद्दल बोलताना हडबडतो.

गंस & गुलाज पाहिली

पात्रं आणि सेटअप मस्त आहे. सगळ्यांचं काम पण चांगलं आहे. पण प्लॉट फार घिसापिटा आहे. गोष्टीतच दम नसेल तर नव्वदीच्या नॉस्टॅल्जिया, फास्ट पेस ऍक्शन अन् चांगले कलाकार याच्या जीवावर पूर्ण बाजी नाही मारता येणार हे निदान राज आणि डीके ला फॅमिली मॅन आणि फर्जी नंतर माहित असणं अपेक्षित होतं.

मला सगळ्यात बेस्ट गुलशन देवैय्या चा चार कट आत्माराम वाटला. मस्त स्केच केलं आहे हे पात्र अन् गुलशन नी सादरही छान केलंय... त्याला थोडं अजून फुटेज चाललं असतं
पार्ट 2 मधे ज्यु. गांची अन् त्याची टशन पाहायला मजा येईल...

पेनकिलर विरुद्ध डोपसिक मध्‍ये डोपसिक सरस वाटली. मायकेल कीटन चा अभिनय चांगला अहे. डोपसिक बहूदा जिओ स्टुडिओ वर आहे.

मेड ईन हेवन पहिला सीझन न बघता दूसरा डायरेक्ट बघितला तर चालेल का.

सध्या अधुरा बघतेय, ती संपल्यावर विचार करेन.

अंजु, पहिला जास्त छान आहे.कलर पॅलेट डोळ्यांना जास्त सुखावणारी आहेत.तारा आणि फैजा च्या नात्याचा भूतकाळ, त्या किती चांगल्या मैत्रिणी होत्या हे चांगलं उलगडलं आहे.
शक्यतो पहिला आधी पाहिलास तर दुसऱ्यात जास्त मजा येईल(दुसऱ्या सिझन मधलं परदेशी वेडिंग, त्यातल्या हिरो ची एन्ट्री पहिल्या सिझन मध्ये आहे.धमाल भाग आहे तो.)

ओके, थँक्स अनु.

अधुरा दुसरा भाग बघितला, चांगली पुढे जातेय सिरीज. एपिसोडस एकामागोमाग एक एका दिवसांत बघून टाकावेसे वाटतायेत पण रोज एकेक बघतेय कारण तेवढा सलग वेळ मिळत नाही. पहिल्या भागात स्टोरीचा अंदाज आलेला. मालविका दहाडमध्ये त्या सायकोची बायको होती. तिच्या आवाजावरून अगदी आठवत होती पण नाव बघितलं, छान काम केलंय.

गन्स अँड गुलाब - ३ भाग पाहिले. चांगली वाटतेय आतापर्यन्त. राजकुमार राव, गुलशन देवैया ( दहाड मधला सोनाक्षीचा बॉस!) यांची कामे छान आहेत. डार्क ह्यूमर चांगला जमलेला आहे.

अंजू मेड इन हेवन सी.१ बघ आधी, काही घटनांची लिंक लागेल मग सी.२ बघताना.
जॅझ मधले परीवर्तन मला सुखाऊन गेले. करन चे कळले नाही.. आई आजारीवगैरे ठीक पण गे लोकांमधे काही लॉयल्टी वगेरे प्रकार नसतो का? कुणी ही क्लब मधे भेटतो, डोळ्यांनी इशारा करतो, हे लोक कोपर्यात जातात वगैरे काय? त्याचा विक्रांत मेसी असतो आधीच, शिवाय लिव इन वाला १. मागच्या सी. १ मधे पण ३-४ पार्ट्नर्स बघून देवा हे लोक एकमेकांना ओळखतात तरी कसे पटकन, आणि इतक्या घाऊक प्रमाणात गे पीक असते हे बघून अजून नवल वाटले.
सिगारेट दारू ड्रग्स चा अ तिरेक आहे ह्या सिझन मधे.. करन चे ईंटिमेट वाले सिन्स मी पळवले. गे लोकांबद्दल एक्सेप्टन्स आहे पण डीटेल सीन्स बघवत नाहीत. त्याचा अभिनय मात्र नैसर्गिक आहे.

काल मेड इन हेवनचा दुसरा सिजन संपवला. मला आवडला.
राधिका आपटे स्वतःला दलित म्हणवते, जातीचा उल्लेख करत नाही कारण एकदा बुद्ध धर्म स्विकारला की तुम्ही हिंदु धर्मातली जातही नाकारता. त्याचवेळी नुसते बुद्धिस्ट एवढी ओळख देशात पुरत नाही त्यांना कुळ-मुळ हवे असते, त्या दृष्टीने ओळख ही दलित.
मला करणचे त्या लहान मुलाला समजून घेणे, तसेच त्या मुस्लीम स्त्रीला धीर देणे, तिच्या बाबतीत वेळीच अ‍ॅलर्ट होवून वाचवायची धडपड वगैरे आवडले. आईचे शेवटच्या आजारातही नाकारणे , त्यातून ढासळणे बघून फार वाईट वाटत राहीले.
>> गे लोकांमधे काही लॉयल्टी वगेरे प्रकार नसतो का?>> ते हुकअप कल्चर त्याचे आतुन तुटलेले असणे अधोरेखीत करते. असे तुटलेले असणे होमो मधेही दिसून येते.
त्या तिसर्‍या पार्टनर स्त्रीची कथा

नेटफ्लिक्स वर 'गन्स अँड गुलाब ' हि राज आणि DK दिग्दर्शित सिरीज पाहिली. लेखन, संवाद, अभिनय, छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन अशा सर्वच बाबतीत उत्तम अनुभव देणारी हि सिरीज वाटली. अगदी छोट्या भूमिकेतील कलाकारांनी देखील अप्रतिम रित्या निभावलेली हि कलाकृती चुकवू नये अशी आहे.

Depp vs Heard - अख्ख्या जगाला माहित असलेली जॉनी डेप ची defamation केस. तीन भागांची डॉक्यूसिरीज आहे.
Heard ने नकार दिला होता पण जॉनी डेपने कोर्टात cameras लावुन चित्रीकरणाची परवानगी दिली होती, त्यामुळे आपल्याला रिअल कोर्ट केस पहायला मिळते. बाकी माझी मतं राखीव ठेवते. आवर्जुन पहा. Domestic violence सारख्या sensitive विषयावर आहे. माबोकरांची मतं वाचायला आवडतील.

पूर्वीच्या दूरदर्शन स्टाइलने गेल्या आठवड्यापासून रोज एका ठराविक वेळेला एका वेबसिरीजचा एक(च) एपिसोड बघायला सुरुवात केली आहे.

सोमवार (क्रिमिनल जस्टिस - पहिला सीझन. मी दुसरा सीझन गेल्या वर्षी पाहिला होता.)
मंगळवार (मोझार्ट इन द जंगल - प्राइम. वेगळा विषय. इंटरेस्टिंग आहे. पुस्तकावर आधारित आहे.)
बुधवार (क्लार्कसन्स फार्म - प्राइम)
गुरुवार (द नाइट मॅनेजर - इंग्रजी, प्राइम)
शुक्रवार (पाताल लोक, प्राइम) - याची टाइमटेबलमध्ये एन्ट्री झाली, पण गेल्या शुक्रवारी बघायला जमलंच नाही. Biggrin

क्लार्कसन्स फार्म
मज्जा आहे एकदम. शेतकरी असल्याने नव-शेतकऱ्याची नवलाई जवळून बघितली आहे

पूर्वीच्या दूरदर्शन स्टाइलने गेल्या आठवड्यापासून रोज एका ठराविक वेळेला एका वेबसिरीजचा एक(च) एपिसोड बघायला सुरुवात केली आहे.
>>
है शाबास
म्हणजे 7-8 आठवड्यात किमान 5 वेब सिरीज चा फाडशा...

'गन्स अँड गुलाब पहायला सुरुवात केलीय , पहिली 15 20 minutes नेटाने बघायला लागली , आता मजा येतेय.
ईन्ग्लिश गाणी एकदम माहौल बनवतायेत.

गन्स अ‍ॅण्ड गुलाब च्या बहुधा दुसर्‍या एपिसोड मधे श्रेयनामावली आहे ती एकदम कल्पक पध्दतीने दाखवली आहे. प्रत्येक कलाकाराच्या नावाच्या पार्श्वभूमीमधे काहीतरी विशेष आहे. त्यात सतीश कौशिकचे नाव एका कॅलेण्डरवर आहे, तेथे कॅलेंडर असेही लिहीलेले आहे Happy

ज्यांना संदर्भ लागला नसेल त्यांच्याकरता Happy

हो टायटल्स मस्त केली आहेत गन्स अँड गुलाब ची, कल्पक एकदम.
सीरीज आधी आश्वासक वाटली होती पण संपता संपता पारच ढेपाळली. का ही ही आहेत शेवटचे २-३ भाग.

अधुरा एक भाग राहिलाय बघायचा, स्पॉयलर्स असतील पोस्टमध्ये.

त्या टीचरचा past shocking एकदम. निनादला ज्यांनी मारलं डायरेक्ट किंवा indirect त्यांचा बदला घेणं एकदम करेक्ट, घ्यायलाच हवा पण बाकी बरीच निरपराध माणसं मारली जातात, ते पटलं नाही, वाईट वाटलं.

बघितला शेवटचा भाग. अगदी प्रॉपर खूनी कोण असेल याचा अंदाज आधी आलेला आणि सेकंडलास्ट भागात जवळजवळ कन्फर्मड. त्यामुळे निनादने मारलं त्या कोणाबद्द्ल सहानुभुती वाटली नाही. फक्त सेकंड सीझनसाठीचा लास्ट सीन नको होता. सिझन वन इनफ होता. त्या टीचरलाही हवं तर शिक्षा द्यायची आधीच्या गुन्हाची याच भागात. आता सेकंड सीझन उगाच काहीतरी करतील.

एक खटकलं की निनादच्या आई बाबांकडे आदुने जाऊन त्यांचं सांत्वन करायला हवं होतं, धीर द्यायला हवा होता. स्टोरीला तिथे क्लोजर द्यायला हवं होतं.

बाकी यंग आदुला, आणि त्या डीन व्यासला कुठेतरी पाहील्यासारखं वाटतं.

थॅंक यु rmd ही सिरिज सुचवण्यासाठी.

राहुल देवने चांगलं काम केलंय. मला तो आवडत नाही खरंतर, त्याचा भाऊ मुकुल देव आवडायचा. राहुल अशा रोलसाठी परफेक्ट मात्र.

त्या सुप्रिया टीचरचा ताबा कोणी घेतला याचाही अंदाज आला, सेकंड सीझन आला तर बघूया.

आता फर्जीचा सेकंड सीझन यायला हवा.

प्राईमवर ‘The English’ ही लघुमालिका बघितली. आवडली. सन १८९० मधे ही कथा सुरू होते. कॅार्नेलिया लॅाक नावाची बाई आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायला इंग्लंडहून अमेरिकेत येते. तिची ही कथा. भरपूर क्रूरता, रक्तपात बघायला मला आवडत नाही पण ही मालिका कथा, संवाद आणि एकसे एक सुंदर फ्रेम यात खिळवून ठेवते. वेस्टर्न चित्रपट/मालिका ज्यांना आवडतात त्यांनी नक्की बघा.

उगाचच , how to get away with a murder पहायला सुरुवात केली .
सुरुवातीलच एक खून झालाय , ४ तरूण मुलं घाबरलीयत , काय करायच , काय झालय , त्यांच बोलणं चालू आहे .
मग कथा काही महीने मागे जाउन परत चालू होते .
एक क्रिमिनाल लॉयर जी लॉ कॉलेजमध्ये शिकवतेय . तिच्या वर्गात शिकणार्या ५ मुलांना ती तिच्या सोबत काम करत शिकण्याची संधी देते .
तिचे दोन असिस्टन्स , तिचा प्रोफेसर नवरा , एका विद्यार्थ्याची तरूण शेजारी ई. ई. , बरीच पात्र आहेत .
प्रत्येक भागात नविन केस आणि एक समांतर चाललेली केस, ज्या केसमुळे सगळे एकमेकाशी जोडले जातात .
नक्की कोणाचा खून झालाय , त्या तरूण मुलांनी नक्की काय केलय , मूळ गुन्ह्यातील खरा गुन्हेगार कोण ? ज्या प्रमाणे कथा १० पावलं मागे जाउन २० पावलं पुढे जाते , एकेक गोष्ट उलगडत जाते ते रंजक आहे . बाकी सगळं ठीक ठीक .
५-६ सीजन आहेत . मी सध्या २ रा बघतेय . पहिला जास्त रोचक आहे . दूसर्यात सगळचं भरकटतं .
सगळ्या सीरीजमध्ये LGBT angle फारच सरार्स झालाय . ईथलं गे कपल मात्र आवडलं .

Pages