Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@सुनिधी, ताली jiocinema वर
@सुनिधी, ताली jiocinema वर आहे आणि फ्री आहे. नक्की पाहा.
मेड इन हेवन बघितली आणि आवडली.
मेड इन हेवन बघितली आणि आवडली. मेहेरचं पात्र खूप आवडलं. तिचा आवाज खरंच वेगळा आहे. तिचे दागिने विशेषतः ऑक्सिडाईझ गळ्यातले आवडले. जोहरची बायको खरंच सुंदर निघाली. तो तिचा दुसरा नवरा असेल आणि मोठा मुलगा तीचा आधीच्या लग्नाचा असेल याची कल्पना आली होती. ताराची आई मला दोन्ही सिरीजमध्ये सॉलिड वाटली. कुठेही इमोशनल नाही. प्रत्येक ठिकाणी फायदा बघणारी. ताराची बहीण फारच साधी दाखवली होती आधी, त्या पार्श्वभूमीवर ती ताराच्या जीवावर मुलीला मोठया शाळेत टाकते हे खटकलं. तारा अगदी क्लासी दिसते प्रत्येक वेळी. कनिष्ठ वर्गातून आलेली मुलगी फक्त त्या गृमिंग क्लासच्या आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर एव्हडा मिलेनिअर पटवू शकते आणि शेवटपर्यंत त्याचे प्रॉपर्टी शोषण करते हे तरीही पटत नाही. कबीर दिसायला ओबड धोबड आहे. उपेंद्र लिमये आणि निळु फुले बरे दिसतात त्याच्यापेक्षा. शेवटच्या भागात नसीरचा मुलगा आहे का. राघव आवडला. रसोईया
आता मला पडलेले प्रश्न विचारते, तारा सासूला चेक देऊन बाहेर पडत असते तेव्हा सासू तिला नवीन काम दाखवत नाही तो पाळणा असतो का लाकडाचा आणि म्हणून ती एव्हडी पेटून उठते का घरासाठी. तारा आदिलला सांगते की रूम तूझ्या नावावर बुक केली आहे म्हणजे ती ब्लॅकमेल करते का त्याला. करण खोटे लग्न करूच शकला असता आईच्या समाधानासाठी. नीलमच्या मुलाचा डिवोर्स झाला तरी त्याला सासऱ्याची प्रॉपर्टी कशी मिळेल, ते काय साइन करायला सांगतात त्याला. दिया मिर्झा भागात तो ट्रेडिशनल कपड्यातला लग्नाचा फोटो वगैरे अगदी पतोडी पॅलेसवरून प्रेरित वाटले. शेवटच्या भागात प्री वेडिंग पार्टी सॉंग छान आहे. गुरगाव आणि इयेमआयवाले तुझ्यासाठी नाहीत हे ताराची आई तिला परफेक्ट सांगते जे तिला तेव्हा पटत नाही पण रिसॉर्टमध्ये जेव्हा स्पा नसते आणि रूम साधी असते तेव्हा तिला काय आपल्यालाही ते पटते. हुश्श, सध्या एवढंच.
दिया मिर्झा भागात तो
दिया मिर्झा भागात तो ट्रेडिशनल कपड्यातला लग्नाचा फोटो वगैरे अगदी पतोडी पॅलेसवरून प्रेरित वाटले. >>>> ती दिया मिर्झा आहे ??? कळलच नाही मला.
हो, तो एअर हॉस्टेसशी दुसरं
हो, तो एअर हॉस्टेसशी दुसरं लग्न करतो आणि इकडे पहिली नस कापून घेते ती पहिली बायको शेहनाज, दिया मिर्झा आहे.
स्पॉयलर***********
स्पॉयलर***********
आदिल ताराला आधी थोडक्यात कटवायला बघत असतो. नंतर पण केवळ ताराला बॉयफ्रेन्ड आहे याचा वापर करून सेपरेशन मधे तिचे कॉम्पेन्सेशन कमी करत असतो. म्हणून ती त्याला ब्लॅकमेल करते - म्हणजे करायची हिन्ट देते. सासूनेही तिला १८ लाखाची मदत (उसने देऊन) देऊन त्या जोरावर तिला सस्त्यात सेटल करायला प्रेशराइज करायचा प्रयत्न करते तेव्हा तिला लक्षात येते की तिची कुणाला काही पडलेली नाहीये. म्हणून तीही मग ब्रुटल स्टँड घेऊन आदिल ला अडकवते.
आणि प्रि नप अॅग्रीमेन्ट सासर्याच्या प्रॉपर्टीसाठि नसते तर लग्नानंतर स्पाउस म्हणून तिच्याअकडच्या कोणत्याही संपत्तीवर हक्क सांगणार नाही असे अॅग्रीमेन्ट असते.
बाय द वे ताराचं काम कोणी
बाय द वे ताराचं काम कोणी केलंय. स्टोरी इंटरेस्टींग वाटतेय, बघु का विचार करते.
ताराचं काम केलेली शोभिता
ताराचं काम केलेली शोभिता धुलिपाला.
अच्छा, थँक्स सायो.
अच्छा, थँक्स सायो.
थँक्स सान्वी.
थँक्स सान्वी.
शोभिता धुलिपला सीझन १ मध्ये
शोभिता धुलिपला सीझन १ मध्ये प्रचंड आवडलेली. एक वेगळेच सौंदर्य आहे तिच्यात. ह्या सीझनचे दोनच भाग पहिले आहेत अजूनतरी. इथंही ती आवडत आहे. करन मात्र जरा सुस्त वाटतोय. पहिल्यात छान दिसत होता. मला मेड इन हेवनचे इंट्रो म्युझिक (एकूणच त्याची इंट्रो) पण खूप आवडते.
धन्यवाद मैत्रेयी. प्री नप
धन्यवाद मैत्रेयी. प्री नप भारतात बेकायदेशीर आहे असे मी परवा एका मुलाखतीत ऐकले. दलित हा शब्द मलाही नवीन वाटला पण वर लिहिले आहे तसेच असेल. राधिका आपटेचा त्यातला नवरा विग लावून आहे असे वाटते. तमिळ, दलित आणि शेवटचे ख्रिश्चन लग्न आवडले. तारा आणि करण प्रत्येक प्रसंगातून कसे मार्ग काढतात आणि माणुसकी सोडत नाहीत ते आवडले. हो करण पहिल्या सीजनमध्ये छान दिसत होता. यात त्याचे नाक फार उठून दिसतेय.
म्हणून तीही मग ब्रुटल स्टँड
.
म्हणून तीही मग ब्रुटल स्टँड
म्हणून तीही मग ब्रुटल स्टँड घेऊन आदिल ला अडकवते.
>> त्याच्यासोबत xxx करणे यात काय बृटल होते कळेल का? आदित्य स्वतच्याच लग्नाच्या कायदेशीर बायकोसोबत xxx करून कसा अडकला नक्की?
करण या सिझन मध्ये पार उतरला मनातून.
मेड इन हेवन पहिला सिजन
मेड इन हेवन पहिला सिजन आवडलेला
पियू, सेक्स करणे नाही ब्रुटल
पियू, सेक्स करणे नाही ब्रुटल म्हणत आहे मी
उगीच सासूचे प्रेम, नवर्याला माफी वगैरे गुंतवळ्यात न अडकता त्याचे राहते घर काढून घेणे याला ब्रुटल म्हटले.
>स्वतच्याच लग्नाच्या कायदेशीर बायकोसोबत xxx करून कसा अडकला नक्की>>>> सिंपल आहे की, लग्नाची असली तरी सेपरेटेड आहे ना, डिवोर्स ची केस चालू आहे, त्या सेटलमेन्ट च्या निगोसिएशन वर पण इम्पॅक्ट होऊ शकतो ( होतोच) , आणि वर कल्कीला कळले त्याने हे उद्योग केलेत तर काय होईल त्यांच्या रीलेशनशिप चे ? ती, तिचे बाळ त्याच्या दृष्टीने इम्पॉर्टन्ट आहेत, सो ही हॅज अ लॉट टू लूज.
स्पॉयलर
स्पॉयलर
तोही कधीकधी संधीसाधू माणूस वाटतोच.नताशा शी लग्न ठरलेलं असताना तारा शी xxx बिनधास्त(तिने उद्युक्त केलं वगैरे ठिके पण हा मोठा बिझनेसमन, याला तितका संयम आणि सेन्स स्वतःच्या इमेज साठी असणं अपेक्षित आहे.), नंतर तारा शी लग्न झालेलं असताना क्लासि भूक भागवायला फैजा, मग फैजा बरोबर एकत्र, तारा शी केस चालू असताना परत तिने जरा गोड बोलली की परत तिच्याशी.एकंदर जोवर पुरावे जनरेट होऊन अडचणीत येत नाही तोवर हे सगळे काहीही करायला तयार आहेत.
नेफिवर "गन्स और गुलाब" अशी
नेफिवर "गन्स और गुलाब" अशी काहीतरी सिरीज आलेली दिसते. कोणी पाहिली का?
गन्स अँड गुलाब्ज (Guns &
गन्स अँड गुलाब्ज (Guns & Gulaabs)आहे ते फारएन्ड मस्त वेबसिरीज आहे नक्की पहा वेगळ्या ह्युमर ची कॉमेडी आहे आणि त्यात 90 चा नॉस्टॅल्जिया.केसेट्स ,लँडलाईन ,90 च्या हेअर स्टाइल आणि गाणी.
नेटफ्लिक्स वर रिलीज झालेली ही सिरीज सुरुवातीला इतकी पकड घेत नाही पण हळूहळू केरेक्टर डेवलेप झाली की पकड घेते.राजकुमात राव ,गुलशन देवाह, आदर्श गौरव(हॉस्टेल डेज वाला)आणि दुलकर सलमान सगळ्यांनी कामं चांगली केली आहेत पण सगळ्यात मस्त (पाना टिपू) राजकुमार राव त्याला सूट करतात असे रोल( ल्युडो ,स्त्री टाईप)दिवंगत अभिनेते सतीश कौशिक पण आहेत यांचं बहुतेक शेवटचं काम असेल.फॅमिली मॅन आणि फर्जी च्या डिरेक्टर राज अँड डिके ची आहे म्हणून मी पाहिली पण फॅमिली मॅन च्या अपेक्षेने पाहू नका.
गँग ऑफ वसेपुर टाईप पिक्चर सिरीज आवडत असतील तर मस्ट वॉच कारण डायलॉग्स.
स्पॉयलर्स-
काही सीन्स मध्ये जाम हसू येतं जस की लव्हलेटर लिहिताना राजकुमार गातो हॉस्पिटल मध्ये आत्माराम ला गोळी मारतो तो सीन आणि शेवटी जेव्हा जो कहां है विचारतो तेव्हा राजकुमार राव म्हणतो तो डायलॉग .
स्पॉयलर
स्पॉयलर
म्हणूनच जेव्हा राघव ताराला म्हणतो की तू चार वर्ष लग्नात होतीस म्हणून तू हे घर घेऊ शकत नाहीस, तेव्हा ती म्हणते की तुला काही बोलायचा अधिकार नाही. धुतल्या तांदळाचे कुणीच नाही. सासू नव्या सुनेच्या आणि नातवाच्या स्वागताला तयार झाली, आदिल कधीच कोणाशी एकनिष्ठ नव्हता. दुसरी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे बायका एकमेकींशी वाईट वागतात किंवा सपोर्ट करत नाहीत. दिया मिर्झा गोष्टीत सासू मुलाला दुसरे लग्न करण्यापासून परावृत्त करू शकते पण ती उलट दियाला सांगते की तू तलाक दे. पहिल्या भागात आई मुलीला रंग उजळण्यासाठी उपचार करायला फोर्स करते. बुलबुलची सासरची मंडळी तिलाच वाईट ठरवतात. ताराची आई पैशाची भुकेली असते. जाझचे लग्न तिचे आईवडील विशेषतः आई होऊ देत नाही.
कल्की - धन्यवाद
कल्की - धन्यवाद
मला प्राईमवर कोणताही
मला टीव्हीवर प्राईमचा कोणताही कार्यक्रम चालु करताना एका झटक्यात चालुच होत नाही. गोल गोल फिरत रहातं व एरर येऊन थांबतं. ३-४ वेळा करुन मग केव्हातरी सुरु होतं. आणि हे नेहमी होतं. तुम्हाला कोणाला हा प्रॉब्लेम येतो का?
कबीर बसराय उर्फ उपेंद्र लिमये
कबीर बसराय उर्फ उपेंद्र लिमये चे तरुण आणि चप्पट गाल व्हर्जन>> आणि मी पूर्ण सेरीजभर विचार करत होते की याला कुठे पाहिलाय.
1899 नेटफ्लिक्स
1899 नेटफ्लिक्स
अधुरा बघायला घेतली. एक
अधुरा बघायला घेतली. एक एपिसोड बघितला. भारी वाटतेय. काहि ठीकाणी जाम डेंजर वाटतेय.
ह्यातले बरेच जण ओळखीचे वाटतात, कुठेना कुठे बघितलेले. अधिराज म्हणजे आदु पाताललोक मध्ये होता बहुतेक, ईश्वाक सिंग. निनाद कशात बरं होता, त्याचे कुरळे केस मस्त आहेत, तोही ओळखीचा वाटतोय.
वेदांत म्हणजे श्रेणिकने काम छान केलंय.
हुलू वर जर कोणी "डोपसिक"
हुलू वर जर कोणी "डोपसिक" सिरीज पाहिली असेल (ती ही रेकमेण्डेड आहे) तर त्याच विषयावर नेफिवर "पेनकिलर" नावाची लिमिटेड सिरीज आली. एक-दीड एपिसोड पाहिला. ही पण खिळवून ठेवणारी आहे.
यातली उझो अडुबा (असाच उच्चार असावा) भारी आहे. जबरी स्क्रीन प्रेझेन्स आहे तिचा.
पेनकिलर आजच चालू केली. मी ते
पेनकिलर आजच चालू केली. मी ते एम्पायर ऑफ पेन पुस्तक वाचलं आहे पण सिरीयल जास्त चांगली वाटते आहे. त्या उझो अडुबाने आल्या आल्या सिरीजचा ताबाच घेतलाय एकदम.
बाकी मेड इन हेवन पहिला सिझन आवडला होता.दुसरा अजिबातच बघावासा वाटला नाही. ओरिजिनल सीझनमध्ये ते LGBT प्रकरण वगळता स्टोरीज जरा तरी ऑरगॅनिकली डेव्हलप केल्यासारख्या वाटल्या. या सिझनमध्ये मात्र एखादा विशिष्ट सोशल- पोलिटिकल पॉईंट- तोही अनेकदा एकांगी पद्धतीने - मांडायचा हा उद्देश- मग त्यासाठी त्याच्या आसपास काहीतरी स्टोरी लिहून टाकणे - असा प्रकार केलेला दिसतोय.
मेड इन हेवन बघत आहे २ एपि.
मेड इन हेवन बघत आहे २ एपि. पाहिलेत त्यामुळे स्पॉइलर नाहि वाचलेत. साईट वर बघत आहे
घरी प्राईम असून ही शो दिसत नाही. 
शोभिता मॉडर्न लूक मधे क्लासी वाटते पण काही काही भारतिय कपड्यांत अगदीच किरकोळ वाटते.
निलम वाल्या एपिसोड मधे ते ब्रास ग्लासेस, सजवणूक, बाहेर मेहेंदी आणि लग्न घर कल्पना अगदीच सुंदर आहेत काही काही..
करन ह्या सीझन मधे डोळे सुजलेला आणि फारच जास्त ड्रग्स करताना दाखवलाय त्यामुळे फेस सुजल्या चा मेकप केलाय असं वाटतं.
पहिला सीझन फार च एंगेजिंग होता, हा जरा ओके आहे. मेहेर चं पात्र अॅक्चुअल पुरूषाने केलंय का? की ती स्त्री आहे? छान घेतेलाय तो अॅंगल.
हो
हो
यावेळी मेड इन हेवन खूप जास्त सामाजिक संदेश देणारं वगैरे बनवलंय.
करण ने मागच्या वेळी जेल मध्ये जाणं पण धीराने सहन केलं
यावेळी गे असणं कायदेशीर झाल्यावर, थोड्या अडचणी कमी झाल्यावर पण तो इतका गळपटला(बहुतेक आईच्या आजाराने)
Your honor
Your honor
सिजन 2 पाहिला
घट्ट बांधीव कथा पटकथा नाहीये.
काहीही चाललंय असे वाटले बऱ्याच प्रसंगात.
सिजन 1 मात्र चांगला वाटलेला
मेड इन हेवन बघितली आणि आवडली.
मेड इन हेवन बघितली आणि आवडली. पहिला सिझन पण आवडला होता. तारा आणि तिची पूर्ण टीम छान दाखवली आहे.
मिसेस जोहरी ची पॅरलल स्टोरी पण चान्गली दाखवली. ती नवऱ्यासमोर सारखे 'बाप पे गया है' असे बोलून पण विलास राज शांत कसा राहतो हे चांगले उलगडत नेले. मुलातील बदल पण चांगले दाखवले .
प्रत्येक character चे eye expressions खूप बोलके आहेत. तारा आणि करणं ची मैत्री पण मस्त
बॉलिवूड लव्ह स्टोरी बघून लग्नानंतर प्रोड्युसर झालेल्या काही actress आठवल्या .
आता मला पडलेले प्रश्न विचारते, तारा सासूला चेक देऊन बाहेर पडत असते तेव्हा सासू तिला नवीन काम दाखवत नाही तो> मला हि हे नीटसे कळले नाही.
Pages