चंप्या दुधवाला....!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीवर प्रकाशित झालेल्या
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' (http://www.maayboli.com/node/12292) आणि
वांगे अमर रहे ! (http://www.maayboli.com/node/12438)
या लेखांवर लिहिताना वाचताना मला माझा शेतीबद्दल चा एक अनुभव मांडावासा वाटला!

सन २००६ मध्ये पी.एच.डी. (रसायनशास्त्र) चा अभ्यासक्रम/संशोधन संपवुन मी भारतात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी तयारी करायला पुण्यात आलो. पण दुर्दैवाने, माझ्या छोट्या पुतण्याला कॅन्सर झाल्याने मला अभ्यास अर्धवट सोडुन त्याच्या उपचाराकडे लक्ष द्यावे लागले. चाणक्य मंडळ, पुणे अन टाटा हॉस्पिटल, मुंबई च्या खेट्या मारण्यात माझे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे स्वप्न कामी आले Sad मे २००७ ची पुर्व परिक्षा मी नापास झालो! आख्या आयुष्यातील नापास चा एकमेव शिक्का माझ्या माथी बसला! (सविस्तर: स्व..देश पुस्तक. ग्रंथाली प्रकाशन)

त्यानंतर जुन २००७ ला माझे लग्न झाले. Happy नोकरी अर्धवट करत होतो. पण मन रमत नव्हते. स्व्तःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे वेड लागले होते. आय ए एस चे स्वप्न धुळीस मिळाले अन मग भले लट्ट पगाराचे नोकरी हाती असुनही मन स्थिर नव्हते. रसायन अन ऑषध उद्योगात काही करायला लागणारे मोठे भांडावल हाती नव्हते..... मग गावी काही करावे म्हणुन चाचपणी केली. बारामतीच्या सह्याद्री अ‍ॅग्रो ने आमच्या तालुक्यात दुध संकलन व शितकरण केंद्रे चालु करण्याचे योजले आहे असे समजले. आमच्या कुटुंबाचे एक हितचिंतक श्री नानाभाऊ कराडे ह्यांनी मला सविस्तर माहिती दिली... अन ७ ऑगस्ट २००७ ला बारामतीला सदर कंपनी बरोबर करार केला!

या पुर्वी दुध संकलनाचा व्यवसाय एका भावाने केलेला होता, पण त्यात त्याला तब्बल १० लाखाचा तोटा झालेला होता. त्यामुळे घरुन कुणीही ह्या उपक्रमाला आर्थिक पाठबळ देउ करित नव्हते! एकला चलो रे.......!

गावाकडील शेतकृयांकडुन्/दुध उत्पादकांकडुन दररोज दोन वेळा दुध जमा करणे व ते ३ डिग्री तापमानाला थंड करुन टॅन्कर (सह्याद्री अ‍ॅग्रो ने पाठवलेला) ने बारामतीला पोहच करणे हे कामाचे स्वरुप.

दुध संकलन व शीतकरन केंद्र चालु करण्याचा खर्च होता साधारण पाच लाख रुपये. जागा स्वतःचीच (व्होल वावर इज आवर) असल्याने फक्त कंपनीनी दिलेल्या आराखड्याप्रमाणे इमारत बांधणी चा खर्च होता. खिशात होते सत्तर हजार रुपये! काम तर सुरु केले.... मग पाया बांधुन झाल्यावर पैसे संपले:)
त्याचवेळी खुप पाउस पडला अन बांधकम जवळपास एक महिना बंद ठेवावे लागले! माती, वाळु, विटा ई ची वाहतुक पावसाने रस्ते ओले केल्याने बंद झाली होती..... त्यामुळे महिनाभर सवलत मिळाली! पैसे संपल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही Happy

तालुक्यातील तीन बॅन्काकडे कर्जाची मागणी केली. तारण देऊनही दुध संकलन केंद्रा साठी च्या पुर्वीच्या अनुभवावरुन एकाही बॅन्केने कर्ज दिले नाही. मग एका मित्राकडुन काही पैसे घेतले, अन काही कंपन्यांमध्ये काम करणार्या मित्रांनी त्यांच्या पर्सनल लोन सेवेचा वापर करुन ( व्याज दर १९%) मला तीन लाख रुपये जमा करुन दिले!

पाउस थांबला अन काम सुरु झाले!

दत्त जयंतीच्या दिवशी २३ डिसेंबर २००७ ला दुध संकलन अन शितकरन केंद्राचे उद्घाटन केले! जो भाउ दुधातील माहितगार होता, त्याने केंद्र चालवायची जबबदारी उचलली. पहिल्या दिवशी १४२ लिटर दुध जमा झाले. कंपनीने सहा महिन्यात प्रतिदिन किमान दीड हजार लिटर दुध जमा व्हायला हवे असे कळवले. मग शेतकर्यांकडे मोर्चा वळवला... पण ग्रामीण भागात असे अनेक संकलन केंद्र असल्याने प्रत्येक जण उचल (अ‍ॅड्व्हान्स ) ची मागणी करु लागला.... ज्या पाच पन्नास शेतकर्‍याना बोललो, त्यांची एकुण मागणी २५ लाखाच्या पुढे गेली..... धबाडधुम! इथे शिवरात्र अन एकादशी एकसाथ चालु असताना ....!

मग शेतकर्‍यांना केवळ १) दुधाचे वेळेवर पेमेट २) दर्जेदार दुधाला दर्जेदार भाव ३) केंद्र चालवण्याचा खर्च म्हणुन दुध उत्पादकाकडुन काहीही कपात केली जाणार नाही, अश्या आश्वासनांवर (जी गेली दोन वर्षे १००% पाळली आहेत ) दुध देण्याची विनंती केली. काहींनी ती मान्य केली अन त्यांना फरक समजुन आला..... एक महिन्यात प्रतिदिन १०० अन सहा महिन्यात प्रतिदिन अडिच हजार लिटर दुध जमा होउ लागली. एका वर्षात प्रतिदिन चार हजार लिटर दुध जमा करुन महाराष्ट्रात सह्याद्री अ‍ॅग्रो च्या एकुण ५०० केंद्रा मध्ये तीसरा क्रमांक पटकावला!!! Happy

मित्रांनी दिलेले सर्व पैसे परत करु शकलो! अन अनेक नवे मित्र ही जोडु शकलो!

आज अंदाजे ४०० लहान मोठे दुध उत्पादक दररोज ४००० लिटर दर्जेदार दुध श्री बाळकृष्ण दुध संकलन व शितकरण केंद्रावर जमा करत असतात! इतर दुध केंद्रांनी आजवर लुटलेले/ कमी भाव दिलेले/ पैसे बुडवलेले लोक गेली दोन वर्षे अत्यंत समाधानाने दुध उत्पादनाचा हा पुरक उद्योग यशस्व्व्पणे करित आहेत... सकाळी किंवा संध्याकाळी जर कधी केंद्रावर बसले, तर ह्या शेतकरर्यांशी मनमोकळी बातचीत होते. लै झ्याक मजा येते! तिथुन पाय हलत नाही! Happy पुन्हा मुंबई, सिडनी ला जाउशी वाटत नाही Happy
अश्या भेटीतुन विचारांचे आदान प्रदान होते! समवयस्क अन लहान मोठे शेतकरी बांधव प्रत्यक्ष शेती करताना काय अडचणी येतात ते सांगतात...अन जमल्यास काही मेळावे भरवुन, कृषी तज्ञ बोलावुन मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात.

***************

ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्‍हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच! Happy

यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
१) गुळ बनवण्याच्या आधुनिक प्रक्रियेबद्दल माहीती मिळवणे.
२) ज्य लोकांची गुर्‍हाळे सध्या सुरु आहेत त्यांचेशी कायम संपर्कात राहणे.
३) कोल्हापुर/सातारा भागातील मित्रांकडुन याबद्दल अधिक माहिती मिळवणे.

....चंप्या गुळवाला!:)

प्रकार: 

चंप्या दूधवाला हे शिर्षक वाचून मला कोणत्यातरी दुधवाल्याबद्दल लिहिलं असेल असं वाटतं. तो तूच असशील अशी शंकाही नाही आली. Wink
मस्तच. खूप शुभेच्छा.

वॉव सह्ही!! व्हेन्चर कॅपिटलिस्ट ह्या प्रक्लपात पैसे गुंतवयला तयार होतील!

चंपक , मस्तच रे. माझ्या नवर्‍याच्या मामानी पण डेअरी उद्योग सुरु केलेला. जोडिस आता भाजीपाला डायरेक्ट शेतकर्‍याना विकता यावा यासाठी पण त्यांची खटपट सुरु आहे. तुला खुप सार्‍या शुभेच्छा.

वॉव. मस्तच आहे हे चंपक.
आमच्या कडे माझे मोठे दीर धाकट्या दीराच्या मागे लागलेत हे काम सुरु करण्यासाठी.

मस्तच रे चंपक. गुळाचे काय करतोस ते सांग नक्की. आता गेले की भेट देइन तुझ्या केंद्राला Happy

छान वाटलं वाचून्. शेतकर्‍यांना चांगला मार्गदर्शक भेटला. तू अडचणी आल्या तरी काम चालू ठेवलस ह्याच कौतुक वाटलं. अशाच तरुण रक्ताची मुलं देश नक्कीच पुढे आणतील.

चंपक, सहीच! रुनी आणि संघमित्राला अनुमोदन.
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

श्री जागोमोहनप्यारे ह्यांनी दिलेल्या इन्पुट वर काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता श्री दिनेशदादा यांचेकडुन अशी माहिती मिळाली... जी आस्चर्यकारक आहे!

Maaldives baddal saangaayache tar te bhaarataatUnach kaay sri lankehun suddhaa kuThalaach khaadyapadaarth ghet naaheet. tyaachee aaNi aussie lokaanchee jee agreement aahe ( to desh buDaalaa ki sagaLe tikaDe yeNaar aahet ) tyaamUle te aussie lokaanaa pref detaat. tyaa lokaanchyaa imports var barech embaargo aahet. tithe bhaarataatalyaa vastu ajibaatach disat naaheet.

गुड. काहीतरी पोलिटिकल लोचा असणार, ही शंका होतीच. अन्यथा, भारत हा खूप जवळचा देश आहे त्याना.

साहेब एकदम जोरात की ....

अरे कालच 'सेंद्रिय शेती मालाच्या' प्रदर्शनात, सातार्‍याच्य चिवटे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या गुळाचा व्यवसाय आहे. बरेच पुरस्कार वगैरे मिळाले आहेत त्यांना. ईतरांपेक्षा त्यांचा गुळ १० रु ने महाग होता, म्हणुन मी त्यांच्याशी थोडी चर्चा केली Happy

त्यांच्या शेतावर ते प्रशिक्षण वर्ग पण घेतात.

त्यांचा फोन नं - पत्ता तुला कळवते [ ढेपेवर चिकटवलेला आहे Happy ]

<< माल्डीवेस बद्दल सांगायचे तर ते भारतातूनच काय श्रीलंकेहून सुद्धा कुठलाच खाद्य पदार्थ घेत नाहीत . त्याची आणि औस्सिए लोकांची जी अग्रीमेंत आहे ( तो देश बुडाला कि सगळे तिकडे येणार आहेत ) त्यामुळे ते औस्सिए लोकाना प्रेफ देतात . त्या लोकांच्या इम्पोर्त्स वर बरेच एम्बार्गो आहेत . तिथे भारतातल्या वस्तू अजिबातच दिसत नाहीत.. >>
(जी-मेल पॅडवर केलेले मराठी शब्दांतर.)
....
चला एक नवी माहीती मिळाली.
....
सरोज तेथे पंक, फुल तेथे कांटा,
अवघड दुर्गम्य, होतकरुंच्या वाटां,
पार करुनी जाणे, विपत्ती सावटांना,
अंती जय लाभे, हिकमती चिवटांना ......!
(* घायाळ पाखरांस ....*)

छान रे चंपका. डोकं ठिकाणावर ठेऊन, वास्तव स्विकारून, जिद्दीने पावलं उचलली की यश मिळतं, हा साधा-सोपा मंत्र. पण फार कमी वेळा सिद्ध होताना दिसतो. कारण तुझ्यासारखे कमीच. Happy

पुढल्या वाटचालीस शुभेच्छा देतो तुला. Happy

भले शाब्बास चंपक! दुग्ध शर्करा योग साधणार म्हणजे तू Happy यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी अभिनंदन आणि गूळाच्या व्यवसायासाठी खूप सार्‍या शुभेच्छा तुला..

खुप मस्त!! दोन्ही व्यवसायांमधे खरं तर सगळ्याच व्यवसायांमधे अशा प्रामाणिक माणसांची खुपच गरज आहे...खुप शुबेच्छा तुम्हाला Happy

अभिनंदन चंपक. Happy

१) दुधाचे वेळेवर पेमेट २) दर्जेदार दुधाला दर्जेदार भाव ३) केंद्र चालवण्याचा खर्च म्हणुन दुध उत्पादकाकडुन काहीही कपात केली जाणार नाही, अश्या आश्वासनांवर (जी गेली दोन वर्षे १००% पाळली आहेत ) दुध देण्याची विनंती केली. काहींनी ती मान्य केली अन त्यांना फरक समजुन आला..

>>>>>>>>>>>>

चंपक, अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवली आहे तुम्ही डेअरी. आणि उचल दिली नाही हे एका दृष्टीने चांगलेच झाले. अनेक खाजगी दूध संकलनवाले/डेअरीवाले शेतकर्‍यांना उचल देऊन, अव्वाच्या सवा व्याजदर आकारतात. त्यात पशुखादय व इतर अनुषंगिक गोष्टी त्यांच्याकडुनच घ्यावा लागतात, दूधही त्याच डेअरीला दयावे लागते. हा सर्व खर्च वजा जाता दूधाचे अत्यल्प उत्पन्न उत्पादकाच्या हातात येते. अशाप्रकारे शेतकर्‍याना पुर्ण परावलंबी/मिंधे करुन व्यवसाय करतात व गब्बर होतात.

उचल न घेताही अनेक उत्पादक असे आहेत जे भूमीहिन आहेत, तेसुद्धा किफायतशीर दूधधंदा करत आहेत. त्यांचे संपुर्ण कुटुंब फक्त दूधधंदयावर् गुजराण करत आहेत. अर्थात त्यांचे डेअरीवाले तुमच्यासारखे त्रिसुत्री राबवनारे असतात.
हे वाचत असताना मनात काही प्रश्न आहेत. तुम्हाला शक्य झाल्यास सांगा, व्यवसायाचे गुपीत म्हणुन काही सांगावयाचे नसल्यास तसे पुर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. Happy
०१.साधारणपणे तुम्हाला प्रतिलिटर युनिट किती येतात? इबी &डीजी.?
०२. ४ डीग्री तापमान येण्यासाठी BMC किती वेळ चालावावा लागतो. ?
०३. उत्पादकांना फॅटचा दर काय देता?
०४. एस एन एफ चा क्रायटेरीया काय आहे?

Pages