घायाळ पाखरांस ....

Submitted by अभय आर्वीकर on 10 December, 2009 - 20:14

घायाळ पाखरांस ...

का गळाले अवसान या करांचे ?
का भासते मलूल फडफडणे या परांचे ?
आल्या अवचित कुठूनी अनाहूत गारा ?
तुला लोळविले भेदुनी तुझा निवारा .....!

दृढ हिकमतीने तू घरटे बांधियेले,
अगम्य कला गुंफुनी अध्धर सांधियेले,
विसरुनी भूकघास, प्राण ओतलास,
वादळात क्षणाच्या झाले सारे खल्लास .....!

गठन-विघटन असे सृष्टीचक्र,
उर्वीही कंपविते होतां दृष्टीवक्र,
उन्मळती तरूही जलप्रलयाने,
रे त्रागा अनाठायी! वियोग आशयाने ......!

सावर विच्छिन्न परं, घायाळ काया,
हो सिद्ध, धरी जिद्द, फिरुनी श्रमाया,
बाधित वेदनांनी, जरी उरं धापे,
साधित काय होई, रुदन विलापे ? ......!

मेघ येती, विरती, पावती लयासी,
वारा, त्या गारा, अस्तल्या निश्चयासी,
न चिरंतन काही, क्षणभंगुर पसारा,
मग व्यर्थ का रे! शोक अंगीकारा ? ......!

रुदन, विलाप असे कायरत्व,
दान, आर्जव दुषित याचकत्व,
सज्ज हो झुंजण्या, करुनी चित्त खंबीर,
विपत्तीशी टक्करतो, तोच खरा वीरं .....!

अनुकंपा, याचना, पसरणे हात,
त्यास म्हणतात मनुजाची जात,
तुम्हा पाखरांची स्वावलंबी पक्षीजात,
स्वसामर्थ्याने करावी अरिष्टावर मात .......!

सरोज तेथे पंक, फ़ूल तेथे काटा,
अवघड दुर्गम्य, होतकरुंच्या वाटा,
पार करुनी जाणे, विपत्ती सावटांना,
अंती जय लाभे, हिकमती चिवटांना ......!

सरसर शर सुटावा, चाप ओढताची,
धक धक उरी धडकी, नाद ऐकताची,
तसे तुझे उडणे, कापीत नभांगणाला,
जणू शूर शोभे, रणांगणाला ......!

पाट पाण्याचे थिरकत तरंग,
वरी विह्नंगावा तोर्‍यात राजहंस,
तसा तुही विहर, घे कवेत दिशांना,
नव्हे धरा रे ! गगन तुझा बिछाना ......!

घे शोध स्वत्व, त्याग आत्मग्लानी,
वाली तुझा तूची, बळ अंगी बाणी,
लाली भोर ल्याली, सरली निशा काळी,
"धडपड" अभय किल्ली, भविष्या उजाळी ......!

घे एकदा भरारी मित्रा,
घे एकदा भरारी......!

. गंगाधर मुटे

गुलमोहर: 

मस्त वीर रसातील कविता.
प्रेरणादायी, खुप आवडली.

तसा तुही विहर, घे कवेत दिशांना,
नव्हे उर्वी रे ! गगन तुझा बिछाना ......!

छान.

चांगली ....थोडी शब्दाळ वाट्ली...
अवांतर : पाखरांवर एक निदा फाझलींचा शेर आहे... तो सहज आठवला..
" फिरकापरस्ती परींदोंमे कहां पायी जाती है....
कभी मंदीरपे जा बैठे...कभी मस्जीदपे...."

Happy Happy Happy

घे एकदा भरारी मित्रा,
घे एकदा भरारी......!

मुटेजी,
अहो ...तुमच्या अशा कविता वाचुन तर माझ्यासारखे अनेक लोक आता भरारी घेतील !
Happy

सहृदय अभिप्रायाबद्दल सर्वांचा आभारी आहे. Happy

अनुजा, आवडली नाही, हरकत नाही. तुमच्या या मताचा मी आदर करतो. पण

<<"कि शब्दकोष शेजारी घेऊन लिहलंत?">> म्हणजे काय?

शब्दकोष शेजारी घेऊन लिहिल्याने पांडित्य येते कवित्व येत नाही.
तसे नसते तर शब्दकोषालाच काव्यसंग्रह म्हणावे लागले असते.

पुन्हा मी ही कविता बारकाईने वाचली आणि आता दाव्याने म्हणु शकतो की या कवितेतला
एकही शब्द निष्कारण आलेला नाही.
एकही शब्द आगाऊ नाही.
एकही शब्द अतिरंजित नाही.

तसेच मलूल आणि अध्धर हे शब्द शब्दकोषात सापडेल किंवा नाही मला शंका आहे.

असो. आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

शब्दकोष घेऊन लिहिल्याने पांडित्य येते कवित्व येत नाही.
तसे नसते तर शब्दकोषालाच काव्यसंग्रह म्हणावे लागले असते

उत्तम उत्तर!