Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.
१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.
यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:
जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.
चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.
***
सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन
तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अलिबाबा, आता फुल इग्नोर करतो
अलिबाबा, आता फुल इग्नोर करतो .
भरत , मान्य तोंडावर पडल्याचे
भरत , मान्य तोंडावर पडल्याचे मान्य करायला लाज वाटत असेल ना ?
@विकु >>> धन्यवाद. या गोष्टी
@विकु >>> धन्यवाद. या गोष्टी खटकतात हे सांगितल्याबद्दल आभार.
@पुरोगामी >> मला तुम्हाला मुद्दा द्यायचा नाही. मी दोन्हीच्या बाजूने नाही. दलित स्त्रियांना फक्त मुस्लीम त्रास देतात हे तुमचे म्हणणे काय आणि दलित अत्याचारात तथाकथित पुरोगामी मौनात जाणे काय हे एकच आहे असे मला वाटते. दोन्हींची ही नुरा कुस्ती आहे. एकमेकांना पूरक असेच मुद्दे उचलले जातात. या मुद्द्यांना अनुकूल अशा घटना घडवल्या जातात.
जोपर्यंत हे परस्परपूरक राजकारण संपत नाही तोपर्यंत या घटना घडत राहणार.
देशापुढचा खरा प्रश्न हिंदुत्ववादी सत्तेत येणार कि सौम्य हिंदुत्ववादी हा नाही. सर्वांना एका पातळीवर आणून देशाच्या प्रगतीत भागीदार बनवणे हा प्रश्न आहे. पण जर तसे सगळे एका पातळीवर आले तर मग त्यांच्यात सुद्धा सत्तेत जाण्याची इच्छा जागृत होईल.
त्यामुळे अशा सर्वांना डोकं वर काढता येऊ नये अशा समस्यांमधे गुंतवून ठेवण्याचे राजकारण हिंदुत्ववादी आणि पुरोगामी दोघेही खेळतात. दंगली हा त्यांच्यासाठी खेळ आहे. दंगलीचे अनेक फायदे या दोघांना होत असतात. यामुळे फूट तर पडतेच पण लोक पोटापाटाण्याचे प्रश्न सोडून जीविताच्या हमीसाठी शरण येतात. अन्यायाने हवालदिल होतात. मात्र अन्याय करणारे कसे योग्य हे दोन्ही पक्ष स्थान, समाजघटक आणि अजेण्ड्यानुसार ठरवत असतात.
असे राजकारण असेपर्यंत मणिपूरची घटना शेवटची ठरणार नाही. त्यामुळंच सोशल मीडीयात चर्चा करणार्यांनी पक्षापलिकडे जाऊन बोलायला पाहीजे. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या पक्षाचे वेठबिगार असल्याप्रमाणे वागायला नको.
दलित स्त्रियांना फक्त मुस्लीम
दलित स्त्रियांना फक्त मुस्लीम त्रास देतात हे तुमचे म्हणणे काय आणि दलित अत्याचारात तथाकथित पुरोगामी मौनात जाणे काय हे एकच आहे असे मला वाटते. >>>>>
दलीत अत्याचारात फक्त मुस्लिम त्रास देतात हा मुद्दा नाही .
दलीत महिलाना सवर्णांनी पण त्रास दिलाय आणि मी त्याचा वेळोवेळी निषेध ही केलाय .
पण दलीत मुलींच्या अत्याचारात मुस्लिम आरोपी असेल तर येथील भरत , भ्रमर , कुकर्नी सहित इतर ढोंगी पुरोगामी गँग पळ काढते ! ( या बाबत असंख्य स्क्रीन शॉट टाकू शकतो ).
जणू काय त्यांनी मुस्लिम आरोपींचे आजन्म संरक्षण करण्याचे व्रत घेतलय.
सवर्ण आरोपी असेल तर यांच्या लेखणी ला धार येते आणि मुस्लिम आरोपी असेल तर यांनी दलाली खाल्लेली असते का ? चार पुरोगाम्यांच्या टोळक्यात स्वतःला अती श्रेष्ठ दाखवण्यासाठी दलीत मुलींच्या मुस्लिम आरोपींकडे हे दुर्लक्ष करतात का ?
फुरोगामी
फुरोगामी
तुम्हाला पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी या मुद्द्यावर उत्तर देतो. जर तुम्हाला मतात फरक करावासा वाटला तर आनंद वाटेल.
सुरूवातीला मलाही हिंदुत्ववादी कळपातले जाणुनबुजून असे सोंग घेतात असे वाटायचे म्हणून त्यांच्याशी वादविवाद करणे मी पूर्णपणे थांबवले होते.
पण एका ऐंशीच्या घरातल्या एका वर्णाने ब्राह्मण असलेल्या एका हिंदुत्ववादी माणसाशी चर्चा करताना त्याची मतं ही एकांगी विचार ठासल्यामुळे झालेली आहेत हे लक्षात आलं. सततच्या चर्चेमुळे त्यांच्यात फरक पडला. तुम्ही आणि मी भेटण्याची सुतराम शक्यता नाही. समोरासमोरच्या चर्चेत मतं बदलतात. इथे ती शक्यता नाही. तरीही प्रयत्न करून बघतो....
दलितांच्या बाबत मुस्लीम आरोपी
दलितांच्या बाबत मुस्लीम आरोपी असेल तर मग लोक गप्प का ? या प्रश्नाचा दुसरा अर्थ ब्राह्मणवादी विचारांच्या लोकांना सुद्धा अत्याचार करू द्या असा आहे. तिकडे गप्प बसता तर मग इथेही गप्प बसा.
आणखीही एक अर्थ आहे कि हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांकडून झाले तर तुटून पडता मग मुस्लीमांच्या बाबतीत गप्प का ? हा प्रश्न पडणे ठीक आहे. या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन.
अत्याचार अनेक कारणांमुळे होतो. क्षणिक राग, बदल्याची भावना, गुंडगिरी, पोलिसात तक्रार करण्याचे भय , राजकारण अशा लाखो घटना रोज घडत असतात ज्यामुळे त्या सामान्य समजल्या जातात. त्या घटना या एका वेळी घडून जातात ज्याचा इतर ठिकाणी परिणाम होत नाही. पण जातीय द्वेष ही घटना अशी आहे जी सामान्य नाही. निव्वळ जातीय द्वेषातून अन्याय होण्यासाठी कुठलेच कारण लागत नाही. कुठली घटना घडलेली असायची गरज नाही. त्यामुळे घटनेच्या मागचा जातीय द्वेष जास्त घातक आहे. याचा अर्थ अन्य घटना सोडून द्या असा होत नाही.
पन जातीय द्वेषामुळे अन्याय होणे आणि त्यात न्याय न मिळणे यामुळे त्या समूहाला असुरक्षित वाटू लागते. आपल्याला इथे न्याय नाही , उद्या आपल्यावर पाळी आली तर न्याय मिळण्याची खात्री नाही ही भावना त्यामागे असते. अशा वेळी संवेदनशील व्यक्ती त्यातले धोके ओळखून मानसिक पाठिंबा द्यायचे काम करतात. देशात राजकारण करणारे मोठे पक्ष नेमक्या या मानसिकतेचा लाभ उचलतात.
मुस्लीमांच्या बाबतीत धार्मिक द्वेषाचे कारण एक वेळ समजू शकते. पण ते जातीय द्वेष कशाला करतील ? त्यामुळे अन्याय झाला त्यामागचे कारण कुठले आहे हे बघितले जाते. ते सामान्य असेल तर त्यात जातीय कोन नसल्याने त्याबाबतच्या घटनांमधे जनमत बनत नाही. तसे बनवायचा प्रयत्न केला तर उलट पीडीतांच्या विरूद्ध जनमत जाऊ शकते.
आरोपी मुस्लीम आहेत म्हणून दलितांवर अत्याचार केला हे पचण्यासारखे नसते. अन्याय झाला त्याचे खरे कारण सापडले आणि पटले तर नक्कीच लोक विरोध करतात. सध्या तरी मुस्लीम लोक भिऊन आहेत. एखादा भडक माथ्याचा असेल त्यालाही इतर लोक आवर घालताना दिसतात हे डोळ्यांना दिसणारे दृश्य आहे.
जे मला सांगायचे ते सांगितले. विश्वास ठेवायचा कि नाही हा तुमचा प्रश्न.
@फुरोगामी
@फुरोगामी
दोन तीन प्रतिसाद वाचले ज्यात तुम्ही माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित दुश्मन का दुश्मन दोस्त होता है हा व्यावहारिक विचार त्यामागे असेल. मी सुद्धा व्यवहार म्हणून एकाच वेळी दोन दोन झगा अंगावर घ्यायला नाही पाहीजेत. पण आयडी जपणे, एखाद्या बाजूशी स्ट्रॅटर्जी म्हणून जुळवून घेणे यापेक्षा माझे जे काही वेडेवाकडे मत असेल ते मांडणे मला श्रेयस्कर वाटते. आयडी उडाला तर उडाला. कुणी नाराज झाला तर झाला.
एकच गोष्ट आहे बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे संघपरिवाराचे लोक मनातला द्वेष लपवून ठेवत नाहीत. त्यांना ज्या घटकांचा द्वेष करायचा आहे ते तो जाहीरपणे करतात. खरेतर तोच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी हे अशा घटकांचे उघड शत्रू आहेत. त्यांना एक्स्पोज करण्यात एनर्जी खर्ची पाडण्यात काय पॉईंट दिसत नाही.
पण या समूहांची बाजू घ्हेण्याचे ढोंग जे करतात ते ढोंग उघड करणे हे जास्त गरजेचे आहे. याचा अर्थ हिंदुत्ववाद्यांच्या भूमिकेला समर्थन असा काढू नये. धन्यवाद.
सामना +१००००.
सामना +१००००.
Submitted by सामना on 29 July
Submitted by सामना on 29 July, 2023 - 11:44>> योग्य विश्लेषण.
कॉमी, मानव पृथ्वीकर
कॉमी, मानव पृथ्वीकर
आभारी आहे.
सामना तुमचे मत योग्य आहे.
सामना तुमचे मत अगदी योग्य आहे.
+111
सामना, स्पष्ट आणि रोखठोक.
सामना, स्पष्ट आणि रोखठोक. पटण्याजोगेही.
सामना, उत्तम।पोस्ट
सामना, उत्तम।पोस्ट
https://www.ifp.co.in/manipur
https://www.ifp.co.in/manipur/public-rally-calls-for-stopping-arrests-in...
वाह!
मणिपूर बाकी राज्य न सारखे
मणिपूर बाकी राज्य न सारखे नाही असे वाटते..
आज च बातमी वाचली कुकी महिला भारतीय सुरक्षा दलांना त्यांच्या भागात प्रवेश करून देत नाहीत.
सुरक्षा दलाच्या दहा गाड्या त्यांनी आडवल्या
सरकार नी बळाचा वापर केला की आमच्यावर अन्याय झाला म्हणून बोंब मारायला मोकळे.
त्यांच्या वर दुसऱ्या जमावाने हल्ला केला की सरकार बघा काहीच करत नाही असे म्हणायला मोकळे..
Same तसेच ते maiti पण आहेत
सरकार नी योग्य तो (Afsa सारखा)कायदा त्या राज्यात लागू करून बळाचा पूर्ण वापर करण्याचा अधिकार सुरक्षा दलना देणे हाच योग्य मार्ग आहे.
तर च तिथे शांतता राहील
आज च बातमी वाचली कुकी महिला
आज च बातमी वाचली कुकी महिला भारतीय सुरक्षा दलांना त्यांच्या भागात प्रवेश करून देत नाहीत. >>> हे कदाचित त्यांचे तयार झालेले डिफेन्स मेकॅनिझम असू शकते... सुरक्षा दलांनी जर तेथील शस्र सज्ज बंडखोरांना ताब्यात घेतले तर मग विरोधी गटाच्या हल्ल्यातून आपला (महीलांचा) बचाव शेवटपर्यंत कोण करणार ही मानसिकताही त्या मागे असू शकते. ग्राउंड झिरो वर कदाचित दोन्ही गटांना सुरक्षादलांच्या कारवायां नंतर असा कटू अनुभव आला असण्याची शक्यता नाकाता येत नाही...गेल्या तीन महिन्यांत तिथे कोणत्या प्रकारचे अराजक घडून गेले असेल याची आपण इथे बसून कल्पना करु शकत नाही...पुर्ण तथ्ये आजून बाहेर यायची आहेत, अशा वेळी त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणच्या महीला मुलांची सुरक्षा ही कोणत्याही पक्षपाताशीवाय आणि कोणत्याही परिस्थितीत केली जाईल याची हमी दिली जायला हवी...आणि त्याच्या अंमलबजावणीचे दाखलेही त्वरित दिले जायला हवेत....तरच त्यांच्या वर्तणूकीत आणि दृष्टीकोनात फरक पडू शकेल.
हेमंत - नक्की कुठल्या
हेमंत - नक्की कुठल्या संदर्भात कुकींबद्दलची बातमी आली आहे हे माहित नाही.
कुकींबाबत अशी खोटी बातमी पेरली नसेल कशावरुन? दंगली/ भांडणे यांचे मुळ खोट्या बातम्या पसरविण्यापासून सुरवात होते.
महिलांची परेड झाल्यानंतर ७५ दिवस त्या संबंधांतली बातमी प्रसार माध्यमांपासून आणि जनतेपासून लपवून ठेवली होती. प्रत्यक्ष घटना घडतांना मणिपूर पोलिसांची हजेरी होती असे पिडिताचे म्हणणे आहे. अशा अनेक (शेकडो) केसेस झालेल्या आहेत असे तिथले मुख्यमंत्रीच म्हणतात.
AFSPA - दुधारी शस्त्र आहे. पोलिस लोक निष्पक्षपातीपणे काम करतातच असे नाही... दिल्ली २०२० दंगलीतले व्हिडिओ उपलब्द आहेत. पोलिसच CCTV कॅमेरे फोडत आहेत. दुसर्या एका वेगळ्या घटनेत ( उ प्र ) रस्त्यावर कर्फ्यु सारखी परिस्थिती आहे आणि काही पोलिस हातातल्या दंडुक्यांनी दोन्ही बाजूला पार्क केलेल्या गाड्या फोडत आहेत. रस्त्यावर पोलिसांव्यतिरिक्त कुणी नाही. एका समुहाने हे असे नुकसान केले आहे हे दाखवायला/ सांगायला नंतर आय टी सेल आहेच.
नुकत्याच ताज्या घटनेत, नागालँड मधे सुरक्षा दलाने १४ -१६ लोकांना ( civilians) मारले होते. काही दशकांपूर्वी, उ प्र मधे PAC च्या जवानांनी ४० -५० निरपराध्यांना/ निशस्त्र लोकांना मारले होते ( हशीमपूरा २२ मे १९८७ गुगला ).
बिल क्लिंटन यांच्या भारत दौर्याच्या आधी ३५ शिखांची हत्या झाली ( २० मार्च २००० ). कुणी केली ?
बळाचा वापर फार कमी काळासाठी ठिक आहे. दिर्घकाळ शांतता हवी असेल तर दोन समाजामधल्या संवादा शिवाय पर्याय नाही.
मलाही त्या कुकीज बायकांनी
मलाही त्या कुकीज बायकांनी रस्ता अडवल्याचा बातमी खोटी च वाटते .
गेले तीन महिने फक्त मैतई च दादागिरी , गुंडगिरी , दंगल खोर असल्याच्या येथील बुद्धिवंत तज्ञाशी सहमत .
माजी लष्कर प्रमुखांनी तर कुकीज कडे असलेल्या चिनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वरून तर मणिपूर चिघळवण्यात चीन चा हात दिसत असल्याचे सांगितले .
बहुतेक नरवणे ना दोभाल ची जागा घ्यायची असेल.
सगळ्या आघाड्यांवर भाजप सरकार फेल गेलेली असताना नरवणे भाजप ची बाजू घेतात तरी भारतील तमाम हुश्शार विचार वांत शांत कसे हा प्रश्न मला पडलाच आहे .
बहुतेक भारतातील विचार वांतचे टेन्शन कमी करण्यासाठी दयाळू चीन ने त्या रायफल्स दिल्या असतील अशी ही शक्यता आहे .
चीनला दयाळू सरकारने मणिपूरमधे
चीनला दयाळू सरकारने मणिपूरमधे रायफली वाटण्याचा परवाना दिलेला असेल.
देशी जेम्स बाँड अजित दोभाल
देशी जेम्स बाँड अजित दोभाल दिसले नाहीत बर्याच दिवसांत. चीनला गेलेत की युक्रेनला?
वेष बदलून मणिपूर मध्ये फिरत
वेष बदलून मणिपूर मध्ये फिरत असावेत
https://thefrontiermanipur
https://thefrontiermanipur.com/exclusive-aussie-accused-of-drug-peddling...
Dr Reza Borhani (50), an Australian, was arrested with Rs 1.8 crore worth of LSD popularly known as Acid, a psychedelic drug in suburban Bandra on November 24, 2019. He had a meeting with N Biren Singh in the latter’s office chamber on September 17, 2019.
हे आणि काय आता?
मणिपुरी महिलांनी आर्मीविरूद्ध
मणिपुरी महिलांनी आर्मीविरूद्ध निदर्शेने केल्याच्या बातम्या अनेक वर्षे अधूनमधून येत आहेत. २००४ मधेही मोठे आंदोलन झाले होते. पण त्याचा मैतेई-कुकी या सध्याच्या वादाशी नक्की संबंध आहे का ही माहिती नाही.
मणिपुरी महिलांनी आर्मीविरूद्ध
मणिपुरी महिलांनी आर्मीविरूद्ध निदर्शेने केल्याच्या बातम्या अनेक वर्षे अधूनमधून येत आहेत## ती AFSPA च्या विरोधात होती. ईरोम शर्मिला चे नाव ऐकले असेलच
२००४ मधल्या आंदोलनाबद्दल मी
२००४ मधल्या आंदोलनाबद्दल मी आधी लिहिलंय / लिंक दिली आहे. आसाम रायफल्सने एका महिलेला चौकशीच्या नावाखाली उचललं आणि नंतर तिचा मृतदेह वाईट स्थितीत मिळाला. तेव्हा मदर्स ऑफ मणिपूर ( मूळ नाव मणिपुरी भाषेत आहे) या मैतेई स्त्रियांच्या गटातील स्त्रियांनी विवस्त्र होऊन आंदोलन केलं होतं.
आता याच संघटनेतल्या स्त्रियांनी कुकी बायकांना धरून मैतेई पुरुषांच्या हवाली केल्याच्या बातम्या आहेत.
मणिपुरी स्त्रिया विविध आंदोलनांत पुढे असतात हे खरं आहे.
स्त्रियांचे आंदोलन खरेतर
स्त्रियांचे आंदोलन खरेतर रिलेव्हंत नाहीये. पण ट्विटर भाजप आयटी सेलचे काही अत्यंत विकृत लोक "कुकी महिला सैन्यासमोर विवस्त्र होतात, कुकी आतंकवादी महिलांचा असा वापर करतात" असे संपूर्ण खोटे नाटे पसरवत होते, झालेल्या घटना जस्तीफाय करण्यासाठी.
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे चीन बद्दलचे वक्तव्य बघितले.
दोन महिलांची सार्वजनिक रित्या नग्न परेड ( त्या पैकी एका महिलेच्या भावाला तसेच वडिलांना त्याच दिवशी मारले) काढणे आणि घटना घडल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने ७५ दिवस काहीच हालचाली न करण्याचे रहस्य अनाकलनीय वर्तन आहे. एव्हढा मोठा गुन्हा झाल्यावरही मौन बाळगणे हे चीनच्या दबावामुळे होते का?
बर्याच बातम्या बनावट आहेत.
बर्याच बातम्या बनावट आहेत. चीनने रायफल्स वाटण्याचा संबंधच येत नाही. असे होत असेल तर आपले लष्कर, गुप्तचर संघटना, केंद्र सरकार काय करत होते असा प्रश्न उभा राहील.
रायफल्स खरेच असतील तर त्या आसाम रायफल्स मधल्या बोडो आदिवासींकडून कुकींना स्वसंरक्षणार्थ दिल्या असण्याची शक्यता आहे. बोडो आदिवासी नाराज आहेत.
सुरक्षा दलांना प्रवेश च दिला
सुरक्षा दलांना प्रवेश च दिला नाही .
देशातील कायद्याचा फायदा घेवून स्त्रिया ना सुरक्षा दला ना कारवाई पासून रोखण्याची निती असेल .
तेथील लोकांची .
तर सरकार नी कारवाई kashi करायची .
त्या साठी खास कायदा च लागू करावा लागेल .
जो कायदा सुरक्षा dalana पूर्ण कायदेशीर संरक्षण देवून बला चा वापर करण्याचा पूर्ण अधिकार देतो.
पण सुरक्षा दलांवर पण आरोप केले जातात.
देशात हा प्रकार फक्त काहीच राज्यात होती.
एक काश्मीर आणि हे आता मणिपूर.
काही मोजकीच राज्य सोडली तर .
केंद्रीय सुरक्षा दलांनी अत्याचार केला असे भारतातील एका पण राज्याने आरोप केला नाही
आज पर्यंत कोणत्याच पक्षाचा केंद्र सरकार नी केंद्रीय सुरक्षा दलांना माणसे मरण्याची,बायकांवर अत्याचार करण्याची खुली सुट कोणत्याच राज्यात दिली नाही
आणि तसा आरोप पण कोणत्याच राज्याने केला नाही.
काही मोजकीच दोन तीन राज्य सोडली तर
पण ट्विटर भाजप आयटी सेलचे
पण ट्विटर भाजप आयटी सेलचे काही अत्यंत विकृत लोक "कुकी महिला सैन्यासमोर विवस्त्र होतात, कुकी आतंकवादी महिलांचा असा वापर करतात" असे संपूर्ण खोटे नाटे पसरवत होते >>> एक उत्तर प्रदेशातील जुना व्हिडीओ परसत होता मणिपूरचा म्हणून. लोकही व्हॉट्सॅप पाहताना बिनडोक होतात. डोके मोबाईल बाहेर ठेवून या क्लिप्स बघून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढतात. जराही शहानिशा करत नाहीत.
Pages