मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अद्याप 'बाईपण भारी देवा' बघितला नाही, पण बहिणींमधले शीतयुद्ध व वाद प्रत्यक्षात बघितले आहे. माझ्या आईला एक थोरली (जी नुकतीच गेली, जिच्यावर मी मायबोलीवर लेख लिहिला होता) व दोन धाकट्या, अश्या एकूण ४ बहिणी आहेत. तर तरीही त्यांच्यात सर्रास दोन गट होती. पहिल्या गटात माझी मोठी आई (थोरली मावशी), व आई तर दुसऱ्या गटात धाकट्या दोन मावश्या होत्या. आश्चर्य म्हणजे एका गटातल्या दोघींचेही आपापसांत पटत नसे. थोरल्या दोघी जरा श्रीमंत घरी असून त्यांना माझ्या आजीआजोबांकडून जास्त अटेंशन भेटते असे माझ्या धाकट्या मावश्यांना वाटत असे. भाऊबीज, आहेर, व मानमरातबाहून शीतयुद्ध चालत असे. त्यात माझी मोठीआई व आई दोघीही मितभाषी व निर्मोही, त्यामुळे त्या सगळं सोडून देत असे. पण धाकट्या दोघींनी जरा कांगावा केला तर माझी आई अधिकार गाजवायलाही मागे पुढे बघत नसे. तर थोरली प्रत्येक वेळी समंजस भूमिका घेत सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करे पण तीच बळीचा बकरा बनत असे. मात्र हळूहळू माझ्या आईने त्यांच्यातून अंग काढून घेतले आणि अलिप्तपणे वागायला सुरुवात केली. अजूनही चौघींत (आता तिघींत) हवा तेवढा संवाद नाही, जेवढ्यास तेवढेच वागणे आहे. मी तटस्थपणे विचार करत असतांना मला माझ्या धाकट्या दोन्ही मावश्यांची चिडचिड समजते, कारण त्यांच्यावर तसा अन्याय झाला आहे. कारण माझ्या आजीआजोबांनी थोरल्या दोघी व मामा (एकच मामा आहे) ह्यांच्याकडे जेवढे लक्ष पुरवले तेवढेच धाकट्या दोघींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच कदाचित त्यांना ओरबाडण्यात आनंद वाटत असावा. उदा. माझी आजी गेली तेव्हा तिच्या जवळ असलेल्या तिसऱ्या मावशीकडे आजीचे सगळे स्त्रीधन होते. आजीचे संपूर्ण विधी झाल्यावर एके दिवशी चौघीही बहिणी बसल्या असतांना तिसऱ्या मावशीने स्त्रीधनातुन जास्त किमतीचे दागिने स्वतःजवळ ठेवून इतर बाहेर काढले आणि त्यातली अत्यंत हलक्या वजनाचे दागिने थोरल्या मावशीला व माझ्या आईला तुम्ही श्रीमंत आहेत, तुम्ही काय गरज आहे म्हणून दिले. त्यात परत थोरल्या मावशीला सद्गुणांचा पुळका आला, आणि ती व तिच्या वतीने माझी आई काहीही घेणार नसल्याचे आणि धाकट्या दोघींतच वाटणी करा असे घोषित केले. मात्र माझ्या आईला स्वतः घ्यायचे नसले तरी आपला हक्क घ्यायचा होता आणि तो माझ्या मामीला द्यायचा होता; कारण आजीची अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझी आई व मावश्या ह्यापैकी कुणीही करू शकणार नाही एवढी मामीने सुश्रुषा केली होती. ती आजीला एका सेकंदासाठीही नजरेआड करत नसे. ह्या स्त्रीधनाच्या वाटणीमुळे आईला माझ्या थोरल्या मावशीचा प्रचंड राग आला होता पण तिचा मान ठेवायला ती काहीही बोलली नव्हती.

तर काय? बहिणीं (भावा) मध्येही बाईपण भारी देवा सारखं चालत.

अगदी अगदी राहुल. प्रत्यक्षात पाहीलेल्या केसेस आहेत. म्हणुन रीलेट होत गेले काही सीन्स.
काही बहि‍णी स्थूल दिसतात ते खरंय.. रोहिणी तर दिपा/सुचित्रा ची आई म्हणुनही खपून जाईल बहुतेक.
वंदना गुप्ते च्या साड्या हायलाईट आहेत वॉर्डरोब चा!
मुळ मंगळागौरी साठी अजून मेहनत घ्यायला हवी होती विशेशतः जरा बारीक वाल्या बहिणींनी! पण असो.
मंगळागौर प्रसंगी पहिला राउंड & वाइल्ड कार्ड एन्ट्री दोन्ही वेळचा कपडेपट भारी. तशा ब्लाउजेस ची फॅशन नक्की येणार!

रावरंभा हा एक मुव्ही आहे आणि तो कुणी ही बघू नये इतका बकवास बनवलेला आहे...
शंतनू मोघे - महाराज ( मोघेना पैसे कमी मिळाले असल्यासारखे पाट्या टाकत काम केलेय )
हिरो - कोण आहे माहीत नाही... प्रतापराव गुजर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात मधील रावजी हे पात्र आहे. दिसायला अति सामान्य आणि त्या पेक्षा सामान्य त्याचा अभिनय.
रंभा - रावजी ची गर्लफ्रेंड. हिला का घेतली ते त्यांचं त्यांनाच ठाऊक.
प्रतापराव गुजर - लक्ष सिरीयल मधले इन्स्पेक्टर. त्यांनी खूप प्रयत्न केलाय पण बिचार्यांनी एकट्याने प्रयत्न करून काय होणार...
संतोष जुवेकर - फितूर आणि व्हिलन.।
कुशल बद्रिके - मुघल. क्रूर वगैरे दिसायचा फक्त प्रयत्न केलाय , प्रत्यक्षात मात्र काहीतरी जोक च करेल आता पटकन असं वाटत राहते.
बहलोल खान - बरा वाटला कोण ऍक्टर आहे माहीत नाही...
शेवटला तर या 7 जणांच्या कबरी की तत्सम काही दाखवले हे बघून माझा च बांध फुटलेला...

इतकी महत्वाची घटना प्रतापराव गुजर आणि बहलोल खान..... पण डिरेक्टर ला माती च खायची होती....

हिरो ओम भूतकर मुळशी पॅटर्न मध्ये होता
हिरोईन मोनालिसा बागल बहुतेक
मी पाहिला नाही
घरच्यांनी लावला होता
प्रतापराव अशोक समर्थ

सध्याच्या मराठी ऐतिहासिक चित्रपटांच्या नादाला लागूच नये. जुने उपलब्ध आहेत.
+१ रंगीत कॅमेरे, भरपूर बजेट , व्हीएफएक्स वगैरे काहीही न वापरता भालजींनी व सहकार्‍यांनी उत्कृष्ट सिनेमे बनवले आहेत.

सध्याच्या मराठी ऐतिहासिक चित्रपटांच्या नादाला लागूच नये. जुने उपलब्ध आहेत. >>>
अगदी अगदी . मी मागेही ईथे उल्लेख केला होता . पावनखिन्ड सिनेमा पाहून आलो आणि नंतर लेकाला युट्युबवर जुन्या चित्रपटाची क्लिप दाखवली . बाजी प्रभू त्वेषाने लढले म्हणजे काय ते दाखवायला . Happy

हे सगळे चित्रपट युट्युबवरच आहेत का ? कधी कधी क्वालीटी खराब असते .
मला आवडतात सगळे सूर्यकांत/चन्द्रकांतवाले सिनेमे .
लेकाला दाखवायचे आहेत .

मला जुने मुव्ही आवडतात आणि नवीन ही. कारण इतिहास लहान मुलांपर्यंत नवीन पिक्चर दाखवून च पोहोचवता येतोय. जुने मुव्ही माझी तरी मुलगी बघायला उत्सुक नसते.
नवीन पिक्चर बघून ती मला प्रश्न विचारते आणि मग मला त्यावर एक्सप्लेन करणं सोपं जातं. निदान त्या निमित्ताने तरी शिवाजी महाराजांबद्दल अभिमान निर्माण होतोय ही मोठी गोष्ट आहे.....
बाकी चित्रपट बरे तरी आहेत. पण रावरंभा अगदीच बोगस.

मिडीयम स्पाईसी बघितला प्राईमवर. काही झेपला नाही. आवडते कलाकार आहेत म्हणून बघितला. सागर देशमुख नक्की कुठल्या प्रदेशातला आहे ते कळलंच नाही. सई छान दिसलीये कुरळ्या केसांमध्ये. ती पुरुष डब्यातून प्रवास करते ते तर अजिबात झेपलं नाही. गर्दी नसताना एकवेळ समजू शकतो पण भर गर्दीत पुरुष डब्यात... अरेरे. स्पृहा जोशी जास्त नव्हती ते एक बरं झालं. बांद्रा सुरेख दाखवलं आहे. नेहा जोशी आवडते. शेवटची आत्याची भेट छान वाटली. एकंदरीत बरा आहे.

स्पृहा जोशी नाही पर्ण पेठे बहुतेक.
मला सई चे दिसणे सोडून काहीही झेपलं नाही(माझा आयडी हॅक झालेला नाही Happy )
एकंदर कहना क्या चाहते हो झालं.पण इंटरनेटवर बऱ्याच जणांना खूप आवडलाय.

स्पृहा जोशी आहे सुरुवातीला, त्या पार्टीत, कृष्णा नाव आहे तिचं. लग्न झालेलं असतं तिचं. ललित सांगतो ना तिच्याबद्दल की प्रेम आहे की नाही हे कळायच्या आधीच ती निघून गेली होती. पर्णलाही लग्नाची किती घाई होते आणि ती त्याला विचारू शकत होतीच की. सई त्याला थोबाडीत का मारते. ते संवाद मला नीट कळलेच नाहीत. एकंदरीत लोक एकमेकांशी काही स्पष्ट बोलतच नाहीत. गाळलेल्या जागा भरायच्या का. नीना कुलकर्णीला नणंद का आवडत नसते. ललित आणि पाऊस प्रेक्षणीय. बाकी डोक्यावरून गेला चित्रपट.

नीना कुलकर्णीला नणंद का आवडत नसते>>>> नणंदेने जातीबाहेर लग्न केलेलं असतं घरातून पळून जाऊन बहुधा. त्यामुळे तिला एकदम बोल्ड वगैरे समजतात सगळे आणि अटेंशन मिळत असतं भावाचं (म्हणजे नीनाच्या नवर्‍याचं, मुलांचं) म्हणून हिला जेलसी असते की मी सगळं करूनही मला कोण विचारतंय टाईप्स.

महाबोअर आहे तो सिनेमा. नणंदेने मुसलमानाशी लग्न केलेलं असतं घरच्यांच्या विरोधाला न जुमानता, पण नीना कुलकर्णीने ते असं धरून बसणं काही पटलं नाही. तिला काही त्याची डायरेक्ट झळ बसलेली दिसली नाही - मुलीचं लग्न न जमणं किंवा तत्सम.
काय ते येडपट प्रेम आणि लग्न आणि 'करू की नको'चे घोळ!
Proud

लग्न नाही करत नणंद, अशीच रहात असते लिवइन मध्ये. हुशार असते पण ती. तिने लिहिलेल्या पुस्तकाच्या विषयावरून वाटलं तसं. ललित बहुतेक तिच्यावरून प्रभावित होतो आणि तोही लिव इनचा पर्याय स्विकारतो, कारण तो म्हणतो ना की धक्के द्यायला मलाही आवडायला लागलंय (माझा एक तर्क) Biggrin

ओपनहायमर च्या यशाने मराठीत सुद्धा असा सिनेमा यावा असे वाटू लागले आहे. जयंत नारळीकर, वसंत गोवारीकर, अनिल काकोडकर किंवा विजय भटकरांवर सिनेमा निघायला हवा. बायोपिक म्हटल्यावर सुभा फिक्स आहे. ओपनहायमर इतक नाही पण बजेट चांगल हवं तर झी स्टुडीओची निर्मिती गरजेची आहे. त्यामुळे अजय अ तुल पण फिक्स. त्यांचं संगीत असेल तर शास्त्रज्ञाचे प्रेम प्रसंग, गाणी पण फिक्स. बहरला हा मधुमास प्रमाणे हनुवटीला मुठी लावलेल्या सिग्नेचर डान्स स्टेप प्रमाणे कमरेवर हात ठेवून लटके झटके वाली एखादी स्टेप व्हायरल झाली तर पिक्चर चालणार यात काही शंका नाही. त्यासाठी शास्त्रज्ञ अभ्यास करत असताना शेजारच्या वाड्यातली गंगी येऊन डान्स करून त्याला त्रास देते असं गाणं टाकायला लागेल.

नंतर तर त्या ठेक्यावर त्याला ई इक्वल टू एम सी स्क्वेअर हे दिसायला लागतं आणि शेवटी भाषणात माझ्या यशाचे श्रेय गंगीला आहे असे शास्त्रज्ञ बोलून जातो. घरी आल्यावर मग बायको हजेरी घेते असा कौटुंबिक प्रसंग टाकता येईल. त्यामुळे शास्त्रीय विषयाच्या सिनेमात फॅमिली ड्रामा कसा आणला यावर केस स्टडी देखील होईल. शेवटी बायकोची समजून काढताना एखादे गाणे. शोध लावताना अपयश आल्यावर अजयच्या आवाजातले टिपेला आवाज लावून " खेळ मांडला" प्रमाणे जीवघेणे गाणे.

बस बस बस.... सिनेमा आकार घ्यायला लागला. नोलन सुद्धा डोकं आपटून घेईल कि मला हे आधीच का सुचले नाही ?

Submitted by रघू आचार्य on 22 July, 2023 - 07:48

Lol Lol

बापरे Happy
कल्पना करून चक्कर आली (मला दाढी करून आणि निळे लेन्स लावून ललित प्रभाकर चालेल ओपेनहायमर म्हणून.आता ललित च्या त्वचेवर निळे डोळे म्हणजे घाबरायचं की वा म्हणायचं हे ज्याने त्याने स्वतःचं ठरवावं.)

मी अनु Lol , मीरा Happy

च्रप्स, किती दिवसात आयडी उडवणार ते कळवून टाका Lol

Lol आचार्य, मराठी विनोदी शोज मध्ये एपिसोड बनवा यावर.
हास्यजत्रा की हवा येऊ द्या कोणते सुरू आहेत सध्या?

Lol , कुणी ग्रे शेड रंगवणारा रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर घाला, बाकी गोट्या तर सगळीकडे सारख्याच .
सिनेमा बघितलेल्यांना गोट्यांचा संदर्भ समजेल.

मीरा, अनु, हपा, सायो, मैत्रेयी, मानव, अस्मिता. , सुनिधी आभार सर्वांचे. Happy

बहुचर्चित' वाळवी ' युट्युबवर पाहिला, मुव्हि चान्गला आहे पण मला ओव्हर हाइप्ड वाटला पण ब्लॅक कॉमेडी म्हणतायत तसा काही वाटला नाही'स्क्रिनवर मुडदे पडतायत आणी आपण हसतोय' या अर्थाच्या कॉमेन्ट वाचल्या होत्या पण मला त्यात काहिच कॉमेडी वाटली नाही...
लो बजेट मधे बरा मुव्हि काढला आहे इतकच.... जरा अजुन चान्गले सवान्द, धक्कातन्त्र वापरुन कॉमेडी करता आला असता.अनिता दाते सायकोच्या भुमिकेत फिट आहे, जाड्या स्वप्निलला खिडकितुन आत घ्यायच म्हणजे खिडकी कस्टममेडच करावि लागली असणार..नम्र्ता सभेराव हास्यजत्रेच्या सेटवरुन थेट येवुन गाडित बसली असावी... ती मेल्यावर कलकलाट थान्बला म्हणून आपल्यालाच बर वाटत.
स्वजो त्याच्या वयाला आणी आकारमानाला शोभतिल अशा भुमिका करतोय बघुन बर वाटल, सुभाने नॉर्मलच रोल करावे...शेवट चान्गला केलाय.
शिवानी सुर्वेच कौतुक सहज आणी चान्गल काम करते तिला अजुन चान्गले रोल मिळायला हरकत नाही, अभिनयक्षमता ,लुक्स आहे तिच्यात.

बहुचर्चित' वाळवी ' युट्युबवर पाहिला -.-.-.-.-. लिंक द्याल का प्लिज. मला सापडला नाही. नाव वाळवी आहे पण ओपन केली यु ट्यूब लिंक की वेगळाच मुव्ही आहे.

Pages