⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️ भाग 6

Submitted by मधुरा कुलकर्णी on 7 May, 2023 - 23:50

भाग पोस्ट करायला झालेल्या विलंबाबाबत मनापासून सॉरी....
मी लेक्टरर आहे आणि स्टूडेंट च्या एक्झामस सुरू आहेत त्यामुळं टाइप करायला वेळ मिळत नसल्यामुळे भाग पोस्ट करायला वेळ होतोय... पुढचा भाग मी रविवारी पोस्ट करेन...

भाग १
https://www.maayboli.com/node/83282

भाग २
https://www.maayboli.com/node/83302

भाग ३
https://www.maayboli.com/node/83312

भाग ४
https://www.maayboli.com/node/83323

भाग ५
https://www.maayboli.com/node/83368

प्रकरण ६ : वन स्टेप ऍट अ टाईम

"अरे... दिक्षा, तू काय रडली वैगेरे आहेस का? डोळे बघ कसले लाल झालेत? ये इथे, बसं.. पाणी घे जरा."
आस्था काळजीने दिक्षाची विचारपूस करत बोलली.

सकाळी सुमेर सोबत बोलणं झाल्यावर दीक्षा आस्था सोबत बोलण्यासाठी तिला कॉल केला होता. आणि ती आज सुट्टी घेणार आहे हे कळल्यावर तिला स्वतःच्या घरी येऊ शकते का विचारल्यावर आस्थाने एका पायावर तयार होत येण्यास लगेच होकार दिला. ती जेंव्हा घरी आली तेंव्हा सुमेर ने दरवाजा उघडत आस्थाला आत घेतले आणि दोघींना बोलण्यासाठी व्यवस्थित एकांत आणि स्पेस मिळावी म्हणून, 'मी जरा बाहेर जाऊन येतो', असं पुटपुटत ताबडतोब काढता पाय घेतला.

पण आस्था आत आल्या आल्या हॉलमध्ये बसलेल्या दीक्षाकडे, तिच्या थोडया लालसर झालेल्या डोळ्यांकडे बघून आस्था लगेच काळजीने विचारपूस करताना पाहून आपण तिला सर्व आपल्याला माहित असलेले सत्य सांगण्याचा निर्णय योग्यच आहे याची तिला खात्री वाटली. इकडे आस्था आपल्या मैत्रिणीला रडवेली झालेली पाहून रेस्टलेस झाली होती.

"आणि सुमेर भाई असा मला बघून लगेच बाहेर का गेला? काय झालंय सांगशील का मला?" थोडं तणतणतच किचन कडे जात सिंक मध्ये पाण्याचा ग्लास विसळत तो तिथेच ऍटॅच केलेल्या फिल्टर मधून स्वच्छ पाणी भरत दीक्षा कडे येऊन तिच्या हातात ग्लास दिला.

"आता पटापट बोलायचं हा.. कालच तुला बोलणार होते पण तू ॲब्रप्टलि फोन कट केलास.. आज जर तू बोलावलं नसतसं तरी मी आज इकडे येण्यासाठीच सुट्टी काढली होती. फोन वरून माझी तब्येत बिघडली आहे त्यामुळं मी येत नाहीय असा त्या शेट्टी ला कॉल करून डच्चू देऊन इकडे आलेय मी... आणि मी कोणतीही थातुर मातुर कारणं ऐकूनही घेणार नाहीय आणि तू सांगूही नकोस.." अगदी हातवारे करत, बोटं नाचवत आस्था ची बुलेट ट्रेन सुटली होती.

"काय पोरगी आहेस... माझ्याच घरी येऊन मलाच बसायला सांगून पाणी आणून देतेस.. मी तुझी खातिरदरी करायची का तू??" तोंड वेंगडत थोडं हलकं फुलकं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत दीक्षा बोलली.

"तू तर गप्पच बसं हा... मी काय पाहुणी नाहीय.. माझ्याच घरी आलिये मी... तुझी परमिशन का म्हणून घेऊ?" नाक उडवत आस्था म्हणाली तशी दीक्षा खळखळून हसायला लागली.

"आता टोलवाटोलवी खूप झाली, काय विषय आहे बोलं पट्कन.. " आस्था दिक्षाकडे रोखून बघत म्हणाली. दिक्षा सरसावून बसली आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली.

"तू मला काल विचारलं होतंस की मी एवढी पॅरानॉइड बेहेव्ह का करतेय... आणि म्हणून मी तुला घरीच बोलावून घेतले सो दॅट, मला तुला सगळं सांगता येईल."

"इस इट टू डिफीकल्ट टु शेअर?" आस्था तिच्या चेहऱ्यावरचा भावनांचा कल्लोळ वाचत तिला प्रश्न केला.

"होय खरं तर... पण जर खरचं काय झालं आणि कसं झालं याचा शोध घ्यायचा असेल तर मला मदत घ्यावीच लागणार आहे.. आणि मी तुझ्यावर विश्वास ठेऊन मला जे माहित आहे ते सांगण्यासाठी बोलावलंय."

"नक्किच माझ्यावर विश्वास ठेऊ शकतेस तू... सांग मला मी तुला माझ्याकडुन जे काही मदत शक्य आहे ती नक्की करेन."

"आय नो दॅट... " एक घोटभर पाणी पिऊन सुकलेला घसा ओलावत तिने स्वतःचे बोलणे सुरू ठेवले. "खर तर या सगळ्याची सुरुवात जवळपास १० - १२ वर्षांपुर्वी झाली होती. माझे बाबा, दीनानाथ कर्वे, ते सुद्धा ABC news मध्येच काम करत होते. आणि आता जसे मर्डरस् होतायत तेंव्हा सुद्धा तश्याच मर्डर केसेस होतं होत्या. आणि तेंव्हा इन्सपे. अनिरुद्ध अभ्यंकर यांच्या हातात ही केस होती....." स्वतःच्याच ट्रान्स दीक्षा बोलत होती आणि आपल्या वडिलांचे नाव असे अचानक ऐकून आस्था एकदम ताठ झाली.

दिक्षाच बोलणं मधुनच तोडत, अगदी हलक्या आवाजात कुजबुजत तिने प्रश्न केला, "माझे बाबा? तू त्यांना ओळखतेस? आणि तुझ्या वडिलांचा आणि माझ्या वडिलांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता का? कारण तू ज्या टाईम पिरियड चा उल्लेख करतेयस त्याचं दरम्यान माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. तेंव्हा ते हाई प्रोफाइल केस हॅण्डल करत होते... एवेर सिन्स, ही'ज् पॅरालाइज्ड..." गालावर वडिलांच्या अश्या अवस्थेला आठवून नकळत ओघळलेला अश्रू पुसत तिने प्रश्न केला. आणि दीक्षाने चमकून आस्था कडे पाहिले. आणि तिच्या डोळयात किंचित रागाची छटा उमटली.

"कदाचित मला जेवढं माहित आहे तेवढं सगळं सांगून झाल्यावर, तू तुला जे जे त्या केस बद्दल माहित आहे ते सगळं सांग, आय थिंक अवर पास्ट गोज वे बॅक दॅन जस्ट अवर फ्रेंडशिप नाऊ..." थोड्याशा दुखावलेल्या आवाजात दीक्षा ने आस्था ला प्रतिसाद केला.

आणि दीक्षाच्या आवाजातला बदल टिपत आस्था थोडी अस्वस्थ झाली. सोफ्यावर बसल्या बसल्या थोडी चुळबुळ करत तिने नकळत होकारार्थी मान हलवली. "मला सगळी डिटेल मध्ये माहिती नाहीय, पण दादाला सगळे इन्स अँड आऊटस् माहित आहेत... तुझ बोलण झाल्यावर आपण त्याच्याकडे जाऊ हवं तर.."

अचानक धक्कादायक बातमी कळल्याने दिक्षाची मनस्थिती सैरभैर व्हावी अशी अवस्था झाली. तरी स्वतःला स्थिर करून दिर्घ श्वास घेतला आणि मान थोडी झटकून बोलायला सुरुवात केली.

"तर, मी कुठं होते...., हा...,  माझे बाबा, जे ABC news मध्येच काम करत होते. आणि आता सेम मर्डरस् केसेस होतं होत्या. आणि तेंव्हा तुझ्या बाबांच्या हातात ही केस होती.,
मी एक गोष्ट तुला सांगितली नाही, मी मागच्या महिन्यापासून जे मर्डरस् कव्हर करतेय ते एरवी प्रमाणे, रेग्युलर कॉन्टॅक्टस् कडून मिळणाऱ्या टिप्स वरून नाही तर माझ्या मोबाईल वर  अननोन प्रायव्हेट नंबर वरून येतायत.

आणि भाईच्या मते त्या टीप्स आमचे बाबा देतायत. पण मला कायम वाटतं आलंय की त्यावेळी सुद्धा आणि आता सुद्धा बाबा निर्दोष आहेत. आणि म्हणूनच मी जुन्या सिमिलर केसेसचा उल्लेख माझ्या न्यूज कव्हरेज मध्ये केला नाहीय, जेणेकरून जे खरोखर दोषी आहेत त्यांच्या हातात आयात कोलीत मिळायला नको.

आणि टू थिंक अबाऊट दॅट, मला आत्ता स्टाईक झालं, जर तुझे बाबा, त्यांचा ॲक्सिदेंट केवळ
अक्सिदेंट नसेल आणि काही घातपाताचा प्रयत्न असेल तर, कारण ते गुन्हेगारांच्या म्होरक्याला पकडण्यात खूप जवळ पोहचले असतील तर..." अचानक ब्रेक लागावा तसं थांबत तिने या शक्यतेचा विचार करायला लागली.

"असो, पॉइंट इस, तेंव्हा शेट्टी सरांनी, माझ्या वडिलांना सांभाळून काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या डायऱ्या मी वाचतेय, अक्षरशः पारायणे झालीयत माझी... पण हातात डिफिनेटीव्ह असं अजून काही मिळालं नाहीय आणि काही काहींचा अर्थ पण मला समजत नाहीय... इट्स लाईक सम इन्साईड कोड लँग्वेज.... लाँग व्हर्सन शॉर्ट, मला जश्या आता टिप्स मिळतायत तेंव्हा त्यांना पण तश्या टिप्स मिळत होत्या."

बोलता बोलता उठत, स्वतःच्या वार्डरोब कडे जात तिथे टेबलावर ठेवलेली किल्ली तिने उचलली. आणि वार्डरोबवर अडकवलेले कपडे बाजूला करत मागच्या विशिष्ठ भागावर दाब दिला आणि कर्ररर् असा आवाज करत तिने दाब दिलेला भाग उजव्या बाजूला सरकत त्याच्या मागे असणारं लॉकर दिसू लागलं. किल्ल्यांच्या गठ्ठ्यामधून ठराविक किल्ल्यांच्या सिक्वेंस ने लॉकर चा दरवाजा उघडत, आतली एक डायरी बाहेर काढली आणि त्याच्या कव्हर वरून अलगद हात फिरवत लॉकर आणि वॉर्डरोब च दरवाजा बंद करत परत आस्था बसलेल्या ठिकाणी आली आणि तिच्या हातात डायरी दिली.

"'२ सप्टें. २०१२' च पान उघडं." आस्था ला सांगत दीक्षा तिच्या बाजूला बसली. "डायरी च्या नुसार या घटनांची सुरुवात तेंव्हापासूनच झाली तेंव्हा त्यांना पहिली बॉडी सापडली. सर्जिकल कटस्, ऑर्गन रेमोवल... आताच्या केस चे डिटेल पोस्ट मोर्टेम रिपोर्ट्सना मला अक्सेस नाहीय... पण आय थिंक दिज अल्सो शोज् सेम एम. ओ.* "

"नाही!" आस्था डायरी उघडू का नको अश्या दोलनामय अवस्थेत डायरी हातात खेळवत अचानक बोलली. "मी दादा च बोलणं अर्धवट ऐकलं होतं, ड्रग स्मगलिंग इस अल्सो हॅपनिंग."

आणि दीक्षा तिच्या चेहऱ्यावर आणि केसातून दोन्ही हात फिरवत वैतागून कपाळावर आठी पाडत बोलायला सुरुवात केली. "तुझ्या दादाला आता बहुतेक भेटावच लागणार आहे बहुदा.....! असो, आता माझ्या बाबांनाच का टिप्स मिळत होत्या याचा त्यांनी कुठंच उल्लेख केला नाहीय आणि ज्या कारणांसाठी त्यांना टिप्स मिळत होत्या कदाचित त्याच कारणासाठी मला पण टिप्स मिळतायत..  भाईला बाबा दोषी होते असच वाटतेय...

झालं असं होत की, तेंव्हा सुद्धा जसं मी क्राइम सिन वर सुरुवातीला पोहचतेय तसे ते पण पोहचायचे. दर रविवारी रात्री बरोबर एक वाजता अश्या पाच बॉडीज सप्टेंबर मध्ये तेंव्हा मिळाल्या आणि शेवटचा विक्टम, हि वॉज स्टील अलाईव्ह विथ ऑल हिस ऑर्गनस् इंटॅक्ट बट हि हॅड एक्सिसिव ब्लड लॉस." कपाळावरून हात फिरवत दोन क्षण डोळे बंद करून दीर्घ श्वास घेत दीक्षा पुढे बोलणे कन्टीन्यू  केले.

"सो, बाबांनी न्यूज न कव्हर करता अँब्युलन्स ला कॉल केला. पण अँब्युलन्स तिथे यायच्या ऐवजी पहिल्यांदा पोलीस तिथे पोहचले. आधीच बाबांना न्यूज आधी कशी कळते या संशयाच्या कारणाने ते पोलीसांच्या रडार वर होते आणि जेंव्हा पोलीस तिथे पोहचले तेंव्हा ज्या चाकूने त्या विक्टमवर जखमा झालेल्या तो तिथे सापडला आणि त्याचा ब्लड लॉस थांबण्याच्या प्रयत्नात बाबांचा शर्ट रक्ताने माखला होता."

"त्यांनी अँब्युलन्स ला कॉल करायच्या आधीच पोलिसांना अननोन इन्फर्मंट कडून टीप मिळाली होती की माझे बाबा या सगळ्या हत्यासत्राच्या मागे आहेत. आणि त्यांना तुझ्या वडिलांनीच अटक केली होती. मी आणि भाई दोघं पण लहान, आई लहान असतानाच गेलेली, आणि अटक झालीय म्हंटल्यावर बाकी मित्र आणि नातेवाईकांनी पाठ फिरवली."

"बाबांच्या डायरी मधल्या नोंदीनुसार ते, शेवटून दुसऱ्या मर्डरच्या वेळेस टीप मिळाल्या मिळाल्या लगेच गेले होते तेंव्हा त्या अंधुक प्रकाशात बॉडी जवळ उभा असलेला व्यक्ती पहिला होता.. अर्थात् बाबांची चाहूल लागल्यावर तो पळू लागला पण ही अल्मोस्ट कॉट हिम् आणि त्याचा चेहरा काही दिसला नव्हता पण त्या झटापटीत एक फिनिक्स पक्ष्याच्या आकाराचे पेंडंट आणि मानेवरचा फिनिक्सचा टॅटू त्यांनी पहिला."

"त्यांनी एक चूक केली, ताबडतोब ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही. आणि त्यांच्या अटकेच्या वेळी हे सगळं सांगण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला; पण ऐकून घेणारं कोणी नव्हतं...! सगळे आपापल्या तुंबड्या भरणारे पोलीस, आणि तुझे वडील, ते केवळ पुराव्यांवर विश्वास ठेवणारे... माझ्या वडिलांच्या विरोधात सगळे पुरावे होते, कोणी खोलात शिरून चौकशी केली नाही..."

नॉन स्टॉप बोलण्याने घसा कोरडा पडला तसा घोटभर पाणी पिऊन तिने बोलणे सुरू ठेवले.

"पण तुझ म्हणणं ऐकल्यावर वाटतंय की तुझ्या वडिलांची अवस्था पण माझ्या वडिलांसारखीच झालीय, ..... कदाचित खोलात चौकशी करण्याच्या प्रयत्नात...!!" मागच्या आठवणींनी आलेले अश्रु एका बोटाने पुसत तिने बोलणे सुरू ठेवले.

"दरम्यान, अटक झाल्यावर थोड्या दिवसात, खोटा आळ सहन न होऊन बाबांनी सुसाईड अटेमप्ट करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा हॉस्पिटल मध्ये नेताना त्या गाडीचा ॲक्सिडेट झाला अँड ड्यीयुरींग दॅट ही एस्कॅपेड.. त्यानंतर त्यांचा काहीच ठावठीकाणा लागला नाही. आणि म्हणूनच भाई त्यांना दोषी मानतो. ही सेज दॅट एफ फादर वॉज इनोसंट, हे शुड हॅव फॉट... अँड नॉट रन लाईक गिल्टी पर्सन.. आणि त्यामुळं सुमेर भाई बाबांना दोषी मानतो."

"आणि तो पुराव्यांनासुद्धा पाहतोय... आणि त्याच्यामते बाबा या हत्यासत्रात दोषी आहेत.. कदाचीत तो बरोबर आहे पण माय गट सेज् अदरवाईस...! त्यांच्या डायऱ्या वाचण्याची तसदी भाई ने कधी घेतली नाही... आणि मी सुद्धा त्याला कधी फोर्स केला नाही. ही इस बिटर अबाऊट होल थिंग...!" कडवट स्वरात वडिलांबद्दलची ही माहिती देत सुस्कारा सोडला.

"आणि या घडीला मी कशावर विश्र्वास ठेऊ आणि कशावर नाही ते मला कळत नाहीय... अजून एक म्हणजे, बाबांनी ज्या पेंडेड चा उल्लेख केलेला ते माझ्याकडे आहे"

गळ्यातली चेन बाहेर काढत तिने आस्था ला ते पेंडेंड दाखवले. "आणि हे सगळ घेऊन मी पोलिसांकडे गेलेही असते ... पण ते यावर कितपत विश्वास ठेवतील याची मला जरा पण कल्पना नाहीय..... प्लस मागच्या वेळी डिपार्टमेंट मधलं करप्शन उघड केल्यामुळे ते सगळे मला किती सीरियली घेतील हा मुद्दा पण अलाहिदाच आहे... आणि बाबांना न्याय देण्याच्या प्रयत्नात मी हे करिअर करायचं ठरवलं होत.. आणि मला प्रोटेक्ट करण्याच्या प्रयत्नात भाई ने..."

दिक्षाचे बोलणे सगळे ऐकल्यावर, आस्था थोडी शांत बसली. "मला वाटतं आपण दादा कडे जाऊयात... तो आपल्याला नक्की मदत करेल.. आणि तुझ बोलणं ऐकल्यावर मला सत्य नक्की काय आहे ते जाणून घ्यायचंय." शांत पण ठाम आवाजात आस्थाने तिचं मत मांडलं. मिनिटभर विचार करून दीक्षा ने सुमेर ला कॉल केला आणि "आपण सगळे इन्सपे. निलय कडे जातोय, घरी ये..." थोडक्यात सूचना करून कॉल कट केला....

***********

'...तीन...दोन....एक....' अविनाश संध्याकाळच्या वेळी जिम मध्ये पुशअप्स काउन्ट करत नुकत्याच ज्या घटना घडत होत्या त्याचा विचार करत होता. निलयवर झालेला हमला, होणारे मर्डरस्, वेअर हाउस मध्ये ऐकलेला संवाद ह्या सगळ्यात काहीतरी लिंक मिस होतीय अशी फिलिंग त्याला होत होती, आणि ती काय असेल याचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

आणि या सगळ्यांत 'फिनिक्स टॅटू चा काय रोल आहे हे सुद्धा शोधायला हवं.' स्वतःशीच विचार करत त्याने सेट पूर्ण केला आणि मोबाईल शोधायला लागला. फोन हातात येताच, एक नंबर डायल करत, "हॅलो, रझिक एक काम आहे. रॉयल कॅफे मध्ये भेट." थोडक्यात मेसेज देत फोन कट केला. आणि जाता जाता वेअर हाउसला एक भेट द्यायची असा विचार करत घामेजलेल अंग कोरड करत शॉवर मध्ये घुसला.

**************

इकडे निलय समोर उभ्या असलेल्या दीक्षा आणि सुमेर कडे डावी भुवई वर करत चेहऱ्यावर वैतागलेले भाव घेऊन या दोघांना कसं गोड शब्दात कटवयाच याचा विचार करतच होता की दीक्षाच्या मागून हळूच डोकावून पाहणार्या आस्थाला पाहून त्याच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. "आस्था, तू इकडे काय करतेयस? आणि तुझ्यासोबत हे दोघं कसे काय आलेत...?" त्याचा प्रश्न पूर्ण होतोय न होतोय तोपर्यंत धाडकन दार उघडत श्री आत घुसला. "सर आय हॅव व्हेरी इम्प्रोटंट इन्फॉर्मेशन.. "

आणि त्याला पाहून आस्था उगाच हाताचा चाळा करत, केस कानामागे टाकत केबिनच इंटेरियर अचानक इंटरेस्टिंग वाटतं असल्यासारखं चहूबाजूला नजर टाकू लागली. तिच्यातला हा बदल तिरक्या नजरेने टिपत दिक्षाच्या गालावर हलकेच स्मित हास्य पसरले. पण ना ही वेळ आहे ना जागा असा विचार करून एका क्षणात चेहरा कोरा करत निलयकडे पाहू लागली.

"श्री, जरा बोलताना आजुबाजुला कोण आहे कोण नाही हे पाहायला पाहिजे ना? का चार डोळे पण पुरेसे नाहीत तुला?" श्री वर प्रचंड वैतागत निलय थोडया चिडचिड्या आवाजात ओरडत बोलला. आणि श्री ने केबिन मध्ये नजर फिरवली आणि समोर दीक्षा आणि सुमेर कडे पाहत आणि ओशाळ हसत ' मी आलोच..' असं हळूच बोलवत आस्था कडे एक चोरटी नजर टाकत पटकन मागच्या मागे बाहेर पडला.

आणि निलय आता दीक्षा आणि सुमेर ला आपल्याकडे काय काम आहे असा विचार करत, "हे पहा, इट्स ॲन् ऑन गॉईंग इंव्हेस्टीगेशन... माझ्याकडून तुम्हाला कोणताही बाइट मिळणार नाहीय... त्यामुळं तुम्ही आलात तरी चालेल..." त्यांना कटवण्याचा उद्देशाने त्याने दरवाज्याकडे इशारा करत समोरच्या फाईल मध्ये डोकं खुपसून वाचायला सुरुवात केली. का कुणास ठाऊक पण हे प्रकरण अजूनच कॉम्पलिकेटेड होणार आहे अश्या व्हाईबज त्याला येत होत्या.

"ऑफिसर, आम्ही इथे बाईट घ्यायला आलो नाहीय... वी हॅव समथिंग इंपॉर्टन्ट टू डिस्कस." थोड्या तीव्र शब्दात दीक्षा निलयला उद्देशून बोलली आणि फाईल फटकन मिटत हातात पेन्सिल खेळवत निलयने तिच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागला. "व्हॉट इंपॉर्टनट डिस्कशन वी पॉसिबली कुड हॅव? तुमच्या मुळे डिपार्टमेंट वर लोकं विश्वास ठेवताना कचरत आहेत. ज्या गोष्टी आधी डिपार्टमेंट ला समजणं अपेक्षित आहे त्या गोष्टी तुम्हाला आधी कळतायत, तरी मी अजून त्यावर काही ऍक्शन घेतली नाहीय... आणि तुम्ही बिना अपॉईंटमेंट, बिना परमिशन डायरेक्ट माझ्या केबिन मध्ये घुसला आहात... व्हाय शुड आय लिसन टू यू??" एवढ्या दिवसांच फ्रस्ट्रेशन आठवत थोड्या मोठ्या आवाजात त्याने दीक्षा आणि सुमेर कडे पाहून म्हंटले..

आणि दीक्षाने हातातली डायरी टेबलावर सरकवत, "तुमच्या वडिलांनी दहा वर्षांपूर्वी जी केस पहिली होती... त्याचा आणि आताच्या घटनांचा संबंध नाहीय अस तुम्हाला वाटतं का? डोन्ट बी नाईव्ह ऑफिसर, हियर अस आऊट, आय हॅव सम ऑफ माय ओन क्वेस्शनस्... अँड वी कॅन वर्क टूगेदर..." थोड्या शांत आवाजात निलयच्या डोळयात डोळे घालून दीक्षा म्हणाली, आणि दोन सेकंद विचार करून, "ठीक आहे... लेट्स हीअर यू..."

**********

Group content visibility: 
Use group defaults

छान भाग.

टाईपोज सुधारलेत तर वाचन सुकर होईल. शिवाय ..... हमला नाही हल्ला, तो व्यक्ती नाही तर ती व्यक्ती वगैरे.

खरेच इन्टेरेस्टिंग.. गॅप मुळे कोण कोणाचा ते चटकन आठवेना.

रच्याकने, व्यक्ती हा शब्द स्त्रिलिंगी आहे. व्यक्ती स्त्री असो वा पुरूष, ‘ती‘च असते. हल्ली सगळीकडे तो व्यक्ती वाचायला मिळते, दातांखाली दगड आल्यासारखे वाटत राहते. शक्य असल्यास दुरुस्त करा.

जरा गडबडी मध्ये टाइप केल्यामुळे थोड्या टायपिंग मिस्टेकस् असतील..
फार उशीर करायला नको म्हणून जास्त एडिट न करता पोस्ट केला पार्ट...
काही काही चूक ऑटो correct मुळे झाल्या आहेत...

थोडा वेळ मिळाला की चुका दुरुस्त करेन...

"अरे... दिक्षा, रडली आहेस का तू? डोळे बघ कसले लाल झालेत! ये इथे.. बस अन पाणी पी."
काळजी वाटून आस्थाने दिशाची विचारपूस केली.

सकाळी सुमेरसोबत बोलणं झाल्यावर दीक्षाने आस्था सोबत बोलण्यासाठी तिला कॉल केला होता. ती आज सुट्टी घेणार आहे हे कळल्यावर दीक्षाने तिला मी तुझ्या घरी येउ का? असे विचारले. आस्थाने एका पायावर तयार होत लगेच होकार दिला. ती जेंव्हा घरी आली तेंव्हा सुमेरने दरवाजा उघडत दीक्षाला आत घेतले. दोघींना बोलण्यासाठी व्यवस्थित एकांत आणि स्पेस मिळावी म्हणून, 'मी जरा बाहेर जाऊन येतो', असं पुटपुटत ताबडतोब काढता पाय घेतला.

हॉलमध्ये बसलेल्या दीक्षाकडे, तिच्या थोडया लालसर झालेल्या डोळ्यांकडे, बघून आस्था लगेच काळजीने विचारपूस करताना पाहून आपण तिला आपल्याला माहित असलेले सत्य सांगण्याचा निर्णय योग्यच आहे याची दीक्षाला खात्री वाटली. इकडे आस्था आपल्या मैत्रिणीला रडवेली झालेली पाहून अस्वस्थ झाली होती.

"सुमेर भाई असा मला बघून लगेच बाहेर का गेला? काय झालंय सांगशील का मला?" आस्थाने थोडं तणतणतच किचनमध्ये जाउन पाण्याचा ग्लास सिंकमध्ये विसळला. तिथेच ऍटॅच केलेल्या फिल्टर मधून स्वच्छ पाणी भरून तिने तो ग्लास दीक्षाच्या हातात दिला.

"आता पटापट बोलायचं हां.. कालच तुला बोलणार होते पण तू अचानक फोन कट केलास.. आज जर तू बोलावलं नसतंस तरी मी आज इकडे येण्यासाठीच सुट्टी काढली होती. माझी तब्येत बिघडली आहे त्यामुळं मी येत नाहीय असा त्या शेट्टीला कॉल करून डच्चू देऊन इकडे आलेय मी. कोणतीही थातुर मातुर कारणं ऐकूनही घेणार नाहीय आणि तू सांगूही नकोस.." अगदी हातवारे करत, बोटं नाचवत आस्थाची बुलेट ट्रेन सुटली होती.

"काय पोरगी आहेस... माझ्याच घरी येऊन मलाच बसायला सांगून पाणी आणून देतेस.. मी तुझी खातिरदारी करायची का तू??" तोंड वेंगाडत, थोडं हलकं फुलकं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत दीक्षा बोलली."तू तर गप्पच बसं हा... मी काय पाहुणी नाहीय.. माझ्याच घरी आलिये मी... तुझी परवानगी का म्हणून घेऊ?" नाक उडवत आस्था म्हणाली तशी दीक्षा खळखळून हसायला लागली.

"आता टोलवाटोलवी खूप झाली, काय विषय आहे बोलं पट्कन.. " आस्था दिक्षाकडे रोखून बघत म्हणाली. दिक्षा सरसावून बसली आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली.

‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी’....

ये नया मराठी है, ये मराठी व्याकरण में घुसेगा भी नही और मोड़तोड़ करेगा वो अलग....

उगीच जास्त टीका करुन लेखिकेला नाऊमेद करु नका हो. Happy

आपण एक लेखनप्रकार हाताळतोय व हे करताना त्या भाषेचे नियम पाळायला हवेत याची जाण लेखकाने ठेवायला हवी. मग ती प्रमाणभाषा असो वा बोलीभाषा. छापिल पुस्तकांमध्ये व्याकरण तपासायला, मुद्रितशोधन करायला वेगळी टिम असते. नेटवर लिहिल्या जाणार्‍या साहित्यात ही जबाबदारी लेखकावरच येते. आणि ही जबाबदारी त्याला पेलवत नाही हे हल्ली सतत दिसते. अशा वेळी लेखकाने त्याच्या नियमीत वाचकांपैकी किंवा चाहत्यांपैकी एकाला ही जबाबदारी द्यावी. वाचक वाट पाहात असतात त्यामुळे लेखकालाही घाई असते लिखाण लवकर प्रकाशीत करायची. त्यामुळे टायपिंगच्या चुका होतात आणि वाचकांचा रसभंग होतो.

लेखकांनी टीका का होते हे समजुन घ्यावे व सुधारणा करावी ही नम्र विनंती व ईच्छा.

साधना +1

मधुरा कुलकर्णी, तुम्ही कथा लिहा हो. छान सुरू आहे.

उगीच जास्त टीका करुन लेखिकेला नाऊमेद करु नका हो.
+१

अशा वेळी लेखकाने त्याच्या नियमीत वाचकांपैकी किंवा चाहत्यांपैकी एकाला ही जबाबदारी द्यावी.
+१

<<उगीच जास्त टीका करुन लेखिकेला नाऊमेद करु नका >>
सहमत...

व्याकरणाच्या सुधारणा होणे आवश्यक आहे, पण त्या सूचना जर लेखिकेच्या विपु मधे लिहिल्या तर सुधारणा पण होतील आणि लेखिकेचा उत्साह पण टिकून राहील.
इथे असा एक नकारात्मक प्रतिसाद आला की तशी रांगच लागते. बरेच लेखक माबो सोडून गेलेत.

छान झालाय हा ही भाग.
कथा उत्कंठावर्धक आहे, छान वेग आहे कथेला.
भूतकाळात बरच रहस्य दडल आहे,
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

तुमचा व्यवसाय, परिक्षेची तयारी वैगरे सांभाळून कथा इथे वाचकांना देता याबद्दल धन्यवाद
इथल्या टीका मनाला लावून घेऊ नका.

लेखकांनी टीका का होते हे समजुन घ्यावे व सुधारणा करावी ही नम्र विनंती व ईच्छा.>>>>>
@ साधना
Thank you...

मला मान्य आहे की टायपिंग मिस्टेक खूप आहेत...
आणि पुढच्या भागात मी त्या कमीत कमी होतील याची काळजी नक्की घेईन..
मी माझा जॉब आणि अभ्यास दोन्हीं सांभाळून लवकर पोस्ट करण्याच्या प्रयत्नात एवढ्या चुका झाल्यात...

बाकी ज्यांनी ज्यांनी negative comment केलीय त्यांच्यासाठी...
मागचे चार भाग त्यात एवढ्या चुका नव्हत्या. तेंव्हा भाग आवडला आहे एवढी दोन शब्दांची कॉमेंट करायला तुम्ही नव्हता...
मला तुमच्या negative comment बद्दल वाईट वैगेरे नाही वाटल..चूक असेल तर ते दुरुस्त व्हायलाच पाहिजे... त्यात काहिच वाद नाही...
पण चुकलं असेल तर चुका सांगण्याची एक पद्धत असते एवढंच माझ म्हणणं आहे...

मी जर हा भाग आता पोस्ट केला नसता तर कथेमधला रस कमी झाला असता आणि खूप वेळा नंतर भाग पोस्ट केला तर कोणतीच लिंक लागत नाही..
मी "लेखक" आहे का नाही ते मला माहित नाही पण मी वाचक नक्किच आहे... आणि त्यामुळं जसा भाग लिहून झालं तसा पोस्ट केला...

ज्यांनी ज्यांनी मला यासाठी समजून घेतलं त्यांना खूप खूप थँक्यू..

And I assure you that next there'll be minimum mistakes...

आणि ज्यांना फक्त criticize करायचं आहे .. तो पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे.. तुम्ही चुका सांगा... I'll try to minimise them...

आणि चार negative comment मुळे नाउमेद वैगेरे होण माझा स्वभाव नाहीय..

असो...
पुढच्या वेळी भाग पोस्ट करून झाल्यावर माझ्या "चुका" सांगायला नक्की या

ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी’....
ये नया मराठी है, ये मराठी व्याकरण में घुसेगा भी नही और मोड़तोड़ करेगा वो अलग....

@अज्ञानी >>>>>>>>

व्याकरण बरोबर पाहिजे नक्की मान्य...

पण आधीच्या भागात चुका नव्हत्या तेंव्हा भाग चांगला झाला आहे एवढं सांगितलं असतं तर बरं वाटल असतं मला...

असो... तुमच्या कॉमेंट ला उत्तर देण्याचा घाट एवढ्या साठी घातला, की व्याकरण मधल्या चुका मला पण मान्य नाहीत.. आणि मी फक्त मायबोली वर वाचत नाही... बाकी ब्लॉग्ज, मिसळपाव, प्रतीलिपी बरेच ठिकाणी वाचते.. आणि बरेचदा comment पण करते... पण चुका असतील ना... तर त्या चुका मनाला लागतील एवढ्या हार्ष शब्दात सांगत नाही हे पण तेवढंच खर आहे...

असो, तुमचं मत तुमच्या बरोबर...

तुम्ही negative comment केलीय म्हणून मी तुम्हाला बोलतेय असा काही अर्थ काढू नका... मी फक्त माझ मत सांगितलं आहे

तुमचा व्यवसाय, परिक्षेची तयारी वैगरे सांभाळून कथा इथे वाचकांना देता याबद्दल धन्यवाद
इथल्या टीका मनाला लावून घेऊ नका
@ manya >>>>>>>

खुप खुप thank you sir....

नाही...
टीका करण्याच्या निमित्याने का होईना, लोकं वाचतायत हे समजल्यामुळे मी तशी ओके आहे...
जोक असाईड....

मनाला वैगेरे लावून घेत नाही...
होय चुका आहेत... त्या दुरुस्त करायला पाहिजेत...
आणि मी त्या नक्की करेन...
पण support साठी खरचं thank you

उगीच जास्त टीका करुन लेखिकेला नाऊमेद करु नका हो.
+१

अशा वेळी लेखकाने त्याच्या नियमीत वाचकांपैकी किंवा चाहत्यांपैकी एकाला ही जबाबदारी द्यावी.
+१

@आबा

Thanks for your support..

उगीच जास्त टीका करुन लेखिकेला नाऊमेद करु नका हो...
लेखकांनी टीका का होते हे समजुन घ्यावे व सुधारणा करावी ही नम्र विनंती व ईच्छा.>>>>>>
@साधना...

मी नक्की पुढच्या वेळी व्यवस्थित लिहेन...
Thanks

अशा वेळी लेखकाने त्याच्या नियमीत वाचकांपैकी किंवा चाहत्यांपैकी एकाला ही जबाबदारी द्यावी. वाचक वाट पाहात असतात त्यामुळे लेखकालाही घाई असते लिखाण लवकर प्रकाशीत करायची. >>>>>>>

असं कोण मला चुका दुरूस्त करून द्यायला तयार असेल मला खरचं माहित नाही... मी आधी लिहिलं आहे.. पण कोणता वाचक किंवा "चाहते" अगदी मदत करतील असं एवढं कोण ओळखीचं नाहीय... आणि हो.. लवकर पोस्ट करण्याच्या प्रयत्नातच माझ्याकडुन चुका झाल्यात .. समजून घेण्यासाठी खरचं खूप thank you

एवढं प्रांजलपणा
ठिकै देर आये दुरुस्त आये
अन्यथा २ वर्षापुर्वी गझल विषयी एवढा गोंधळ एटिट्यूड दाखवत मधुरा कुलकर्णी ह्या आयडीने घातला नसता . आणि तेव्हा कोणी समजावून सांगितले तर त्याना हार्श भाषेत प्रत्युत्तर दिले नसते.
सुधारणा आहे आनंद आहे
आणि कमेंट निगेटिव्ह नव्हती.
वरची अमाच्या २ कमेंट दिसल्या नाहीत ? तुम्ही नाव घेऊन लिहिलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय असा काही अर्थ काढू नका... मी फक्त माझ मत सांगितलं आहे.

@अज्ञानी.....
वरची अमाच्या २ कमेंट दिसल्या नाहीत ? त्यावर कोट करून नाव घेवून बोलायला धाडस नाही ? >>>>>>
अहो सर (i think/किंवा mam) मी id पाहिला नाहीय तुमचा... मी आता फोन हातात घेऊन कॉमेंट वरून खाली वाचतेय... प्रत्येक कॉमेंट ला रिप्लाय द्यायला वेळ लागेल ना... मी इथे कोणालाच ओळखत नाही.. i mean personally... त्यामुळं प्रत्येक कॉमेंट ल रिप्लाय देईन मी..
I'm not intimidated by anyone if that's what you are saying...

अन्यथा २ वर्षापुर्वी गझल विषयी एवढा गोंधळ एटिट्यूड दाखवत मधुरा कुलकर्णी ह्या आयडीने घातला नसता .>>>>>
ट्रस्ट मी.... गझल मला अजिबात समजत नाही... आणि त्यावर कोणताही वाद वैगेरे घालायचा प्रश्न येत नाही... त्यामुळं तो जो कोणता आयडी असेल... I'm not the same person...

Ok
बाकी राहिला प्रश्न आधीच्या भागांवर का नाही प्रतिसाद त्याचा !!
सर्वच भाग छान झालेत
पण पहिल्या भागा पासून फार इंग्रजी तेहि देवनागरीमध्ये वाचताना खरंच मजा निघुन जाते
कृपया ह्यावर नक्की उपाय निघुन ही सर्व लेख मालिका अधिक सुंदर बनवण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

मधुरा कुलकर्णी, तुम्ही कथा लिहा हो. छान सुरू आहे.

Submitted by मामी >>>>>>

खुप खुप धन्यवाद मामी... मी कथा पूर्ण करेन... आणि नक्की, पुढच्या वेळी कमीत कमी चुका असतील...

आता टोलवाटोलवी खूप झाली, काय विषय आहे बोलं पट्कन.. " आस्था दिक्षाकडे रोखून बघत म्हणाली. दिक्षा सरसावून बसली आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली.

Submitted by अश्विनीमामी>>>>>>>>

सॉरी पण तुम्हाला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे मला समजलं नाही....

म्हणजे मी लिहिलेले पराग्राफ तुम्ही चुका दुरुस्त करून कॉमेंट केलेत... मी exactly word to word tally करून पाहिलं नाहीय पण it seems like that...

If you have any suggestions, please tell me...
पण चुका दुरुस्त करून परा टाकलेत त्यावरून मला खरचं काही कळलं नाही...

आणि @अज्ञानी यांच्या बोलण्यावरून it seems like, you are quite known person on मायबोली.... सो, तुमच्या ज्या सूचना असतील त्या नक्की सांगा मला...

नविन भाग!!!
उत्कंठावर्धक आहे.

Submitted by धनवन्ती >>>>>
Thank you...

इंटरेस्टिंग. पण थोडी गॅॅप पडल्यामुळे रिफ्रेश करावे लागले.
Submitted by केशवकूल >>>>>>
Thanks ...

छान भाग.
टाईपोज सुधारलेत तर वाचन सुकर होईल. शिवाय ..... हमला नाही हल्ला, तो व्यक्ती नाही तर ती व्यक्ती वगैरे.
Submitted by मामी >>>>>

नक्की मामी... Thanks

खरेच इन्टेरेस्टिंग.. गॅप मुळे कोण कोणाचा ते चटकन आठवेना.
रच्याकने, व्यक्ती हा शब्द स्त्रिलिंगी आहे.
Submitted by साधना>>>>>>>>
हो... पण ही चूक ऑटो करेक्ट मुळे झाली आहे.. त्यासाठी सॉरी...
By the way "रच्याकने" या शब्दाचा अर्थ मला कळला नाही....

By the way "रच्याकने" या शब्दाचा अर्थ मला कळला नाही....

By the way = "रच्याकने"
मायबोली रूपांतरण = रस्त्याच्या कडेकडेने

@ अज्ञानी...
पण पहिल्या भागा पासून फार इंग्रजी तेहि देवनागरीमध्ये वाचताना खरंच मजा निघुन जाते>>>>>>
तुम्ही सुहास शिरवळकर किती वाचलं आहे मला माहित नाही... पण इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहायचे ही कॉन्सेप्ट मी त्यांच्या कादंबऱ्या वरून घेतली आहे...
मला स्वतःला मराठी वाचताना इंग्रजी शब्द रोमन लिपी मध्ये असेल तर आवडत नाही .. एक तर एकच लिपी असावी असं मला वाटतं.. त्यामुळे मी इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहिते..
आणि वास्तविक पाहता, आपण इंग्रजी संवाद रोजच्या भाषेत खूपदा करतो अगदी सहज... त्यामुळे मी इंग्रजी संवाद add केलेत...
इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहायचे ही चूक आहे अस मला वाटत नाही...

हा, मी इंग्रजी संवाद कमी करेन.. पण देवनागरी लिपी लिहिताना मला रोमन लिपी लिहायला खरचं आवडणार नाही... Excuse me for that...

सर्व लेख मालिका अधिक सुंदर बनवण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा>>>>>>
या साठी खरच खूप thank you..

By the way = "रच्याकने"
मायबोली रूपांतरण = रस्त्याच्या कडेकडेने>>>>>>
मी मायबोलीवर बरेचदा हा शब्द वाचला होता.. तेंव्हा पण मला याचा अर्थ कळला नव्हता ..
I thought that this is some inside language...
Thanks for clearing that by the way...

सं कोण मला चुका दुरूस्त करून द्यायला तयार असेल मला खरचं माहित नाही... मी आधी लिहिलं आहे.. पण कोणता वाचक किंवा "चाहते" अगदी मदत करतील असं एवढं कोण ओळखीचं नाहीय... आणि हो.. लवकर पोस्ट करण्याच्या प्रयत्नातच माझ्याकडुन चुका झाल्यात .. समजून घेण्यासाठी खरचं खूप thank you>> अहो मी करीन मदत एडिटिन्ग करायला प्रूफिन्ग करायला. काही मदत लागली तर जरुर सांगा. मी हे प्रोफेशनली केलेले आहे. व अजुनही फ्री लान्स करते. मला खूप आवडते. छान लिहिताहात तुम्ही. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

अहो मी करीन मदत एडिटिन्ग करायला प्रूफिन्ग करायला. काही मदत लागली तर जरुर सांगा. मी हे प्रोफेशनली केलेले आहे. व अजुनही फ्री लान्स करते. मला खूप आवडते. छान लिहिताहात तुम्ही. पुढील भागाच्या प्रतीक्षेत>>>>>>>>>>>>>

थॅन्क्स @अश्विनीमामी
पुढचा भाग प्रकाशित करण्याआधी तुमचा सल्ला नक्की घेईन...

Pages