⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️ भाग 2

Submitted by मधुरा कुलकर्णी on 17 April, 2023 - 11:04

भाग १
https://www.maayboli.com/node/83282

प्रकरण २:- रिटर्न्स

स्थळ :- ABC न्यूज ऑफिस
वेळ :- रात्रीचे ०९:१५

            तिने ऑफिस च्या मेन गेटच्या बाहेर गाडी पार्क केली, आणि त्याच्या सोबत ऑफिस च्या दिशेने पावले टाकू लागली. आणि दरवज्याजवळ गेल्यावर तो दरवाजा तिला किंचित कीलकीला उघडा दिसला आणि पूर्ण ऑफिस बिल्डिंग मध्ये कुठेच लाईट नाहीय हे पाहून ती लगेचच अलर्ट मोड वर जात .३८ कॅलिबर ऍन्कल शिथ मधून उजव्या हातात घेउन लोड करत दरवाज्याला हलकासा धक्का दिला. त्याने  सुध्दा तिला कव्हर करत आजूबाजूला नजर फिरवली आणि हाताने इशारा करत दरवाज्याला अजून थोडा धक्का दिला.

                "कुर्र्ररररर..... कुईईई...." असा टीपिकल हॉरर मूव्हीच्या बॅकग्राऊंड म्युझिक ला टशन देत दरवाजा पूर्ण उघडला आणि ती अंधारात बुडालेली रूम बघून ते दोघे अजूनच अलर्ट मोड वर गेले.. "कुठं आहेत सगळे? ही काय भानगड आहे नक्की? एवढ्या लवकर ऑफिस कधीच बंद होत नाही..." तिने काळजीने कुजबुजत त्याला विचारले. त्याने खांदे उडवत 'काही कल्पना नाही बुआ' अश्या युनिव्हर्सल कोडने तिला प्रतिसाद दिला. पण त्याच्यासुद्धा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि काळजी होती.

अन् तेवढ्यात........

            ती ऑफिस ची रूम डोळे दिपतील अश्या प्रकाशाने उजळून निघाली, आणि
"सरप्राइज........"
"काँग्राजुलेशन ...."
"ब्राव्हो....."
"पॉप....... "
"थ्री चेअर्स फॉर वंडर सिब्लिंगज......!!!"
"हिप हिप...
हुऱ्ये..
हिप हिप
हुऱ्ये..
हिप हिप
हुऱ्ये.."

            अश्या आरोळ्या ऐकु येऊ लागल्या आणि तिने .३८ अनलोड करत डाव्या भुवई वर त्या .३८ ने रब करत गालात अलगद डेव्हिल स्मित करत .३८ ला तिच्या जागी पुन्हा खुपसले आणि जवळच असणाऱ्या आस्था ला जवळ ओढत तिच्या पाठीवर मारू लागली...
"मूर्ख आहेस का बे तू?? जीव घश्याशी आलेला माझा... ही नक्कीच तुझीच आयडिया आहे... हो ना?? भाई... म्हणजे काय हे? आणि नक्की का आणि कशाबद्दल हे सगळं अरेंज केलंय तू?" आस्था तिचा मार चुकवत पूर्ण ऑफिस मध्ये पळू लागली आणि, "अरे, ये कैसा इन्साफ है भाई... मी आणि बाकी सगळ्यांनी तू आणि सुमेरने पुन्हा एकदा न्यूज गाजवली म्हणून हा सगळा घाट घातला... आणि जीव कशाला घश्याशी आलेला?? एवढं चांगलं सरप्राइज प्लॅन केलं तर त्याची कदरच नाही काही लोकांना..." आणि आपल्या भसाड्या आवाजात "दोस्त दोस्त ना रहा..." असं गाणं म्हणत तिला अजूनच इरिटेट करू लागली..

"दीक्षा... बसं ना आता... किती मारशिल बिचारीला.." सुमेर दिक्षाला थोडं फटकारत बोलला.. आणि आस्था पळता पळताच..., "तूच रे तूच तो भाई... ज्याला माझी कदर आहे." खोटे खोटे अश्रू पुसत दीक्षा चा मार चुकवत सुमेर ला कॉम्पलिमेंट दिली आणि त्याने त्याचा उजवा हात त्याच्या केसात फिरवत हसून तिला दाद दिली. आणि मग आस्था आणि दीक्षा मनापासून हसत एकमेकींच्या गळ्यात पडल्या. "काँग्राटस् यार... पुन्हा एकदा तू न्यूज चॅनलच नाव गाजवलसं आणि.... साईड बेनिफिट... टीआरपी वाढवलीस.." आस्था आनंदाने चिवचिवत बोलली. दिक्षाने वर वर हसत जवळच्या ट्रे मधला कॉल्ड ड्रिंक्स चा ग्लास उंचावत आस्था ची कॉम्पलिमेंट स्वीकारली आणि त्या ऑफिस रूम मध्ये छोटेखानी पार्टी सुरू झाली. आणि दीक्षा तिच्याच विचारात हरवली.

मागच्या महिन्यापासूनच तिच्या सेल वर ब्लॉक्ड नंबर वरून येणारे मेसेजेस् तिच्या विचारांचे केंद्रबिंदू होते. विचारांच काहूर तिच्या डोक्यात सुरू होतं. आपल्याला ज्या नंबर वरून टिप्स मिळतायत तो नंबर कोणा इनोसंट बाय स्टँडर चा नसून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्याचा आहे हे न कळण्याएवढीही ती दूधखुळी नव्हती. आणि त्यामुळेच ती तिची लाडकी .३८ सध्या सतत जवळ बाळगत होती आणि तिच्या पद्धतीने त्या नंबर बद्दल माहिती काढायचा प्रयत्न करीत होती. या बाबत तिने फक्त तिच्या भावाला म्हणजेच, सूमेरला फक्त कल्पना देऊन ठेवली होती. पोलिसांच्या कडे जाऊन ऑफिसियल तक्रार नोंदवायचा विचार ही तिच्या मनाला शिवून गेला होता. पण तिने डिपार्टमेंट मध्ये चालू असलेला भ्रष्टाचार न्यूज द्वारे उघडकीला आणल्यापासून आपल्या तक्रारीचा फारशी काही दाद मिळेल असं तिला वाटतं नव्हतं. आणि हेच मत सुमेर च सुद्धा असल्यामुळे हे वंडर सिब्लिंगज त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या सगळ्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत होते.

         वंडर सिब्लिंगज अश्यासाठी, कारणं या दोघांनी एकत्र बऱ्याच प्रकारच्या बातम्या, प्रसिद्ध ब्लॉग्ज प्रसारित करून त्यांच्या पद्धतीनं होईल तशी समाज जागृती करण्याचा प्रयत्न करीत होते. अँड ऑफ कोर्स् त्याच्या रेपोर्टिंग स्किल्स मुळे चॅनल ची टीआरपी ऑफ दि चार्टस् जात होती... आणि त्यामुळे चॅनल चा जबरदस्त फायदा होत होता.

दीक्षा म्हणजे सत्ताविशीचं गहू वर्णीय नितळ सौंदर्य... लांबसडक काळेभोर केस, सडपातळ बांधा, नाजूक जिवणी, पाच - सव्वापाच फूट उंची आणि या सौंदर्याला चार चाँद लावणारे तपकीरी, पाणीदार, बोलके डोळे, जणू सगळं सौंदर्य या डोळ्यांमध्ये समावलं होत .. हा पण ह्या नाजूक सौंदर्याला भुलून कोणी गैरसमज करून घेतला, तर तो गैरसमज फ्लाईंग किक खाऊन आणि कंबरडं मोडूनच दूर होइल असे व्यक्तित्व... जसं व्यक्तिमत्व तिखट, तशीच लेखणी सुद्धा जहाल... जे जे चुकीचं आहे, त्याच्या विरोधात  योग्य पद्धतीने पण नाकाला झोंबेल अश्या शब्दांत ब्लॉग्ज वर व्यक्त होणारी लेखणी, आणि चॅनल वर तेवढ्याच धडाधीने व्यक्त होणारे शब्द...

आणि सुमेर... तिशीचा ABC news TV चा सर्वोत्कृष्ट, स्किल्ड क्राइम न्यूज कव्हर करणारा कॅमेरामन... दिक्षाचा मोठा भाऊ..., रूंद कपाळ, लांब बाकदार नाक, दाट भुवया, शार्प जॉ लाईन, मानेपर्यंत रुळाळणारे दाट काळेशार केस नजरेत भरेल एवढी उंची, आणि त्याच्या व्यक्तित्वाला शोभून दिसणारा सावळा रंग... योग्य पद्धतीने योग्य घटनेचे गांभीर्य जाणवून देणारे दीक्षा च्या शब्दांना उठावदार करणारे पूरक असे फोटोज्, व्हिडिओज् काढणे हा त्याच्या कामाचा महत्त्वाचा भाग होता. आणि तो सुद्धा सध्या दीक्षा ल येणाऱ्या मेसेजेस मुळे काळजीत पडला होता.

          रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही "छोटेखानी" पार्टी संपल्यावर दोघे बहीण-भाऊ घरी येऊन पोहचले आणि दिवसभराचा थकवा आणि नाही म्हटलं तरी थोडंफार असलेला मानसिक तणाव यांच्या एकत्रित परिणामामुळे दोघे आवराआवर करून लगेच निद्राधीन झाले.

          दुसऱ्यादिवशी दीक्षा ने सुट्टी टाकली होती त्यामुळं मस्तपैकी झोप आवरून सकाळी ७:०० - ७:३० च्या दरम्यान उठून आन्हिके वैगेरे आवरून, तो अननोन टिप्स देणारा कोण आहे आणि तो टिप्स का देतोय या आणि अश्या उलट-सुलट विचारातच सकाळच्या कोवळ्या उन्हाचे दुपारच्या रखरखाटात कधी रूपांतर झाले तिला कळलेच नाही. आणि तेंव्हा एकदमच तिचा फोन जोरजोरात वाजायला लागला.

"आपका फोन बज रहा हैं टिरींग टिरींग कर रहा हैं....."

रिंगटोन मुळे दचकून भानावर येत तिने फोन रिसिव्ह केला.
"आहेस का जागी? का सुट्टी म्हणुन अजून लोळत पडलीयस? तुम्ही काय बाबा मोठे लोकं.. सुट्ट्या लगेच मिळतात... ह्या टकल्या शेट्टीला आम्हीच भेटतो सुट्ट्या रिजेक्ट करायला." व्हिडीओ कॉल रिसिव्ह केल्या केल्या
आस्था ने तोंड वेंगाडत नौटंकी सुरू केली आणि दीक्षा चा मूड एका क्षणांत ठीक झाला. आणि ती आस्था सोबत बोलण्यात बिझी झाली..

आस्था म्हणजे आपल्या इन्स्प. निलय ची बहिण... तीच हो... ABC news TV मध्ये सध्या ऍज् अ इंटर्न म्हणून मागच्या चार पाच महिन्यांपासून काम करत होती.. भावापेक्षा बराच वेगळा स्वभाव असलेली, केतकी वर्णाची, मध्यम बांधा, खांद्यावर रुळणारे केस, आणि हसल्यावर दोन्ही गालांवर पडणाऱ्या खळ्या... बेधुंदपणे झरणारा झरा जसा वाहेल तसं हीच बेधुंद होऊन जगणं, खूप बडबडा, नौटंकी करणारा स्वभाव असलेली ही वल्ली सगळ्यांच हवीहवीशी वाटयची..

आस्थासोबत बोलून ऑफिस मध्ये काय काय झालं याचा आढावा घेत दीक्षा तिची नौटंकी ऐकत बसली होती. "आज तुला काही कामंबिम नाही का?? आणि शेट्टी सरांबद्दल अस कसं बोलतेस तू? किती चांगले आहेत बिचारे... उगाच सगळे नावं ठेवतात त्यांना... आणि... किती वेळ झालं बोलत बसलीयस!! माझे तर कान बधीर झाले बाई..." तिच्या नौटंकी मध्ये सहभागी होत दीक्षा ने तिला विचारलं. त्यावर आस्था ने तोंड वेंगडात तिला चिडवून घेतले, आणि, "तो टकला तुझ्यावर आणि सुमेर भाई वर खुश असतो फक्त, म्हणून तुला चांगला वाटतो... आमच्यासोबत मात्र अगदी... हुहहहह् न जाणे कोणत्या जन्माची दुष्मनी काढतं असतो"
दिक्षाला हसू आवरले नाही.

तेंव्हा आस्थाने चेहरा सावकाश गंभीर करत दीक्षा ला प्रश्न विचारला, "काल जेंव्हा सरप्राइज प्लॅन केलं होतं तेंव्हा तु अगदी रिव्हॉल्व्हर काढतं एवढं ओव्हर रिॲक्ट का केलंस? आय नो यु, असे प्रॅन्क्स् तु पण खूपदा केलेयस.. पण मी ऑब्सर्व करतेय, मागच्या महिन्यापासून, एस्पेशली मर्डरस् तू कव्हर करत असल्यापासून.... तू बरेचदा टेन्स्ड असतेस, फक्त तू नाहीस सूमेर भाई सुद्धा... काय झालंय?? प्लिज सांग मला... तुला कोणी काही बोललं वैगेरे आहे का? का काही धमकी वैगेरे दिलीय? माझा भाऊ नक्की मदत करेल तुला..."

आस्थाचं बोलणं ऐकून दिक्षाच्या कपाळावर आठ्या पडल्या, "माझ्या प्रॉब्लेम्स च्या बाबत तुझा भाऊ कसा मदत करणार आहे?"
"असो, अगं काही खास नाही... आपण क्राईम न्यूज देतो ना.. त्यात सध्या सिरियल मर्डरस् सुरू आहेत ना म्हणून प्रिकॉशन घेतेय बाकी काही नाही... तू उगाच काहीतरी जास्त विचार करू नकोस." दिक्षा ने तिला वरवर उत्तर देत उडवून लावायचा प्रयत्न केला. आणि तिला बोलता बोलता आस्थाने हात दाखवत थांबले, "पोलीस अधिकाऱ्याची बहिण आहे मी.. जर चेहरे आणि बॉडी लँग्वेज वाचता येत नसेल तर काय कसं चालेल? स्पिल यॉर् गट् गर्ल, काय चालूय??" आस्थाच्या 'पोलीस अधिकाऱ्याची बहिण आहे' याचं एका वाक्यावर दिक्षाचे डोळे चमकले होते, आणि पुढचं तिने जरा कमी ऐकलंच नाही. पण जरा विचार करत, "मी सांगेन तुला, आता नाही.. पण वेळ आल्यावर तुलाच पहिला सांगेन... आता फक्त एवढच सांगेन, 'पास्ट हॅज रिटर्न्ड बॅक टु हॉंट मी'" गूढपणे तिने वाक्य उच्चारले आणि "नंतर बोलेन मी तुझ्यासोबत.." असे बोलून तिने कॉल कट केला आणि भराभर मोबाईल वर काहीतरी टाइप करून मेसेज सेंड केला आणि पुन्हा विचारात हरवली. माध्यान्हीचे तळपून झाल्यावर तशीच सूर्यकिरणे उतरतीला लागली. आणि तिच्या डोळ्यातून जुन्या आठवणीने दुःखाने अश्रू ओघळत राहिले आणि पाठीमागुन कांरवां वर मन्ना डे स्वर आळवत राहिले..., 'जिंदगी कैसी ये पहेली हाये...!'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद....

मोठा लिहायचा म्हणजे पोस्ट करायला वेळ लागू शकतो... म्हणुन जेवढा लिहून झाला तेवढा प्रकाशित केलाय
@शरद

छान सुरु आहे…

सगळे मेन लिड हिरो टॉल, डार्क व हँडसम आणि हिरोइनी शेलाट्या, लांब केसांच्या असल्यामुळे शेवटी कोण कोणाच्या गळ्यात पडतेय हे पाहायची उत्सुकता… Happy

हायला… माझ्या डोक्यात किडा वळवळला व्हिलन कोण ते… पण सध्या राज को राजही रहने दो….

कथा लंबी रेस का घोडा वाटतेय. लगेच संपणार नाही.

वाचते आहे.
पुढच्या भागाची प्रतिक्षा

छान आहे कथा
निलय आणि दिक्षा ह्या मुख्य पत्रांना (अजून नायक नायिका अशी जोडी बनवता येणार नाही पण शक्यता गृहीत धरू... [इथे एक न टाकता आलेली ईमोजी] ) एक पार्श्भूमी आहे, मागे काही गोष्टी घडून गेल्यात... त्याबद्दल छान उत्सुकता निर्माण केली आहे.
थोड्या थोड्या अंतराने का होईना एक एक भाग पोस्ट करून कथा पूर्ण करावी ही विनंती

धन्यवाद @एस
न टाकता आलेल्या ईमोजी... टोटली relatable @manya
मी कथेमध्ये जागोजागी ईमोजी टाकत नाही... पण काही काही ठिकाणी ईमोजी स्पीस् लाउडर दॅन वर्ड्स...
डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसणारी ईमोजी इमॅजिन करा...

आज दुपारपर्यंत पुढचा भाग पोस्ट करेन

आणि अजून एक शंका...
मायबोलीवर पोस्ट करताना फोटो कसा add करायचा कोण सांगू शकेल का??
कारण पुढच्या भागात मला एक इमेज add करायची आहे... आणि एरर न येता इमेज add करून पार्ट कसा पोस्ट करायचं ते कोणीतरी मार्गदर्शन करा