⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️ भाग 3

Submitted by मधुरा कुलकर्णी on 19 April, 2023 - 03:31

भाग १
https://www.maayboli.com/node/83282

भाग २
https://www.maayboli.com/node/83302

प्रकरण ३ शून्यात अडकलेली माणसे

त्या निर्जन ओबधोबड जमीन असणाऱ्या माळरानावर दुपारच्या साधारण तीन - चारच्या दरम्यान निलय ची घारी सारखी नजर प्रत्येक इंचावरून बारकाईने फिरत होती, की कुठे कोणता दुर्लक्षित राहिलेला पुरावा घटनास्थळी आहे का? ज्या ठिकाणी पहिली बॉडी सापडली होती, तिथे तो आला होता.

ज्या ठिकाणी बॉडी सापडली होती त्या ठिकाणी, आणि जिथे कोणताही उपयुक्त वाटलेला किंवा संबंधित वाटलेला पुरावा गोळा केला होता तिथे तिथे रेड फ्लॅगज् लाऊन ठेवले होते. दोन चार दिवसांमागेच पाऊस झाल्याने थोडा चिखल झाला होता. त्याच्या काळ्या चकचकीत शूजवर चालताना चिखलाचे शिंतोडे उडत होते. मधूनच पाय थोडा घसरत होता. पण तो हार न मानता शोध घेत होता.

जवळपास अर्ध्या एक तासाने, बॉडी च्या लोकेशन पासून अंदाजे १० - १२ फुटांवर उजव्या बाजूला अचानक काहीतरी चमकले. पावसामुळे थोडी माती वाहून गेल्यामुळे त्यावर प्रकाशाचे किरण पडून तो प्रकाश परावर्तित होत होता. त्या दिशेने पटपट चिखल तुडवत काळजीपूर्वक ती चमकणारी वस्तू हातात उचलली आणि कॉ. सावंतना आवाज दिला. आणि हळूवारपणे ग्लोव्हज घातलेल्या हाताने त्यावर लागलेला चिखल बाजूला करत त्याचे निरीक्षण करू लागला. साध्या बेंटेक्स च्या चेन मध्ये सोनेरी रंगाचं जरा गरजेपेक्षा जास्तच मोठं असलेलं सोन्याचं चंद्रकोर आणि त्यात असणारा फिनिक्स असं युनिक डिझाईन असणारे ते लॉकेट आणि त्यावरची बारीक नक्षीकामाकडे तो निरखून पाहू लागला.

61Mqh8NsWsL._AC_UY1000_.jpg(फोटो गूगल वरून साभार)

आणि तेवढ्यात डोळ्यांच्या कोपऱ्यात काही फूट अंतरावर त्याला अचानक काहीतरी हालचाल जाणवली. ते लॉकेट पटकन एव्हईड्नस् बॅग मध्ये टाकत झिप लॉक करत तो त्याच्या डाव्या बाजूला झेपावला आणि तो ज्या ठिकाणी काही क्षणांपूर्वी होता तिथे 'सुंsssssss फट्' करत गोळी मातीत शिरली. निलयची एवढी स्विफ्ट रिअँक्शन अपेक्षित नसलेली ती व्यक्ती निशाणा चुकल्या चुकल्या त्या ठिकाणहून पोबारा करू लागली.

ते काही फुटांच अंतर निलयने झटकन लांब लांब ढांगा टाकत पूर्ण केलं आणि त्या पूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या चेहेरा पूर्ण झाकलेल्या व्यक्तीच्या अंगावर उडी घेतली. आणि त्या दोघांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ सुरू झाली. या झटापटीत त्या व्यक्तीचा मान झाकणारा मास्क फाटला आणि उजव्या कानामागून आणि मानेवर रुळणाऱ्या केसांमधून डोकावणारा फिनिक्स चा टॅटू निलयच्या नजरेस पडला. मास्क फाटल्यावर ती व्यक्ती अजुनच तीव्रतेने झटापट करायला लागली आणि निलयच्या छातीत जोरात कोपर मारून आणि त्याच्या पायाच्या नडगी वर जोरात लाथ मारत स्वतःची निलयच्या मगरमिठीतून सुटका करून घेत हरणाला लाजवेल इतक्या जोरात पळत जवळच्या झाडीत ठेवलेली यामाहा स्टार्ट केली आणि चिखल उडवत काही क्षणांत नजरेआड झाली. सुरुवातीला किरकोळ शरीरयष्टी वाटलेल्या त्या व्यकीकडे अनपेक्षितरित्या जास्त ताकत आणि चपळता होती.

"शि*....!!! मा****द..." छातीवर हात चोळत निलयने एक शेलकी शिवी हासडली. लगबगीने मोबाईल काढत श्रीला कॉल केला, "मी आता पहिल्या क्राइम सिन वर असताना कोणत्या तरी व्यक्तीने माझ्यावर हल्ला केलाय. गाडीचा नंबर MH01C2323 (काल्पनिक) असा आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तो चोरीचा असू शकतो, तरी तू या एरिया मध्ये असणार्या  ट्रॅफिक कॅमेरा च्या मदतीने त्याला ट्रॅक करायचा प्रयत्न कर. इथे जवळचा ट्रॅफिक कॅमेरा म्हणजे हायवे वरच आहे.. तो दिसतो का ते पाहा."

फोन कट करत निलय तिथे धावत पळत आलेल्या सावंत कडे पाहत म्हणाला, "आपल्याला सुरुवातीला वाटलेल तसं फक्त ड्रग स्मगलिंग आणि ऑर्गन स्मगलिंग ची केस नाहीय ही.. देअर इस मोर टू दि स्टोरी दॅन वी रिअलायझ... कॉल थीस ऍज अ गट फिलिंग.." हातातल्या एव्हईड्नस् बॅग मधल्या लॉकेट वर नजर टाकत निलय बोलला.

"जिथे डिस्चार्ज झालेला शॉट होता तिथली बुलेट आणि त्याच केसिंग एव्हईड्नस् बॅग मध्ये घेऊन बॅलेस्टिक एक्स्पर्ट कडे तपासणी साठी पाठवा. माझ्या अंदाजाप्रमाणे कमी कॅलीबर ची शॉर्ट रेंज असणारी बुलेट असेल.. पण ट्रेस करायचा प्रयत्न करू शकतो आपण, लेट्स गो"

"तुम्ही ठीक आहात ना सर?" को. सावंत काळजीने विचारू लागले. "तुम्हाला काय मेजर इंजुइरी वैगेरे झाली नाहीय ना??" आपल्या कपाळावर आठ्या घालत त्यांनी निलयला विचारणा केली. त्यांच्या डोळ्यातली काळजी पाहून निलय त्यांना आश्र्वस्थ करू लागला. "इट्स ओके सावंत, जास्त काळजी करू नका. ठीक आहे मी एकदम" निलयच्या बोललण्याने त्यांना त्यांचे समाधान झाल्यासारखे वाटले नाही. पण त्यांनी जास्त विषय न वाढवता मान डोलवत, "तरी तुम्ही एकदा चेकिंग करून घ्या." असे बोलत विषयाला बगल दिली.

"इथे जास्त कॅमेरे नाहीयत, तुम्ही जीप घेऊन त्या यामाहा चा पाठलाग करा, मी इथे अजून कोणते पुरावे आहेत का ते पाहतो. या लॉकेट चा, या हल्लेखोराचा आणि या पूर्ण केसचा या सगळ्यांचा जवळचा संबंध आहे." निलयने सावंत ना सूचना केली. त्यांनी मन डोलवत निलय ला होकार देत जीप मध्ये बसत पटकन इग्निशन चालू करत ज्या दिशेने यामाहा गेल्या त्या दिशेला वेगात जीप पळवली. सावंत सारखा मुरलेला ड्रायव्हर त्याचा पाठलाग करणार या बाबत निश्चिंत होऊन तो पुन्हा आजूबाजूला नजर टाकत प्लास्टिक बॅग वरून लॉकेट वरच्या बाजूला हात फिरवू लागला. "आतापर्यंत अवॉइड केलय पण आता, जुन्या नोंदि पहाव्याच लागणार आहेत, बाबांना कोणते कोणते क्लू मिळाले होते, आणि त्यांनी कोणते निष्कर्ष काढले होते, ते पाहिल्याशिवाय हे हत्यासत्र थांबवणं शक्य होणार नाही." जबडा आवळत स्वतःचीच पुटपुटत अजून काही आऊट ऑफ दि प्लेस काही दिसतंय का ते पाहू लागला. बराच वेळ शोधाशोध करून पण अजून दुसरा कोणता पुरावा घटनास्थळी सापडला नाही म्हंटल्यावर त्याने हार मानली आणि सावंत ची वाट पाहू लागला.

त्याचं दरम्यान इकडे सावंत त्या यामाहा चा पाठलाग करू लागले. रहदारी नसलेला रस्ता म्हणजे त्यांना मिळालेलं मोकाट रान च होत. थोडं पुढं गेल्यावर समोर लक्ष ठेवत त्यांनी कचकन् टर्न मारत जीप शेताडीत घुसवली. आणि तिथे जेवढा स्पीड वाढवता येईल, तेवढा वाढवला. 'हायवे वरून साधरण ८० च्या स्पीडने जाईल साला, पंधरा मिनिटात गाठतो त्याला.' स्वतःशीच स्वगत पुटपुटले. अजून स्पीड वाढवत जीप शेताडी तुडवत पळत राहिली, आणि दहा मिनिटात त्या शेताडी नंतर हायवे उगवला. एक गचका घेत जीप पायवाट ओलांडत तिरपी जात हायवेला लागली. आणि समोर यामाहा बघून, "गाठलं बघ.."
बस्स्! जीप पुन्हा वारा प्यायल्या सारखी पळत सुटली. जीपने साधारण सहा सात मैलाच अंतर तोडल आणि हायवे वर पुल लागला. आणि मागं जीप बघून यामाहा अजूनच जीव तोडत पळू लागली आणि पुढे गावात एन्ट्री करत गल्लीबोळातून मार्ग काढत वेडीवाकडी पळू लागली. एवढ्या लांब पाठलाग करूनसुद्धा आता गल्लीबोळात गाडी शिरल्यामुळे त्यांना पाठलाग करण अवघड होऊन बसले. जीपला ब्रेक दाबत त्यांनी स्टिअरिंग व्हील वर दाणकन हात मारत स्वतःच फ्रस्ट्रेशन व्यक्त केलं, आणि अचानक आजूबाजूला नजर टाकत काही सुचत त्यांनी मोबाईल काढत नंबर डायल केला, "सुलेमान, गाडी नंबर MH01C2323 तुझ्या गल्लीत एंटर केलीय, मला ती गाडी कोणाची आहे, कुठं गेली सगळी माहिती हवीय. तुझी माणसं कामाला लाव आणि लवकरात लवकर मला माहिती दे." कॉल कट करत जीप पुन्हा वळवत माळरानाकडे पिटाळलि.

**********
आज आभाळाकडे बघितलं, ते निरभ्र आकाश पाहून सुद्धा त्याच्या डोळ्यांच्या कडा अलगद ओल्या झाल्या. हातातल्या वेगवेगळ्या वर्तमापत्रांवर हेडलाईन्स दिसत होत्या..
'एव्हरी वन हॅव देअर ओन मिस्ट्री...'

उत्तर - प्रतिउत्तर, हेवेदावे यांचं राजकारण या हत्यासत्रांमूळ उफाळून आलं होत...
"खुनी मोकाट. अद्याप ओळख सुद्धा न पटलेल्या मृतांची संख्या वाढत आहे. "

" खुन पडत असताना, मंत्री जलस्यामधे मग्न "

" शहर असुरक्षीत ? परप्रांतीयाना बाहेर काढा "

" सरकार झोपले आहे काय.?"

"अजून अस्वस्थ व्हा.. माझा शेवटचा घाव बसल्यावर आठवेल माझा भूतकाळ... माझ्यावरचे खोटे आळ.. मी शांत बसणार नाही.." डोळ्यांत वेडसर झाक आणि ओठांवर क्रूर हसू... "शून्यात अडकवल होततं ना मला... आता तुम्ही गोल गोल फिरत बसाल." भरघोस मिश्यांवर पालथा हात फिरवत स्वतः सोबत स्वगत करत राहिला.

"या केस वर काम करत असल्याचा रिग्रेट करशील अभ्यंकर.. वडिलांचं कर्ज मुलगाच परत करणार ना.. तयार रहा, आज ना उद्या... पण होणार नक्की.."

**********
दुसरीकडे त्याचं वेळी...

"एक काम सांगितलेलं धड करता येत नाही. एकतर पहिल्यांदा ते लॉकेट हरवलंत ते हरवलंत आता त्या इन्स. वर गोळी चालवून आलात... आलात ते आलात, ते लॉकेट तिथंच त्याला आहेर म्हणून देऊन आलात. माणस नाहीत अकलेचे कांदे पाळलेत मी ..."

ती व्यक्ती त्या जुनाट वेअर हाऊस मध्ये लांब लांब ढागा टाकत येरझाऱ्या घालत समोर मान खाली घालून उभ्या असलेल्या दोघांवर आरडा ओरड करत होती. "आता तो इंस्पे. भुतासारखा मानगुटीवर बसेल तेंव्हा डोक्यात प्रकाश पडेल तुमच्या...!!" ती व्यक्ती तणतणत त्यांना झापत होती.

"मंग्या भाई, बॉस च डोकं सरकलंय बहुतेक..."
शऱ्या मंग्या ला खुसपुसत म्हणाला आणि मंग्याच्या मग्रूर चेहऱ्यावर उपहासात्मक हास्य पसरलं. तो कुजबुजत मंग्या ला बोलला, "बरोबर बोलतोयस लेका तू... भलाई का जमाना ही नाही रहा... मी आपलं आपल्या मार्गातील द्व्याप जाईल म्हणून त्या चिकण्यावर गोळी झाडली. आता तो गरजेपेक्षा जास्तच चपळ निघाला त्याला मी काय करू?.. पण अजून एक म्हणजे त्याच्यावर मी एकट्यानेच गोळी झाडली नाही हा... तिथं अजून एक इसम होता. आणि त्याला त्या चिकण्याचा जीव घ्यायचाच होता. असो, आपल्याला काय...??? पोलिस आहे तो... ढीग भर शत्रू पाळून ठेवले असणारंयत..."

**********

Group content visibility: 
Use group defaults

संध्याकाळच्या ०३:०० - ०४:००>>>
ही अगदी अगदी पहाटेची वेळ आहे.
काही भाग पुन्हा पडलाय. एडीट करायला पाहिजे.

एडिट केलाय पुन्हा...
वाचून पहा...
@Ajnabi, @केशवकुल
आणि संध्याकाळ ची ०३:०० - ०४:०० ही वेळ पहाटेची आहे अस का म्हणाला मला कळलं नाही @केशवकुल...

आणि मला फोटो कसा add करायचा ते सुद्धा सांगा कोणतरी... ते फोटो add करण्याच्या प्रयत्नातच खर तर repeat पराग्राफ add झालेला ...

I think he wanted to say that 0300 - 0400 hrs are in morning
In evening it's 1500-1600 hrs (I think it's late afternoon though)

ओह ओके...
बदल केला आहे...
@अज्ञातवासी.. thanks
@केशवकुल ...Thank you

फोटो च कोणीतरी सांगा रावं.....

मोठे भाग टाका प्लीज>>>>>

पुढचा भाग मोठा टाकेन...
फक्त पार्ट लेट पोस्ट होईल म्हणून छोटे जेवढे टाइप होइल तर पार्टस पोस्ट करत होते..
फक्त जे रोज पोस्ट करत होते ते आता एक दिवसाआड पोस्ट करत जाईन..

छान पकड घेतली आहे कथेने

छोटा किंवा मोठा, रोज किंवा दिवसाआड, पुढचे भाग सोयी नुसार पोस्ट करा

छान पकड घेतली आहे कथेने

छोटा किंवा मोठा, रोज किंवा दिवसाआड, पुढचे भाग सोयी नुसार पोस्ट करा>>>>>>>

Thank you

छान पकड घेतली आहे कथेने

छोटा किंवा मोठा, रोज किंवा दिवसाआड, पुढचे भाग सोयी नुसार पोस्ट करा>>>>>>>

Thank you