मराठी भाषा गौरव दिन २०२३-खेळ पुस्तकांचा- शीर्षक ओळखा

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 11:34

Screenshot_20230228_110105.jpg
मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!

पहिला संच
books1.pngपहिल्या संचाची उत्तरं
ans1.png
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले

दुसरा संच
books2.pngदुसऱ्या संचाची उत्तरं
ans2.png
दुसऱ्या संचाची उत्तरं
१.माणसे अरभाट आणि चिल्लर
२.शिवार
३.बखर बिम्मची
४. अमृतफळे
५.ओंजळधारा
६.निळांसावळा
७. गाव
८.पैलपाखरे
९.पारवा
१०.मुग्धाची रंगीत गोष्ट

books3.pngans3.png
१. खरं सांगायचं म्हणजे
२. काजवा
३. वर्षा
४. गंधर्वयुग
५. लिलीचे फूल
६. एका मुंगीचे महाभारत
७. उन्ह आणि पाऊस
८. आठवण
९. गुणाकार
१०. अश्रूंचे झाले हिरे

books4.pngसंच पाचवा -
पुढील अक्षरसंचात नऊ पुस्तकांची नावे विखुरली आहेत. बघा बरं, तुम्हांला मिळतात का? आधीच्या चौकटींसारखी यात अन्य अक्षरे नाहीत. सगळी अक्षरे वापरली जायला हवीत. ही सगळी पुस्तके वेग वेगळ्या लेखकांची आहेत, पण त्यांत एक साम्य आहे. पुस्तकासोबत लेखकाचं नावही लिहाल तर उत्तम!
उ णीं ळ क्क ल्या आ नी
तं व रा अ च चं ल
प चे अं र जि य
ब आ क्षी रा शी आ न
रा प त मा णं दा
लु ठ त ळ उ मु कॉ

पाचव्या संचाची उत्तरं
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
जिणं आमुचं - बेबी कांबळे
आयदान - उर्मिला पवार
कॉलनी - सिद्धार्थ पारधे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आलं बरोबर. Happy

(जाण्याची नोंद- येण्याची नोंद करण्यानं शालीत पाय अडकून पडायची वेळ आली. )

एका मुंगीचे महाभारत
अश्रूंचे झाले हिरे
उन्ह आणि पाऊस
वर्षा? चैन ?
खरं सांगायचं म्हणजे
काजवा
गाठ?
गंधर्व युग

आठवण
मृग
लिलिचे फूल
एका मुंगी चे महाभारत
उन्ह आणि पाऊस
गुणाकार
अश्रुंचे झाले हीरे
गंधर्व युग
काजवा
वर्षा / चैन

अमितव आणि सुहासिनी, तुम्ही दोघांनी मिळून दहाही पुस्तके शोधलीत. अभिनंदन!
उत्तर हेडरमध्ये देतो आहे.
काही जास्तीची पुस्तकेही आली आहेत.

गोपुरांच्या प्रदेशात
दुर्दम्य
मन्वंतर
कळ
वेगळं जग
खाली उतरलेलं आकाश
तलावातले चांदणं
अमृत
कडू आणि गोड

पहिली सहा पुस्तकं सोडली तर बाकीची पुस्तके आहेत का नाही माहित नाही.

माझे मन, छान !

कळ हे पुस्तक आहे. पण या लेखकाचं नाही.

दलित साहित्य हा धागा दिसतोय.
उचल्या - लक्ष्मणराव गायकवाड
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी?
जिणं आमुचं
शेवटची २ मी नाही वाचलेली. लेखक पण आता आठवेनात

छान!
आता तीन नावे राहिलीत. लेखकांची नावे आठवत असतील, तर तीही लिहा.

बरोबर. मला हे नावच आठवेना, उर्मिला पवार यांचे कुठलं पुस्तक विचार करत बसले. गुगल करायचा कंटाळा आला. बाकी बरीच वाचली आहेत पण यादीत नाहीत ती. काही वर आली आहेत. यावरून काही वाचायची आहेत अजून तेही समजलं.

कॉलनी - सिद्धार्थ पारधे

Pages