ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.
पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.
त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.
लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..
पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.
चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.
पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!
या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.
आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.
त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.
सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे
)
वीएफएक्स आणि अॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली
)
अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.
जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.
दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.
बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.
आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.
ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.
मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा 
तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.
अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.
असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्या पब्लिकला दोन विशेष टिप्स -
१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.
२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा 
धन्यवाद,
ऋन्मेष
कधी कधी वाटतं की प्रत्येक
कधी कधी वाटतं की प्रत्येक प्रतिसादाचे पैसे घ्यायला हवेत माबोने.
>>>
कधी कधी मलाही वाटते की माझा प्रतिसाद वाचणाऱ्यांकडून मी पैसे घ्यायला हवेत
>>कधी कधी मलाही वाटते की माझा
>>कधी कधी मलाही वाटते की माझा प्रतिसाद वाचणाऱ्यांकडून मी पैसे घ्यायला हवेत<<
सांभाळ रे बाबा, नको ती गोष्ट मॉनेटाय्ज करायला जाशील आणि कोणितरी मानसिक छळाचा दावा ठोकायचा तुझ्यावर...
आणि कोणितरी मानसिक छळाचा दावा
आणि कोणितरी मानसिक छळाचा दावा ठोकायचा तुझ्यावर...
>>>>
ठोकू द्या की
आयुष्यभर सिद्ध करत राहतील
मैं तुम्हारे प्यार मे पागल हो
मैं तुम्हारे प्यार मे पागल हो गया हु.
हे वाक्य प्रतेक प्रतिसाद च्या शेवटी लिहीत जा.
म्हणजे प्रतिसाद मध्ये वजन येईल.
शाका नी कधी मायबोली वर येवून वाचले तर तो पण भावना विवेश होईल.
आम्ही तर प्रतेक प्रतिसाद जो निर्मळ प्रेमाचा प्रतीक असतो तो वाचून भावनिक होतो.
मैं तुम्हारे प्यार मे पागल हो
मैं तुम्हारे प्यार मे पागल हो गया हु.
हे वाक्य प्रतेक प्रतिसाद च्या शेवटी लिहीत जा.
म्हणजे प्रतिसाद मध्ये वजन येईल.
शाका नी कधी मायबोली वर येवून वाचले तर तो पण भावना विवेश होईल.
आम्ही तर प्रतेक प्रतिसाद जो निर्मळ प्रेमाचा प्रतीक असतो तो वाचून भावनिक होतो.
मैं तुम्हारे प्यार मे पागल हो
मैं तुम्हारे प्यार मे पागल हो गया हु.
हे वाक्य प्रतेक प्रतिसाद च्या शेवटी लिहीत जा. >>> हेमंत सरांची घणाघाती फलंदाजी आजही सुरूच.
ला जवाब युक्तिवाद
ला जवाब युक्तिवाद
जे असे प्रत्येकवेळी लिहावे
जे असे प्रत्येकवेळी लिहावे लागेल ते प्रेम कसले..
प्रेमावर एक वेगळा धागा हवा
हल्ली ते एखाद्यावर वेड्यासारखे प्रेम करायची पद्धत लोप पावली आहे..
शाहरूख देखील हल्ली रोमान्स सोडून ॲक्शन करू लागला आहे.
कधी कधी येत्या पिढीची चिंताच वाटते.
तूर्कीला मदत साहित्य घेवून
तूर्कीला मदत साहित्य घेवून जाणाऱ्या भारतीय विमानाला पाकिस्तान ने प्रवेश नाकारला !
पण बॉलीवुड मधील पठाण मध्ये मात्र पाकिस्तान ची आय एस आय भारताला मदत करताना दाखवलय , वास्तवात
आय एस आय ने मदत केल्याचे आज पर्यंत ऐकलेले नाही .
तरीही मूर्ख पब्लिक सिनेमा ला डोक्यावर घेत आहे .
अरे वा! बघितला का तुम्ही पण
अरे वा! बघितला का तुम्ही पण पठाण!
पाकिस्तान ला क्लीन चीट
पाकिस्तान ला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न करणारा मूव्ही मी बघत नाही !
बॉयकॉट गँग / भाजप गेली मसणात !
पाकिस्तानी गुडघे मेंदु लोकं आपल्या जवानांचे शिर कापून , नेवून विकृतीचे प्रदर्शन घडवतात .
त्यांच्या आय एस आय ने कित्तेक वेळा भारतात अतेरिकि हल्ले
करवून निरपराध सामान्यांचा बळी घेतलेला असताना हाकल्या शारक्या फक्त गल्ला डोळ्यासमोर ठेवून पोर्कीज आय एस आय ला भारता बाबत सॉफ्ट दाखवतो आणि येथील येडी गाबळी पठाण ला डोक्यावर घेतात .
वास्तवात
वास्तवात
आय एस आय ने मदत केल्याचे आज पर्यंत ऐकलेले नाही
>>>>
असूही शकते नसूही शकते
अश्या गोष्टी बाहेर येत नाहीत
पाकिस्तान ला क्लीन चीट
पाकिस्तान ला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न करणारा
>>>>
भारतीय पठाण आयएसाअयची एक पोरगी पटवतो यात पाकिस्तानला क्लीनचीट कुठे आली.
आधी पिक्चर तर बघा. मग बोलूया
आणि येथील येडी गाबळी पठाण ला
आणि येथील येडी गाबळी पठाण ला डोक्यावर घेतात .
यात तुम्हाला कोणी ठराविक येडा गबाळा अभिप्रेत आहे का ?
चित्रपट न बघता काहीही लिहतात.
चित्रपट न बघता काहीही लिहतात... कोण पसरवते असले चुकीची माहिती...
आयेसाय ची मुलगी पाकिस्तानला
आयेसाय ची मुलगी पाकिस्तानला आणि आएसायविरोध करून भारतीय पठाणला मदत करते. उगाच न बघता फोक्या मारू नका.
आता इथे पाकिस्तान कोठून आला.
आता इथे पाकिस्तान कोठून आला.
आयएसआय कोठून आली.
पठाण बघणारे पाकिस्तान प्रेमी आहेत हा अर्थ कोठून आला.
उगाच वेगळे वळण देण्यात काही अर्थ नाही.
Shaka Muslim आहे म्हणजे भारत विरोधी आहे.
हे पण चुकीचे आहे.
मी विरोध करत होतो ते दाव्यांस.
६००, कोटी कमावले ह्या पेक्षा किती लोकांनी बघितला हे महत्वाचे.
Shaka शिवाय बॉलिवूड चालणार च नाही.
हे असले फालतू विचाराचा मी विरोध केला आहे.
पण हे पाकिस्तान, आयएसआय हे काही पटत नाही.
ह्या धाग्यावर
पठाण बघणारे पाकिस्तान प्रेमी
पठाण बघणारे पाकिस्तान प्रेमी आहेत हा अर्थ कोठून आला.
>>>
बॉयकॉटवाले
पण चित्रपटात असे काही नाहीये हे बघितलेल्यांना समजले आणि त्यांनी तसे पसरवले.
पण हे पाकिस्तान, आयएसआय हे काही पटत नाही.
ह्या धाग्यावर
>>>>
हो, ते या धाग्यावर नकोच. राजकारणी आयडी उतरले की पठाणला लहूलौहान करून टाकतील.
त्यापेक्षा बॉक्स ऑफिस कलेक्शन चेक करूया.. कुठवर पोहोचलेय....
दिल दहला देने वाले आकडे
दिल दहला देने वाले आकडे
In 13 days, Pathaan has recorded $39.41 million in the overseas territories alone, while nett collection in India stands at 438.45 crore (Hindi – 422.75 crore, Dubbed – 15.70 crore)! The total worldwide gross is an incredible 849 crore (India gross: 525.80 crore, overseas : 323.20 crore)!
हे 600, की काय ते जागतिक
हे ८४९ करोड की काय ते जागतिक कलेक्शन आहे काय?
जागतिक कलेक्शन असेल तर हा सिनेमा काही जास्त लोकप्रिय नाही.
जुरासिक पार्क ह्या प्राण्यांना वरील सिनेमा नी ६ billion American dollar इतके collection केले होते.
करा भारतीय रुपयात कन्व्हर्ट आणि त्या मध्ये पठाण कुठे बसतोय ते बघा.
या हिशोबाने मराठी चित्रपटांना
या हिशोबाने मराठी चित्रपटांना तुच्छच लेखायला हवे.
मराठी हिंदी ईंग्लिश चित्रपटांचे मार्केट वेगवेगळे असते.
हिंदी चित्रपटांशी तुलना करा आणि बघा..
अरे हो त्याची गरजही नाही..
तुम्हाला तुलना करायला हॉलीवूड चित्रपट आणावा लागला यातच ते आले की पठाण हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे..
अवांतर - ८४९ नाबाद आहे. अजून फुगतोय आकडा
पहिल्या पानावर तेच तेच धागे
पहिल्या पानावर तेच तेच धागे बघुन वैताग आलाय..
तो शाहरुख खान पण आता पठाण ला विसरुन पुढच्या कामाला लागला असेल.
बास करा आता हे गुर्हाळ.
शाहरुख साठी एखादा स्वतंत्र ग्रुप करुन आणि असले शाहरुख्मय धागे तिकडे हलवता आले तर किती बरं होईल. म्हणजे आम्हाला बाकी चांगले धागे दिसतील तरी.
+७८६
+७८६
लोकं शाहरूखवर सुरू झाले की थांबत नाहीत.
माझा धागा आहे तरी अजून दोनतीन लोकांनी धागे काढले.
याच धाग्यात लिहिले असते तर चांगले झाले असते.
जुरासिक पार्क ह्या
जुरासिक पार्क ह्या प्राण्यांना वरील सिनेमा नी ६ billion American dollar इतके collection केले होते.
>>> कसे जमते असे आकडे फेकायला... अवतार ने देखील 3 बिलियन क्रॉस नाही केला... तो highest grosser आहे...
च्रप्स
च्रप्स
चू भू देणे घेणे.
अति उत्साहात होऊन जाते.
>>जुरासिक पार्क ह्या
>>जुरासिक पार्क ह्या प्राण्यांना वरील सिनेमा नी ६ billion American dollar इतके collection केले होते.
>>> कसे जमते असे आकडे फेकायला...<<
हेमंतशेठ इज राइट. जुरासिक पार्क मुविज (फ्रँचाय्ज) चं बॉक्स ऑफिस कलेक्शन $६बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे...
बाकि एका गाजलेल्या फ्रँचायजीची तुलना पठाणसारख्या टुकार सिनेमाशी करणं हे बरोबर नाहि, पण तो वाद ऋन्म्यावर सोडुया...
६ बिलियन बरोबर म्हणायला रेष
६ बिलियन बरोबर म्हणायला रेष किती आणि कशी खेचायची याला काही धरबंध?

ऋन्मेशला चिअरअप करायला https://www.boxofficemojo.com/year/world/2023/
आणि लाईफ टाईम ग्रॉस मध्ये जुरासिक पार्क पहिल्या तिसातही नाही. इतर आहेत. अवतार आणि अॅव्हेंजर्स सोडून जुरासिक पार्क का आठवला कोण जाणे.
त्यात डायनासोर hero आहे.
त्यात डायनासोर hero आहे.
एक प्राणी मुख्य भूमिकेत असून पण सिनेमा खूप चालतो.
अभिनेत्याची गरज नाही.
तेरी मेहरबानी या फक्त कुत्र्या मुळे चालला.
हेच सांगण्यासाठी.
जुरासिक पार्क
देवा!
देवा!
त्यात डायनासोर hero आहे.
त्यात डायनासोर hero आहे.
एक प्राणी मुख्य भूमिकेत असून पण सिनेमा खूप चालतो.
अभिनेत्याची गरज नाही.
>>> हेमंत सर इतकी उत्तम कॉमेडी फ्री का करता ? तिकीट ठेवा, ज्युरासिक पार्कचे ६ बिलियन फिके पडतील.
Pages