ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड! - चित्रपट पठाण

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 January, 2023 - 08:09

ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!

गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.

२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.

पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.

हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.

या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.

पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अ‍ॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.

त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.

लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..

पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.

चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.

पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!

या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.

आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.

त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.

सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अ‍ॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे Happy )

वीएफएक्स आणि अ‍ॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली Happy )

अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अ‍ॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.

जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.

दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अ‍ॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.

बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.

आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.

ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.

मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्‍या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा Happy

तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अ‍ॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.

अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.

असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्‍या पब्लिकला दोन विशेष टिप्स -

१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.

२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणताही पुरस्कार कितीही नावाजला गेला तरी तो शाहरूखसारख्या सुपर्रस्टारपेक्षा मोठा नसतो हे त्याने कायम लक्षात ठेवायला हवे..

हेमंत सर , अगदी मनातील बोललात !
एखादा फलंदाज त्याच्या मनगटातील कला फटक्या द्वारे दाखवतो , तसे तुमचे शब्द आहेत . वाह !!!!!
ऑस्कर शिवाय कोणताही अभिनेता परिपूर्ण असूच शकत नाही .
सारुक बद्दल फारतर म्हणता येईल की गुंतवलेले पैसे परत मिळण्याची हमी असलेला गल्लाभरू कलाकार ....
पण तो ऑस्कर च्या जवळपासही फिरकू शकत नाही .
हॉलिवूड मधील देखील ड्यानीयल क्रेग सारखे जेम्स बाँड सिरीज तुफान सक्सेस करणारे सारुक सारखे गल्लाभरूच निघाले .
रूनमेषराव चे सारुक वरील प्रेम समजू शकतो , पण हेमंत सरांनी सारुक बद्दल काळया दगडावर रेषा ओढली आहे ......

अहो फुरोगामी आम्ही तर तुम्हाला देशप्रेमी समजत होतो पण तुम्ही तर विदेशी पुरस्कारांचे गोडवे गायला लागलात. कुठे फेडणार ही पापं Proud

सारुक बद्दल फारतर म्हणता येईल की गुंतवलेले पैसे परत मिळण्याची हमी असलेला गल्लाभरू कलाकार ....
>>>>

मन गुंतवले की आयुष्यभर भरमसाठ आनंद मिळण्याची हमी असलेला सुपर्रस्टार Happy

यही तो प्यार हैं.
प्रेमात सर्व आंधळे होतात .ह्या वाक्याची सत्यता कोणाला पडत नसेल तर त्यांनी ऋनमेष, शारुख ह्यांच्या प्रेमाची कहाणी वाचावी.
त्यांचे उदाहरण डोळ्या समोर ठेवावे.

Sharukh nantar bollywood बंद होईल काय?,
तो विचार करूनच अंगावर काटा येत आहे.
हिंदी सिनेमे तयार च होणार नाहीत शाहरुख नंतर.
सो horrible

पठाण गेला नाही ऑस्करला यातून ऑस्करचा दर्जा कळतो >> नाटु नाटुला ऑस्कर मिळणे म्हणजे सखाराम गटण्याने 'सर, हे पेढे; प्राज्ञ परीक्षेत पास झालो' म्हणण्यापैकी आहे असं वाटायला लागलं मला हे वाचून Happy

त्यांनी ऋनमेष, शारुख ह्यांच्या प्रेमाची कहाणी वाचावी.
>>>>

करोडो लोकं आहेत शाहरूखप्रेमात.
मायबोलीवर हजारो असतील.
फक्त त्यांना आजवर कोणी हाक दिली नाही.
हाक द्यायचा विचार जरूर आहे.
पण ईतक्यात नाही. ऑगस्ट महिन्यात. एक शाहरूख गटग करायचा विचार आहे.. त्याचा धागा लवकर काढेनच. जेणे करून भारताबाहेरून येणारे शाहरूखप्रेमीही आपल्या फ्लाईटची तिकीटे आताच बूक करून ठेवतील..

पण तुम्ही तर विदेशी पुरस्कारांचे गोडवे गायला लागलात. कुठे फेडणार ही पापं Proud>>>>>>>>
ऋन्मेशसरांना बरं वाटावं म्हणून थोडा उपरोधाचा तडका मारला होता हो Happy
त्यातील सारुक उल्लेखावरून तुमच्या लक्षात यायला हव होत !

आला प्राईमवर?

पठाण आणि अवतार यांची मजा थिएटरलाच बाकी..

Prime वर आलं असेल तर धावती नजर मारतो.
ऋनमेष खूप स्तुती करत आहे बघुया त्यांची आवड काय प्रकार ची आहे

'सर, हे पेढे; प्राज्ञ परीक्षेत पास झालो' >>> "उत्तीर्ण"... हपा तुमच्या कडुन ही अपेक्षा नव्हती Happy

Prime वर आलं असेल तर धावती नजर मारतो
>>>
नजर धावतीच राहते पिक्चर बघताना. वेगवान चित्रपट. एक क्षण स्वस्थ बसू देत नाही शाहरूख Happy

बघितला प्राइमवर. महाभंगार आहे. थिएटरमधे न बघुन पैसे वाचवल्याबद्दल स्वत:ला शाबासकी दिली >>>>>>>
मी पण अर्धा तास बघितला असेल !
मला आश्चर्य वाटले की या सिनेमाने १०० कोटी तरी कमवले कसे काय ?
काय ते विमानाच्या हुक ला अडकून हवेत उडणे !
सारुख ने बिकनी चा वाद क्रियेट करून देखील कुंपणावरील हिंदूंनी पठाण च्या पारड्यात वजन टाकल्या मुळेच चालला अन्यथा एकदम भंकस आहे .

पठाण बघायचा केविलवाणा प्रयत्न केला. अगदीच जमला नाहिये..पाकिस्तान ची हिरॉईन, वॉर वगैरे नेहमीचाच मसाला.
शाखा पेक्षा जॉन आय कँडी दिसतोय..जबरदस्त बॉडी.
मला आणि मुलीला शाखा आवडत असून ही पूर्ण पाहवला नाही..अगदीच काही मिळाले नाही तर उरलेला बघेन किंवा नाही.

बरं झालं थियेटरात पैसे घालवले नाहीत.

शाखा ने बॉडी कमावलीय पण फेस खंगलेला दिसतोय.. डीयर जिंदगी सारखे रोल्स करावेत त्याने..त्यात तो मोहक वाटतो.
उगा केस फेकत माकड उड्या मारण्या ला लोक वाहवा करतात. ह्या धाग्याचे टायटल लॉल आहे.

रुन्मेश तू डीफेंड करत येऊ नकोस..हा प्रतिसाद चित्रपटा विषयी आहे..तुझा काहीच संबंध नाही.

रुन्मेश तू डीफेंड करत येऊ नकोस.
>>>

भारतातल्या सर्वात मोठ्या सुपर्रस्टारला मी काय डिफेंड करणार Happy

पीके मधील लास्ट सीन आठवला.
हमे अपने भगवान की रक्षा करनी आती है.
त्यावर आमीर छान सुंदर उत्तर देतो.

Pathaan OTT Release: ‘पठान’ के ओटीटी पर आते ही सर्वर हुआ क्रैश, डिलीटेड सीन देख फैंस हुए खुश

Additional scenes in #Pathaan extended cut with timestamp:

- Dimple Kapadia's discussion in flight - 1:10:00
- Pathaan's torture in Russian Prison - 1:10:16
- Pathaan's return to JOCR & discussing plan to catch Jim - 1:30:00
- Rubai being interrogated - 1:42:12

शाहरूखला कितीही बघा.... मन भरतच नाही Happy
सर्वर क्रॅश नाही होणार तर काय होणार...

ऋनमेष.
चे स्वतःचे ते मत आहे.
पण सिनेमा भंगार आहे.
सरळ दहा मिनिट पण बघणे अवघड होते.
कथेत बिलकुल दम नाही.
फालतू स्टंट.
त्या पेक्षा तो baby बरा होता.
कथा , डायलॉग दमदार हवेत.
ते पठाण मध्ये नाहीत.

ऋनमेष.
चे स्वतःचे ते मत आहे.
>>>

हो.
मी जे लिहितो ते माझे मत असते. तुम्ही जे लिहिता ते तुमचे मत असते.

आता प्रश्न असा आहे की बहुतांश लोकांचे मत काय आहे?
तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमावलेला गल्ला आणि ओटीटी सर्वर क्रॅश झाल्याचे पाहता ते ओळखणे अवघड नाही Happy

कथेत बिलकुल दम नाही.
फालतू स्टंट.
त्या पेक्षा तो baby बरा होता.
कथा , डायलॉग दमदार हवेत.
ते पठाण मध्ये नाहीत.
..
..
..
>>>>

थोडक्यात चित्रपट पुर्णपणे शाहरुखने आपल्या खांद्यावर पेलला आहे Happy

Lol

K3G
पण असाच हिट होता की

साऊथ सारखेच हजार कोटींचा पिक्चर आम्ही पण दिला म्हणून हो...
तोवर साऊथ वाले ऑस्कर जिंकून गेले.
वेगळीच रेस सुरू आहे.
Happy

Pages