ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.
पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.
त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.
लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..
पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.
चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.
पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!
या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.
आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.
त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.
सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे )
वीएफएक्स आणि अॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली )
अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.
जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.
दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.
बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.
आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.
ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.
मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा
तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.
अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.
असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्या पब्लिकला दोन विशेष टिप्स -
१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.
२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा
धन्यवाद,
ऋन्मेष
वर्षभर आधी लोकांना वेठीस धरून
वर्षभर आधी लोकांना वेठीस धरून, सहनशक्तीचा अंत होईल असे अवाजवी कौतुक करून शाहरुख खानबद्दल लोकांना नाव काढलं तरी डोक्यात जाईल अशा पद्धतीची अमानवी जाहिरात करून सुद्धा पिक्चर चालला.
यावरून शहाणे होऊन आता तरी या रिव्हर्स कौतुक मोहिमा थांबवा. या घाणेरड्या मोहिमेमुळे चित्रपट पडला नाही.
झिरो पडला म्हणून पठाण सुद्धा आपण पाडू या ओव्हर कॉन्फिडन्स ला प्रेक्षकांनी कानफटात वाजवली आहे. लोकच ठरवतात. झिरो, फॅन दणकून आपटले. लोकांनीच पठाण चालवला.
डोण्ट आस्क फॉर लॉजिक! डोण्ट एव्हर मेस विथ एस आर के or एसजे or एसटी.
Audience will break kanfat.
पठाण ने गल्ला जमवला यात वाद
पठाण ने गल्ला जमवला यात वाद नाही , पण इतका धंदा करील असे वाटले नव्हते !
थोड्यावेळा पूर्वी प्राईम वर वॉर मूव्ही बघत होतो , पठाण पेक्षा कितीतरी उजवा आहे .
घरातील इतरांना देखील पठाण मूव्ही आवडला नाही म्हणून त्यांनी वॉर लावला होता .
वॉर मध्ये विनाकारण रॉ ला व्हीलन स्वरूपात दाखवणे टाळले आहे .
शारुख च्या मैं हू ना मध्ये लष्करी अधिकारी व्हिलन दाखवला आहे , ज्या प्रमाणे पठाण मध्ये आहे .
पब्लिक ला लष्करातील आणि रॉ मधील व्हीलन मध्ये गुंतवून ठेवायचं , त्या अधिकाऱ्यांमुळे सामान्य तरुण अतेरीकी झाल्याचं दाखवायची कीड शारुक् च्या डोक्यात पसरली आहे .
आणि बहुतांश पब्लिक ने ती आयडिया डोक्यावर घेतली हे चांगले नाही .
शिवाय मुख्य म्हणजे वॉर मध्ये दाखवलेल्या स्टंट्स ला अनुरूप ऋतिक आणि टायगर वाटतात तरी .
पठाण मध्ये काहीही केले तरी शारुक म्हातराच दिसतो .
नेते, पोलिस, सरकारी अधिकारी
नेते, पोलिस, सरकारी अधिकारी भ्रष्टाचारी आणि क्रिमिनल असू शकतात आणि सिनेमात दाखवलेले चालतात मग रॉ एजंट आणि लष्करी अधिकारी व्हीलन का नाही दाखवायचे म्हणे?
बिकीनीच्या रंगावरून आणि गाण्यातल्या शब्दावरून राळ ऊठवायची पण मग तिचा काही ईफेक्ट दिसला नाही की ही राळ म्हणजे शाहरूखनेच सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी पब्लिसिटी स्टंट केला म्हणत अजून एक राळ ऊठवायची.
पठाण मध्ये काहीही केले तरी शारुक म्हातराच दिसतो . >> अहो म्हातार्या शाहरूखचा सिनेमा बघायलाच ही तोबा गर्दी लोटली. तो जर दहा वीस वर्षे तरूण असता तर काय झाले असते विचार करा. गुप्तहेर, अॅक्शन, बिकिन्या तर जेम्स बाँड सिनेमात पठाण पेक्षा कैक पटींनी भारी असतात पण पब्लिक गुप्तहेर, अॅक्शन, बिकिन्या नाही तर शाहरूखला बघायला गेली... माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर ऋन्मेषला विचारा.
सगळ्या मिडियातून एवढी खर्चिक आणि मोठी बॉयकॉट मोहीम चालवून सुद्धा तिला न जुमानता पब्लिक सिनेमा ऊचलून धरायला गेली... असेच तर २०२४ मध्ये म्हातार्या दिसणार्या राहुल गांधींना ऊचलून धरायला गेली तर ... बघा बुवा कल्पना करून. शेवटी सिनेमा हा समाजमनाचा आरसाच असतो असे म्हणतात ना!
एकदम बकवास. नविन काहिहि नाहि,
एकदम बकवास. नविन काहिहि नाहि, शारुख सकट. १५-२० मिनिटांनंतर पॉज केला, आणि नेफिवर "नाईट एजंट" चालु केली. हाऑका नंतर काहितरी सनसनाटि बघायला मिळतंय..
ती निगेटिव पब्लिसिटी झाली नसती तर सिनेला आपटला असता असं वाटु लागलंय...
नेते, पोलिस, सरकारी अधिकारी
चला ठीक आहे , दाखवू द्या रॉ चे अधिकारी भ्रष्ट !
मग आय एस आय ची लोकं भारतीय सरकार च्या अडचणी वाढवतात की मदत करतात ?
आत्ता पर्यंत शे दोनशे टेररिस्ट अटॅक आय एस आय ने भारतात घडवून आणले असतील की नाही ?
मग त्या कपटी आय एस आय च्या ऑफिसर ची मदत घेताना दाखवणाऱ्या पेक्षा आणि मन लावून पाहणाऱ्यांच्या बुध्दी ची किव येते !
बुडाखाली बॉम्ब फुटल्यावरच पाकड्या आय एस आय च्या क्रूरतेची खात्री पटेल का ?
पाकिस्तानी सिनेमाच्या क्लिप्स टाकतो , मग कळेल त्यांनी भारतीय लष्कर , आणि येथील जनते बद्दल तिकडे सतत कसे विष भरून ठेवत आहेत .
आधीच बॉलीवुड ने अती धार्मिक सहिष्णुता दाखवून हिंदू धर्माची नासाडी केली , त्यात पठाण सारखे मूव्ही आय एस आय ला क्लीन चिट देत आहेत .
हा धागा वाचून माझं मन भरून
हा धागा वाचून माझं मन भरून आलं आहे. मी आता शारुकचे एक मंदिर बांधायचा विचार करतोय. कृपया काही सूचना असतील तर जरूर कळवा, अशी नम्र विनंती. _/\_ धागा पळायला तितकीच मदतपण होईल.
ता.क. कृपया पुजारी म्हणून कुणी अर्ज करू नये, ती जागा आधीच भरली आहे.
किमान दोन चार वर्ष तरी
किमान दोन चार वर्ष तरी बॉलीवुडवाल्यांनी मौलाना ची दुसरी काळी बाजू दाखवली ( जसे पुजारी लोकांना विलन दाखवायचे ) तरच बॉलीवुड वरील बहिष्कार कमी होऊ शकतो !
पठाणचे नशीब जोरदार होते , फालतु मूव्ही असताना देखील इतका त्याने धंदा केला .
म्हणून शारुक चे अपकमिंग आणि बॉलिवुड मधील इतर मूव्ही हिट होतील अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे .....
सिनेमा न बघताच ( म्त्याहणजे
सिनेमा न बघताच ( म्हणजे तसं सा़ंगून) त्यावर जास्तीत जास्त
तेही असले अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहिणाऱ्यांच़ं कौतुक करावं तेवढं थोडंच्. आणि ते बेशरम ऱंग, भगवी बिकिनी यावर बरेच दिवसांत काही वाचलं नाही. ते विसरू नका.
असाच बहिष्कार घालत रहा. आधी ब्रह्मास्त्र आणि मग पठाण. अगदी फ्लॉप.
तेच अक्षयकुमार आणि कंगनाचे सगळे पिक्चर सुपरहिट. आहे की नाही आमची ताकद.
लालसिंग चढ्ढा मध्ये पाकिस्तानातले मौलवी अपप्रचार करतात, पाकिस्तान छुपं युद्ध खेळतो, असं दाखवल़ं, तो सिनेमा का हिट केला नाही?
आणखी दोन अडीच महिन्यांत शाहरुखचा जवान येतोय. त्याला बॉयकॉट करायची कारणं शोधली की नाही?
मग त्या कपटी आय एस आय च्या
मग त्या कपटी आय एस आय च्या ऑफिसर ची मदत घेताना दाखवणाऱ्या पेक्षा आणि मन लावून पाहणाऱ्यांच्या बुध्दी ची किव येते ! >> अहो नुसते रील लाईफमध्ये मध्ये रॉ एजंट आयएसआय ऑफिसरशी (जो बिचारा भारतीय कलाकारच आहे) हातमिळवणी करते हे पडद्यावर बघून तुमचे पित्त खवळते तर रिअल लाईफमध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन सर्वोच्च्य नेत्याशी हातमिळवणी, मेहमान नवाजी, हसीमजाक करतांना तुम्ही कोणा भारतीयाला बघितले तर तुम्हाला राग येईल की कसे?
लिंक पण अशा पेपर ची दिली जे
लिंक पण अशा पेपर ची दिली जे ६०० रू. ची भीक मागतय .
पाकिस्ताच्या आणि भारताच्या आत्ता पर्यंत च्या संबंधांत नवाज च काय तो शरीफ निघाला होता , मुशर्रफ आणि इम्रान पाताळयंत्रीच होते .
हवं तर इतिहास धुंडाळून बघा !
जाऊ द्या तो मुद्दा वेगळा आहे .
बेशरम बिकनी वैगेरे करणे होती , राईट विंग पब्लिक ला शारुख वर राग काढायचा होता , पण ते फेल झाले . पठाण मुव्हीचा फालतु , भंकस असून देखील ! हे विशेष नमूद करावेच लागेल .
पठाण हिट झाला म्हणजे सगळी खानावळ गँग आणि त्यांची चिल्ली पिल्ली बॉलीवुड मध्ये पुन्हा एकदा राज्य करतील , पुन्हा फक्त हिंदू धर्मावर टीका करणारे सिनेमा बनवतील अशी आशा सोडून द्या !
भीक मागावी तर अशी
पठाण - मिशन इंपॉसिबल - फॉल
पठाण - मिशन इंपॉसिबल - फॉल आउट ची भ्रष्ट नक्कल आहे असं म्हणातत म्हणे
नका ऐकू त्यांचे. ते जळ्कुटे
नका ऐकू त्यांचे. ते जळ्कुटे लोकं असतात. स्वत: पठाण बघून येतात आणि दुसऱ्यांनी या सुखापासून वंचित राहायला असे करतात.
आमच्या शाळेतही अशी मुले होती. स्वत: अभ्यास करून यायचे आणि दुसऱ्यांना म्हणायचे काय अभ्यास करतोयस. सोड चल खेळायला. अभ्यास करून कोणाचे भले झालेय वगैरे वगैरे
पठाण - मिशन इंपॉसिबल - फॉल
पठाण - मिशन इंपॉसिबल - फॉल आउट ची भ्रष्ट नक्कल आहे असं म्हणातत म्हणे >> भ्रष्ट नक्कल म्हणणे त्या शब्दांचा अपमान आहे. उगाच नकली वाटणारे व्ही एफ क्स वापरण्यापेक्षा आहेत त्या परफेक्ट कास्ट चा - त्यांच्या पर्सोना, स्वॅग, स्क्रीन प्रेसेन्स इत्यादी चा अधिक उपयोग करून घेतला असता तर एंटरटेनिंग तरी झाला असता असे वाटून गेले.
ऋन्मेषदा सर्वांना गोल गोल
ऋन्मेषदा सर्वांना गोल गोल फिरवून दाणकन आपटत आहेत.
त्यांच्या सापळ्यात नामवंतांची मंदीआळी सामील झाली आहे.
खूपच गुदगुल्ल्या होत आहेत.
on a serious note
on a serious note
https://joyojeet.people.si.umich.edu/pathaan/
एक अभ्यासपूर्ण लेख. या बॉयकोट मोहिमेचे विश्लेषण. या ट्रेण्ड विषयी माझे अंदाज खरे ठरले.
१ सुशांत च्या आत्महत्येपासून चेकाळलेले तथाकथित ssr warriors यात आघाडीवर होते.
२ तो 'शाहरुख' असूनही 'राज', 'राहूल', या नावानी रसिकांच्या मनात घर करून असतो, नेमके हेच त्यांना नको होते.
३ हे ट्रेंड वाले ९९.९९ % मोदी भक्त होते.
मन से रावण जो निकाले
मन से रावण जो निकाले
राम उसके मन मे है _/\_
- मोहन भार्गव, स्वदेस
सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा !
७-८ तुक्ड्यात बघितला , नाही
७-८ तुक्ड्यात बघितला , नाही आवडला , बोर झाला खुपच .
मन से रावण जो निकाले
मन से रावण जो निकाले
राम उसके मन मे है _/\_
- मोहन भार्गव, स्वदेसजावेद अख्तर झालंच तर विजय प्रकाश म्हणू शकता.
(No subject)
Pages