आपलं कोल्हापूर

Submitted by झकासराव on 14 October, 2008 - 22:07

मित्रहो,

कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची
लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का??
मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात.
मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर. मला स्वत:ला खिद्रापुरचे मन्दीर परत पहायच आहे. कारण आता त्याची स्मृती माझ्या मेन्दुतुन जास्तच पुसली गेली आहे. असे अनेक ठिकाण आहेत जे जावीच अशी आहेत.
कालच साप्ताहिक सकाळमधील एक लेख वाचला आणि जाणवल की अरे ह्यात मला माहित असलेल्या अनेक ठिकाणांची माहिती आहे की.
उदाहरणार्थ मसाई पठार. मी पैज लावु शकतो की ह्या विषयी कोणीच फारस ऐकलं नसेल.
हे पठार आणि त्यावर असलेली पांडव लेणी ही काहि वर्षापुर्वी (म्हणजे मी हाफ पॅन्ट घालुन शाळेत जात असताना) वादाच केंद्र झाल होत. त्यावेळीच काय त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ते प्रकरण थंड झाल.
मी ती लेणी पाहिली आहे. माझ्या मावशीच्या गावापासुन फारतर ५-६ किमी चालत गेल की मसाई पठार लागत.
मी कित्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे गेलो आहे.
तर अशा अनेक ठिकाणांची माहिती देणारा हा लेख वाचाच. आणि ह्या ठिकाणाना देखील भेट द्या.

http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html

(ह्या लिन्क वर गेलात की तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापुर ह्यावर क्लिक करा.)

ह्या लेखात तरी एका किल्ल्याचा उल्लेख राहिला आहे. रांगणा किल्ला. इतिहासाच्या पुस्तकात नकाशात हे नाव पाहिल होत आणी त्यानंतर विसरुनच गेलो होतो ह्या किल्ल्याविषयी. हा फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला. ह्याची माहिती लोकसत्ता मध्ये भटकंती सदरात आली होती. गगनगडाच्या आसपास आहे हा.

तसच वरच्या लेखात << कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे>> ही माहिती आहे.
कन्हेरी मठ बघणे हे मस्ट मस्ट आणि मस्टच आहे अस माझ मत झालय.
त्यानी तेथे वसवलेल गाव पाहुन मी अचंबीत झालो. खुप कष्ट घेतल आहे त्यासाठी त्या लोकानी. हे गाव बघण्यासाठी २५ रु तिकिट आहे पण ते खुपच कमी आहे असच वाटेल तुम्हाला. तिथे फोटो काढण्यास बन्दी आहे. पण त्यानी तिथेच एक बाग केली आहे त्याचे मी फोटो काढले आहेत.
त्यातील हे काही.
हे राशी उद्यान आहे. प्रत्येक राशीची माहिती आणि त्याच चिन्ह त्यानी बनवलेल आहे. हे चिन्ह बनवताना तीच पद्धत वापरली आहे जी त्या गावातले पुतळे बनवताना वापरली आहे. खालील फोटोत मेष रास दिसत आहे.

ही त्याच बागेतील बसण्याची व्यवस्था.

अजुन काहि फोटो पहायचे असतील तर ते खालील लिन्क वर आहेत.
http://picasaweb.google.com/zakasrao/KanheriMath?authkey=ZQsGxI7GWbU#

मग येणार ना कोल्हापुरला?? आणि हे सगळ पाहणार ना??
ह्यातील एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर बिन्धास्त विचारा मी देइनच.
नक्की या Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो भाकरी म्हणजे ज्वारीचीच तिथे, सध्या थंडीमध्ये बाजरीची पण मिळेल... आणि अगदी दोन्ही हातात मावणार नाही इतकी मोठी

कोल्हापुरात एक मी पाह्यलं दर ४-५ घरांमागे एक तरी कलाकार (चित्र, शिल्प व इतर दृष्य माध्यमे!) असतोच.. किंवा जास्तच.
चित्र काढणं याला रिकामटेकडे धंदे म्हणून हिणवलं जात नाही बहुतेक..

४-५ घरांमागे एक तरी कलाकार >>
खर आहे नीधप.. याचे बरेचसे श्रेय शाहू महाराजांना द्यायला हवे.. त्यानी खेडो-पाड्यातून येणार्‍या लोकाना राजाश्रय दिला.. म्हणुन तेव्हा पासून पिढिजात कुटुंब कोल्हापुरात आहेत..कला जोपासत आहेत.

ह्म्म्म सगळ्यात महत्वाचं आहे हे. संपूर्ण मराठी समाजामधे केवळ कोप मधेच दृष्य कलांना, दृष्यात्मकतेला महत्व आहे.
त्याबाबतीत पुणं सगळ्यात कमनशिबी. एक चांगली आर्ट गॅलरी जिथे खूप काही 'बघायला' मिळेल अशी नाही. कलाछाया आणि सुदर्शन मधे काही काळ चालू होता तो उपक्रम सोडल्यास. हे उपक्रमही हल्लीहल्लीच चालू झालेले.
बाकी बहुतांश आर्ट ग्यालर्‍यांमधे घरगुती सजावटीच्या आणि इतर गोष्टींच्या वस्तूंची प्रदर्शनं भरलेली.

अरे केदार पण रस्त्यांचं काम तर सुरुय. मी रोज फोन करुन भावाला विचारत असतो. वरती कुणीतरी म्हटलय की पुर्ण कोल्हापुरच नवीन बांधतायेत. तसं वाटणं साहजिका असण्याइअतपत बेकार अवस्था झालीय रस्त्यांची. खरंच!

Pages