
नमस्कार !
2022 ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षात आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांचा धावता आढावा या लेखात घेत आहे. गेली ३ वर्षे संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या covid-19 या रोगासंबंधीचे संशोधन चालूच आहे. परंतु याची विस्तृत माहिती संबंधित धाग्यावर आतापर्यंत आलेली असल्याने या विवेचनातून या आजाराला पूर्णपणे वगळलेले आहे.
१. मधुमेह प्रकार-१ : यामध्ये स्वादुपिंडाच्या इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश झाल्यामुळे अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनच्या उपचारावर राहावे लागते. अशा रुग्णांसाठी सध्या विविध स्वयंचलित इन्सुलिन इंजेक्शन प्रणाली अस्तित्वात आहेत. यंदाच्या संशोधनात अशी एक अत्याधुनिक प्रणाली विकसित केलेली आहे. त्याला ‘बायोनिक पॅनक्रिआज’ म्हणतात.
या आजाराच्या या पुढील संशोधनाचा टप्पा अधिक रोचक आहे. उच्चरक्तदाबासाठी उपचार म्हणून वापरण्यात येणारे verapamil हे औषध इन्सुलिन-निर्मिती पेशींचा नाश रोखू शकते. त्यावर अभ्यास चालू आहे.
२. मेंदू विकारांच्या संदर्भात यंदा बऱ्यापैकी संशोधने झालेली आहेत. म्हातारपणी स्मृतिभ्रंश ही एक महत्त्वाची समस्या उद्भवते. सध्या त्यासाठी काही औषधे अस्तित्वात आहेत. परंतु औषधांविनाचे उपचार यावर बऱ्यापैकी संशोधन सातत्याने होत आहे. मेंदूचे विशिष्ट भाग लो फ्रिक्वेन्सी प्रवाहांच्या सहाय्याने चेतवल्यास स्मृतीपेशींचे कार्य अबाधित राहू शकेल का, यावरील विविध प्रयोग नेटाने चालू आहेत.
३. पार्किन्सन आजार हा देखील एक मेंदू संदर्भात महत्त्वाचा आजार. तो जितक्या लवकर ओळखता येईल तितके या रुग्णांचे भवितव्य अधिक चांगले राहील. त्यासाठी एखादी व्यक्ती झोपेत असताना तिच्या श्वसनाचा विशिष्ट अभ्यास करून संगणकाच्या साह्याने काही आलेख काढण्यात येतात. या आलेखांच्या बिघाडातून पार्किन्सन्स होऊ शकेल का याचा अंदाज बांधता येईल.
४. लहान मुलांची झोप यावर बऱ्यापैकी संशोधन चालू आहे. शालेय वयातील मुलांनी किमान नऊ तास रोज झोपल्यास एकंदरीत मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. ज्या मुलांची झोप बऱ्यापैकी कमी असते त्यांच्यामध्ये मूड बिघडणे आणि विचारक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. याचा सविस्तर अभ्यास चालू आहे.
५. डोळे : म्हातारपणी होणारी दृष्टीपटलाच्या संवेदनशील भागाची (macula) झीज ही डोळ्यांची एक जटील समस्या. ती रोखण्यासाठी आहारातून Lutein and zeaxanthin हे घटक देण्यासंदर्भातील संशोधन प्रगतीपथावर आहे.
६. पायांच्या दुर्बलतेमध्ये किंवा काही स्वरूपाच्या पंगुत्वामध्ये विविध कृत्रिम साधनांचा उपचार होत असतो. या संदर्भात रोबोटिक सांगाडे हे एक नवे संशोधन आहे. या प्रकारचे सांगाड्यांचा दुर्बल व्यक्तीखेरीज मजूर किंवा अग्निशामन दलाचे कर्मचारी यांच्यासाठी देखील वापर करता येईल.
७. एड्स हा आजार एचआयव्ही विषाणूमुळे होतो. त्याच्या प्रतिबंधासाठीचे लस संशोधन गेली अनेक वर्ष चालू आहे. त्या संदर्भात आशादायक निष्कर्ष मिळालेले आहेत.
८. आपल्या मोठ्या आतड्यात अनेक उपयुक्त जिवाणू वास्तव्य करतात. त्यांचा आपल्याला उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी उपयोग होत असतो. विविध कारणांमुळे या जिवाणूंच्या वसाहतींवर विपरीत परिणाम होत असतात. विविध प्रकारचे आतड्यांचे दाहयुक्त आजार व मधुमेह या आजारांच्या संदर्भात या जिवाणूंच्या वसाहतींचा सखोल अभ्यास चालू आहे.
९. माणसाला डास चावल्यामुळे विविध आजार होतात. किंबहुना डास हे बऱ्याच रोगजंतूंचे वाहक म्हणून काम करतात. ठराविक लोकांना डास अधिक प्रमाणात आणि वारंवार का चावतात हा एक यक्षप्रश्न. या संदर्भातही कुतूहलजनक संशोधन चालू आहे. ज्या लोकांच्या त्वचेतून ठराविक रसायने अधिक प्रमाणात स्रवतात व ती डासांना आकर्षित करतात. त्यांचा अभ्यास चालू आहे.
१०. संगीत आणि विविध प्रकारचे ध्वनी यांचा वेदनाशामक म्हणून उपयोग करता येतो. या संदर्भातील संशोधनही प्रगतीपथावर आहे.
11. हृदयकार्य बंद पडल्यानंतर काही मिनिटातच शरीरपेशींचा ऑक्सिजन अभावी नाश होऊ लागतो. अशा प्रकारचा नाश लांबवता किंवा रोखता येईल काय, या संदर्भात प्राण्यांवर संशोधन चालू आहे. हे यशस्वी झाल्यास पुढील मानवी संशोधनाची दिशा ठरवता येईल. हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूच्या स्ट्रोकमध्ये संबंधित पेशींचा नाश होतो. त्यांचे पुनरुज्जीवन करता येईल का, हा या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भातही या संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असेल.
शरीराचे विविध अवयव आणि त्यांच्या संबंधित वैद्यकाच्या अनेक शाखांमध्ये निरंतर संशोधन चालूच आहे. त्यापैकी काही ठळक संशोधनाची ही होती ओझरती ओळख. याखेरीज विविध रोगनिदान, उपकरणे आणि चिकित्सा पद्धतींमध्येही भरीव संशोधन झालेले आहे. त्याचा आढावा वेळोवेळी मी संबंधित आरोग्य धाग्यांवर प्रतिसादांमधून घेतलेला आहे. ज्या संशोधनांमध्ये मराठी माणसांनी मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आमची माणसे, आमचा गौरव (https://www.maayboli.com/node/80165) या धाग्यावर वेळोवेळी केलेला आहे
येणाऱ्या नव्या वर्षात वरील सर्व संशोधनांची अधिक प्रगती होऊन विविध नवे औषधोपचार संबंधित रुग्णांना उपलब्ध व्हावेत ही सदिच्छा.
आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा देखील व्यक्त करतो.
……………………………………………………………………….
डॉक्टर नाही सांगू शकणार.
डॉक्टर नाही सांगू शकणार.
शरीर काय प्रतिक्रिया देईल कोणीच सांगू शकणार नाही.
असंख्य त्रास सुरू झाले की समजून जायचे वेळ आली आहे
चांगली चर्चा.
चांगली चर्चा.
संशोधनाची दिशा कशी असावी, त्याचे लाभ सर्वसामान्य माणसापर्यंत पोचण्याची तळमळ, त्यातील अपप्रवृत्तींवर भाष्य आणि कर्करोगासारख्या आजारावरील जनमानस या विषयांवरील आपणा सर्वांची मते वाचून समाधान वाटले.
सर्वांना धन्यवाद !
माहितीपूर्ण आढावा.
माहितीपूर्ण आढावा.
>>>लोकांच्या त्वचेतून ठराविक रसायने अधिक प्रमाणात स्रवतात व ती डासांना आकर्षित करतात>>> भारीच !
डॉक्टर साहेब,
डॉक्टर साहेब,
तुमचे सगळेच लेख अप्रतिम असतात. खूप नवी माहिती मिळते.
तुम्हालाही नवीन वर्ष उत्तम जावो ही प्रार्थना!
=====
हेमंत 33,
तुमचे प्रतिसाद अस्थानी वाटत आहेत.
बेफि,
बेफि,
धन्यवाद !
नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना बरेच दिवसांनी तुमची भेट व्हावी हा सुंदर योगायोग आहे !
तुमचेही साहित्य दर्जेदार असते हे वेगळे सांगणे न लगे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बेफि,
दु प्र
काल मी लेख वरवर वाचला होता,
काल मी लेख वरवर वाचला होता, आता नीट वाचला. छान झालायं सुटसुटीत आणि माहितीपूर्ण.
तुम्हाला व सर्व मायबोलीकरांना नववर्ष निरोगी व आनंदाचे जावे या शुभेच्छा!!
डॉक्टरांना व सर्व
डॉक्टरांना व सर्व मायबोलीकरांना नववर्ष निरोगी व आनंदाचे जावो.
शुभेच्छा!!
अस्मिता, साद
अस्मिता, साद
धन्यवाद !
सर्वांना नवीन वर्ष आनंदाचे जावो आणि आरोग्यपूर्ण देखील....
सुंदर लेख....
सुंदर लेख....
मज्जारज्जू विषयी काही संशोधन तुमच्या वाचनात आले का?
तुम्हाला आणि सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आढावा आवडला.
आढावा आवडला.
धन्यवाद .द सा, मज्जारज्जूला
धन्यवाद .
द सा,
मज्जारज्जूला इजा पोचल्यानंतर त्याच्या उपचारांमध्ये टिशू अभियांत्रिकी हे एक नवे क्षेत्र विकसित होत आहे.
यामध्ये विशिष्ट बायोपोलिमरचा वापर यावर बरेच संशोधन चालू आहे :
https://health.ucdavis.edu/news/headlines/clinical-trial-offers-hope-for...
कुमार सर
कुमार सर
खूप धन्यवाद
लिंक वाचली....
एक आशेचा किरण मज्जारज्जूला इजा पोहचलेल्यांसाठी.
insl3 हे संप्रेरक पुरुषांचे
insl3 हे संप्रेरक पुरुषांचे आरोग्य ठरवतो.
कॅन्सर पासून अनेक आजार भविष्यात होतील का ह्याचा अंदाज ह्या संप्रेरक ची पातळी तपासून करता येतो.
असे सायन्स अलर्ट वर वाचले.
हा एकच जीन .निरोगी आयुष्य की रोग ग्रस्त आयुष्य हे पुरुष मध्ये ठरवतो.
insl3 हे संप्रेरक >>
insl3 हे संप्रेरक >>
होय, चांगली माहिती.
insl3 या संप्रेरकाचे इंसुलिनशी साधर्म्य असून ते वृषणात तयार होते. निरोगी अवस्थेत त्याची पातळी अनेक वर्षे स्थिर राहते.
डॉ . कुमार साहेब,
डॉ . कुमार साहेब,
आपले लेख छान असतात.
अभिमित
अभिमित
धन्यवाद !
तुमची प्रथमच भेट झाली. तुमचे सदस्यनाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्थ काय त्याचा ?
नेहमी प्रमाणेच अतिशय नेटका
नेहमी प्रमाणेच अतिशय नेटका लेख.
कॅन्सर संबंधी अनेकांची नकारात्मक मते वाचली. कॅन्सर हा एक दुर्धर आजार नक्कीच आहे, पण जेवढे लवकर त्याचे निदान होईल तेवढी रोगी पूर्ण बरा होण्याची शक्यता वाढते. सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती कोणत्याही आजारातून बरे होण्यास मदत करते.
डॉ. बर्नी सीगल या कॅन्सर तज्ज्ञाचे 'लव्ह मेडिसिन अँड मिराकल' नावाचे एक छान पुस्तक आहे. ज्याचे त्याक नावाचे मराठी भाषांतरही उपलब्ध आहे. त्यात त्यांनी सकारात्मक विचार करण्याच्या प्रवृत्ती बाबत खूप छान विवेचन केले आहे. त्या पुस्तकाचा एका वाक्यात संक्षेप सांगायचा झाल्यास, 'मृत्यू प्रत्येकालाच अटळ आहे पण मृत्यू येई पर्यंतचा काळ आनंदात कसा घालवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे'.
ससु,
ससु,
धन्स !
लव्ह मेडिसिन अँड मिराकल' नावाचे एक छान पुस्तक >>> चांगली माहिती.
>>>>सकारात्मक विचार करण्याची
>>>>सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती कोणत्याही आजारातून बरे होण्यास मदत करते.>>>> +९९
>>>'मृत्यू प्रत्येकालाच अटळ आहे पण मृत्यू येई पर्यंतचा काळ आनंदात कसा घालवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे'.>>> बरोबर.
अवांतर.
अवांतर.
पुढे कधी शोध लागेल आणि मेलेला माणूस जिवंत करण्याचे तंत्र विकसित होईल.
अशी आशा ठेवून मृत शरीर जतन करण्याचा प्रकार आता चालू आहे
लाखो डॉलर त्या साठी फीस भरली जाते.
मम्मीज ज्या पुरातन काळातील आहेत .
त्या मध्ये पण मृत शरीर चे संवर्धन केलेले आहे.
ह्या दोन्ही घटनेचा हेतू एकच असावा का?
प्राचीन मम्मीज करण्यामागे
प्राचीन मम्मीज करण्यामागे तत्कालीन लोकांच्या काही समजुती होत्या.
मृत्यूनंतर आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघतो. त्याचा प्रवास व्यवस्थित व्हायला असेल तर तिकडे पृथ्वीवर त्याचे शरीर व्यवस्थित जतन केले पाहिजे अशी समजूत होती.
https://www.livescience.com/mummification.html
https://www.sciencealert.com
https://www.sciencealert.com/skipping-meals-could-be-much-worse-for-you-...
वजन कमी करण्याच्या खुळा पायी. नाश्ता सोड,एक वेळचे जेवण सोड .
असले नको ते सल्ले मिळतात आणि लोक असे जेवण सोडतात.
त्या मुळे अचानक मृत्यू होण्याची शक्यता वाढते .
वरील आर्टिकल त्या वर च आहे
वरील संशोधन वाचले. दिवसातून
वरील संशोधन वाचले. दिवसातून किती वेळा जेवावे यावर असंख्य प्रकारची संशोधने झालेली आहेत. निष्कर्षांमध्ये अर्थातच एकमत नाही.
ग्लुकोजचा चयापचय सकाळी उत्तम, दुपारी मध्यम आणि रात्री कमी पातळीवर येतो.
म्हणून..
सकाळची न्याहारी चांगल्यापैकी असावी आणि रात्रीचे खाणे पुरेसे लवकर आणि संयमित असावे इतपत मी पाळतो.
तीन वेळा जेवले पाहिजे.जे आपण
तीन वेळा जेवले पाहिजे.जे आपण पिढ्या न पिढ्या जेवत आहोत.
कोणतेच जेवण स्किप करणे नको.
हे मला तरी पटले
बरोबर.
बरोबर.
प्रत्येकाचा प्रकृतीधर्म, आजार आहेत किंवा नाहीत, आणि वय यानुसार आणि गरजेनुसार आपापल्या आहारतज्ञाचा सल्ला घेऊन ठरवावे हे उत्तम.
सर्वांसाठी एक नियम नसावा.
सकाळची न्याहारी चांगल्यापैकी
सकाळची न्याहारी चांगल्यापैकी असावी >>
मी आयुष्यात कधीच न्याहारी केली नाही, फक्त २ वेळा जेवण जेवतो. याचे कारण लहानपणी लवकर उठायचा कंटाळा, त्यामुळे फक्त १ ग्लास दूध प्यायचो. आतातर सवय झाली, ब्रेकफास्ट केला तर दुपारी जेवायला भूक लागत नाही. अजून तरी मस्त मजेत जिवंत आहे, कुठल्याही त्रासाशिवाय. म्हणून विचारतोय, सकाळी नाश्ता केलाच पाहिजे याला काही आधार आहे का?
ह्या वरून एक कोटी सायन्स
ह्या वरून एक कोटी सायन्स अलर्ट वर च वाचली.
.अंडी खाल्ली की कोलोस्ट्रोल वाढते .
हे खरे आहे का?
ह्या वर अजून संशोधन च चालू. आहे .
आणि लोक मात्र अंडी बिन्धास्त खात आहेत.
अजून तरी अंडी खावी की न खावी ह्या वर एकमत नाही.
नक्की पोषण कसे होते हा मोठा क्लिष्ट प्रश्न आहे.
त्याचे उत्तर सहज सोप नक्कीच नाही.
"नाष्टा करणं गरजेचे आहे ह्याला काय आधार आहे"
कशाला काहीच आधार नाही.
विविध सँपल सर्व आहेत.
डॉक्टर नीट सांगतील
सकाळी नाश्ता केलाच पाहिजे
सकाळी नाश्ता केलाच पाहिजे याला काही आधार आहे का?
>>>
फक्त जिवंतच राहायचं असेल तर आपल्या शारीरिक गरजेनुसारचे उष्मांक 24 तासांमध्ये मिळाले तरी पुरे !
कधी जेवावे, किती वेळा जेवावे हे जे मुद्दे उपस्थित झाले आहेत त्याचे कारण म्हणजे समाजात वाढत असलेले मधुमेह आणि विविध चरबीचे आजार वाढण्याचे प्रमाण. त्या दृष्टीने निरनिराळ्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार आहाराच्या वेळांचे सल्ले दिले जातात.
बहुसंख्य लोक दिवसपाळीत काम करतात. सकाळी उठल्यानंतरचे सहा सात तास सर्वाधिक कार्यक्षमतेचे असतात; म्हणून न्याहारी चांगली पाहिजे. त्यातून जेवढे ग्लुकोज शरीरात जाईल त्याचा चयापचय उत्तम होईल. हे समजण्यासाठी ग्लुकोज व इन्सुलिन यांच्यातील नातेसंबंधबद्दल जाणून घ्यायला लागेल. ते या लेखात आलेले आहे
(https://www.maayboli.com/node/65358)
न्याहारी (होय/नाही ) घेण्यासंदर्भात किंवा रात्री उशिरा भरपूर जेवण का करू नये या संदर्भात विविध शास्त्रीय संदर्भ बरेच आहेत.
असे गुगल केल्यास भरपूर मिळतील :
major effects of meal timing on metabolic and physiological parameters
..
नाश्ता केलाच पाहिजे का ?
'च' नाही पण केल्यास उत्तम.
हा एक आहे :
हा एक आहे :

"A series of studies have supported that total energy consumption at breakfast reduced weight gain and CVD risk factors, such as elevated serum low-density lipoprotein cholesterol, decreased serum high-density lipoprotein cholesterol, and hypertension".
Pages