२०२२ : वैद्यकीय संशोधनाची झेप

Submitted by कुमार१ on 29 December, 2022 - 11:29

नमस्कार !
2022 ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षात आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांचा धावता आढावा या लेखात घेत आहे. गेली ३ वर्षे संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या covid-19 या रोगासंबंधीचे संशोधन चालूच आहे. परंतु याची विस्तृत माहिती संबंधित धाग्यावर आतापर्यंत आलेली असल्याने या विवेचनातून या आजाराला पूर्णपणे वगळलेले आहे.

१. मधुमेह प्रकार-१ : यामध्ये स्वादुपिंडाच्या इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश झाल्यामुळे अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनच्या उपचारावर राहावे लागते. अशा रुग्णांसाठी सध्या विविध स्वयंचलित इन्सुलिन इंजेक्शन प्रणाली अस्तित्वात आहेत. यंदाच्या संशोधनात अशी एक अत्याधुनिक प्रणाली विकसित केलेली आहे. त्याला ‘बायोनिक पॅनक्रिआज’ म्हणतात.
या आजाराच्या या पुढील संशोधनाचा टप्पा अधिक रोचक आहे. उच्चरक्तदाबासाठी उपचार म्हणून वापरण्यात येणारे verapamil हे औषध इन्सुलिन-निर्मिती पेशींचा नाश रोखू शकते. त्यावर अभ्यास चालू आहे.

२. मेंदू विकारांच्या संदर्भात यंदा बऱ्यापैकी संशोधने झालेली आहेत. म्हातारपणी स्मृतिभ्रंश ही एक महत्त्वाची समस्या उद्भवते. सध्या त्यासाठी काही औषधे अस्तित्वात आहेत. परंतु औषधांविनाचे उपचार यावर बऱ्यापैकी संशोधन सातत्याने होत आहे. मेंदूचे विशिष्ट भाग लो फ्रिक्वेन्सी प्रवाहांच्या सहाय्याने चेतवल्यास स्मृतीपेशींचे कार्य अबाधित राहू शकेल का, यावरील विविध प्रयोग नेटाने चालू आहेत.

Human_brain.jpg

३. पार्किन्सन आजार हा देखील एक मेंदू संदर्भात महत्त्वाचा आजार. तो जितक्या लवकर ओळखता येईल तितके या रुग्णांचे भवितव्य अधिक चांगले राहील. त्यासाठी एखादी व्यक्ती झोपेत असताना तिच्या श्वसनाचा विशिष्ट अभ्यास करून संगणकाच्या साह्याने काही आलेख काढण्यात येतात. या आलेखांच्या बिघाडातून पार्किन्सन्स होऊ शकेल का याचा अंदाज बांधता येईल.

४. लहान मुलांची झोप यावर बऱ्यापैकी संशोधन चालू आहे. शालेय वयातील मुलांनी किमान नऊ तास रोज झोपल्यास एकंदरीत मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. ज्या मुलांची झोप बऱ्यापैकी कमी असते त्यांच्यामध्ये मूड बिघडणे आणि विचारक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. याचा सविस्तर अभ्यास चालू आहे.

५. डोळे : म्हातारपणी होणारी दृष्टीपटलाच्या संवेदनशील भागाची (macula) झीज ही डोळ्यांची एक जटील समस्या. ती रोखण्यासाठी आहारातून Lutein and zeaxanthin हे घटक देण्यासंदर्भातील संशोधन प्रगतीपथावर आहे.

६. पायांच्या दुर्बलतेमध्ये किंवा काही स्वरूपाच्या पंगुत्वामध्ये विविध कृत्रिम साधनांचा उपचार होत असतो. या संदर्भात रोबोटिक सांगाडे हे एक नवे संशोधन आहे. या प्रकारचे सांगाड्यांचा दुर्बल व्यक्तीखेरीज मजूर किंवा अग्निशामन दलाचे कर्मचारी यांच्यासाठी देखील वापर करता येईल.

७. एड्स हा आजार एचआयव्ही विषाणूमुळे होतो. त्याच्या प्रतिबंधासाठीचे लस संशोधन गेली अनेक वर्ष चालू आहे. त्या संदर्भात आशादायक निष्कर्ष मिळालेले आहेत.

८. आपल्या मोठ्या आतड्यात अनेक उपयुक्त जिवाणू वास्तव्य करतात. त्यांचा आपल्याला उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी उपयोग होत असतो. विविध कारणांमुळे या जिवाणूंच्या वसाहतींवर विपरीत परिणाम होत असतात. विविध प्रकारचे आतड्यांचे दाहयुक्त आजार व मधुमेह या आजारांच्या संदर्भात या जिवाणूंच्या वसाहतींचा सखोल अभ्यास चालू आहे.

९. माणसाला डास चावल्यामुळे विविध आजार होतात. किंबहुना डास हे बऱ्याच रोगजंतूंचे वाहक म्हणून काम करतात. ठराविक लोकांना डास अधिक प्रमाणात आणि वारंवार का चावतात हा एक यक्षप्रश्न. या संदर्भातही कुतूहलजनक संशोधन चालू आहे. ज्या लोकांच्या त्वचेतून ठराविक रसायने अधिक प्रमाणात स्रवतात व ती डासांना आकर्षित करतात. त्यांचा अभ्यास चालू आहे.

१०. संगीत आणि विविध प्रकारचे ध्वनी यांचा वेदनाशामक म्हणून उपयोग करता येतो. या संदर्भातील संशोधनही प्रगतीपथावर आहे.

11. हृदयकार्य बंद पडल्यानंतर काही मिनिटातच शरीरपेशींचा ऑक्सिजन अभावी नाश होऊ लागतो. अशा प्रकारचा नाश लांबवता किंवा रोखता येईल काय, या संदर्भात प्राण्यांवर संशोधन चालू आहे. हे यशस्वी झाल्यास पुढील मानवी संशोधनाची दिशा ठरवता येईल. हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूच्या स्ट्रोकमध्ये संबंधित पेशींचा नाश होतो. त्यांचे पुनरुज्जीवन करता येईल का, हा या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भातही या संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असेल.
Heart_anterior_exterior_view.png

शरीराचे विविध अवयव आणि त्यांच्या संबंधित वैद्यकाच्या अनेक शाखांमध्ये निरंतर संशोधन चालूच आहे. त्यापैकी काही ठळक संशोधनाची ही होती ओझरती ओळख. याखेरीज विविध रोगनिदान, उपकरणे आणि चिकित्सा पद्धतींमध्येही भरीव संशोधन झालेले आहे. त्याचा आढावा वेळोवेळी मी संबंधित आरोग्य धाग्यांवर प्रतिसादांमधून घेतलेला आहे. ज्या संशोधनांमध्ये मराठी माणसांनी मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आमची माणसे, आमचा गौरव (https://www.maayboli.com/node/80165) या धाग्यावर वेळोवेळी केलेला आहे

येणाऱ्या नव्या वर्षात वरील सर्व संशोधनांची अधिक प्रगती होऊन विविध नवे औषधोपचार संबंधित रुग्णांना उपलब्ध व्हावेत ही सदिच्छा.
आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा देखील व्यक्त करतो.

……………………………………………………………………….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. माझ्या वाचनानुसार
as long as a person can fit their nutrients in during other meals, breakfast may not be the most critical meal of the day.

माझा अनुभव आणि माझ्या डॉक्टरच्या मते मी माझी सवय बदलायची गरज नाही. BMI अगदी व्यवस्थित आहे. पण तरीही विशिष्ट संदर्भासहित दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे.

एखाद्या व्यवसायाच्या गरजेनुसार खाण्याच्या वेळा कशा कायमस्वरूपी होतात याची दोन उदाहरणे सांगतो.

१. जेव्हा एखादा विद्यार्थी १७ व्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो तेव्हा त्याला एकदम नव्या वातावरणाचा सामना करायचा असतो. त्यामध्ये रक्त, मांस व पू अशी दृश्य बघावी लागतात. ते बघून सुरुवातीस काही जणांना चक्कर येऊन पडण्याचे प्रकार होतात. जर का पोटात अन्न नसेल तर ही लक्षणे अधिक तीव्र होतात. बरेचसे प्रात्यक्षिक देखील उभे राहून करावे लागते.

म्हणून, जेव्हा विद्यार्थीदशा सुरू होते तेव्हा प्राध्यापक विद्यार्थ्यांना सांगतात, की घरून निघताना व्यवस्थित खाऊनच या. यातूनच पुढे मग सकाळी घरून निघताना न्याहारी करूनच निघणे ही सवय आयुष्यभरासाठी अंगवळणी पडते.

२.
लष्करातील एका कर्नल साहेबांनी सांगितलेला अनुभव सांगतो. त्यांना कुठल्याही वेळेला लष्करी तळावरून बोलवणे येई. आणि एकदा गेले की ते काम किती तास चालेल, तिथून अजून किती लांब पाठवले जाईल हे सांगता येत नसायचे.
म्हणून ते म्हणायचे,
“कधीही कामासाठी बोलावणे आले की आम्ही पाच मिनिटात घरात जे काय असेल ते पटपट खातो आणि मगच बाहेर पडतो. मागचे जेवण किती वेळापूर्वी झाले होते, असले विचारही करत नाही. कारण आम्ही अनुभवले आहे, की एकदा कामाला गेल्यानंतर पुढचे जेवण किती तासांनी मिळेल याची शाश्वती नसते”.

The cliche that breakfast is the most important meal – and one with very specific food groups – developed from those early days of cereal.

How lobbyists made breakfast 'the most important meal of the day
https://www.theguardian.com/lifeandstyle/2016/nov/28/breakfast-health-am...

Eating breakfast is not a good weight loss strategy, scientists confirm

Cereal companies created a myth about the first meal of the day. Researchers keep debunking it.
https://www.vox.com/2019/2/1/18206873/breakfast-diet-weight-loss

“The most expensive part of cereal-making is shoving it down people’s throats by advertising,” he explains. “I don’t think cereal would have been successful without the massive propaganda of the industry.”
https://www.theatlantic.com/health/archive/2019/05/what-is-breakfast/589...

Sorry, There’s Nothing Magical About Breakfast
https://www.nytimes.com/2016/05/24/upshot/sorry-theres-nothing-magical-a...

How Breakfast Became a Thing
https://priceonomics.com/how-breakfast-became-a-thing/

Bernays’ Breakfast Bamboozle: The PR campaign that made Americans eat more bacon
https://legitur.com/history/bernays-breakfast-bamboozle-the-pr-campaign-...

आमचे एक नातेवाइक लश्करात होते ते ही बरोब्बर घरुन निघताना फोडणीचा भात का होईना भरपूर खाउन जायचे.
त्यांना साबु, खिचडी फार आवडा यची. व काश्मिरात नॉन फॅमिली स्टेशन वर जायचे झाले की बायको बनवायची व दोघे रडत रडत खायचे.
आपले कसे खिचडी मंजे ट्वांय होते तसे त्याम्चे नव्हते. ह्यांनी आता पुस्तक लिहिले आहे.

२०२१ मध्ये एक ड्रग मला सुचवले होते ते फार महाग होते. ते आता २०२३ मध्ये पेटंट मधून बाहेर आले आहे व जेनेरिक झाले आहे. काही हजारात किंमत झाली आहे. आपण विश्वास ठेवुन चालत राहायचे. नवे नवे शोध लागतच असताfunction at() { [native code] } त.

सध्या लेट्रोझोल व शेल कॅल वर गाडी चालू आहे.

अमा
सध्या लेट्रोझोल >>>

अच्छा ! तुम्हाला हे चालू आहे होय. मग सर्वप्रथम त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होऊ दे अशी इच्छा व्यक्त करतो.

काय योगायोग असतो बघा.....
आत्ताच मला इथल्या एका सभासदाने व्यक्तिगत संपर्कातून palbociclib या औषधाबद्दल थोडीफार माहिती विचारली होती. ते बरेच महाग आहे अशी माहिती पण पुरवली होती. म्हणून मी तोच विषय वाचत होतो.

अशा योगायोगाची गंमत वाटते

मी ते प्रिस्किरीप्शन शोधून नाव लिहिते. ८५००० रु. एक डोसेज ची किंमत. होती. डॉक्टर सरांनी आधी सर्व पर्याय एक्स्प्लेन केले. सर्जरी रूल आउट केली. व नंतर लेट्रो व शेल कॅल वर बोळवण केली. मी तर परत येताना पूर्ण रस्ता हायवे वर रिलीफ मधून रडत आले. तेव्हा स्ट्रॉन्ग म्हणून आत्ता रिटायर्मेंट गाठता आली. पेशंट मानसिकते वर नक्की लिहा सर.

मी मोठा प्रतिसाद लिहित होतो, १५-१६ ऒळी लिहुन झाल्या होत्या.
पण माबोकरांचे नशीब बलवत्तर, प्रतिसाद सॆव्ह होण्यापूर्वी डिलीट झाला.
नंतर कधीतरी ज्ञान पाजळेन.

खरंय अमा. तुमची मनस्थिती समजू शकतो.
गेल्या एक-दोन वर्षात मी एक अनुभव घेतोय. कर्करोगावरील उपचारांचे पर्याय आता बरेच वाढलेले आहेत. त्यातील नवे उपचार महागडे तर काही अति महागडे आहेत. कुठला उपचार द्यायचा यावर विज्ञानातच भरपूर मतभिन्नता आहे.

जेव्हा माझ्या संपर्कातील किंवा नात्यातील कोणाला या प्रकारचे उपचार चालू होतात, तेव्हा हटकून मला त्या औषधांची नावे, किमती वगैरे पाठवून शंका विचारल्या जातात. “मग दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेऊ का?” असेही प्रश्न आपसूक येतात. मी त्यांना एक स्पष्ट करतो,
“अशा प्रकारच्या आजारांचे उपचार हा माझा प्रांत नाही. तुमच्या डॉक्टरांवरच पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला जे औषध दिले आहे त्याबद्दलचे सामान्यज्ञान मी तुम्हाला समजावून सांगेन”.

या निमित्ताने या नवनव्या उपचारांचे माझे वाचन होते आहे हे मात्र चांगले.

मानव
जरूर पाजळा !
तुमच्या ज्ञानामृताचे सेवन करण्याची इच्छा नेहमीच असते !

मोठ्या प्रतिसादांच्या बाबत मी एक पथ्य कटाक्षाने पाळलेले आहे. जरी ते ऑनलाइन टंकन केलेले असले तरी पहिले ते नकलून वर्डमध्ये घेऊन सेव्ह करणे.
अन्यथा ते ऑनलाइन गायब झाल्यास भयंकर चिडचिड होते

Who सारखी संस्था स्थापन करून औषध संशोधन आणि निर्मित ही सरकारी ,सार्वजनिक मालकी असणाऱ्या संस्था नीच करावी.
हवं तर वेगळा टॅक्स जगातील सर्व नागरिकांवर लावावा.
तेव्हाच जगातील सर्व रोगांवर औषध मिळतील आणि ती पण स्वस्तात.
खासगी कंपन्या फक्त हित जपतात.
त्या मुळेच अजून
कॅन्सर, मधुमेह,ब्लड प्रेशर हे आणि ह्या सारखे अनेक आजार जगात जीव घेणे आहेत.
माणूस आता इतका बुद्धिमान झाला आहे की कॅन्सर सारखे आजार डोई जड होण्याची बिलकुल शक्यता नाही.
व्यापारी संबंध गुंतल्या मुळेच तो अजून जीव घेणा आहे

पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर .
मला वाटतं ही व्याख्या योग्य आहे.
आणि पेशींची वाढ,योग्य प्रमाणात वाढ ह्याचे नियंत्रण एकाधाच जीन करत असेल .
तो अजून माहीत नाही.
हे अविश्वसनीय आहे.
जेनेटिक अभियांत्रिकी गगनाला गवसणी घालत आहे.
आणि प्राथमिक स्तरावर ची समस्या अनूतरित आहे.
कसे शक्य आहे

आणि पेशींची वाढ,योग्य प्रमाणात वाढ ह्याचे नियंत्रण एकाधाच जीन करत असेल .
>>>
नाही हो ! असे न वाचता असे काहीतरी चुकीचे लिहू नका राव.

कर्करोगासाठी जबाबदार असणाऱ्या जनुकांची संख्या शेकड्यांमध्ये आहे.
इथे तुम्ही त्याचा विस्तृत तक्ता सुद्धा पाहू शकता:
https://cancer.sanger.ac.uk/census

८५००० रु. एक डोसेज ची किंमत. होती.
>>>
गेल्या दशकात कर्करोग आणि अन्य काही चिवट दुर्धर आजारांविरोधात निघालेली औषधे immunologic या गटात मोडतात. त्यांचे उत्पादन जैवतंत्रज्ञानाने केले जाते. हे तंत्रज्ञान महागडे असावे.

एक सामान्यज्ञान म्हणून छोटीशी माहिती :
या सर्व औषधांच्या (मूळ) नावांच्या शेवटी प्रामुख्याने तीन प्रकारचे प्रत्यय असतात :

*******mab
*******mib
*******nib

जैव तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय केले जाते डॉक्टर की त्यामुळे ही औषधे एवढी महाग होतात?...कारण आता कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे ही औषधेही जास्त प्रमाणात लागत असणार..सामान्य रुग्णांना अशा जीवघेण्या आजारांवर उपचार घेणे शक्य व्हावे म्हणून WHO सारख्या जागतिक संघटना किमतींवर काही निर्बंध का नाही घालू शकत!? त्यात कोणत्या मर्यादा येतात ?

नुसती महाग नसतात तर अती
प्रचंड महाग असतात.
त्या किंमती चे समर्थन करणे पण त्या कंपन्यांना शक्य होणार नाही.
सरकार नी प्रश्न उभा केला तर..

नुसती महाग नसतात तर अती
प्रचंड महाग असतात.
त्या किंमती चे समर्थन करणे पण त्या कंपन्यांना शक्य होणार नाही.
सरकार नी प्रश्न उभा केला तर..

जैव तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय केले जाते
>>> इथे सारांश आहे :
https://www.biotechnology.amgen.com/how-biotech-medicines-made.html
त्यात नक्की खर्चीक काय असते ते एखादा तंत्रज्ञ सांगू शकेल.

बहुधा " Producing the master cell line containing the gene"
हे अवघड असावे.
....
अस्मिता , बघतो.

औषध उद्योगातील अर्थशास्त्र हा एक मोठा विषय आहे. त्यात कोणाचा अभ्यास असेल तर स्वतंत्रपणे लिहा असे सुचवतो.
एखाद्या परिच्छेदात उरकण्यासारखा हा विषय नाही

त्यात नक्की खर्चीक काय असते ते एखादा तंत्रज्ञ सांगू शकेल.
>>> नात्यातील एक मेंबर ॲमजेन मधे काम करतो. ही प्रक्रिया लांबलचक संशोधन असलेली , क्लिष्ट व सुरक्षिततेच्या वेगवेगळे प्रोटोकॉल पाळणारी आहे. हे वरवरचं गप्पांमध्ये कळलेलं.

मध्ये सरकारने एक कायदा वापरून कॅन्सरवरच्या एका प्रचंड महागड्या औषधाची किंमत नियंत्रित केली होती. याबद्दल मायबोलीवर कोणीतरी लिहिले होते. लोकसत्तेत प्रा डॉ मृदुला बेळे कॉपीराइट -ट्रेडमार्क यांबद्दल लिहीत असतात. त्यांचे एक नियमित सदरही होते.

भरत
बरोबर मी तो लेख वाचला होता
कदाचित आपण अन्यत्र चर्चा केली होती का ?
कोविड धागे ??

आत्ताच मला इथल्या एका सभासदाने व्यक्तिगत संपर्कातून palbociclib या औषधाबद्दल थोडीफार माहिती विचारली होती. ते बरेच महाग आहे अशी माहिती पण पुरवली होती. म्हणून मी तोच विषय वाचत होतो.>> हेच ते.

चिमुरी ह्यांच्या धाग्या वरील पण प्रतिसाद वाचले.

खूप मोठा खर्च असतो संशोधन करून औषध निर्मिती करण्यासाठी आणि सर्व protocol पाळण्यासाठी.
म्हणून पेटंट पद्धत हक्काची बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी.
खूप खर्च येतो हे मान्य केले तरी त्या औषध कंपन्यांना पूर्ण जगाची बाजार पेठ आंदण दिली जाते.
हे पण सत्य आहे.
गुंतवणुकी पेक्षा किती तरी मोठा फायदा होण्याची हमी च जगतील सरकार देतात
ह्या क्षेत्रात खासगी गुंतवणूक कमी करून सरकारी गुंतवणूक वाढली तर च स्वस्त औषध उपलब्ध होतील.
नाही तर नवं नवीन औषध येतील पण ती सामान्य लोकांच्या काही कामाची नसतील.
ती खरेदी करण्याची कुवत च अगदी माध्यम वर्गात पण नसेल.

कॅन्सर वर लाखो खर्च करून पण काहीच खात्री नसते.
त्या पेक्षा मृत्यू च स्वीकारावा असे विचार सामान्य वर्ग करतो.
तुमच्या आधुनिक औषधांचा फायदा काय?

आरोग्य, ही मूलभूत गरज आहे .
त्या क्षेत्रात सरकारी गुंतवणूक च जास्त प्रमाणात हवी.

सरकारी गुंतवणूक ह्याचा अर्थ च सार्वजनिक निधी पुरवणे.
आणि होणाऱ्या उत्पादन वर सर्वांचं हक्क असणे.

Pages