Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मग तसंच आता अर्चना ला परत ही
मग तसंच आता अर्चना ला परत ही आणू शकतील.
मला अर्चना आवडत होती पण गेले 2 ते 3 दिवस डोक्यात गेलीय.... मस्त ट्रॅक मिळालेला तिला, लोकांना पण ती आवडत होती... पण लास्ट दोन तीन दिवस खूप इरिटेत करत होती आणि त्याचा च फायदा शिव ने उचलला.... बाकी तिचं ते अब्दु मेहमान असला तरी आपला कॉम्पिटिटर आहे म्हणणं आवडलेलं....
प्रियांका पण मला आवडते पण ती फार किरकिरी आहे... जिंकणाऱ्यांमध्ये मला प्रियंका आणि शिव ला बघायला आवडेल.....
अब्दु पण सगळं भांडण झाल्यावर , स्तूपिद पीपल वगैरे बोलायला लागतो....
सुम्बुल तर माठ लोकांची राणी आहे
टीना किती जळू आहे. ती तिच्या बोलण्याचा टोन खाली वर न करता एक सरळ लाईन मध्ये आणि सरळ टोन मध्ये बोलत जाते बोलत जाते ते अजून च चीड आणणारं असतं
आरोह वेलणकरने संधी साधून शिव
आरोह वेलणकरने संधी साधून शिव विरोधी ट्विट केली आहे, त्याला टास्कमधे शिव चावला होता त्याची

आरोह वेड्याला अजुन गेम समजला नाही
बिबॉ मधे लाथ मारून शिवानी बाहेर जात नाही, प्रतीकला लिटरली जमिनीवर आपटून कुन्द्रा बाहेर जात नाही आणि अर्चनाही जाणार नाहीये,वाजत गाजत येईल परत !
शिव ने माफ केला असता आज
शिव ने माफ केला असता आज मिलियन फॅन असते.. आता शिव्या खातोय...
सलमान मस्त एकेकाला आधी प्रश्न
सलमान मस्त एकेकाला आधी प्रश्न विचारून मग त्यांची उत्तरं त्यांनाच बदलायला लावतोय.
शिवलासुद्धा व्यवस्थित कात्रीत पकडलं.
मजा आली .. लुझर शिव अँड गॅंग
मजा आली .. लुझर शिव अँड गॅंग ला आरसा दाखवला...
प्रियांका फॉर विन ...
जिंकणाऱ्यांमध्ये मला प्रियंका
जिंकणाऱ्यांमध्ये मला प्रियंका आणि शिव ला बघायला आवडेल.....
->>> हेच टॉप टू असतील.. सुमबुल देखील असू शकते...
सुमबुल देखील असू शकते... >>>
सुमबुल देखील असू शकते... >>> ही कशाला, नको.
आज मी हिंदी रिपीट बघतेय.
शिव कसाही असो आणि गॅंग कशीही.
शिव कसाही असो आणि गॅंग कशीही.. पण अर्चना अतिशय घाण वाटते.. साजिद नंतर जे काही बोलत होता ते पण बरोबर.. तिने बाहेरच्या कितीतरी गोष्टी काढल्या आहेत.. लोकांना उकसवल आहे.. उगाच टीआरपी साठी आणायचाच आहे तर फालतू सारावा सराव कशाला.. शिव च्या हजार पट ती लोकांना पर्सनल बोलली आहे , डॉग इत्यादी म्हणाल आहे आणि उकसवल आहे..
प्रियांक अति बोरिंग आणि खोटारडी वाटते मला तर.. अंकित ला कितीतरी मॅन्युप्लेट करते.. बेलगाम कन्टीनुएस बडबडत जाते.. मी अशी नाही मी असं कधी करणार नाही .. प्रियांका ऐसी नाही है न ऑल काय काय बोलते..
फिल्म प्रमोशन आणि टास्क बोअर
फिल्म प्रमोशन आणि टास्क बोअर होतोय हिंदी एपिसोड.
मराठी झाल्यावर थोडं बघितलं तेव्हा शिवला सॉफ्टली झापत होता सलमान. असाच कुल झापतो का तो सर्वांना. ते बघायचं आहे म्हणून बघतेय तर फिल्म प्रमोशन सुरू.
तो साजिद मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम वाटला.
आजचा एपिसोड मस्त मस्त मस्त.
आजचा एपिसोड मस्त मस्त मस्त. चुगली गॅंग मधील एकेकाचा खोटेपणा दाखवला. टीना, सुमबुल आणि निम्रत आता काय करतात बघू या.
आणि साजिदसाठी स्लो कॅप्स ! जो माणूस गौतमला मा बहेन च्या शिव्या देतो, बाटली फोडतो, दारावर लाथ मारतो, मी तुमचा बाप आहे मला उसकावू नका नाहीतर इथे बाटल्या फुटतील, मला बाहेर काढतील म्हणतो, तो कुठल्या तोंडाने व्हायोलन्स सपोर्ट करत नाही म्हणतॊय. एक नंबरचा ढोंगी माणूस आहे.गोरी गेल्यावर ह्याला आनंद कसला झालं की आता माझे राशन वाचेल म्हणे. disgusting hypocrite माणूस आहे. उद्या शिवशी भांडण झाले की बघू या कितीजण त्याच्या बाजूने बोलतील. शिवने त्याचा अर्धा खेळ याच्याच मागे सर सर म्हणून खराब केला आहे.
आणि कोणी violence सपोर्ट केलाच नाहीये.
सौन्दर्या आणि अंकित आता एकदम
सौन्दर्या आणि अंकित आता एकदम impressive खेळत आहेत. हे येणार टॉप ७ मध्ये.
सलमानने कसलं निरुत्तर केलं
सलमानने कसलं निरुत्तर केलं शिवला, मस्त झापले. शिव गोल गोल बोलत राहिला. जे शॉट दाखवले ते बघून शिव मराठीत इनोसंट होता, तसा आता नाही राहिला मात्र असं वाटलं, चेहेरा पडलेला जाम. अर्चनालाही छान झापले सलमानने. शिवच्या मस्त प्री planned करणीवर सलमानने पाणी घातलं.
मला प्रियंका आवडली, ती ठाम होती अर्चनाला परत आणण्यावर. ती निमरत बरी वाटली पण शालीन बरोबर का असते. तिच्या कायद्याच्या ज्ञानाला दंडवत मात्र, हाहाहा. सलमानने छान खिल्ली उडवली.
टिना, सुमबुल अजिबात आवडल्या नाहीत. सौदर्याच्या खळ्या आवडतात. अंकित, गौतम आवडले.
अर्चनाला काही पढवून किंवा एखादी कामगिरी देऊनही पाठवले असेल बिग बॉसने. ती परत अशी वागली तर मात्र bb परत चान्स देणार नाहीत.
बाय द वे तो अबदू काय साजिदला चिकटून असतो का.
सुंबुलला पण मस्त झापले,
सुंबुलला पण मस्त झापले, बहुतेक खोटं बोलत होती. मी बघत नाही म्हणून बहुतेक शब्द वापरला.
बघून शिव मराठीत इनोसंट होता,
बघून शिव मराठीत इनोसंट होता, तसा आता नाही राहिला मात्र असं वाटलं, चेहेरा पडलेला जाम.
<<<<<<
अन्जु,
तू फक्त विकेंडला बघतेयेस का ? बाकी सिझन फॉलो केला आहेस का ?
शिव उलट मराठीपेक्षा भारी खेळतोय इथे, खूप कॉन्फिडन्ट आणि पॉझिटिव !
एखस्द्याला टार्गेट करून तिची एग्झिट प्लॅन करणे यात काय चूक ? तोच तर गेम आहे !
बिगबॉसला प्रॉब्लेम पॉलिटिकल पार्टी /नेत्याचं नाव घेणे हा आहे पण त्याच्यासाठी एखाद्याचा गेम कशाला एक्ज
अर्चना ज्या लेव्हलला अख्ख्या घराला सतत प्रवोक करते , रादर दुसरं काही करतच नाही , तिला स्वतःला मात्रं हे जमलं नाही फेस करायला !
तिला तिच्या लेव्हलला आन्सर बॅक करणे हे फक्तं शिव बोलु शकतो पण आता तेही होणार नाही , बिबॉ उगीच स्ट्रॅटेजीज ओपन करु नका !
तू फक्त विकेंडला बघतेयेस का ?
तू फक्त विकेंडला बघतेयेस का ? बाकी सिझन फॉलो केला आहेस का ? >>> एकच विकेंड बघितला काल, अर्चना प्रकरण झालं म्हणून, त्यात शॉटस दाखवले ना, तो शिवचा स्वभाव नाही खरंतर असं वाटलं. त्याने इंस्टीगेट केलं म्हणून नाही, ते करतातच आणि तो गेमचा भाग आहे. बाहेरचं काढून बोलणं हा शिवचा स्वभाव नाही किंवा नव्हता म्हणून लिहीलं.
त्याला मुद्देसुद आपलं म्हणणंही मांडता आलं नाही काल.
अर्चना मला नव्हतीच आवडली एकदा थोडा वेळ बघितलं होतं तेव्हा मी लिहीलंही होतं पण इथे बऱ्याच जणांना ती आवडते बघून, चांगली खेळत असावी वाटलं.
काल सलमानच्या म्हणण्यानुसार ती निगेटिव्ह खेळत असली तरी इंडिव्हीजुअल खेळते आणि बाकी grp करतात हे जाणवलं.
मला आता शंका आहे की bb ने तिच्यावर काही कामगिरी सोपवली असणार, असंच घेतलं नसेल परत.
हयात आता political इश्यू आल्याने शिवला उलट फायदाच होईल, तो जिंकूही शकतो.
शिव खरंच चांगला खेळतोय मराठी
शिव खरंच चांगला खेळतोय मराठी पेक्षा. खरं तर त्याचे प्लस पॉइंट म्हणजे टास्क, पण इथे बिग बॉस टास्कच देत नाही म्हंटल्यावर त्याचा जो प्रांताच नाही, ते म्हणजे बोलणें (अर्थातच मुद्देसूद, स्पष्ट आणी शेवट पर्यंत) हे तो खूप चांगलं करतो आहे अगदी प्रियांका आणि अर्चना समोर.
जसे दिपांजली ने वर सांगितले तसे त्याने काल सलमान ला सांगायला हवे होते मात्र.
शिव चांगला खेळतोय, मला
शिव चांगला खेळतोय, मला मराठीतच तो नव्हता आवडला.
अंजू, हा शिव खरा की तो खरा होता ते काय माहित आपल्याला
अर्चना शिव प्रकरण होण्याआधी
अर्चना शिव प्रकरण होण्याआधी त्याच भागामध्ये जेव्हा शिव चे प्लॅनिंग दाखवत होते आणि नंतर ते प्रकरण झाले तेव्हाच समजलेले एकतर अर्चनाला काढणार नाहीत आणि काढले तरी परत आणतील. अर्चना सध्यातरी एंटरटेन करण्यात टॉपला होती. त्यामुळे तिला बाहेर पाठवू शकत नाहीत. अर्चनाला बाहेर पाठवण्यात फक्त बिग बॉस चा स्वतःची इमेज क्लिअर ठेवण्याचा हेतू होता बाकी काही नाही.
शिवने अर्चना चा ट्रिगर पॉईंट ओळखलेला आणि तो तेच ग्रुपला सांगत होता का आपण हिला प्रत्येक वेळी याबद्दल बोलून भडकवू. त्याला वाटलं पण नसेल की ती फिजिकल वायलेंस करेल म्हणून. पण नेमका त्याच दिवशी तो प्रसंग घडला आणि शिवने प्री प्लान करून अर्चनाला बाहेर काढलं असे दिसले.
शिवला जेव्हा बिग बॉस ने कन्फेशन रूम मध्ये बोलावलेलं होतं अर्चना सोबत काय करायचं यासाठी, त्यावेळी ऍक्च्युली त्याने ओळखायला हवं होतं ते बिग बॉसला ती घरात पाहिजे म्हणून हा निर्णय शिवच्या हाती दिलाय. त्याने ग्रुप साठी आणि खास करून साजिदसाठी अर्चनाला बाहेर पाठविण्याचा डिसिजन घेतला असेल असं मला तरी वाटते. त्या वेळेस त्याने अर्चनाला माफ करून घरात ठेवण्याचा निर्णय घेतला असता तर शिवला भरपूर फायदा झाला असता वोट्स पण वाढले असते प्लस अर्चना पण थोडी दबून राहिली असती.
काल सलमानने पण अर्चनाला एकटीला तिच्या चुका सांगितल्या आणि शिवला सगळ्यांसमोर चुकीचा दाखवला. याचा फायदा अपोजिट गॅंग नक्कीच घेणार.
ती प्रियंका आणि सौंदर्य अर्चना येणार म्हणून एवढ्या का खुश होत्या. अर्चना त्यांना पण काय काय बोललेली विसरल्या वाटतं त्या
अंजू, हा शिव खरा की तो खरा
अंजू, हा शिव खरा की तो खरा होता ते काय माहित आपल्याला >>> हम्म पॉइंट है. त्यावेळी तो भाबडा वाटला त्यामुळे मी त्याला पहिल्या दिवसापासून सपोर्ट केलं आणि ती कजाग नेहा समोर होती, ती फार छळत असायची त्याला (पर्सनली नेहाला नाही बोलत, गेममध्ये मला ती तशी वाटायची) .
त्या वेळेस त्याने अर्चनाला माफ करून घरात ठेवण्याचा निर्णय घेतला असता तर शिवला भरपूर फायदा झाला असता वोट्स पण वाढले असते प्लस अर्चना पण थोडी दबून राहिली असती. >>> खरं आहे. इथे त्याने स्वत: मराठीत कसे वागलो होतो हे डोक्यात ठेवायला हवं होतं, माफ करायला हवं होतं तिला. इथे आरोह मुद्दा येणारच कारण परत तेच, अर्चना जागी शिव होता आणि शिवच्या जागी आरोह.
एनिवे शेवटी वोटिंग त्यालाच करणार आहे मी, पहिला आला तर आवडेल पण काल मला प्रियंका आवडली त्याच्यापेक्षा. त्याला मी मराठीत आवडला म्हणून वोटिंग करणार.
शिव एकटा खेळला प्रियांका
शिव एकटा खेळला प्रियांका सारखा तर चान्स आहे.. तो बुली गॅंग चा सदस्य झाल्यापासून गंडला आहे.. निम्रत स्टॅन साजिद डुबवतील त्याला....
तो खरं तर कात्रीत सापडला.
तो खरं तर कात्रीत सापडला. अर्चनाला माफ केले असते तर ग्रुप मधल्या लोकांना आवडलं नसतं. मराठी मधला शिव ऑफ कोर्स खरा. इथे तो पूर्ण तयारीनिशी आला आहे. आणि तेच बरोबर आहे. फक्त त्याने आधीच स्ट्रॅटेजी रिव्हील करायला नको होती.
मला प्रियंका जरी टॉप ला
मला प्रियंका जरी टॉप ला बघायची असली तरी काल काय माहित का एकदम डोक्यात गेली....
म्हणजे सगळ्या बाबतीत मी किती करते, मला च कसा त्याग करावा लागतो वगैरे 100 टाईम बोलत राहते, अशाने तो अंकित च काय तर दुसरा कोणी तिला किंमत देणार नाही... समोरच्याला बोलू च देत नाही. सतत बोलत राहते....
सौंदर्या डोक्यावर पडली आहे , आता त्या अर्चनाचा भला मोठा पुळका आलाय. आधी तर तिचे मॅनर्स, संस्कार, जाहिल पणा, गवार पणा, शिक्षण काढणारी हीच बया होती...
अर्चना ला कोण सुरुवातीला विचारत नव्हतं तेव्हा शिव शी च तिची दोस्ती झालेली..
मला अर्चना आवडत हाती कारण ती एंटरटेनमेंट चांगलं करायची.... पण आता मुद्दाम लोकांना प्रोवोक करते, एकतर तिचा तो भसाडा आवाज... दुसऱ्याला वाटेल ते बोलायचं, पण स्वतः वर आलं की वाटेल ते भांडण करायचं यामुळे नावडती होत चाललीय
शिव ने प्रवोक केले पण ते बिबॉ
शिव ने प्रवोक केले पण ते बिबॉ मधे नेहमी केले जाते, अर्चना तर १० पटीने जास्त करते. शिव इज नो डीफरंट. पण इथे पोलिटिकल पार्टीज आणि दीदी वगैरे नावे आली त्यामुळे फरक पडला असावा. शिव ला झापणे गरजेचे झाले. त्यात शिव ने सरळ ते प्लान करत असल्याचे बोलून दाखवले ते चुकले.
एकूण बिबॉचाच गेम आहे. त्यांचा डिसिजन झाला असणार. आणि सलमान ने क्लेवरली ते एक्झिक्यूट केले, सगळ्यांच्या तोंडून त्यांना हवे ते वदवून घेतले.
नॉट सरप्राइज्ड!
एम सी स्टॅन रॅपर आहे. त्याचे
एम सी स्टॅन रॅपर आहे. त्याचे नाव याआधी कधी ऐकले नव्हते. पण त्याचे ब्रँडेड कपडे बघून हा खूपच श्रीमंत असावा. आज Louis Vuitton चा शर्ट घालून आला होता. दोन अडीच लाखाचा असेल. Amiri चे टी शर्ट्स घालतो तेही ३५०००-५०००० चे असतात.
सगळेच सेलेब्रिटी आहेत आणि चांगलेचुंगले कपडे घालतात म्हणा.
पण यावेळी स्टायलिश कोणीच वाटत नाही.प्रियांका आणि टीनाचे कपडे चांगले असतात. निम्रतचे काही तरी विचित्र आहेत. सौंदर्य ठीक ठीक.
गोरी आणि अर्चना बॅड. सगळ्यात वाईट म्हणजे सुमबुल. स्टायलिस्ट बदलावा तिने.
स्टॅन कसला misogynist आहे.
स्टॅन कसला misogynist आहे. याची सुई लडका लडकी यातच अडकली असते. कितीही पैसे आले तरी सुसंस्कृतपणा येत नाही हेच खरे.
याला या आठवड्यात सलमानने आरसा दाखवलाच पाहिजे.
स्टॅनच्या गळातल्या एकेका
स्टॅनच्या गळातल्या एकेका डायमंड नेकलेसची किंमत दीड करोड्पेक्षा जास्तं आहे, त्यानेच सांगितले होते.
तो पुण्याच्या एका झोपडपट्टी एरीयात वाढला आणि नंतर नाव झाल्यावर पैसे आले.
त्याच्या युट्युबच्या काही रॅप व्हिडिओजना ८०-९० मिलियन व्ह्युज आहेत
शेखर सुमन सोशल मिडिया वर येऊन
शेखर सुमन सोशल मिडिया वर येऊन स्वतःच्या फेवरेट्सच्या सपोर्ट मधे ट्विट्स करतो (प्रियंका,अन्कित, अर्चना).


बिइंग अ होस्ट, हाउ फेअर इज दॅट ?
बाकी शिव-अर्चना भांडण अपेक्षेप्रमाणे शान्त झाले आणि प्रियंका -शिव भांडण अजून भडकले.
काल प्रियंका किती फेक, ओव्हर अॅक्टिंग कि दुकान दिसत होती, प्रयत्नं करुनही आवडत नाही , बिबॉने इज्जत का फालुदा केला कन्फेशन रुम मधे बोलावून !
जे अर्चनाचे सो कॉल्ड फ्रेन्ड्स आहेत , यांच्यावरच भारी पडेल तेंव्हा मजा येईल, ऑलरेडी दिसलच प्रोमो मधे
एम्सीस्टॅन बोलणी खाणार पुढच्या आठवड्यात मिइसॉजनिस्ट बिहेवियर बद्दल !
(Btw , मलाही आश्चर्यं वाटलं सुम्बुल इतकी लहान असून स्मोक करते याचं , १८ म्हणजे she is literally a kid !)
बिगबॉसने शिक्षा दिली कि आता सिगरेट्स पाठवणार नाही, यावर अर्चना सगळ्या फुकणार्यांना चिडवत होती, साजिदचा वन लाय्नर भारी होता ‘अगर तू बाहर जाके वापस आगयी, सिगरेट्स भी आएगी
प्रियांका एवढी इरिटेट करते
प्रियांका एवढी इरिटेट करते तरी तिला बाहेर नको तितका सपोर्ट करतात.
शेखर सुमन सोमी वॉर लिहितोच पण
शेखर सुमन सोमी वर लिहितोच पण काल प्रियांका अंकित ची शो च्या बरम्यान बाजू पण घेत होता .. टोटल पक्षपाती ..
सुमबुल कडे बघून वाटत तिच्या बाबानी तिला लवकर कामाला लावून तिच बालपण हिरावून घेतलं.. आता ती पूर्ण दिशाहीन वाटते.. बडे बडे डायलॉग , बाप ऐसा होता है बेटी ऐसी होती है, हिंदी सीरिअल छाप गुडी महान बिहेविअर या सगळ्यात ती पूर्ण दिशाहीन झालीये
तिच्या बाबांच्या टिपिकल महान कविता आणि अशा आयडिलिस्टिक कल्पना तिच्या मनात भरून ठेवल्यात .. पण खरंतर ती अतिशय सामान्य आहे.. आणि तशीच खरीखुरी सामान्य मुलगी बनून राहिली तर स्पेशल वाटेल..
साजिद तिला छान बोलला होता..
साजिद तिला छान बोलला होता.. तुझे जरुरत हैं अपने उमर के लोगों के साथ टाईम बिताने कि.... कॉलेज जा...अपनी एज ग्रुप के फ्रेंड्स बना ...
Pages