बच्चन ऐंशी वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर बच्चन मेनिया कशाबद्दल सुरू आहे ते शोधल्यावर कळलं!
इथे बरेच (सगळेच?) बच्चन फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली बच्चनची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?
मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.
आमच्या चाळीत दिवाळीच्या शेवटी प्रोजेक्टर वगैरे आणून सिनेमा बघायचा कार्यक्रम असायचा. तो सिनेमा कायम अमिताभचाच असायचा. (बहुधा 'डॉन'च असायचा नेहमी वाटतं!
) . त्यात बहुधा प्रथम पाहिलं असावं बच्चनला. 'डॉन का इंतजार', 'नीचे तुम्हारी आँटी बहुत सारे अंकल्स को लेकर आयी है' वगैरेवर क्राउडबरोबर नेमाने टाळ्या पिटल्याचंही आठवतं.
पण अमिताभ ही व्याधी कधी जडली ते काही आठवत नाही.
तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल. 
त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट अमिताभ मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अॅक्शन, काहीही.
या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :
१. चुपके चुपके : परिमल बनून असरानीच्या घरी राहायला जातो आणि जया भादुरीला बघताच प्रेमात पडतो. जात्या सत्प्रवृत्त माणूस, सोंग उघडं पडेल या भीतीने सतत टेन्शनमध्ये असतो. ते एक फार प्रचंड भारी सुंदर पंक्चरलेलं हसू हसत 'हॅ हॅ हॅ, गाना तो आप को सुनाना ही पडेगा' म्हणतो ते बघून मला दर वेळी फुटायला होतं! सिनेमा भाषेच्या गमतीजमतींचा आहे, आणि नखशिखांत गुलजारचाच आहे, पण अमिताभ हा प्रसंग खिशात घालतो!
२. नमक हराम : यूनियन लीडरने अपमान केला त्याबद्दल राजेश खन्नाला सांगताना संतापाने अक्षरश: डोळ्यांत पाणी आलेला बच्चन. तो रोलच खराखुरा अॅन्ग्री यंग मॅनचाच आहे. त्याच किंवा बापाला हार्ट अटॅक आल्याचं कळतं त्या प्रसंगात त्याबद्दल बोलताना 'ही इज अ ब्लडी… ही इज अ ब्लडी…' याच्यापुढे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रागाने!
३. त्रिशूल : तो 'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना खून है'वाला सगळाच प्रसंग! बापाबद्दलचा राग, सूडबुद्धी एकीकडे आणि त्याने आणि गीता सिद्धार्थने सहज कौटुंबिक जिव्हाळ्याने त्याच्या जखमी हाताची शुश्रुषा केल्यावर एकदम डिसार्म होणं दुसरीकडे! त्या सगळ्या संमिश्र भावना एकाच वेळी चर्येवर दिसत असतात! अफाट!
४. शोले : कितीतरीच प्रसंग - लिस्ट करणं अवघड होईल. 'बहुतों को इन्होंने दो घंटों में सिखा दिया है', 'तो शादी के बाद तेरे घर मुझे आया की नौकरी मिलनेवाली है' हे नेहमी आठवल्या जाणार्या 'तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ?' किंवा 'पहली बार सुना है ये नाम'वगैरेंव्यतिरिक्त. प्रत्येक संभाषणात जी 'पते की बात' असते ती तो बोलतो किंवा विचारतो! त्या अनुराधा चोप्राच्या पुस्तकात वाचलं होतं की सेटवर बसून सलीम जावेद डायलॉग्ज ऑन द फ्लाय लिहीत होते. तसं असेल तर हे कॅरेक्टर बिल्डिंग किती भारी आहे ते आणखीनच जाणवतं.
५. शक्ती : तो स्मिता पाटीलच्या घरी राहात असताना राखी त्याला 'घरी चल' म्हणून भेटायला येते तो सगळाच प्रसंग. तो आपण एका मुलीबरोबर राहातो हे आईला कसं सांगायचं म्हणून इतका अवघडून जातो की ज्याचं नाव ते! 'वो वहाँ उस का कमरा - वहाँ वो जाने, उस का काम जाने; मैं यहाँ ये अपना… अलग…'
६. दीवार : मारामारीत कशाला पडलास म्हणून निरुपा रॉय त्याला ओरडत असते तेव्हा तिच्याकडे रोखून बघत फक्त 'तो क्या मैं भी भाग जाता?' इतकंच विचारतो! ते 'भी' ठासूनसुद्धा म्हणत नाही, गरजच नसते! ती त्या संपूर्ण कुटुंबाची सगळ्यात दुखरी नस असतेच. ऐकून तिच्या वर्मावर आघात होतोच, पण ते म्हणताना त्यालाही तितकाच त्रास होत असतो!
७. पुन्हा दीवार : शशी कपूरला पोलिस ट्रेनिंगसाठी सोडायला स्टेशनवर जातात तेव्हा तिथे नंतर नीतू सिंग येते. शशी कपूर दोस्त म्हणून ओळख करून देतो, पण अमिताभ काय ते समजतो आणि आईला घेऊन शिस्तीत तिथून कटतो. मग हळूच मागे येऊन शशी कपूरच्या कानात 'अच्छी है' म्हणून सांगून जातो.
८. डॉन : लता चांगली गाते हे आपल्याला माहीत असतंच, पण इतर कोणी तिची गाणी गायलेली ऐकली की ती चांगली म्हणजे किती चांगली होती ते नीटच कळतं तसं माझं शाखाचा डॉन बघताना झालं! 'मुझे उसके जूते पसंद नहीं'चं 'हॅहॅहॅहॅ शूज' झालेलं ऐकवेना!
९. काला पत्थर : राखी काहीतरी बॅन्डेज वगैरे आणायला दुसर्या खोलीत जाते तेव्हा तिच्या टेबलावर उपडं घातलेलं पुस्तक न राहवून उचलून बघतो तो सीन.
१०. त्याच्या आवाजात ऐकलेल्या नज्म/कविता! 'कल नयी कोपलें फूटेंगी', 'मैं और मेरी तनहाई', इ.
वरती सगळ्यांनी त्याच्या
वरती सगळ्यांनी त्याच्या प्राईममधले चित्रपट लिहिले आहेत त्याला अनुमोदन.
नव्या शतकाच्या सुरुवातीला खाकी नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात अमिताभने वयस्क पोलिस ऑफिसरची भुमिका केली होती. ऍंग्री यंग किंवा ओल्ड मॅन नाहीच. वयाचे व निर्मम कामाचे परिणाम चेहर्यावर व शरीरावर दिसत असलेला, पिचलेला प्रामाणिक ऑफिसर. बघण्यासारखा आहे हा पिक्चर.
बाकी त्याचे अलिकडच्या काळातले डान्स शावा शावा, बंदा ये बिन्धास है वगैरे आवडतात. स्टेप्स नेहमीच्याच असल्यातरी मस्त स्वॅग आहे.
हा धागा आणि.सगळे प्रतिसाद
हा धागा आणि.सगळे प्रतिसाद फेव्हरीट लिस्टीत एकदम.
सगळेजण माझ्याच मनातले लिहीत आहेत असं साम्य.
वर आताच उल्लेख झालेला आहे त्या खाकी मधला सत्काराचा सिन आहे, त्यात त्याने चेहऱ्यावर उपरोध पोत्याने मोजावा इतका दाखवलाय.
बच्चन हे प्रकरण आम्ही बघायच्या आधीपासून जरा मोठ्या वयातल्या मुलाकडून आमच्या कानातून मेंदूत जाऊन बसलय.
अमिताभ अफाट आहे, त्याची रेंज अफाट आहे.
त्वेष, राग, विनोद, अहंकार, सुप्त अहंकार आणि ईर्ष्या काहीही असो खूप छान व्यक्त करतो तो.
नेहेमीचे चित्रपट आवडतातच पण -
नेहेमीचे चित्रपट आवडतातच पण -
१. अजूबा - एकदम कॉमेडी चित्रपट .
लहानपणी अजूबाचा मास्क आणि ही -मॅनची तलवार घेऊन खेळायचो
२. आँखे - एकदम झकास चित्रपट.
३. सरकार - बाळासाहेबांचे बेअरिंग एकदम मस्त पकडले आहे
४. न आवडलेले चित्रपट - अक्क्स, तुफान , १९८० मधले बरेचसे
मुंबईमध्ये विजेंदर सिंगच्या बॉक्सिंग मॅचच्यावेळी अमिताभना जवळून बघितले होते. सुपरस्टार काय असतो ते अगदी याची देही बघितले
लहानपण व्यापून टाकणारा, भारून
लहानपण व्यापून टाकणारा, भारून टाकणारा आणि मनावर अजूनही राज्य करणारा माणूस. ??+१११११११
मध्यंतरी त्याचा कमबॅक झालेला तेंव्हा - आज का अर्जुन वगैरेमधे जरा "अरे, तो अमिताभ राहिला नाही की काय !" असे वाटत होते.. पण तो आला आणि त्याने जिंकलच!
त्याच्या आवाजाच्या प्रेमात आहे मी.. आवाजाची फेक आणि खर्जातल्या आवाजाचा पुरेपुर वापर त्याने केलेला दिसतो! कविता वाचनाचा तोच धीरगंभीर आवाज मनाला शांतता देऊन जातो.
बाकी वरील सगळ्या पोस्टींशी सहमत! फार छान धागा काढलेला आहे हा!
मस्त धागा, स्वाती
मस्त धागा, स्वाती
अँग्री मॅन म्हणून अमिताभचे डॉन, शोले, जंजीर, नमकह्राम, दिवार ई ई पिक्चर्स 'य' वेळा पाहून झालेत आणि पुढेही पाहिले जातील, पण त्याच्या या भुमिकेपासून जरा हटके असणारे कभी कभी, सिलसिला, अभिमान आणि चुपके चुपके सुद्धा परत परत पाहिले जातात माझ्याकडून.
वर सगळयांनी सांगितलेले
वर सगळयांनी सांगितलेले चित्रपट तर आवडतातच पण मला अमिताभ चा बेमीसाल चित्रपट आणि त्यातील अभिनय पण खूप आवडतो
बेमिसालबद्दल अनुमोदन. मला
बेमिसालबद्दल अनुमोदन. मला मुकद्दर का सिकंदर पेक्शाही बेमिसाल मध्ये अमिताभ राखीच्या व्य्कतीरेखांचे त्यांनी अभिनयातून दाखवलेले कंगोरे खूप भावले. अमिताभ-हृषिदा जोडीचा हा थोडा अंडर अचिवर सिनेमा म्हणावा लागेल.
मस्त पोस्ट्स येत आहेत, धागा
मस्त पोस्ट्स येत आहेत, धागा काढल्याचं सार्थक झालं अगदी!
मला आता इथे उल्लेख आलेल्या सगळ्याच चित्रपटांची उजळणी करावीशी वाटते आहे.
भरत, 'मजबूर'बद्दल अनुमोदन. 'बेनाम' फारसा आठवत नाही मला आता, पण पांढर्या गणवेषातला अमिताभ (एअरपोर्टवर कस्टम्समध्ये असतो का?) आठवतो आहे.
(कस्टम्स तरी ठीक, 'मंजिल' सिनेमात - तोच तो 'रिमझिम गिरे सावन'वाला - तो अॅममीटर्स विकायचा व्यवसाय करत असतो हे बघून भयंकर मजा वाटली होती!
)
मैं तेरा जी भर दूँ सोचा था
मैं तेरा जी भर दूँ सोचा था हाँ कर दूँ
)
मैं तेरा जी भर दूँ सोचा था हाँ कर दूँ
फिर काहे फिर काहे
ना कर दी ना कर दी
फिर काहे ना कर दी
मैं सदके जान कर दूँ
मैं ने बदल दिया इरादा.... जुम्मा .....
(जुम्मेका मौका है, द्स्तूर है... बस्स्स इतकंच...
(No subject)
मजबूर मध्ये विमान प्रवासाची
मजबूर मध्ये विमान प्रवासाची तिकिटं विकतो.
नमकहलाल पिंक बदला वक्त आनंद
नमकहलाल
पिंक
बदला
वक्त
आनंद
>>> मजबूर मध्ये विमान
>>> मजबूर मध्ये विमान प्रवासाची तिकिटं विकतो
हाहा, हे नव्हतं आठवत.
मोहिनी, येस, अलीकडच्या काळात वजीर आणि बदला आवडले होते मला.
तो अॅममीटर्स विकायचा व्यवसाय
तो अॅममीटर्स विकायचा व्यवसाय करत असतो हे बघून भयंकर मजा वाटली होती! >>>
हो. एका त्याचाच काही भाग रिपेअर करण्याच्या सीन मधे तो एकदम जवळून काहीतरी निरखून बघत असतो, तेव्हा तो नेहमीच्या एखाद्या सीन मधे पिस्तुलाच्या बॅरल मधे किती गोळ्या आहेत ते बघतोय असेच वाटते.
हे कोणत्यातरी बाफ वर लिहीले होते - पण "मंझिल" पिक्चरचे काही सीन्स बरेच आधी शूट झालेत, तर काही नंतर. त्यामुळे अमिताभचा प्री-जंजीर लुक अनेक सीन्स मधे दिसतो ("रिमझिम गिरे सावन" ची लता व्हर्जन .- ते मुंबईतील पावसातील शूट) तर बाकी सीन्स मधे लेट ७०ज मधला लूक (त्याच गाण्याची किशोर व्हर्जन). यू ट्यूबवर या ओळी सर्च मधे टाकल्या तरी ज्या क्लिप येतील त्यात सहज दिसेल.
आह्ह्हा क्या बत है सी!!!!
आह्ह्हा क्या बात है सी!!!! रसिक रसिक.
"पण "मंझिल" पिक्चरचे काही
"पण "मंझिल" पिक्चरचे काही सीन्स बरेच आधी शूट झालेत, तर काही नंतर. त्यामुळे अमिताभचा प्री-जंजीर लुक अनेक सीन्स मधे दिसतो " - करेक्ट. आधी थोडा शूट झाला. नंतर बंद झाला. मग जंजीर आला, अमिताभ 'अमिताभ' झाला आणि मग अचानक त्याच्या पॉप्युलॅरिटीमुळे डबाबंद असलेल्या मंझिल ला उपयोग होईल हे जाणवल्यामुळे तो परत फ्लोअरवर गेला.
त्या नाण्याची दुसरी बाजू. सिलसिला च्या वेळी अमिताभ ने 'याराना' साठी डबिंगमधे वेळ घेत सिलसिला लांबवला होता अशी वदंता होती. सिलसिला पडल्यावर यश चोप्रा आणी अमिताभमधे बराच काळ वितृष्ट आलं होतं (बहुदा मोहब्बते पर्यंत).
शक्ती बघतोय आता
शक्ती बघतोय आता
इन्टरेस्टिंग!
'मंजिल' आणि 'सिलसिला'चे किस्से इन्टरेस्टिंग!
'जुम्मा चुम्मा' साठी आभार.
'जुम्मा चुम्मा' साठी आभार. अतिशय संयत आणि समयोचित पोस्ट.
अस्मिता.
अस्मिता.
सिलसिला पडल्यावर यश चोप्रा
सिलसिला पडल्यावर यश चोप्रा आणी अमिताभमधे बराच काळ वितृष्ट आलं होतं >>> इंटरेस्टिंग! साधारण १९८३ पासून अमिताभने अगदी ठरवून केल्यासारखे चुकीचे दिग्दर्शक निवडले
कुलीच्या अपघातानंतर आणि १९८४ च्या निवडणुकीतील खासदारकीनंतर त्याच्या चेहर्यावर वय दिसू लागले - गिरफ्तार आणि मर्द मधे ते पहिल्यांदा जाणवले.
आधीचे त्याचे दिग्दर्शक आपली प्रतिभा तोपर्यंत विसरले होते. त्याने नंतर निवडलेले दिग्दर्शक मुळातच बंडल होते. ८० च्या दशकाचा मधला काळ हा मुळातच सर्वात दरिद्री काळ होता एकूण क्वालिटीच्या बाबतीत. पण तरी सुभाष घई होता, एन चंद्रा नवीन आला होता. राहुल रवैल वगैरे सारखे तुलनेने हिट आणि नव्या स्टाइल मधे सादरीकरण करणारे लोक आले होते. पण अमिताभ तरीही मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, टिनू आनंद आणि साउथ मधले बटबटीत दिग्दर्शक यांच्याबरोबर काम करत राहिला.
आणि किशोर कुमार! तो जायच्या बर्याच आधी जागतिक दर्जाचा बिनडोकपणा करत अमिताभला शब्बीर, मोहम्मद अजीज वगैरे महान लोकांचे प्लेबॅक देऊ लागले लोक. बहुधा अमिताभ आणि किशोर मधेही थोडा काळ वितुष्ट आले होते मधली एक दोन वर्षे. पूर्ण किशोरची गाणी असलेला शराबी हा शेवटचा. त्यानंतर शहेनशाह चे टायटल साँग सोडले तर बरीचशी फुटकळ गाणीच होती किशोरची त्याला. धूप मे निकला ना करो वगैरे. मला ती फारशी आवडत नाहीत. बाकी १९८५ च्या आसपासचा काळ म्हणजे "मरीद टांगेवाला मय हूँ मरीद टांगेवाला", "हमका इशक हुवा है यारों", "डान्स दिखाउंगा ऐसा, माइकिल जैकसन के जैसा" सारख्या दुर्गंधीने भरलेला
https://www.youtube.com/watch?v=C07DthQt7-M
अर्थात ते ही आवडलेले लोक आहेत. तेथील कॉमेण्ट्स पाहता
>>> हा मुळातच सर्वात दरिद्री
>>> हा मुळातच सर्वात दरिद्री काळ होता एकूण क्वालिटीच्या बाबतीत. पण तरी सुभाष घई होता


मी एक मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचताना, पुन्हा वाचून बघते.
मरीद टांगेवाला >>
मरीद टांगेवाला >>
भयाण सिनेमे होते ते ! महान , जादूगर, आखिरी रास्ता ,गंगा जमना सरस्वती, तो सतत टिव्ही वर लागणारा सूर्यवंशी.
८०च्या दशकापेक्षा आत्ता त्याच्या वयाच्या ऐंशीच्या घरात बरेच चांगले रोल मिळतायत त्याला त्या मानाने. नॉन ग्लॅमरस आणि विविध प्रकारचे.
मरीद टांगेवाला, हाहाहा.
मरीद टांगेवाला, हाहाहा. फारएन्ड भारीच.
अरे वा! मस्त धागा
अरे वा! मस्त धागा
वाचायला खूप आवडतोय
अमिताभ च्या आवाजाची कायमस्वरूपी फॅन. इतकी की पुचाट आवाजाचे हिरो , हिरो वाटतच नाहीत .
वर लिहिलेले बहुतेक सगळे सिन लिंक ना बघता डोळ्यासमोर आले. खरंतर तेव्हा युट्यूब, ऑनलाइन सहज बघणे वगैरे काहीच नव्हते . Vcr आणून किंवा थिएटर मध्ये सिनेमा पाहिला जायचा पण एक एक डायलॉग आणि सिन लक्षात आहे बहुतेकांच्या हे एक आश्चर्यच
लहानपणी अमिताभची गाणी तोंडपाठ करून भसाड्या आवाजात एकत्र गाणे, ते पण मधल्या म्युझिक सकट, हा माझा आणि भावाचा एक छंद होता. त्यामुळे अनेक गाणी आणि म्युझिक पाठ आहे अजूनही , लेकीला फार आश्चर्यकारक वाटतं त्याचं.
अमिताभ च्या आवाजातील नीला आसमा सो गया एक नितांत सुंदर आवडतं गाणं.
फक्त तो 80 च्या दशकातला काळ पार धुवून टाकावा इतका वाईट होता.
अमिताभच्या परवाना चित्रपटाची चर्चा कुठेच होत नाही पण तो ही एक छान सिनेमा आहे. त्यातला सस्पेन्स इथे लिहीत नाहीये.
लहानपणी अमिताभची गाणी तोंडपाठ
लहानपणी अमिताभची गाणी तोंडपाठ करून भसाड्या आवाजात एकत्र गाणे, ते पण मधल्या म्युझिक सकट >>>
हो. आम्ही लावारिसच्या गाण्याचे ते म्युझिक खुर्च्यांवर वाजवायचो. अपनी तो जैसे तैसे च्या आधीचे.
तो सतत टिव्ही वर लागणारा सूर्यवंशी >>> सूर्यवंशम
सूर्यवंशी आणखी वेगळाच.
सावली मी परवानाचा उल्लेख
सावली मी परवानाचा उल्लेख केलाय. व्हिलन होता, असं लिहिलंय मी. मला आवडला, समोर ठोकळा दोघे, नवीन निश्चल आणि योगिता बाली. नवीन एजेड झाल्यावर अभिनयात बरा वाटला पण तेव्हा तरी ठोकळा वाटायचा.
फारएन्ड - लिंक पाहिली- भारी
फारएन्ड - लिंक पाहिली- भारी गाणे आहे डिस्को भांगडा... चोरिओग्राफी गंडलीय...
मीनाक्षी काय कातिल दिसतेय- का बरे हिट झाली नसावी?
“ तो सतत टिव्ही वर लागणारा
“ तो सतत टिव्ही वर लागणारा सूर्यवंशी >>> सूर्यवंशम Happy सूर्यवंशी आणखी वेगळाच.” - वेगळा हे खरंय, पण दर्जाच्या बाबतीत ह्याच मांदियळीत येतो
“ बहुधा अमिताभ आणि किशोर
“ बहुधा अमिताभ आणि किशोर मधेही थोडा काळ वितुष्ट आले होते मधली एक दोन वर्षे. ” - किशोरकुमारने काढलेल्या कुठल्याश्या (बहुदा ममता कि छाव में - जो बराच काळ रखडला होता) सिनेमात अमिताभने गेस्ट अॅपिअरन्सला नकार दिल्यावरून बिनसलं होतं.
बाकी तेव्हाचे ते 'प्रति-रफी' भीषण होते (बरेचसे).
Pages