अमिताभ - टॉप टेन

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 October, 2022 - 13:56

बच्चन ऐंशी वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर बच्चन मेनिया कशाबद्दल सुरू आहे ते शोधल्यावर कळलं!

इथे बरेच (सगळेच?) बच्चन फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली बच्चनची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

आमच्या चाळीत दिवाळीच्या शेवटी प्रोजेक्टर वगैरे आणून सिनेमा बघायचा कार्यक्रम असायचा. तो सिनेमा कायम अमिताभचाच असायचा. (बहुधा 'डॉन'च असायचा नेहमी वाटतं! Proud ) . त्यात बहुधा प्रथम पाहिलं असावं बच्चनला. 'डॉन का इंतजार', 'नीचे तुम्हारी आँटी बहुत सारे अंकल्स को लेकर आयी है' वगैरेवर क्राउडबरोबर नेमाने टाळ्या पिटल्याचंही आठवतं.

पण अमिताभ ही व्याधी कधी जडली ते काही आठवत नाही.

तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल. Happy

त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट अमिताभ मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अ‍ॅक्शन, काहीही.

या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :

१. चुपके चुपके : परिमल बनून असरानीच्या घरी राहायला जातो आणि जया भादुरीला बघताच प्रेमात पडतो. जात्या सत्प्रवृत्त माणूस, सोंग उघडं पडेल या भीतीने सतत टेन्शनमध्ये असतो. ते एक फार प्रचंड भारी सुंदर पंक्चरलेलं हसू हसत 'हॅ हॅ हॅ, गाना तो आप को सुनाना ही पडेगा' म्हणतो ते बघून मला दर वेळी फुटायला होतं! सिनेमा भाषेच्या गमतीजमतींचा आहे, आणि नखशिखांत गुलजारचाच आहे, पण अमिताभ हा प्रसंग खिशात घालतो!

२. नमक हराम : यूनियन लीडरने अपमान केला त्याबद्दल राजेश खन्नाला सांगताना संतापाने अक्षरश: डोळ्यांत पाणी आलेला बच्चन. तो रोलच खराखुरा अ‍ॅन्ग्री यंग मॅनचाच आहे. त्याच किंवा बापाला हार्ट अटॅक आल्याचं कळतं त्या प्रसंगात त्याबद्दल बोलताना 'ही इज अ ब्लडी… ही इज अ ब्लडी…' याच्यापुढे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रागाने!

३. त्रिशूल : तो 'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना खून है'वाला सगळाच प्रसंग! बापाबद्दलचा राग, सूडबुद्धी एकीकडे आणि त्याने आणि गीता सिद्धार्थने सहज कौटुंबिक जिव्हाळ्याने त्याच्या जखमी हाताची शुश्रुषा केल्यावर एकदम डिसार्म होणं दुसरीकडे! त्या सगळ्या संमिश्र भावना एकाच वेळी चर्येवर दिसत असतात! अफाट!

४. शोले : कितीतरीच प्रसंग - लिस्ट करणं अवघड होईल. 'बहुतों को इन्होंने दो घंटों में सिखा दिया है', 'तो शादी के बाद तेरे घर मुझे आया की नौकरी मिलनेवाली है' हे नेहमी आठवल्या जाणार्‍या 'तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ?' किंवा 'पहली बार सुना है ये नाम'वगैरेंव्यतिरिक्त. प्रत्येक संभाषणात जी 'पते की बात' असते ती तो बोलतो किंवा विचारतो! त्या अनुराधा चोप्राच्या पुस्तकात वाचलं होतं की सेटवर बसून सलीम जावेद डायलॉग्ज ऑन द फ्लाय लिहीत होते. तसं असेल तर हे कॅरेक्टर बिल्डिंग किती भारी आहे ते आणखीनच जाणवतं.

५. शक्ती : तो स्मिता पाटीलच्या घरी राहात असताना राखी त्याला 'घरी चल' म्हणून भेटायला येते तो सगळाच प्रसंग. तो आपण एका मुलीबरोबर राहातो हे आईला कसं सांगायचं म्हणून इतका अवघडून जातो की ज्याचं नाव ते! 'वो वहाँ उस का कमरा - वहाँ वो जाने, उस का काम जाने; मैं यहाँ ये अपना… अलग…'

६. दीवार : मारामारीत कशाला पडलास म्हणून निरुपा रॉय त्याला ओरडत असते तेव्हा तिच्याकडे रोखून बघत फक्त 'तो क्या मैं भी भाग जाता?' इतकंच विचारतो! ते 'भी' ठासूनसुद्धा म्हणत नाही, गरजच नसते! ती त्या संपूर्ण कुटुंबाची सगळ्यात दुखरी नस असतेच. ऐकून तिच्या वर्मावर आघात होतोच, पण ते म्हणताना त्यालाही तितकाच त्रास होत असतो!

७. पुन्हा दीवार : शशी कपूरला पोलिस ट्रेनिंगसाठी सोडायला स्टेशनवर जातात तेव्हा तिथे नंतर नीतू सिंग येते. शशी कपूर दोस्त म्हणून ओळख करून देतो, पण अमिताभ काय ते समजतो आणि आईला घेऊन शिस्तीत तिथून कटतो. मग हळूच मागे येऊन शशी कपूरच्या कानात 'अच्छी है' म्हणून सांगून जातो.

८. डॉन : लता चांगली गाते हे आपल्याला माहीत असतंच, पण इतर कोणी तिची गाणी गायलेली ऐकली की ती चांगली म्हणजे किती चांगली होती ते नीटच कळतं तसं माझं शाखाचा डॉन बघताना झालं! 'मुझे उसके जूते पसंद नहीं'चं 'हॅहॅहॅहॅ शूज' झालेलं ऐकवेना!

९. काला पत्थर : राखी काहीतरी बॅन्डेज वगैरे आणायला दुसर्‍या खोलीत जाते तेव्हा तिच्या टेबलावर उपडं घातलेलं पुस्तक न राहवून उचलून बघतो तो सीन.

१०. त्याच्या आवाजात ऐकलेल्या नज्म/कविता! 'कल नयी कोपलें फूटेंगी', 'मैं और मेरी तनहाई', इ.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" Lol रसिक, संयत आणि समयोचित" काय खरं नाही.. सोमवारी बहुतेक 'शर्टाला लागलेले लिपस्टीकचे डाग कसे काढावे?' धागे येणार..

अमिताभने एकेहंगल छाप दु:खी म्हातारे कमी करून रसिक बॉलिवूडीय म्हातार्‍यांचा ट्रेंड सुरू केला -
झूम बराबर झूम
चली इष्क दी हवा चली
गो मीरा गो
मौला कभी मुझे छोडना

मस्त धागा आणि प्रतिसाद!
भरत यांचा प्रतिसाद वाचताना माझ्या लक्षात आलं की माझंही असंच काहीसं झालं आहे. मी अकरावी-बारावीत असताना कौन बनेगा करोडपती सुरू झालं. तेव्हाच कधीतरी 'आनंद', 'चुपके चुपके' बघितला, 'जंजीर' बघितला आणि मग बच्चन 'आवडायला' लागला! शोले, शान, दीवार, अमर अकबर अँथनी वगैरे वगैरे तोपर्यंत बघितलेले होते, पण खऱ्या अर्थाने अमिताभ बच्चन आवडायला लागला ते केबीसीमुळे. मग परत हे जुने सिनेमे बघताना त्यातला अमिताभ जास्त आवडायला लागला.
अमिताभ-किशोर कुमार या जोडीची कित्येक गाणी प्रचंड आवडतात. 'ओ साथी रे', 'दिलबर मेरे', 'आये तुम याद मुझे (मिली)' 'मीत ना मिला' ही आणि अशी कितीतरी.
अनेक सिनेमे अजून बघायचे राहिलेत.
आज थिएटरमध्ये अमर अकबर अँथनी बघणार आहोत! Happy

केबीसीमुळे वा तेव्हापासून अमिताभ आवडायला लागला हे यंग जनरेशनचे प्रतीक आहे Wink

मला अमिताभ कधीपासून आवडायला लागला माहीत नाही. कदाचित शोलेपासून. पण त्या आधी मला मिथून आवडायचा आणि आजोळी गेले की माझ्या मोठ्या मामेभावंडांशी (तीन भाऊ आणि दोन बहिणी) नेहमी अमिताभ विरुद्ध मिथुन वाद चालायचे. प्रत्यक्षात मी तेव्हा ईतका बावळट वयात होतो की जेव्हा गोविंदाचा ईल्जाम पिक्चर पाहिला तेव्हा त्यालाही नाचताना बघून मी मिथुनच बोलू लागलो Happy त्यामुळे त्या वयातल्या आवडीला तसाही अर्थ नव्हता.

मग एका वर्षी त्याच मामाच्या घरी एकदा वीसीआर आणि कॅसेटवर आठवड्याभरात तब्बल पाच सहा वेळा शोले बघितला. तिथून अमिताभ आवडू लागला तो कायमचाच. त्या वयाला साजेशे डॉन, अमर अकबर, नमक हलाल, गेला बाजार मर्द, कूली, नसीब हे सुद्धा आवडीचे होते. अग्नीपथ आलेला त्यातला बच्चन जगात भारी वाटलेला.

मग जरा थोडी अजून अक्कल आली. तेव्हापासून दिवार आणि त्रिशूल या दोन्हीतला अमिताभ माझा अमिताभगिरीचा बेंचमार्क आहे. मी माझ्या आयुष्यात दिवारपेक्षा जबरदस्त संवाद कधी ऐकले नाहीत. कारण तशी संवादफेक करायला दुसरा अमिताभ कधी झाला नाही. टॉप टेन काढता आले तर बघूया फुरसतीने. पण अमिताभचे टॉप टेन पिक्चर काढायचे असतील तर माझ्यासाठी दिवार पहिला!

{आणि किशोर कुमार! तो जायच्या बर्‍याच आधी जागतिक दर्जाचा बिनडोकपणा करत अमिताभला शब्बीर, मोहम्मद अजीज वगैरे महान लोकांचे प्लेबॅक देऊ लागले लोक}
किशोरकुमार त्याच काळात झोपडी में चारपाई सारखी गाणी गात होता ना? सोबत आशा आणि लताही होत्याच.

रंग बरसे गाण्याबद्दल सहमत. तसेच मेरे अंगने मे त्याच्या आवाजातले आवडले नव्हते, पण ते केवढे गाजत होते की तेव्हा. अलका याज्ञिकच्या आवाजातले ओके.

आमच्या गावात चित्रपट रिलीज होऊन बऱ्याच उशिरा लागायचे दोन तर कधी तीन वर्षांनी. जुने गाजलेले चित्रपट मात्र सुरू असायचे. मी अमिताभचा पहिला चित्रपट बहुतेक जंजीर बघितला. मग दीवार, डॉन, मुकद्दर का सिकंदर , शोले, काला पत्थर असे बघितले दोन-तीन वर्षात.
कुली रिलीज झाला तेव्हा शाळे तर्फे विज्ञान प्रदर्शनासाठी अमरावतीला गेलो होतो. तिथे सरच आम्हाला हा चित्रपट बघायला घेऊन गेले, आणि तो माझ्यासाठी अमिताभच्या इमेजला बसलेला एक धक्का होता. तसेच दुसरा धक्का 'महान'.
त्यानंतर त्रिशूल बघितला आणि त्याचे इतर गाजलेले चित्रपट पुढे पाहिले आणि गाडी परत त्याच्या फॅन च्या रुळावर आली.

माझ्या पिढीला पिकू तला अमिताभ जवळचा वाटलेला.
त्यांचे आधीचे गाजलेले डॉन, शोले , नमक हलाल, शक्ती वगैरे चित्रपट द अमिताभ बच्चन या वलायामुळे पाहिलेले. अणि आवडलेले होते.
शोलेतला "तुम्हारा नाम क्या है बसंती" हा डॉयलॉग नवीन आलेल्या मुलांना नाव विचारायला कॉलेजात वापरायचो.
एकंरीतच बच्चन हे प्रकरण कानाच्या पाळीला हात लावण्याच आहे हे नक्की

>>>>>>>>किशोरकुमार त्याच काळात झोपडी में चारपाई सारखी गाणी गात होता ना? सोबत आशा आणि लताही होत्याच.
फार भिकारडा काळ होता तो संगीताकरता.
नशीब आम्ही वयात आलो आणि 'साथिया ये तूने क्या किया ....' , 'पापा केहेते है बडा ...', 'एक दो तीन ....' आदि मस्त गाणी आली. नाहीतर त्या 'हलवा वाला आ गया.....' वाल्या, गाण्यांनी त्या आयुष्यातल्या वसंतोत्सवाची वाट लागली असती Wink

आणि किशोर कुमार! तो जायच्या बर्‍याच आधी जागतिक दर्जाचा बिनडोकपणा करत अमिताभला शब्बीर, मोहम्मद अजीज वगैरे महान लोकांचे प्लेबॅक देऊ लागले लोक}>>>>+१ फारच कर्कश गाणी आहेत ती !

सामो Lol
'आपकी आंखों में कुछ महके हुए से ख़्वाब है' लावायचे की वसंतोत्सवात ! आता स्पॉटीफाय व यूट्यूबच्या कृपेने कस्टमाईज्ड वसंतोत्सव आणता येतो व सगळ्या काळांत/मूड्समधे उंडारता येते.

मस्त धागा आणि प्रतिसाद!
धन्यवाद स्वाती, निवांत लिहेन. Happy

मला फार भारी वाटते त्या काळातील लोकांबद्धल.. कसले नशीब होते त्यांचे... यंग बच्चन चे चित्रपट थेटरात जाऊन बघायला कसली मजा येत असेल.. आणि एकामागोमाग एक एकसे बढकर एक चित्रपट... राजेश खन्ना च्या 1969 पासून 1972 सुवर्णकाळ नंतर चा चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ तो हाच - 1973 ते 1981 बच्चन

आत्ताच बघितला अमर अकबर अँथनी. थिएटर हाऊसफुल होतं Happy टाळ्या शिट्ट्या जोरदार! मजा आली. उद्या संध्याकाळचा 'डॉन'ही हाऊसफुल आहे.

मी पाहिलं तेव्हा आमच्या कडे डॉन नव्हता. कभी कभी ही नाही.
दिवार हाऊस फुल्ल. मग काला पत्थर ठरवत होतो, पण
बायकोने कालिया पाहिला नाही तेव्हा कालिया ठरलं उद्या रात्रीचा शो.

>>>>>'आपकी आंखों में कुछ महके हुए से ख़्वाब है' लावायचे की वसंतोत्सवात !
नाही. शिळ्या फुलांनी नाही. प्रत्येकाच्या तारुण्यातली गाणी तिच्या/ त्याच्या हृदयाच्या ठोक्यात वाजतात आणि ती प्रत्येके पिढीची वेगळी असतात. 'आपकि आंखोमे' वाला घर सिनेमा १९७८ चा होता मी दहा वर्षाचीही नव्हते. वो गाना मेरावाला नही Happy

टाळ्या शिट्ट्या जोरदार! >>> मस्त!

मानव - कालिया मधे सुरूवातीचा "कल्लू" आवर्जून बघा. खूप चांगले काम केले आहे अमिताभने. महा बिनडोक व्यक्तिरेखा आहे. एका शेजारच्या घरी मूल होते म्हणून स्वतःच खुष होऊन नाचणे वगैरे. तो डम्बनेस अस्सल दाखवला आहे बच्चनने. नंतरच्या कालिया व्यक्तिरेखेमुळे तो आणखीनच उठून दिसतो.

काला पत्थर तेव्हा विशेष चालला नव्हता. पण काही चित्रपट टाइम टेस्ट मधे पास होत नाहीत त्याच्या उलटे आहे याच्याबाबतीत. आता तो खूप बघणेबल आहे. मात्र तो एक कमर्शियल चित्रपटच आहे, आणि सर्वांचीच कॅरेक्टर्स चांगली लिहीली असली, तरी अमिताभच्या आणि शत्रुघ्नच्या कॅरेक्टरला इतरांपेक्षा भावखाऊ भूमिका आहे हे सगळे गृहीत धरूनच पाहावा. तो "खाणीवरच्या लोकांचे प्रश्न रेखाटणारा" पिक्चर नव्हे. म्हणजे ते ही आहेच पण ते केवळ बॅकग्राउण्डला.

काला पत्थर तेव्हा विशेष चालला नव्हता.
>>>
हे मी ऐकलेले तेव्हा मलाही आश्चर्य वाटलेले. कारण आमच्या लहानपणी काला पत्थरच्या क्लायमॅक्सची फुल्ल हवा होती Happy

नाहीतर त्या 'हलवा वाला आ गया.....' वाल्या, गाण्यांनी त्या आयुष्यातल्या वसंतोत्सवाची वाट लागली असती Wink

सामो अगदी अगदी Lol

जेवढी भंगार गाणी ऐंशीच्या दशकात होती तेवढीच मेलोडीयस ९० च्या दशकात होती. किंबहुना ती ९० च्या दशकातली मेलोडी मी आजही मिस करतो.
ईथे हे अवांतरच होईल. मागे मी याचा एक वेगळा धागा काढणार होतो. पण पुढे राहून गेले.. कोणीतरी काढायला हवा.. नाहीतर मग मीच काढेन दोन चार दिवसात..

ही माझी यादी. नंतर बदलू पण शकते. वरखाली होऊ शकते.

१. https://www.youtube.com/watch?v=01hsGrkDNWQ

२. https://www.youtube.com/watch?v=W8X1cYD5QAw

३. https://youtu.be/Sl1ap3W3bGw?t=121
( ३:१७ पर्यंत)

४. https://www.youtube.com/watch?v=rAmxXb4s08Q

५. https://youtu.be/g3HnMZd9boc?t=36
( ३:३७ पर्यंत)

६. https://www.youtube.com/watch?v=xd_3d2Mukq8

७. https://www.youtube.com/watch?v=7dO_MS9tZ5E

८. https://www.youtube.com/watch?v=L7vwnD8vWmk

९. https://www.youtube.com/watch?v=Jf92MOkrbEw

१०. https://www.youtube.com/watch?v=g36rfq1xh-U

हा बेस्ट सीन (मोठा आहे. प्रताधिकार मुळे गाणे कट केले आहे.)
https://www.youtube.com/watch?v=F7Ui-CVpf0w

अजून कुणालाच 'खून पसिना ' नाही आठवला का?
आणि 'इन्कलाब ? यातील क्लायमॅक्स सीन लवकरात लवकर विधान सभेत घडून यावा असे वाटते

वरचे सगळे आवडते आहेतच पण मला त्याचा सत्ते पे सत्ता पण आवडतो. ओव्हर द टॉप आहे पण मस्त आहे अमिताभ त्यात ! एकदम टिपिकल मोठ्ठा भाऊ, दादा, शोभतो!

कालिया पाहिला काल. अमजद खान, कादर खान, कल्लु आणि कालिया होउन बाहेर येणारा अमिताभ, प्राण, परवीन बाबी सगळ्यांचे टाळ्या शिट्ट्यांनी स्वागत केले पब्लिकने. अमिताभच्या कित्येक आणि इतरांच्याही बर्‍याच सीन्सना अशीच दाद दिली, अनेक ठिकाणी भीड न बाळगता मोठ्याने हासत होती पब्लिक. मजा आली.

काला पत्थरही बघाणार उद्या.
फारेंड, वर काला पत्थर बद्दल लिहिले त्याच्याशी सहमत. कमर्शीयल चित्रपट म्हणुनच आधी बघितलेला.
अमिताभ, शशी, शत्रु, नितु सिंग त्यात खास आवडलेले. त्यातिल एकल कोंडा आणि अँग्री यंग मॅन अमिताभ शिवाय शत्रुचे दांडगे पात्र, टपोरी डायलॉग, दूरोंंकी आयी बारात गाण्यात शत्रुच्या नुकत्याच प्रेमात पडलेली नाचणारी नितु सिंग, जगया जगया गाण्यात राखीला छत्रीतून घेउन जाणारा अमिताभ आणि पावसात पायर्‍यांवर नाचणारी नीतु सिंग, अपनेपे भरोसा है तो ये दांव लगाले गाण्याच्या पार्श्वसंगितात 'तिसरे बादशाह हम खुद' म्हणणारा शत्रु, टपरीत जाउन टेबल वर पाय ठेवून आरामात शीळ घालणारा शशी हे सगळे लहानपणी एकदमच भारी वाटले होते.
परत थिएटर मध्ये जाउन पहाण्यात मजा येईल.

----
नितु सिंग ऐवजी नूतन लिहिले होते आधी मी, कप्पाळ बडवणारी बाहुली. Lol . केले दुरुस्त.

मस्तच मानव! इथेपण अमर, अकबर, अँथनी तिघांच्याही एन्ट्रीला शिट्ट्या, टाळ्या, रक्तदानाच्या सुप्रसिद्ध सीनला टाळ्या. इतरही अनेक सीन्सना.
माझ्या पुढे बसलेली मुलगी ऋषी कपूरची फॅन असावी. पर्दा है पर्दा गाणं सुरू झालं तेव्हा उठून नाचायला लागली Happy ज्येष्ठ नागरिक भरपूर प्रमाणात आले होते. मस्त अनुभव होता.

या निमित्ताने असे जुने सिनेमे (अमिताभचेच नव्हे, कुणाचेही) परत थिएटरमध्ये लागण्याचा ट्रेंड आला तर मजा येईल.

" कौन कंबख्त नशे के लिये पीता है?" ह्या वाक्याची सर्वात चांगली व परिणामकारक डिलिव्हरी अमिताभ ने अभि मान सिनेमात केलेली आहे. तो मैत्रीणी कडे पक्षी बिंदू कडे जाउन दारू पीत असतो दुखावला गेलेला. व बायको न्यायला येते तेव्हा जिन्यावर उभा राहुन म्हणतो. आतली सर्व रुखरुख अपमान डिवचले जाणे त्या एका वाक्यात आहे.

बाकी मारो औधा के होवे. व इतर सीन्स बेस्टच. शराबी व मर्द मात्र बघवले नाहीत थेट्रात गेलेलो पण बसवेना.

मला इर बीर फट्टे आवड ते गाणे

मारो औधा के होवे >>> Happy यस. आणि नोकरी मागायला गेल्यावर "तू तर चांगला गातोस" असे स्मिता पाटील म्हणते, तेव्हा "गाणा गाणेके साथ साथ खाणा खाणे की भी जरूरत होवे" Happy पिक्चरभर तो एक हायपर आवाज त्याने मस्त पकडला आहे Happy

नमक हलाल मधला सर्वात आवडता सीन म्हणजे सर्वात शेवटी सत्येक कप्पूला खुर्चीखाली झोपवून खुर्चीवर भर रस्त्यात बसलेला असतो तो Happy

नितु सिंग ऐवजी नूतन लिहिले होते आधी मी >>> Lol

मानव, वावे - मस्त! काला पत्थर मधला एकही संवाद नसलेला पण जबरी खुन्नस वाला सीन म्हणजे शशी कपूर अमिताभला एका ट्रकबरोबर जायला सांगतो. तो ट्रकमधे मागच्या बाजूला वर चढतो तर तेथे शत्रू बसलेला दिसतो. दोघांचे हावभाव फार जबरी आहेत.

Happy birthday Amitabh, शुभेच्छा.

आज kbc अमिताभ स्पेशल आहे, जया आणि अभिषेक येणार आहेत.

मस्त मस्त धागा :डोळ्यात बदाम: अनेक सिन्स डोळ्यांपुढे आलेत. काही बघावे लागणार पुन्हा.
आलेत बहु, होतिल बहु परी ह्या सम हाच!

मस्त धागा आहे, सगळ्यांचे किस्से भारी कारण मुळात अमिताभ बच्चनचं भारी. मला आठवतंय जेव्हा जुना गोलमाल ( अमोल पालेकर चा) वरळीला थेटर मध्ये लागला होता,( थेटरचं नाव आठवतच नाहीये. बादल बिजली टाईप ३ थेटर एका ठिकाणी, सत्यम शिवंम बहुतेक )
त्यात एका गाण्यापुरता अमिताभ बच्चन आहे या एका कारणासाठी पिक्चर ची तिकीटं काढली होती. नंतर गोलमाल ऑटाफे झाला तो भाग वेगळा.
दोस्तांना चे डायलॉग कोणी नाही आठवले का? कि मी मिस केली पोस्ट. अमिताभ एका वेगळ्याच बाई बरोबर मुलं किती असावीत आणि मुलांचं ( न मारता Wink ) संगोपन यावर गप्पा मारत रंगून जातो.आणि झिनत तिथे येते. मस्त सीन आहे तो.

त्यानंतरचं गाणं ही छान आहे.
दिल्लगीने दी हवाsssss
थोडासा धुवा उठा
और आग जल गयी ......
तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गयी

शोले मधील : साला नौटंकी घडी घडी नाटक करता है. मग ते पुढे धरमचे स्थळ घेउन मौसी कडे जाणे. ते फिकट निळे जाकीट व त्यावर चिकटवलेल्या चांदण्या. मला ते भारी क्लासी वाटे.

अमर अकबर एंथनी मध्ये: अपुन तेरेकु दोइच मारा लेकिन सॉलिड मारा कि नै. व पर्दा है पर्दा मध्ये मधल्या कडव्यात नोटांची माळ घेउन स्टेज वर जाणे व माळ घालून परत येणे. अगदी सेक्युअर माणूस. नको तिथे फूटेज खायचे नाही.

शराबीतील मुझे नौलख्हा मंगादेरे मधील लास्ट कडवे. नशा शराब में होता तो नाचती बोतल..... ह्यातील भाव समजावुन सांगण्या पलीकडे आहे.

ह्यातीलच मूच्छे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना. मग इंतहा हो गयी इंतजारकी. मग प्रेयसी आल्यावर लगेच काय भारी तुकडा आहे ड्रम्स चा

Pages