अमिताभ - टॉप टेन

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 October, 2022 - 13:56

बच्चन ऐंशी वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर बच्चन मेनिया कशाबद्दल सुरू आहे ते शोधल्यावर कळलं!

इथे बरेच (सगळेच?) बच्चन फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली बच्चनची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

आमच्या चाळीत दिवाळीच्या शेवटी प्रोजेक्टर वगैरे आणून सिनेमा बघायचा कार्यक्रम असायचा. तो सिनेमा कायम अमिताभचाच असायचा. (बहुधा 'डॉन'च असायचा नेहमी वाटतं! Proud ) . त्यात बहुधा प्रथम पाहिलं असावं बच्चनला. 'डॉन का इंतजार', 'नीचे तुम्हारी आँटी बहुत सारे अंकल्स को लेकर आयी है' वगैरेवर क्राउडबरोबर नेमाने टाळ्या पिटल्याचंही आठवतं.

पण अमिताभ ही व्याधी कधी जडली ते काही आठवत नाही.

तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल. Happy

त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट अमिताभ मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अ‍ॅक्शन, काहीही.

या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :

१. चुपके चुपके : परिमल बनून असरानीच्या घरी राहायला जातो आणि जया भादुरीला बघताच प्रेमात पडतो. जात्या सत्प्रवृत्त माणूस, सोंग उघडं पडेल या भीतीने सतत टेन्शनमध्ये असतो. ते एक फार प्रचंड भारी सुंदर पंक्चरलेलं हसू हसत 'हॅ हॅ हॅ, गाना तो आप को सुनाना ही पडेगा' म्हणतो ते बघून मला दर वेळी फुटायला होतं! सिनेमा भाषेच्या गमतीजमतींचा आहे, आणि नखशिखांत गुलजारचाच आहे, पण अमिताभ हा प्रसंग खिशात घालतो!

२. नमक हराम : यूनियन लीडरने अपमान केला त्याबद्दल राजेश खन्नाला सांगताना संतापाने अक्षरश: डोळ्यांत पाणी आलेला बच्चन. तो रोलच खराखुरा अ‍ॅन्ग्री यंग मॅनचाच आहे. त्याच किंवा बापाला हार्ट अटॅक आल्याचं कळतं त्या प्रसंगात त्याबद्दल बोलताना 'ही इज अ ब्लडी… ही इज अ ब्लडी…' याच्यापुढे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रागाने!

३. त्रिशूल : तो 'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना खून है'वाला सगळाच प्रसंग! बापाबद्दलचा राग, सूडबुद्धी एकीकडे आणि त्याने आणि गीता सिद्धार्थने सहज कौटुंबिक जिव्हाळ्याने त्याच्या जखमी हाताची शुश्रुषा केल्यावर एकदम डिसार्म होणं दुसरीकडे! त्या सगळ्या संमिश्र भावना एकाच वेळी चर्येवर दिसत असतात! अफाट!

४. शोले : कितीतरीच प्रसंग - लिस्ट करणं अवघड होईल. 'बहुतों को इन्होंने दो घंटों में सिखा दिया है', 'तो शादी के बाद तेरे घर मुझे आया की नौकरी मिलनेवाली है' हे नेहमी आठवल्या जाणार्‍या 'तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ?' किंवा 'पहली बार सुना है ये नाम'वगैरेंव्यतिरिक्त. प्रत्येक संभाषणात जी 'पते की बात' असते ती तो बोलतो किंवा विचारतो! त्या अनुराधा चोप्राच्या पुस्तकात वाचलं होतं की सेटवर बसून सलीम जावेद डायलॉग्ज ऑन द फ्लाय लिहीत होते. तसं असेल तर हे कॅरेक्टर बिल्डिंग किती भारी आहे ते आणखीनच जाणवतं.

५. शक्ती : तो स्मिता पाटीलच्या घरी राहात असताना राखी त्याला 'घरी चल' म्हणून भेटायला येते तो सगळाच प्रसंग. तो आपण एका मुलीबरोबर राहातो हे आईला कसं सांगायचं म्हणून इतका अवघडून जातो की ज्याचं नाव ते! 'वो वहाँ उस का कमरा - वहाँ वो जाने, उस का काम जाने; मैं यहाँ ये अपना… अलग…'

६. दीवार : मारामारीत कशाला पडलास म्हणून निरुपा रॉय त्याला ओरडत असते तेव्हा तिच्याकडे रोखून बघत फक्त 'तो क्या मैं भी भाग जाता?' इतकंच विचारतो! ते 'भी' ठासूनसुद्धा म्हणत नाही, गरजच नसते! ती त्या संपूर्ण कुटुंबाची सगळ्यात दुखरी नस असतेच. ऐकून तिच्या वर्मावर आघात होतोच, पण ते म्हणताना त्यालाही तितकाच त्रास होत असतो!

७. पुन्हा दीवार : शशी कपूरला पोलिस ट्रेनिंगसाठी सोडायला स्टेशनवर जातात तेव्हा तिथे नंतर नीतू सिंग येते. शशी कपूर दोस्त म्हणून ओळख करून देतो, पण अमिताभ काय ते समजतो आणि आईला घेऊन शिस्तीत तिथून कटतो. मग हळूच मागे येऊन शशी कपूरच्या कानात 'अच्छी है' म्हणून सांगून जातो.

८. डॉन : लता चांगली गाते हे आपल्याला माहीत असतंच, पण इतर कोणी तिची गाणी गायलेली ऐकली की ती चांगली म्हणजे किती चांगली होती ते नीटच कळतं तसं माझं शाखाचा डॉन बघताना झालं! 'मुझे उसके जूते पसंद नहीं'चं 'हॅहॅहॅहॅ शूज' झालेलं ऐकवेना!

९. काला पत्थर : राखी काहीतरी बॅन्डेज वगैरे आणायला दुसर्‍या खोलीत जाते तेव्हा तिच्या टेबलावर उपडं घातलेलं पुस्तक न राहवून उचलून बघतो तो सीन.

१०. त्याच्या आवाजात ऐकलेल्या नज्म/कविता! 'कल नयी कोपलें फूटेंगी', 'मैं और मेरी तनहाई', इ.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख फा - निरीक्षणे पटली - थोडी लांबड लागली आहे असे वाटले पण त्यातली सिनेमांची वर्गवारी पटली.

काल एका पॉड कास्ट मध्ये तो विजयहजारे गिव्ह्ज कन्सिडरेशन टु विजय मर्चंट मोनोलॉग लावला होता. अगदी स्ट्रेस मध्ये होते तरी ऐकून दोन मिनिट इतके हसू आले . हे एका कलाकाराचे यश.

मागच्या पोस्टमधे मोबाईलवरून व्हिडीओच्या लिंका देताना तारांबळ उडालीच. त्यामुळे एक एक दोन दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या. आणि बरेच दिवस इथे नसल्याने चार तासांच्या नियमांचा विसर पडला.
आवडत्या कुठल्याच नट नट्यांचे दहा बनवणे अवघड आहे. त्यात अमिताभजींसारखे दिग्गज असल्यावर अजूनच अवघड. त्यांचे सुपरस्टार ही इमेज बनवणारे जे सिनेमे १९७३ ते १९७५ या काळात आले तेच त्यांचे सर्वात आवडते चित्रपट आहेत. नंतर आलेले आहेत ते त्यांच्या नावाची वसुली करणारेच वाटतात. त्यात अभिनेत्याची काही चूक नाही. त्याने आपले १००% दिले आहे. कदाचित लोक त्या काळी फक्त आपल्या आवडत्या सुपरस्टार ला बघण्यासाठी जात असतील. तीन तास त्याचा पडद्यावरचा वावर एखाद्या सुसह्य कथेत बांधलेला असावा इतकीच माफक अपेक्षा असावी.
मुकद्दर का सिकंदर अलिकडे पाहिलाय. त्यामुळे तो लाऊड वाटला. नाहीतर देवदासचा सर्वात ब्रिलियंट रीमेक झाला असता.
त्यामुळे लिंका देताना एकाच चित्रपटातले दोन सीन्स नसावेत, एकाच इमेजचे नसावेत हे बघताना तारांबळ उडाली. कारण किमान वीस पंचवीस तरी सीन्स आठवतात.
खालचे हे सीन्स वगळायचे आणि टॉप टेन बनवायचे हे पटलेच नाही म्हणून पुन्हा एकदा ही पोस्ट

१. जंजीर मधला प्राणला पोलीस स्टेशनला बोलावून घेतात तो सीन. तो पॉवरफुल संवाद आणि त्यातली संवादफेक, एनर्जी, आग ओकणारे डोळे. अंगावर आलेला हा सीन. तसाच याच चित्रपटातला दुसरा सीन अमिताभ बच्चन जयाजींना घेऊन लहान मुलांच्या पार्थिवावरचे पांढरे कापड काढत जातात तो एक सीन. हा आताही इतका थरारक वाटतो तर त्या काळी लोक वेडे झाले नसतील तरच नवल.
याच चित्रपटात अमिताभ बच्चन प्राणकडे येऊन कव्वाली (किंवा जे काही असेल ते) ऐकताना हसत सुटतात, त्या वेळचा साधेपणा, निर्व्याज हसू हे खूप छान घेतलेले आहे. एकाच चित्रपटातली ही दोन रूपं टोकाची आहेत. पुन्हा एकदा याच चित्रपटातला "तेजा मै जा रहा हूं तेजा, लेकीन जाने से पहले " हा संवाद पण खूप छान. पण खरं सांगायचं तर या सीन मधे अजित जास्त लक्षात राहीले. चार पाच वर्षांपूर्वी फक्त अजित यांच्या खलनायकीसाठी जुने गाजलेले (आता हास्यास्पद वाटणारे सिनेमे) सिनेमे काढून पाहीले. रूबाबदार, एटीकेट्सने भरपूर पण उलट्या काळजाचा, थंड रक्ताचा खलनायक रंगवावा तर अजित यांनीच. खूप वेळा हिरो त्यांच्यापुढे डायलॉगबाजी करतो आणि अजित फक्त छद्मी हसून त्याचा प्रभाव पुसून टाकतात. बरेच जणांना पटणार नाही पण जंजीर मधे अजित अमिताभ यांना भारी पडलेत.

२. दीवार मधला मेरे पास मां है (वर येऊन गेलेच आहे). त्यातलाच देवळातला खूष तो बहोत होंगे तुम आणि मुझे नीद आ रही है मां हा शेवटचा सीन. आता ते लाऊड वाटतात. देवळाच्या पायर्‍यांवर बसणारा बेदरकार लूक असणारा नायक . अजय देवगण या स्टाईलची कॉपी मारतो बहुतेक.
याच चित्रपटातला टेबलवर पायावर पाय टाकून बसलेला लाँग शॉट मधला नायक आणि त्याच्याबद्दल इफ्तेकार आणि सुधीर बोलत असतात तो सीन.

३. त्रिशूल मधे राखी अमिताभ यांना विचारतात कि " तुम जो कर रहे हो वो बिझनेस नही है " तेव्हां आईच्या फोटोजवळ जाऊन आपल्यात धुमसणारा सगळा राग व्यक्त करणारा नायक. बहुतेक याच चित्रपटात पाठी मागे सुरुंग फुटत असताना शांतपणे बिडी शिलगावत बेफिकीरीचे भाव डोळ्यात असणारा नायक. ७० च्या दशकाच्या मानाने खूपच मोठा बदल असेल हा. कारण आजही असेच नायक राज्य करताहेत (अदे, काही वेळा शाखाही).

४. कभी कभी मधे त्यांचे वडील मुलाचा बिझनेस मधे लक्ष घालण्याचा निर्णय ऐकून सुखावतात पण तरीही विचारतात कि " वो शायर अगर तुम्हे कभी चौराहे पर मिल गया तो ? " त्यावर अमिताभ उत्तरतात " तो मै उसे हाय कर दूंगा, कॉफी के लिए पुछुंगा और फिर भूल जाऊंगा ". या चित्रपटात अमिताभपेक्षा रोमँटीक भूमिका शशी कपूर यांनी उत्तम केली आहे. त्यामुळे टॉप टेन मधे यातले सीन्स नाहीत घेतले. "कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है " ही त्यांच्या आवाजातली कविता चित्रपटात मला तरी आढळली नाही. ( आधी असेल तर माहिती नाही). नाहीतर ती टॉप टेन मधे घेतली असती.

५. सिलसिला मधे अमिताभ बच्चन आणि रेखा झाडाखाली बसलेले असतात. सर्वत्र फुलांचा सडा असतो . काही फुलांचा शिडकावा त्या दोघांवर होत असतो, त्यात मात्र दोघे एकमेकात हरवून गेल्यासारखे वाटतात.

६. अमर अकबर अँथनी मधे कव्वाली चालू असताना नोटांचा हार काढणे, मधेच गाणे म्हणणे, थेटरमधे नाचणे. हे एक नंबरच आहे.

७. मजबूर हा अमिताभपटांमधला एक वेगळा पण कमी चर्चेत असलेला चित्रपट आहे. यातल्या नायकाची व्यक्तिरेखा खूपच ब्रिलियंट लिहीलेली आहे. रहस्यपटाची झालर असलेल्या चित्रपटात नायकाची पार्श्वभूमी, त्याच्या समस्या यावर मेहनत घेत नाहीत शक्यतो. पण हा आपला नायक कसा मजबूर असतो हे खूप जास्त प्रभावीपणे पटवून दिले आहे. याच थीमवर गोविंदाचा गँबलर आहे.
यातला कुठला सीन घ्यावा हे कोडेच आहे. कारण नायकात परिस्थितीनुरूप होत जाणारे बदल अमिताभ यांनी खूप बारकाईने दाखवले आहेत. हा अमिताभजींच्या अँग्री यंग मॅनच्या इमेज ला फाटा देणारा तरीही गुन्हेगारी, ग्लॅमर हे सगळं असणारा उत्तम रहस्यपट आहे ज्यात रहस्य हाच युएसपी नाही.

पुन्हा येईन तेव्हां उरलेलं...
( टायपिंग करताना नव्यानेच त्रास जाणवू लागला आहे. सर्वांनाच अनुभव येतोय का ? )

National Film Archive च्या पेजवर खालील किस्सा वाचायला मिळाला

#DidYouKnow:
#FaceOfTheWeek #AmitabhBachchan was reportedly replaced by Sanjay Khan in Kundan Kumar’s Duniya Ka Mela (1974) due to the then box-office status of Bachchan. However, the film was released during the same time as Zanjeer and went almost unnoticed. Whereas Amitabh Bachchan became a huge star overnight with the phenomenal success of Zanjeer.

अमिताभच्या जंजीरच्या आधीच्या चित्रपटात त्याचा नैसर्गिक अभिनय दिसतो.गहरी चाल ह्या चित्रपटात त्याला फिट्स येत असतात.तेव्हा जीव वाचवण्यासाठी गोळी घेऊन पाणी पितानाचा अभिनय अप्रतिम. ग्लास तोंडाला लावताना डोळ्यांची हालचाल अक्षरशः खाटकाच्या तावडीत दिलेल्या गाईच्या डोळ्यांच्या हालचालीसारखी आहे. ह्या चित्रपटात तो हेमा मालिनीचा चक्क भाऊ झाला आहे व जिंतेंद्र त्या चित्रपटाचा नायक आहे.

हम कौन है
या नावाचा पण एक चित्रपट होता त्याचा.

हम कौन है
>>>> डिंपल होती त्यात. निकोल किडमनच्या 'द अदर्स' सारखा होता.

-------

'चली आना तू पान की दुकानपें साडे तीन्न बजे, प प प प पान पान पान - इति रिपीट लूप 'चा अनुल्लेख झाल्याने माझ्या भावना जवळजवळ दुखावल्यात.

रानभुली, छान प्रतिसाद Happy

सोमू मशीनपे काम करते करते तुम्हारे हाथ बहुत सख्त हो गए है| अच्छे नही लगते|

डायलॉग साधेच पण अंदाज सूपर्ब.

मस्त आहे हा धागा.
केव्हांपासून शोधाशोध करत होतो बच्चन बद्दल पण तुमची मायबोली ढिम्म दाखवायला तयार नाही. या अमावस्येला नारळ ठेवून या झाडाखाली आणि चार रस्ते मिळतात तिथे तीन धारेचं लिंबू ठेवा.
फारएण्डने लिंक दिली त्याबद्दल आभार ( हे सोपस्कार पार पाडलेले असावेत).
येतो नंतर. लिहायला लागलो कि माझा नयन भडभडे होणार आहे.

( थोडंसं संवाद आणि सीन्सच्या धाग्यावर लिहीलेच आहे. इथे छान आणि हक्काची सोय झाली फक्त बच्चन बद्दल बोलण्यासाठी).

फेरफटका - मस्त प्रतिसाद आहे तुमचा.

फारएण्ड - खासच. त्या लिंक्स बघतो नंतर.
भरत सुद्धा बच्चन फॅन ? छान लिहीलेय.

वय वर्षे एक असताना आम्हाला बारामतीला ठेवून वडील गुजरातला गेले होते. त्या वेळी बारामती शहराने संपूर्ण भारतात एक विक्रम केला होता.
शाम टॉकीजला हाथी मेरे साथी आणि दुर्गा टॉकीजला शोले फुल्ल चालले होते. शोले मुळे बारामतीत आणखी एक विक्रम झाला होता. पुण्यात रिलीज झाल्यनंतर लगेचच सिनेमा पुढच्याच वर्षी ( सहा आठ महीन्यांच्या उशिराने ) आलेला होता.

शोले मधला ट्रेनचा सीन, टाकीवरचा सीन (त्यातले अ‍ॅण्ड पिसिंग गे ओम पिशिंग असे लक्षात राहिलेले) आणि हाथी मेरे साथी मधले कार, हत्ती, मुलगा पाण्यात पडतो तो सीन लक्षात राहिले. हाथी मेरे साथी चे सीनस जास्त लक्षात राहणे स्वाभाविक आहे. बाकि दोन्ही सिनेमे त्या वेळी समजले नाहीत. पण बच्चन पहिल्यांदा पाहिला तो काकासोबत. Proud

नंतर गुंजन , अलंकारला शशी कपूरचे काही सिनेमे पाहिले. बच्चनचा दीवार गुंजनला पुन्हा आला. दर वर्षी गुंजनच्या वाढदिवसाला तो यायचा. त्या वेळी पहिल्यांदा बच्चनला पाहिले. पण अमिताभ बच्चन हे नाव माहिती नव्हते. आम्ही त्याला शशीकपूर समजलो. काही वर्षांनी समजू लागले तेव्हां दीवार पुन्हा आला तेव्हां परत पाहिला. या वेळी बच्चनची जी छाप डोक्यात बसली ती अजूनही उतरलेली नाही. जंजीर मात्र दुर्दैवाने पंधरा सोळा वर्षांनी पाहिला.

पुढे आमच्या कॉलनीत अमिताभ बच्चन ग्रेट कि विनोद खन्ना याच्या चर्चा चालायच्या. अमर अकबर अँथनी मधे विनोद खन्नाने अमिताभची धुलाई केलीय म्हणजे तोच ग्रेट असं एका गटाचं म्हणणं असायचं. काही वर्षांनी मायबोलीवर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असा सामना बघायला मिळाला तेव्हां अगदी नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्या वेळची काही मुलं अजूनही शैशवात मी म्हणत इथे दबा धरून बसलेली आहेत असेच वाटते.

( या प्रतिसादात शोलेने माझ्या वयाची चहाडी केली आहे असे वाटत असेल तर चुकताय तुम्ही. कुछ कुछ होता है च्या वेळी मी नुकताच सोळा वर्षांचा होतो आणि गेल्याच वर्षी टीन एजमधे प्रवेश केला आहे. ऐश्वर्या राय माझी हम दिल दे चुके है सनमच्या वेळी क्रश होती. तेव्हां सलमान वर नाराज होतो. नंतर विवेक वर नाराज झालो मग सोडून दिले. आता काढा वय !).

मला अमिरभ चा अभिनय आवडलेले टॉप 10 चित्रपट:-
1 शराबी
2 बेमीसाल
3 शोले
4 काला पत्थर
5 खाकी
6 डॉन
7 त्रिशूल
8 दिवार
9 हम
10 मजबूर

Pages