Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाकिस्तान ३५ (स्ट्राईक रेट
पाकिस्तान ३५ (स्ट्राईक रेट १०३) >> हाही त्याने जाणुन बुजून कमी केला विकेट नसल्यामूळे असे सांगितले होते नंतर. बहरलेला कोहली टेस्ट मॅचेस मधे दिसो ही सदिच्छा!
२०-२० साठी भारतिय संघ जाहिर
२०-२० साठी भारतिय संघ जाहिर होऊनही इथे काहि हालचाल नाही!!
माझ्या मते शामी आणि बिश्नोयी अंतिम १५ मध्ये हवे होते.
शामी बाहेर असणं दुर्दैवी आहे,
शामी बाहेर असणं दुर्दैवी आहे, पण अर्शदीप लेफ्ट आर्मर म्हणून व्हरायटी आणतो म्हणून त्याला कदाचित प्रेफरन्स मिळाला असावा. सुरूवातीला स्विंग आणि डेथ ओव्हर्स मधे अचूक यॉर्कर्स टाकून कंट्रोल ठेवणं ही सुद्धा जमेची बाब असू शकते.
चहल च्या फ्लाईटमुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या ग्राऊंड्सवर मोठे शॉट्स मारणं कठीण जाऊ शकतं असा विचार असावा असा माझा अंदाज आहे. ऑक्टोबरमधे - ऑस्ट्रेलियन उन्हाळ्याच्या सुरूवातीला कदाचित विकेट्स टर्न सुद्धा ऑफर करू शकतील (इंडिया ३ स्पिनर्स घेऊन जातेय).
ह्या सगळ्यात जडेजा नसणं हा मोठा लॉस आहे. तसंच आयसीसीच्या टूर्नामेंटमधे एकही 'बिग मॅच प्लेयर' दिसत नाहीये टीममधे (उदा. गांगुली, गंभीर, धवन होते तसा).
कोहलीची जागा फिक्सच होती.
कोहलीची जागा फिक्सच होती. त्यामुळे तो आता थोडाफार रंगात आलाय हे चांगलेच झालेय. अन्यथा तो फ्लॉप होऊनही पुर्ण वर्ल्डकप खेळूनच गेला असता.
राहुल शर्मा कोहली तिन्ही एकच अॅप्रोच म्हटले तरी शर्माने जबाबदारी ऊचलत आपला अॅप्रोच बदलला आहे हे क्लीअर जाणवते. त्याच्या गेल्या ६ ईनिंगपैकी ५ ईनिंगचा स्ट्राईकरेट २२०, २०६, १७६, १७५, १६१ असा आहे..
राहुलला सूर गवसताच त्याच्याकडूनही शर्मा तीच अपेक्षा ठेवणार..
प्रश्न आहे की जिथे नवीन बॉलवर गोलंदाजांना मदत आहे तिथे हे लोकं काय प्लान बी करणार का? मला तत अश्यावेळी पंतला पुढे बघायला आवडेल, अर्थात तो खेळत असल्यास..
तेच तेच लिहायचा कंटाळा
तेच तेच लिहायचा कंटाळा आल्यागत कालच्या पराभवाबद्दल (सोडा, मॅचबद्दलही) कुणीच काही लिहिलं नाही जणू
हो अगदीच
हो अगदीच
थोड्याफार फरकाने हीच टीम
थोड्याफार फरकाने हीच टीम वर्ल्ड कप खेळणार आहे त्यामूळे फार काही बदलेल असे वाटत नाही.
भुवी चार मधल्या तीन सामन्यांमधे १९-२० षटक टाकताना पार धुतला गेला आहे . असही नाही कि तो काही फार वेगळे करत होता किंवा दवाचा प्रभाव होता वगैरे. एकंदर त्याच्या बॉलिंग च्या व्हेरिएशनबद्दल अचूक गेस जनता (जसे काल वेड करत होता) करू लागली आहे त्यामूळे एक्स्ट्रा पेस, एंगल वगैरे नसलेला भुवी मार खातो आहे असे वाटले.
चहल च्या फ्लाईटमुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या ग्राऊंड्सवर मोठे शॉट्स मारणं कठीण जाऊ शकतं असा विचार असावा >> चहल नि हर्शद दोघांनाही त्यांछ्या फसव्या बॉलिंङ मुळे मोठ्या मैदानावर मोठे शॉट्स मारणं कठीण जाऊ शकतं ह्या आशेवर निवडलेले आहे. घोडा मैदान जवळ आहे. फक्त चहल हा काँफिडन्स वाला बॉल्र आहे. असाच मार पडला तर वर्ल्ड कप येइतो पार शेल मधे जाईल अशी भिती वाटते.
ह्या सगळ्यात जडेजा नसणं हा मोठा लॉस आहे. >> अक्षर ती कमी ९०-९५%टक्के तरी भरून काढतो असे मला वाटते रे.
फॉर्म आणि फॉर्मेट बघता अक्षर
फॉर्म आणि फॉर्मेट बघता अक्षर सध्या जडेजापेक्षा बेटर बॉलिंग ऑप्शन आहे. चार ओवर सातत्याने पुर्ण करू शकतो.
जडेजा फलंदाजीत वरचढ असला तरी सध्या आपला प्रॉब्लेम बॉलिंग झालाय. त्यामुळे अक्षरचे असणे एका अर्थी फायद्याचेही ठरू शकते.
जडेजाच्या फिल्डींगची कमी मात्र सतत जाणवत राहणार. कालसारखे कॅचेस सुटत असताना जास्तच..
बॉलिंग अटेक ईतकाही वाईट नाहीये. ऑस्झ्त्रेलियन कंडीशनमध्ये वेगळा भासू शकतो. बुमराहच्या परत येण्याने त्याला एक लीडर मिळू शकतो. भुवी, हर्षल पटेल आणि अर्शदीपपैकी कोण दोम निवडावे हा प्रश्न आहे. नवीन बॉल हाताळाय्ला भुवीपेक्षा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तो असेलच असे वाटते.. बुमराहसोबत अर्शदीप डेथला येऊ शकतो. हर्षल पटेलची मग जागा बनत नाही.
“भुवी चार मधल्या तीन
“भुवी चार मधल्या तीन सामन्यांमधे १९-२० षटक टाकताना पार धुतला गेला आहे .” - हो ना. अगदीच क्लूलेस वाटतोय भुवी सद्ध्या. ह्यातून तो मार्ग काढतो का? कसा काढतो हे बघू.
“अक्षर ती कमी ९०-९५%टक्के तरी भरून काढतो” - अक्षर स्ट्रीटस्मार्ट प्लेयर आहे. मस्त! माझा रोख जडेजाच्या फिल्डींगची कमतरता भासण्याकडे होता. त्या मोठ्या ग्राऊंड्सवर तो जे अँगल्स काढतो, लांबून फ्लॅट आणि अचूक थ्रो करतो त्या बाबतीत तो बाकीच्यांपेक्षा लीप्स अँड बाऊंड्स पुढे आहे.
भुवनेश्वर , चहल आणि दिनेश
भुवनेश्वर , चहल आणि दिनेश कार्तिक अजिबात फॉर्म मध्ये नाहीत, त्यांना ऑस्ट्रेलिया ला नेऊ नये, आणि नेले तर 11 मध्ये अजिबात खेळवू नये
*अक्षर स्ट्रीटस्मार्ट प्लेयर
*अक्षर स्ट्रीटस्मार्ट प्लेयर आहे*. +1. मीं त्याला सुरवातीपासून ' बेरक्या ' खेळाडू ( अर्थात, चांगल्या अर्थाने) म्हणतो.
इंग्लंडला वन डे / T20 क्रिकेट
इंग्लंडला वन डे / T20 क्रिकेट मध्ये भविष्यासाठी हॅरी ब्रूक हा एक कडक फलंदाज सापडलेला दिसतोय.
गेल्या 3 मॅच मधली त्याची बॅटिंग फारच चांगली झालीये.
काल सामना फसायची चिन्हे होती.
काल सामना फसायची चिन्हे होती.
रोहीत शर्माने एकहाती खेचला.
डोळ्यांचे पारणे फेडणारी फटकेबाजी.
अखेरपर्यंत पॅनिक न होता कंट्रोलमध्ये खेळत होता.
बायकांनी ईंग्लंडला वनडेत
बायकांनी ईंग्लंडला वनडेत त्यांच्याच भुमीवर व्हाईटवॉश दिला .. ३-०
काल रोहीत शर्माने २०-२० मध्ये कप्तान म्हणून ५ वे सामनावीर पटकावले.
आजवर ईतर कर्णधारांनी मिळून ४ सामनावीर किताब जिंकले आहेत.
काल शर्माने २०-२० मध्ये सर्वाधिक षटकारांचाही विक्रम केला.
अभिनंदन ! प्रेक्षणीय सामना.
अभिनंदन, भारत ! प्रेक्षणीय सामना.
Last over , Aussie bowler was very predictable. Pandya read him correctly & played confidentally .
सूर्यकुमार व कोहली अप्रतीम !
Rohit Sharma as a full-time
Rohit Sharma as a full-time captain:
Beat New Zealand 3-0 in T20
Beat West Indies 3-0 in ODI
Beat West Indies 3-0 in T20
Beat Sri Lanka 3-0 in T20
Beat Sri Lanka 2-0 in Tests
Beat England 2-1 in T20
Beat England 2-1 in ODI
Beat West Indies 4-1 in T20
Beat Australia 2-1 in T20
ऑस्ट्रेलिया जरी डिफेंडिंग
ऑस्ट्रेलिया जरी डिफेंडिंग चॅम्पिअन्स असले तरी त्यांच्या समोरही या मालिकेनंतर काही मोठे प्रश्न आहेत.
स्मिथ कसोटी / एक दिवसीय क्रिकेट मध्ये कितीही मोठा फलंदाज असला तरी मला त्याची जागा T20 संघाच्या अकरा मध्ये डाऊटफुल वाटते .
कमिन्स चा हि असाच प्रॉब्लेम आहे. तो T20 क्रिकेट मध्ये खूप मार खातो आणि विकेट घेणारा ऑपशन हि वाटत नाही.
कर्णधार फिंच ची जागा हि फलंदाज म्हणून दोलायमान आहे. गेल्या 5-6 महिन्यात त्याच्या धावाच होत नाहीयेत.
कॅमरोन ग्रीन. कॅमरोन व्हाईट
कॅमरोन ग्रीन. कॅमरोन व्हाईट हे रंगांचे प्रकार आहेत का?
कॅमरोन ग्रीन. कॅमरोन व्हाईट
कॅमरोन ग्रीन. कॅमरोन व्हाईट हे रंगांचे प्रकार आहेत का?
काल शेवटच्या शटकानंतर दोन्ही संघाना समान संधी होती. ग्रीन ने फलंदाजी सोबत गोलंदाजीनेही भारतीय फलंदाजाना त्रास दिला. विश्वचषकात भाव खाऊन जाईल असे दिसतेय!
“ विश्वचषकात भाव खाऊन जाईल
“ विश्वचषकात भाव खाऊन जाईल असे दिसतेय!” - नाहीये तो स्क्वाडमधे.
आज यादव, कोहली आणि भारतीय बॉलिंग - मस्त खेळले. ग्रीनने ज्या पद्धतीनं इंडियन बॉलिंग धुवायला काढली होती, ते बघता २२५ तरी स्कोअर होईल असं वाटलं होतं, पण बॉलर्सनी मस्त कमबॅक केलं.
काल शेवटच्या तीन ओव्हर्स
काल शेवटच्या तीन ओव्हर्स मधली एक तरी ओव्हर ग्रीन ला देतील असे वाटलेले पण तो वर्ल्ड कप स्क्वाड मधे नसल्यामूळे त्याला न देता इतरांना दिल्या गेल्या असे वाचले. ग्रीन ला ओव्हर मिळती तर कदाचित निकाल बदलला असता.
अक आपला कोहली नि त्यआंचा स्मिथ - दोन्ही अवघड जागेवरची दुखणी आहेत
बाकी दिप्ती शर्मा ने धमाल उडवून दिली हे मात्र खरं.
असामी
असामी
ब्रॉड, अँडरसन आणि कंपनी ला स्पिरिट ऑफ क्रिकेट बाबत रडताना बघून फार मजा येते.
ग्रीन हा कमालीचा टॅलेंट आहे.
ग्रीन हा कमालीचा टॅलेंट आहे. फिल्डर हि झकास आहे आणि बॉलिंग मध्ये हि सहज गत्या 140K+ टाकू शकतो.
त्याच्या समोरचा सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे सतत होणाऱ्या दुखापतींपासून दूर राहणे.
“ बाकी दिप्ती शर्मा ने धमाल
“ बाकी दिप्ती शर्मा ने धमाल उडवून दिली हे मात्र खरं.” - नियमात बसणार्या गोष्टीविषयी मतांतरं वाचून गंमत वाटते. ‘स्पिरिट ऑफ द गेम‘ विषयीच बोलायचं तर स्टोकच्या बॅटला बॉल लागून जी ओव्हरथ्रोची बाऊंड्री - वर्ल्डकप २०१९ फायनल- गेली होती, ती नाकारून इंग्लंडला ते स्पिरिट सोदाहरण सिद्ध करता आलं असतं.
जर बॅट्समन रन काढण्याच्या उद्देशानं क्रीझबाहेर आला असता, विकेटकीपर त्याला स्टंप करू शकतो (कुठलीही वॉर्निंग न देता), तर नॉन-स्ट्रायकरही (नियमांच्या आधारे) तसाच आऊट होऊ शकतो.
*...तर नॉन-स्ट्रायकरही
*...तर नॉन-स्ट्रायकरही (नियमांच्या आधारे) तसाच आऊट होऊ शकतो.* - +1.
)
यावर खूप खुली चर्चा झाली आहे व असं बाद करण्यात कांहींही वावगं नसल्याचं जवळ जवळ सर्वमान्य झालं आहे. ( मांकडसारखा असामान्य प्रतिभेचा भारतीय खेळाडू मात्र या वादात उगीचच बदनाम झाला !
ब्रॉड, अँडरसन आणि कंपनी ला
ब्रॉड, अँडरसन आणि कंपनी ला स्पिरिट ऑफ क्रिकेट बाबत रडताना बघून फार मजा येते. >> अगदी खरय ! जोन्स त्या आधी ७१ वेळा क्रिज च्या बाहेर गेली होती हा भाग स्पिरीटवाल्यांच्या लक्षात येत नाही का ? ७२ वेळा ती एखाद पाऊल बाहेर नव्हती तर चांगली फूटभर बाहेर होती. हे सगळे स्पिरीटमधे कसे बसवायचे ? स्पिरीट म्हणाजे नक्की काय ? कोणाचे स्पिरीट धरायचे ? उगाचच काढलेला वाद आहे.
मांकडसारखा असामान्य प्रतिभेचा भारतीय खेळाडू मात्र या वादात उगीचच बदनाम झाला ! >> मी उलट म्हणतो कि मांकड्ची क्रिकेट वरची ग्रास्प दिसते ह्या प्रकारातून.
"मी उलट म्हणतो कि मांकड्ची
"मी उलट म्हणतो कि मांकड्ची क्रिकेट वरची ग्रास्प दिसते ह्या प्रकारातून." - खरंय. मी तर म्हणतो हे अभिमानानं मिरवावं असं बिरूद आहे. ह्याला आयसीसीने अधिकृत नाव मंकडिंग देऊन ह्याचा सन्मान करावा आणि असे पुढे जाणारे जे बॅटर्स असतील त्यांनी 'ब्राऊनिंग' केलं असं त्यांना हिणवावं. म्हणजे 'अमकातमका / अमकीतमकी ब्राऊनिंग करताना मंकड झाला/ली'
जरा जास्त होतय रे
जरा जास्त होतय रे
बाकी आजच्या जगात इतक्या वेळा खेळाडूंना सगळे नियम माहित नाहित हे दिसते तिथे साठ वर्षांपूर्वी कोणी तरी एकदम आउट ऑफ सिलॅबस ऑप्शन शोधला हे जबरदस्त आहे.
दुलिप ट्रॉफी नि किवीज ए
दुलिप ट्रॉफी नि किवीज ए सिरीज फॉलो करत होतो. रजत पतिदार एकदम खणखणीत खेळलाय. सर्फराज ने निराशा केली
यशस्वी जय्स्वाल त्याच्या फॉल्टी टेक्निक ने एव्हढा धावा काढतो म्हणजे काही तरी नक्कीच आहे त्यात असे म्हणायला हरकत नाही. बॉलिंङ मधे सौरभ नि मुलाणी हे नेहमीचेच घोडे पुढे होते. नेमके जाडेजा नि अक्षर ह्यांना पाठी टाकून त्यांची वर्णी लागणे कठीण वाटाते
"जरा जास्त होतय रे" - I know.
"जरा जास्त होतय रे" - I know. पण कंटाळा येतो कधी कधी इंग्लिश प्लेयर्सच्या दांभिकपणाचा. परवा (दुसरी वन-डे) एक कुणीतरी इंग्लिश एक्स-प्लेयर कॉमेंट्री करत होती. झुलन गोस्वामी च्या करियरविषयी तिला आथरटन ने काहीतरी बोलायची विनंती केल्यावर कुठल्याश्या मॅचमधे सारा टेलरने झुलन गोस्वामीवर कसा हल्ला चढवला होता वगैरे सांगत बसली होती. असो.
दुलिप ट्रॉफी नि किवीज ए सिरीज फॉलो करत होतो. - पाटीदार छान खेळला. दोन मॅचेसमधे ऋतुराज चांगला खेळला. एक-दोन वेळा शॉ मस्त खेळला. संजूने कॅप्टन्सी चांगली केलीय. मुलाणी फिटनेस ग्राऊंडवर सुद्धा जडेजा आणि अक्षरच्या कित्येक मैल मागे आहे. उम्रान मलिक अजून तरी आयपीएल वंडर च वाटतोय. बघू पुढे काय करतो. मॅचविनिंग डबल सेन्च्युरी केल्यावर डिसिप्लिनरी कारणांसाठी ग्राऊंड सोडावं लगण्याची नामुष्की जैस्वालवर यायला नको होती. लहान आहे अजून. लवकर शिकावं त्याने.
Pages