क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इस क्रिकेटकी झगमग झगमग करनेवाली बत्ती का बटन किसके हाथमे है? ICCभी क्या वो भी अपनीच है.
एन्जॉय क्रिकेट.
शेवटी कप आपुुनच लेके जाने वाले है भिडू.

आज राहुल चा पायचीत चा निर्णय कसला माठ होता. थर्ड अंपायर ला दिसत नाही का किती पावले पुढे आहे ? मला वाटालेले कि बॉल ट्रॅकिंग मधे अमू़क अंतरानंतर बॉल ट्रॅक करणे अ‍ॅक्युरेट नाही असे आहे. अतिशय विचित्र निर्णय.

इंडियाच्या लोअर मिडल ऑर्डरला काहीतरी करायला हवं. पंड्या, पंत / कार्थिक, हूडा / अक्षर / जडेजा ह्या तिघांपैकी दोघांना तरी खेळलंच पाहिजे कन्सिस्टंटली. पंत टी-२० / वनडे मधे टेस्टसारखे समज आणि कन्सिस्टन्सी दाखवत नाही. बहूदा त्याला टेस्टसाठी ठेवून, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे वेगळे पर्याय शोधायला हवे (कार्थिक, संजू, किशन ई.). चहल सुद्धा ब्लो हॉट, ब्लो कोल्ड आहे. कदचित रवी बिश्णोई अधिक संधी देता येईल.

राहुल , चहल आणि भुवी ला विश्वचषक ला अजिबात नेऊ नये,
माझ्या मते 15 ची टीम अशी असावी
1 रोहित
2 पंत
3 विराट
4 सूर्या
5 हार्दिक
6 तिलक वर्मा
7 हुडा
8 बिष्णोई
9 axar
10 अश्विन
11 दीपक चहर
12 हर्षल
13 अर्षदीप
14 बुमराह
15 संजू समसोन
पंत सलामीला

तिलक वर्मा ओव्हर रीच वाटतो. पोटेंशियल आहे पण थेट वर्ल्ड कप साठी नेणे जास्त होतेय. भुवी हे दोन सामने हरवलाय पण त्या आधी कन्सिस्टंटली चांगला खेळत होता. राहुल पेक्षा कोहलि ला नेऊ नये असे वाटते. कोहली फ्ल्युएंट वाटतोय हे मान्य असले तरी जो टेम्पो ठेवावा लागतो तो सुरुवातीला ठेवण्यासाठी त्याला फारच आऊट ऑफ द कॅरॅक्टर खेळावे लागते.

हूडाल बॉलिंग का देत नाही - एखादी ओव्हर तरी अधे मधे ?

खेळ आटोपला. दोन्ही सामन्यांमधे पाचच बॉलर्स वापरले जे महागात पडलय. आपल्याला सहावा हवाच ज्याला मार पडतोय त्याला कव्हर करायला असे वाटतेय. बॅटींग शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मधे कमी पडतेय परत. सूर्याला खाली ठेवून आज पंतला वर ढकलायला हवे होते. कदाचित कार्तिक हे उत्तर निघेल असे वाटायला लागलय.

त्या हुडाला नक्की कश्यासाठी घेतले होते? त्याची गोलंदाजी का नाही वापरूनबघितली? कि केवळ ५ गोलंदाजांच्या जोरावर आपण सामना जिंकू शकतो का हा प्रयोग द्रविड आणि टीम करत होती. अजून एक सामना आहे हा प्रयोग करायला. मला वाटते आशिया-कप आपण प्रयोगासाठीच खेळलो असावा. कारण सामना जिंकणे किंवा प्रयत्न करणे ह्यापेक्षा वेगवगळे प्रयोग करताना प्रत्येकजण दिसला. अगदी चेंडू अडविताना / झेल घेतानासुद्धा कुणीही झेपावणे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसला नाही.

आमच्या गावाकडे एक म्हण आहे.
बेताखाली पोंंबुर्ले् गेले. तस प्रयोगाखाली विश्वचषक हुकला. असंं नको व्हायला.
अरे हुकला असे नाही बोलायचे, मिसला असे म्हणूयात कारण हूक केले कि नेमकंं सीमारेषेवर आउट व्हायला होत.

अगदी चेंडू अडविताना / झेल घेतानासुद्धा कुणीही झेपावणे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसला नाही.
>>
वर्ल्डकपच्या आधी दुखापत नको असेल Happy

मग स्पर्धेत भाग तरी कश्याला घ्यायचा ?
>>>
त्याशिवाय मॅच प्रॅक्टीस कशी मिळणार. त्याशिवाय वर्ल्डकपला कसे नेणार?

सध्या महत्वाच्या दोनच स्पर्धा आहेत. वर्ल्डकप आणि आयपीएल.

मला वाटते आशिया-कप आपण प्रयोगासाठीच खेळलो असावा. कारण सामना जिंकणे किंवा प्रयत्न करणे ह्यापेक्षा वेगवगळे प्रयोग करताना प्रत्येकजण दिसला >> पहिली फेरी तशाच द्रूष्टिने खेळणार हे आधीच द्रविड ने सांगितले होते. पण बाद फेरी नंतर संघ कायम ठेवायचा असे म्हणाला होता. आवेश खान नि जाडेजाच्या दुखापतीमूळे ह्यात घोळ झाला असावा.

"प्रत्येक आंतरदेशीय सामना पूर्ण जिद्दीनेच खेळला जावा." हरल्याचे दु:ख बाजूला ठेवा. खरच जिद्दीने खेळला नाही असे वाटतेय का ? मडल्ड डावपेच, मोक्याच्या क्षणी केलेल्या चूका ही जास्ती सयुक्तिक कारणे वाटत नाहीत का ?

तो अर्शदीप काही तरी विचारत असताना शर्मा पाठ फिरवून का निघून गेला आणी ते कळले का ?

<<त्याशिवाय मॅच प्रॅक्टीस कशी मिळणार. >>
गलथान क्षेत्रक्षणाचा सराव विष्वचषकासाठी कसा उपयोगी येईल?
अरे हं. मॅच फिक्सिंग असेल तर!

मडल्ड डावपेच, मोक्याच्या क्षणी केलेल्या चूका ही जास्ती सयुक्तिक कारणे वाटत नाहीत का ?
>>>>

हो. आणि या चुका दोन्ही सामन्यात झाल्या.
भुवनेश्वर कुमारच्या दोन्ही पेनअल्टीमेट ओवर गंडलेले डावपेच होते.
टीम सिलेक्शन जडेजा आणि आवेशच्या एंज्युरीने गंडले.
पहिल्या फलंदाजीला मिडल ऑर्डर पुन्हा गंडलेली वाटली. त्यात सुर्याचे अपयश अनपेक्षित होते.
टॉप ऑर्डरचे कोहली आणि राहुल तर आपला फॉर्म मिळवायला खेळत होते असेच वाटले.
त्यामुळे नवीन ॲप्रोच नवीन ॲप्रोच जे चालू होते त्याला अनुसरून शर्मा एकटाच ठामपणे फलंदाजी करत होता असे वाटले.
त्यात दोन्ही सामन्यात टॉसही हरलो. खेळपट्टी राहू द्या, पण चेस करताना आपण जास्त कम्फर्टेबल राहिलो असतो.
बर्र जिंकायचा चान्स यातूनही होताच. पण मोक्याच्या क्षणी सामन्याचा निकाल ईकडचा तिकडे करणारे झेल आणि रन आऊट सुटले.

"ते आकडेवारी मधे मांडलय" - Happy मलाही आज सकाळी हे वाचलं तेव्हा कालचं इथलं डिस्कशन च आठवलं.

पंतने त्याच्या करियर च्या सुरूवातीला, एका रणजी मॅच मधे महाराष्ट्राविरूद्ध खेळताना ५५० च्या आसपास टारगेट असताना ३००+ ची एक फास्ट इनिंग खेळून मॅच काढली होती पुण्यात. तेव्हा सुद्धा मोठी इनिंग पेस करण्याचं त्याचं कसब दिसलं होतं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधे सुद्धा त्याने ते दाखवून दिलंय. पण somehow लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचा पेपर त्याला कळतच नाही असं वाटतं. प्रश्न नुसता रन्स काढायचा नाही (तो आहेच), पण त्याचा अ‍ॅप्रोच च संदिग्ध वाटतो. he looks fish out of water, at times. त्याच्याकडे स्किल आहेच, पण कुणीतरी त्याला हा theorem समजावून सांगायला हवा असं वाटतं.

"मडल्ड डावपेच, मोक्याच्या क्षणी केलेल्या चूका ही जास्ती सयुक्तिक कारणे वाटत नाहीत का ?" - आयर्लंड / इंग्लंड मधे ज्या ब्रँडचं क्रिकेट इंडियन टीम खेळली आणि दुबईत जे क्रिकेट खेळली ते अगदीच वेगवेगळं होतं. त्यात पंड्या-जडेजा ची एक पार्टनरशिप सोडली तर एकदाही (लंका आणि पाकिस्तान विरूद्धची दुसरी मॅच) ४, ५, ६ नंबरवरच्या बॅट्समेनने हवा तसा flourishing finish दिला नाही. अर्शदीपने सोडलेला कॅच फारच महागात पडला. भुवीचं लागोपाठ दोन मॅचेसमधे १९ व्या ओव्हरचं अपयश (नुसत्या रन्स गेल्या म्हणून नव्हे, तर he was all over the place) आश्चर्यकारक होतं.

राहूलच्या जागी इशानला (किंवा संजूला सुद्धा) ओपनिंगला पाठवून ओपनिंग आणि विकेटकिपींग असे दोन्ही प्रश्न सोडवता येतील आणि हूडाला पाचव्या नंबरवर खेळवता येऊ शकेल (हूडा, पंड्या, जडेजा / अक्षर - ५, ६, ७). चहल च्या जागी टी-२० त तरी बिश्णोई ला खेळवावं.

एके काळी गंगू, सचिन, सेहवाग, युवी ,रैना वगैरे असताना बरेच स्पेअर बॉलर्स हाताशी असत. ह्यातले कोणीही खर्‍या अर्थाने ऑल राऊंडर नव्हते. काम चलाऊ पेक्षा अधिक बॉलर्स होते नि नेहमी बॉलिंङ टाकून त्यांहे रोल पक्के झाले होते . नंतर धोनीच्या उत्तरार्धात ही सगळी जनता गायब झाली नि नवीन येणारे काहि ना काही कारणामूळे स्पेशालिस्ट बॅट्समन असू लागले. जे कोणी होते ते अशा तर्‍हेने एक्स्टेंडेड रोल मधे वापरणे जवळ्जवळ थांबलेच. कोहलीनेही तोच कित्त सुरू ठेवला. रोहित ही फार वेगळे करत नाहीये. वेंकटेश अय्यर पासून हूडा पर्यंत तीच स्टोरी आहे. कारण काय ते माहित नाही. मी असे अजिबात म्हणात नाहिये कि ह्या दोन सामन्यांमधे ह्यामूळे हरलो पण असलेल्या रिसोर्सचा वापर अजिबात न करणे - तेही पेसर रन्स लीक करत असताना नि स्पिनर्स कंट्रोल ठेवून असताना - अजिबातच कळले नाही.

राहूल, कोहली , पंत मिडल ऑर्डर हे सगळे मुद्दे धरून्ही आपण हे सामने मुख्यत्वे बॉलिंग मधे कमी पडल्यामूळे घालवलेले आहेत. अजून १०-१५ रन्स अधिक असते तरी खरच आपण डीफेंड करू शकलो असतो का ह्याचे उत्तर मला १००% हो द्यावेसे वाटत नाही.

बरेच पर्याय उपलब्ध असल्याने अति प्रयोग करण्याचा मोह व त्यामुळे निर्माण झालेलं अनिश्चिततेचं दाट सावट, हे गुणवत्ता असुनही आलेल्या अपयशामागचं मुख्य कारण असावं .

वर पंतबाबत जे ईतकी आकडेवारी मांडत विश्लेषण केलेय ते खरे तर उघड्या डोळ्यांनीही दिसते. किंबहुना हे सर्व प्रतिस्पर्धी संघाना केव्हाच समजले आहे म्हणूनच तर ती आकडेवारी तशी आहे. मला प्रश्न पडतो की यातून बाहेर पडायला तो काही करताना का दिसत नाही किंवा आपले बॅटींग कोच वा कोच खुद्द राहुल द्रविड असताना हे यावर काय काम करतात?
जर तुम्ही पंतला खेळवता तर तो यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी वेगळे करताना दिसायला हवे जे तो दिसत नाही.
आणि जर यावर उपायच नसेल तर त्याला खेळवायलाच नको.
की त्याची ब्रँड वॅल्यू पाहता त्याला खेळवणे हा व्यावसायिक निर्णय आहे?
त्या केस मध्ये त्याला ओपनर तरी पाठवावे. म्हणजे पॉवरप्लेच्या सहा ओवर क्षेत्ररक्षक आत असलेली फिल्डींग मिळेल त्याला.

श्रीलंका, पाकिस्तान हे अपल्यपेक्षा चांगले खेळले हे सत्य दिलखुलासपणे मान्य करताना कुणी दिसत नाही.
केवढी ही स्वतःची फसवणूक.
बाकी चालुद्या.

<<केवढी ही स्वतःची फसवणूक.>>
तसे नव्हे. असे वाटते की जे होऊ शकले असते ते झाले का नाही याबद्दल चर्चा.

श्रीलंका, पाकिस्तान हे अपल्यपेक्षा चांगले खेळले हे सत्य दिलखुलासपणे मान्य करताना कुणी दिसत नाही. >> मला नाही वाटत वरच्या चर्चेचा तो सूर आहे. आपण ह्या देशांपेक्षा कुठे कमी पडलो ह्याबद्दल आहे. फक्त ते चांगले खेळले म्हणून हरलो एव्हढ्यावरच थांबलो तर पुढे कसे सरकणार ?

पंत कि कार्थिक किंवा राहुल का आहे ह्याचा वाद रोहित ने आज स्वतःलाच ड्रॉप करून सोडवून टाकला Happy कोहली फ्लो मधे खेळायला लागला तर वर्ल्ड कपमधे परत बॅटिंङ लाईनची पंचाईत आहे.

कोहली चे शतक म्हणजे विश्वचषकात त्याचे स्थान अजून बळकट झाले. आजची match सोडली तर कोहली पूर्ण मालिकेत ११०-१२० strike rate ने खेळला असेल. मला तरी हा रेट कमी वाटतोय T20 मध्ये. तेही राहुल आणि शर्मा सारखे इंनिंगस बिल्ड करणारे खेळाडू असताना.

"आजची match सोडली तर कोहली पूर्ण मालिकेत ११०-१२० strike rate ने खेळला असेल" - आत्ता कोहली हाय्येस्ट रन्स स्कोअरर आहे ह्या एशिय कप चा - २७६ रन्स, ९२ चा अ‍ॅव्हरेज आणि १४८ चा स्ट्राईक रेट.

ह्या आधीच्या मॅचेस मधे: लंका ०, पाकिस्तान ६० (स्ट्राईक रेट १३६), हाँग काँग ५९ (स्ट्राईक रेट १३४) आणि पाकिस्तान ३५ (स्ट्राईक रेट १०३)

चांगलाच खेळलाय विराट ह्या सिरीज मधे. हा त्याच्या बॅडपॅच चा शेवट ठरो आणि पूर्वीचा मॅचविनर विराट परत पहायला मिळो ही सदिच्छा!

Pages