क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रदीप मॅगझिन चे 'नॉट जस्ट क्रिकेट' नुकतेच वाचले. लेखक ८० पासून क्रिकेट कव्हर करतोय. फिक्सिंग च्या प्रकरणामधे मुद्गल कमिटि पुढे त्याने बरेच प्रसंग नमूद केले होते. लोढा रिफॉर्म च्या वेळी बर्‍यापैकी घटनांची जंत्री दिली होती जि जस्टीस लोढांनी नमूद केलेली आहे. त्यामूळे हे पुस्तक वाचायची बरीच उत्सुकता होती. काही इनसाईडर गोष्टी नि पडद्या आड घडलेल्या प्रसंगाबाबत अधिक माहिती मिळाली. उगाच सोशल मिडियावर मारलेल्या फुकट थापांपेक्षा चक्षुर्वे:सत्य पाहिलेल्या माणसा चे निरिक्षण वाचायला मजा आली.
* पुस्तकाचे स्वरुप पण जर वेगळे आहेत. नुसता क्रिकेट रिपोर्टर ह्या भूमिकेमधून लिहिण्यापेक्षा त्याचा माणूस म्हणून झालेला प्रवास ह्या भूमिकेचा ओव्हरलॅप लेखनावर आहे. लेखक मूळाचा काश्मिरी पंडीत असल्यामूळे त्याला अजून एक वेगळा इंटरेस्टींग अँगल आला आहे जो विशेषतः भारत-पाक सिरीज संदर्भांमधे जाणवतो
* मला जाणवलेली एक गमतीशीर गोष्ट म्हणजे ह्यतल्या काही गोष्टी ज्यांनी सांगितल्या त्यांनी स्वतःलाच सेल्फ इंप्लिकेट केले आहे . लेखकाला अशा वेळी 'पत्रकार (नि स्वतःचा जॉब) म्हणून त्या प्रसिद्ध करणे' नि 'इंटर्नल काँटॅक्ट कायम ठेवण्यासाठी धडपड करणे' ह्या दोन गोष्टींमधे तारेवरची कसरत करावी लागली आहे. हे एकंदर प्रसंग एव्हढ्या प्रामाणिकपणे मांडले आहेत कि एकदम भारावून टाकतात.
* चॅपल इराबद्दल एकदम इनसाईडर स्कूप्स आहेत. सचिन नि गांगूलीच्या पुस्तकामधे आलेले रेफरन्सेस खूप क्लीयर होत जातात. सचिनच्या १९४ वाल्या प्रकाराबद्दल पण मस्त अ‍ॅनोटेशन आहे. सांगोपांगीच्या अफवांपेक्षा ते अधिक लॉजिकल आहे हे जाणव्ते नि एकदमच पटते.
* गांगूली बद्दल केलेले लिखाण पण वेगळ्या एंगलमधून आहे. खुद्द गांगुलीच्या पुस्तकाला हे वाचल्यावर कंप्लिटनेस आला असते वाटले. अर्धवट ठेवलेले धागे पूर्ण होतात.
* बेदी बद्दल "त्याने इक्बाल कासिम ला दिलेल्या टिप्स नि मुरली कार्तिक वर धरलेला डूख " ह्यामूळे माझे मत बायस्ड आहे पण प्रदीप च्या पुस्तकामधून भेटणारा बेदी एकदम भावून गेला हेही तितकेच खरे.
* कपिल - सुनिल अंतर्गत छुपा वाद, सचिन चा अझरच्या काळामधला कॅप्ट्न्सी पिरीयड, धोनी नि चेन्नई सुपर किंग चा बॅन ह्याबद्दल दिलेली माहिती माझ्यापुरती तरी नवीन होती.
* मला बीसीसीआय च्या इंटर्नल वर्किंग बद्दल थोडे हातचे राखून लिहिले आहे ते खटकले . काही टॉपिक्स ना फक्त लाईव्ह वायर असल्यासारखा दुरून स्पर्ष केलेला जाणवतो. कारणे ही अर्थात उघड आहेत.

भारतीय क्रिकेट बद्दल आस्था असणार्‍यांनी जरूर वाचा असे सुचवेन.

कपिल - सुनिल अंतर्गत छुपा वाद >>> हा तर फार फेमस वाद आहे. म्हणजे कारणे मला माहीत नाही. पण दोघात ३६ चा आकडा होता/ आहे हे माहीत आहे.
गंमत म्हणजे सचिन - कपिल सुद्धा असेच वाद आहेत. हे तर निरीक्षणानेही ओळखलेले मी.
मागे मी या दोन्ही शीतयुद्धांचा उल्लेख केलेला. पण तो काही लोकांना पटला नव्हता. आय मीन विश्वास बसला नव्हता.
अर्थात ते ही ठिकच. वरच्या लिस्टमध्येही काय खरे काय खोटे हे शेवटी ज्यांच्यासोबत घडले असते त्यांनाच ठाऊक असते. आणि ते ही सगळेच काही जगजाहीर करत नाहीत. ईमेजही जपायची असतेच Happy

गंमत म्हणजे सचिन - कपिल सुद्धा असेच वाद आहेत. हे तर निरीक्षणानेही ओळखलेले मी. >> माझा शिरसाष्टांग नमस्कार स्वीकार करावा. हे सो कॉल्ड वाद झाले तेंव्हा मी प्राथमिक शाळेमधे होतो. तुझ्या एकंदर लीळाचरित्राची टाईमलाईन बघून तेंव्हा फारतर पाळण्यात असशील. - नसशिल तेंव्हाही तू हे निरीक्षण करत होतास ? हे तर मुलतान टेस्ट सारखे टी व्ही वर पण येत नव्हते. कदाचित मागच्या जन्मातले काही लोकांना आठवते तसे असावे. परमेश्वराची लीला अगाध आहे हेच खरे.

“ माझा शिरसाष्टांग नमस्कार स्वीकार करावा.” - अणूपासोनि ब्रह्मांडाएव्हडा होत जातसे किंवा इस ज़मी से आसमाँ तक, मैं ही मैं हूँ ह्या संस्कृत पासून हिंदीपर्यंत रचनांचा उगम इथेच आहे रे Happy

हे सो कॉल्ड वाद झाले तेंव्हा मी प्राथमिक शाळेमधे होतो
>>>>

तुमचे वय काय आहे असामी?

मी सचिन कपिल ठस्सन बद्दल बोलत आहे. सचिनचे पदार्पण माझ्या क्रिकेट बघायच्या काळातलेच आहे.

मी जे माझे निरीक्षण म्हणतोय ते नव्वदीच्या दशकातील एका चॅरीटी सामन्यातले आहे जिथे दोघे एकमेकांसमोर येतानाची नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यात सचिनला बहुधा कपिलनेच आऊट केले की व्हायसे वर्सा झालेले. आणि दोघे एकमेकांना नजरही न देता जसे पास झाले ते पाहून कॉमेंटेटरनेही अश्याच आशयाचे वक्तव्य केले. तेव्हा कन्फर्म झाले यांचे काही पटत नाहीये.

कपिल कोच सुद्धा होता ना. काहीतरी वाजले असेल त्याचे. किंवा गावस्करसह सरसकट मुंबईकरांवर राग असेल. मागेही कपिल म्हणालेला की सचिनकडे टॅलेंट असूनही सेहवाग सारखे बिनधास्त खेळता यायचे नाही. हे मुंबईकर फलंदाज शतक झाले की सेट झाल्याचा फायदा उचलून मारायचे तर कॉन्स्ण्ट्रेशन जाऊ नये म्हणून पुन्हा सावध खेळू लागतात. यात गावस्करलाही टोमणा असावा..

>>'नॉट जस्ट क्रिकेट' नुकतेच वाचले

सविस्तर परिक्षण येउदे असामी!!
added in my list Happy

आजकाल क्रिकेटर्समधील आपापसातील संबंध बऱ्यापैकी व्यावसायिक असतात आणि जी काही भांडणे, बेबनाव, वाद होतात ते चमचमीतपणे इतके डीटेलवार इथे तिथे वाचायला मिळतात की त्यातली मजाच जाते!

Golden era मधल्या काही inside stories असतील तर वाचायला नक्कीच आवडेल Happy

आजकाल क्रिकेटर्समधील आपापसातील संबंध बऱ्यापैकी व्यावसायिक असतात आणि जी काही भांडणे, बेबनाव, वाद होतात ते चमचमीतपणे इतके डीटेलवार इथे तिथे वाचायला मिळतात की त्यातली मजाच जाते! >> परफेक्ट म्हणालास. कदाचित हे वाचल्यावर जाणवले कि मला प्रदीपची स्टाईल का आवडून गेली ते. त्याने बर्‍यापैकी सयंत पणे हाताळलय सगळे. सेंसेशनलिस्म टाळूताबर्‍यापैकी ऑब्जेक्टीव्ह राहणे नि त्याचवेळी इनफ मसाला राहू देणे हा बॅलन्स जमवलाय. गोलडन इरावरून लक्षात आले कि प्रत्यक्ष मॅच बद्दल बर्‍यापैकी कमी मजकूर आहे. मॅच आधी, नंतर , मॅचभोवती झालेल्या गोष्टींवर जास्त भर आहे.

अजून कोणाला अशा प्रकारची पुस्तके माहित असतील तर जरुर सुचवा. वायंगणकर चे पुस्तक त्याच्यबारोबर आलेले पण ते आयडॉल्स स्टाईल चे आहे.

पग्या तुला हवे असेल तर अ‍ॅड्रेस पाठव.

झक्की, मी नावे सुचवतो नि मग भाऊ भारतातून पाठवतो. कधी कधी किंडल वरही मिळून जातात पण मला कागदी पुस्तक आवडते म्हणून हा खटाटोप करतो.

Strange decision.. पंत कीपर म्हणूनही सध्या राहुल डीके पेक्षा भारी आहे.
कदाचित पहिला सामना म्हणून काही वेगळा विचार असेल. वेगळ्या स्ट्रॅटेजीने टीम कॉम्बीनेशन ट्राय करत असतील. पण निर्णायक आणि अंतिम सामन्याला जर प्रेशर सिचुएशन क्रिएट झाली तर पंतशिवाय पर्याय नाही हे ही खरेय.

हार्दिक ने त्या सिक्स च्या आधी कार्थिककडे पाहून जी रिअ‍ॅक्शन दिली होती ती पुढच्या सिक्सची नांदी होती.

>>हार्दिक ने त्या सिक्स च्या आधी कार्थिककडे
अगदी अगदी!

हार्दिक गेल्या आयपीएलपासून कमालीचा मॅच्युअर प्लेयर झालाय हे मत परत एकदा नमूद करुन खाली बसतो Happy

टीम इंडियाचे अभिनंदन Happy

कोहली - 100 100 100 (टेस्ट , वन डे , ट्वेन्टी )
असा रेकॉर्ड कोणाचाच नाही.. ना ब्रॅडमन, ना तेंडलु ना कपिल...

पांड्या मारणारच होता सिक्स.
डॉट बॉल गेल्यावर त्याने दिनेश कार्तिकला लूक बघा काय दिलेला.
मी आहे. एका शॉटचा गेम आहे.
तो बघून मलाच आय मीन पब्लिकलाच विश्वास आला..
त्याचे आधीच्या ओवरच्या तीन पैकी दुसरे तिसरे चौकेही काय कडक होते.. मजा आली आज .. अख्खी आयपीएल एकीकडे.. आजची मॅच एकीकडे..

दुखापतीनंतर परतल्यानंतर हार्दिक पंड्या जास्त calm आणि मॅचुअर झालाय असं वाटतंय.
डोकं शांत असेल आणि मन स्थिर असेल तर किती बदल होऊ शकतो ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे तो!

कोहली आज खरे रंगात आला.
हळूहळू रन्स यायला सुरुवात झालेली गेले काही सामने पण फटक्यांवरचा कंट्रोल आणि ईनिंग बिल्ड करायची क्वालिटी मिसिंग होती. आज दोन्ही दिसले पुन्हा.

ओम फट स्वाहा Lol

IMG-20220903-WA0024.jpg

एक मैं और एक तू
दोनों मिले इस तराह
एक मैं और एक तू
दोनों मिले इस तराह
और जो तन मन में हो रहा है
ये तो होना ही था
varungrover tweet
प्यार में पड़े couples जब अकेले में नहीं मिल सकते तो कोई बहाना बनाकर भीड़ में मिलते हैं।
एशिया कप ऐसा ही एक बहाना है।
इकडे नका पाहू;
चालू द्या;
अरेरे सुपर ओव्हर नाही केली. अजून खूप जाहिराती लावत्या आल्या असत्या. अजून पैसा आला असता .

Pages