Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके दावा शब्द हवा का ईथे.
ओके दावा शब्द हवा का ईथे.
माझे मराठी फार चांगले नाही.
बाकी आफ्रिकेने जर या मालिकेत ईंग्लण्डला दणका दिला तर ऑस्ट्रेलियालाही द्यावा. आपल्यालाही म्हणजे ऑस्ट्रेलियाला मायदेशात हरवत पुढे जाता येईल.
बाझबॉल मला वाटते ईंग्लंडच्या
बाझबॉल मला वाटते ईंग्लंडच्या लहरी वातावरणात ॲडवांटेज देणारे आहे. पण अर्थात सोबत तंत्रही हवेच. कारण जेव्हा बॉल करामत करत असेल तेव्हा तुम्हाला टिकून राहणे गरजेचे. त्यासाठी तंत्रच हवे. पण जेव्हा बॉल हलायचा थांबेल तेव्हा वेगाने धावा जमवा. म्हणजे जेव्हा पुन्हा बॉल स्विंग होऊ लागेल तोपर्यंत तुम्ही गेममध्ये पुढे आला असाल. थोडक्यात मारतानाही तिथे कधी मारावे कधी नाही हे महत्वाचे.
ऋन्मेऽऽष, तुम्ही हे सगळे
ऋन्मेऽऽष, तुम्ही हे सगळे लवकरात लवकर द्रवीडला नि सगळ्या भारतीय खेळाडूंना सांगून टाका. जमल्यास भारताचा संघ जिथे असेल तिथे स्वखर्चाने जाऊन त्यांना खेळून पण दाखवा.
ऋन्मेऽऽष, तुम्ही हे सगळे
ऋन्मेऽऽष, तुम्ही हे सगळे लवकरात लवकर द्रवीडला नि सगळ्या भारतीय खेळाडूंना सांगून टाका. जमल्यास भारताचा संघ जिथे असेल तिथे स्वखर्चाने जाऊन त्यांना खेळून पण दाखवा\\\+७८८८८८६
चुम्मा आहे आपल्यात. जो ऑलरेडी
चुम्मा आहे आपल्यात. जो ऑलरेडी तसा खेळला आहे शेवटच्या सामन्यात. द्रविडने ऊठून टाळ्याही वाजवल्या आहेत. पण शर्मा राहुल वगैरेंच्या अनुपस्थितीत आणि कोहली पुजारा फ्लॉप जात असल्याने हरलो आपण ती कसोटी.
पंत आवडता असला तरी पंत
पंत आवडता असला तरी पंत तंत्रशुद्ध खेळाडू आहे म्हणायला माझी जीभ धजावत नाही. हँड आय कोऑर्डीनेशन तरूण पणी चांगले असते नि काही जणां चे अतुलनीय असते. मला पंतची तशीच केस वाटते. स्विंग होणार्या बॉलसमोर पंत नि इतर भारतीय खेळाडूंमधे फक्त कोणाकडे किती पेशन्स आहे एव्हढाच फरक म्हणाता येईल.
पंतला तंत्रशुद्ध नाही म्हणालो
पंतला तंत्रशुद्ध नाही म्हणालो. पण जेव्हा गोलंदाजांना मदत असते तेव्हा तो वेळ काढून नेऊ शकतो. त्याला ऑफ स्टंपबाहेरचे बॉल चांगल्या पद्धतीने सोडताना पाहिले आहे. फक्त त्याने तसे ठरवायला हवे. आफ्रिकेतील दुसऱ्या कसोटीत जे वाह्यात पद्धतीने बाद झाल्याने त्याच्यावर टिका झालेली त्याचे उत्तर म्हणून तिसऱ्या कसोटीत तो एकटाच कसा खेळला हे आपण पाहिलेय. आणि एकदा का स्विंग थांबला की मग तिथून दुसरा नवीन बॉल येईपर्यंत त्याने सामना दूर नेलेला असतो.
बाकी पंचतंत्र असते तसे एक पंततंत्र आहे. त्याची वर्ल्डक्लास गोलंदाजीसमोर खेळायची क्षमता खुद्द संजय मांजरेकर यांनी मान्य केली आहे. २०-२० वर्ल्डकप आणि २०१९ वर्ल्डकप सेमीला जे नवीन बॉलवर हाय प्रेशर गेममध्ये आपली वाताहत झाली त्या पार्श्वभूमीवर मांजरेकर हेच म्हणाला की अश्यावेळी पंतला टॉप ऑर्डर बॅटसमन म्हणून तयार करा. तो हे करू शकतो. त्याला आधीही हे करताना पाहिले आहे. जिथे प्रेशरखाली भल्याभल्यांचे तंत्र गडबडते अश्या महत्वाच्या आणि निर्णायक सामन्यातच निग्रहाने खेळायची एक चांगली खोड त्याला लागली आहे
"बाझबॉल मला वाटते ईंग्लंडच्या
"बाझबॉल मला वाटते ईंग्लंडच्या लहरी वातावरणात ॲडवांटेज देणारे आहे. पण अर्थात सोबत तंत्रही हवेच. कारण जेव्हा बॉल करामत करत असेल तेव्हा तुम्हाला टिकून राहणे गरजेचे. त्यासाठी तंत्रच हवे. " इथून सुरू झालेले पोस्ट्स आहेत.
“ इथून सुरू झालेले पोस्ट्स
“ इथून सुरू झालेले पोस्ट्स आहेत.” - तुझा पत्ता कळव. एक घडा पाठवतो, पालथा घालायला
प्रत्यक्ष भेट - दोघे मिळून
प्रत्यक्ष भेट
गिल ने मिळालेल्या संधीचे सोने करायला लावले आहे. राहुल ला वन डे ओपनर का बनवायला लावलय परत जेंव्हा तो ४-५ वर दणक्यात खेळत होता तर ? ओपनर ची कमी आहे का आपल्याकडे ? ह्याउलट मधल्या फळी मधे हुकूमी खेळेल असा गडी असताना .....
चूक काढायची घाई नको
चूक काढायची घाई नको
पुन्हा वाचा माझी आताची वरची पोस्ट.
पंत तंत्रशुद्ध नाही म्हणजे तो सचिन द्रविड नाहीये जे तंत्रशुद्ध फटके मारून धावा जमवेल.
पण अश्या प्रसंगी टिकून राहायचे तंत्र त्याकडे आहे असेही वर लिहिले आहे. त्याच्या बॉल सोडण्याचे कौतुक केलेय. डिफेन्सला आवश्यक तंत्र तो दाखवतो.
मग एकदा तो पिरीअड खेळून काढला त्याने की तंत्राचे काम संपले त्यासाठी. मग पुढे तो आपले पंत स्पेशल फटके खेळून धावा जमवतो.
“ गिल ने मिळालेल्या संधीचे
“ गिल ने मिळालेल्या संधीचे सोने करायला लावले आहे.” - नक्कीच. आयर्लंड दौर्यापासून संधी दिलेल्या सगळ्याच खेळाडूंनी कमी-अधिक प्रमाणात वेळोवेळी चमक दाखवली आहे. आवेशखान ने म्हटल्याप्रमाणे कदाचित ड्रेसिंग रूममधलं आश्वासक वातावरण पूरक ठरत असावं. अगदी नावावर काट मारावी इतकी मातीमोल कामगिरी कुणाचीच नाहीये.
“ राहुल ला वन डे ओपनर का बनवायला लावलय परत” - कदाचित त्याला बॅटींग प्रॅक्टीस देण्यासाठी ओपनिंगला पाठवलं असावं. कदाचित इशान किशन च्या खेळात कन्सिस्टंसी नसल्यामुळे, पंतची जागा कीपर म्हणून पक्की असल्यामुळे आणि चौथ्या नंबरसाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स तयार झाले असल्यामुळे राहूलचा ओपनर म्हणून विचार होत असावा.
मग एकदा तो पिरीअड खेळून काढला
मग एकदा तो पिरीअड खेळून काढला त्याने की तंत्राचे काम संपले त्यासाठी. >> तंत्र ह्या शब्दाची व्याख्या जगातले लोक ज्या तर्हेने वापरतात त्याच तर्हेने वाचणारे वाचणार नि वापरणार. बाझबॉल संदर्भा मधे तंत्र ज्या हेतूने वापरले आहे ते नि नंतर पंत वर गाडी घसरल्यावर त्यातून तू काढलेला अर्थ ह्यात जमिन अस्मानाचा अर्थ आहे. पंततंत्र हे 'तंत्र' नाही.
कदाचित त्याला बॅटींग प्रॅक्टीस देण्यासाठी ओपनिंगला पाठवलं असावं. >> होपफुली तसेच असावे फक्त. चौथ्या नंबरसाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स म्हणतोयस ? पांड्या नि पंत का ?
आयर्लंड दौर्यापासून संधी दिलेल्या सगळ्याच खेळाडूंनी कमी-अधिक प्रमाणात वेळोवेळी चमक दाखवली आहे. >> नक्कीच तसे म्हणू शकतो.
तंत्र ह्या शब्दाची व्याख्या
तंत्र ह्या शब्दाची व्याख्या जगातले लोक ज्या तर्हेने वापरतात त्याच तर्हेने वाचणारे वाचणार
>>>
हो, तंत्राची व्याख्या तशीच वाचायची आहे. पंतकडे बचावाचे तंत्र असल्याशिवाय का तो गाब्बा, आफ्रिका, ईंग्लंड आणि भारतातल्याही आखाडा खेळपट्ट्यांवर कसोटी फॉर्मेटमध्ये यशस्वी ठरला आहे.
धावा जमवताना मात्र तो आपले फटके खेळतो. त्यातही काही क्लास दाखवणारे फटके असतातच. पण तितकेच तो खेळत नाही. तितकेच त्याने खेळूही नये. त्याने असेच धाकड खेळावे. कारण असे खेळताना तो जे करू शकतो ते ईतर फलंदाज तंत्रशुद्ध पद्धतीने खेळून नाही करू शकत.
त्याने ईंग्लंड कसोटीत जे शतक मारले तेव्हाच्या माझ्या पोस्ट बघा ईथल्याच. त्याच्या जेमतेम वीसबावीस धावा झालेल्या तेव्हाच मी म्हटले होते की आज जसा खेळतोय ते पाहता आफ्रिकेच्या शतकी खेळीची आठवण येतेय. तोच कंट्रोल त्याच्या खेअलात दिसतोय. आजही त्याचे शतक व्हावे..... आणि खरेच झालेही
त्याच्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट आहे. त्यामुळे त्याकडे असलेले तंत्र दुर्लक्षिले जाते. त्याच्या स्वत:कडूनच दुर्लक्षिले जाते तर तुम्हा पब्लिकचे काय
बाकी पंचतंत्र असते तसे एक
बाकी पंचतंत्र असते तसे एक पंततंत्र आहे.
>> आवरा
"चौथ्या नंबरसाठी सुद्धा बरेच
"चौथ्या नंबरसाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स म्हणतोयस ? पांड्या नि पंत का ?" - नाही - सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिपक हूडा, संजू सॅमसन आणि झालंच तर शुभमन गिल सुद्धा (हे सगळे शर्मा, इशान / राहूल आणि कोहली पहिल्या तिनात आहेत असं समजून). पाच आणी सहा मधे पंत, पंड्या, सातवा जडेजा / अक्षर आणि मग ४ बॉलर्स.
हो, तंत्राची व्याख्या तशीच
हो, तंत्राची व्याख्या तशीच वाचायची आहे. पंतकडे बचावाचे तंत्र असल्याशिवाय का तो गाब्बा, आफ्रिका, ईंग्लंड आणि भारतातल्याही आखाडा खेळपट्ट्यांवर कसोटी फॉर्मेटमध्ये यशस्वी ठरला आहे. >> परत कोलांटी उडी मारलीस. तू एकदा तो तंत्र शुद्ध आहे कि नाही हे नक्की स्वतःपुरते तरी नक्की ठरव. तू वगळता इतर कोणीही , अगदी खुद्द पंतसुद्धा मी तंत्र शुद्ध आहे असे म्हणणार नाही. बाकीचे संपूर्ण सबगोलांकार पोस्ट ह्या प्रश्नापुरते निरर्थक आहे.
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिपक हूडा, संजू सॅमसन आणि झालंच तर शुभमन गिल सुद्धा ( >> पण तीच तर गम्मत आहे कि ह्यातले कोणीच वनडे मधे कन्सिस्टंटली चौथ्या आकड्यावर खेळले नाहियेत, सतत सापशिडी सुरूच आहे
मी सुद्धा त्याला तंत्रशुद्ध
मी सुद्धा त्याला तंत्रशुद्ध फलंदाज नाहीच म्हणालोय. पण त्याकडे गरजेपुरते तंत्र आहे जे माझ्या मूळ पोस्टमध्ये नमूद केले होते जिथून ही चर्चा सुरू झाली होती. उगाच का तो कसोटी फॉर्मेटला यशस्वी झालाय. अडमतडम फलंदाजी करून नाही टिकता येत हो ईथे. प्रतिस्पर्धी संघ दर दौऱ्याआधी त्याच्यासाठी खास प्लानिंग करतात. आणि हा पुरून ऊरतो. कमॉन. कसोटी फॉर्मेटला शॉर्ट बॉलला किती कंट्रोलमध्ये खेळतो ते बघा एकदा. प्लेअर बाऊंडरीला लाऊन याच्या अंगावर बॉलिंग केली जाते हा आरामात तो बॉल खाली दाबून सिंगल घेतो. आणि तुम्ही म्हणता त्याकडे तंत्र नाही. मग कोण तंत्रशुद्ध आहे. तो शॉर्ट बॉलला धडपडणारा अय्यर, की ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूचे काय करावे हे समजेणासे झालेला कोहली..
मला आठवतेय की जेव्हा पंतचे पदार्पण झालेले, ईण्ग्लंडला कसोटीत षटकार मारून खाते उघडलेले. तेव्हा दिवस अखेरीस बहुधा तो नाबाद होता. आणि त्याची ती छोटीशी झलक पाहून तेव्हाच दादा काहीतरी सुंदर म्हणालेला. बहुतेक त्याच्या स्टान्स की बॉडीपोजिशनवरून म्हणलेला, की बरेच दिवसांनी असा सॉलिड फलंदाज पाहिला आहे. जो परदेशी खेळपट्ट्यांवर चांगले खेळेल असा विश्वास व्यक्त केला होता. खरे तर मी त्याही आधीपासून पंतचा चाहता होतो. त्याचे आयपीएलमधील जलवे पाहिले होते. पण दादाचे हे बोलणे ऐकून मी चक्राऊनही गेलो होतो. त्याचवेळी आनंदही झाला होता. कारण ईंग्लंडमधील त्याचा खेळ बघून जर दादा काही म्हणत असेल तर त्यात काहीतरी तथ्य असणारच. पुढेही त्याला वेळोवेळी बॅक करायला दादाच सर्वात पुढे होता. आज रिझल्ट समोर आहे. कसोटी क्रिकेट कित्येक जण केवळ चुम्मासाठी बघतात
पण हं. आता तंत्रशुद्ध आहे की नाही याचे पुर्णपणे हो किंवा नाही असेच उत्तर द्यायचे, अध्येमध्ये नाहीच, हा आपला उगाच हट्ट आहे.
तसे तर मग शर्मा, कोहली, राहुल, अय्यर गेला बाजार दिनेश कार्तिक या सर्वांबाबतही द्या उत्तर ते तंत्रशुद्ध फलंदाज आहेत की नाही आहेत? ज्याला तुम्ही नाही म्हणाल त्याचे मी तुम्हाला काही तंत्रशुद्ध फटके दाखवतो. ज्याला तुम्ही हो म्हणाल त्याच्या तंत्रातले दोष दाखवतो
जसे आजकाल कुठल्याही गोष्टी
जसे आजकाल कुठल्याही गोष्टी अरण्यामागे पैसा मिळवणे हेच एक ध्येय असते तसेच फलंदाजीत लवकरात लवकर जास्तीत जास्त धावा करणे हेच उद्दिष्ट असते/ तंत्र, टॅलेटॅ, स्टाईल हे बघणार्यांनी ठरवावे.
पण त्याकडे गरजेपुरते तंत्र
पण त्याकडे गरजेपुरते तंत्र आहे जे माझ्या मूळ पोस्टमध्ये नमूद केले होते जिथून ही चर्चा सुरू झाली होती. >> परत एकदा चर्चा बाझबॉल वरून सुरू झाली होती. मी वरती एकदा तुझे पोस्ट कॉपीही केले होते. वर बघू शकतोस. गरजेपुरते तंत्र , पंत कसोटि मधे कसा खेळतोय इत्यादी आता तू जस्टिफाय करायला वापरतो आहेस. असो, ह्यात नवीन काहीच नाही म्हणा . हँड आय कोआर्डीनेशन ह्या शब्दाबद्दल थोडेसे वाचून बघ. (सॉरी वाचनाचे तुला वावडे आहे हे माहित आहे पण इलाज नाही)
"ज्याला तुम्ही हो म्हणाल त्याच्या तंत्रातले दोष दाखवतो " >> त्याबद्दल मला कणमात्र शंका नाही रे. जिथे घरबसल्या तुला प्रत्येक बॉल मधले फिक्सिंग दिसते तिथे हे तर अगदीच बाळबोध प्रकरण आहे रे.
हँड आय कोआर्डीनेशन ह्या
हँड आय कोआर्डीनेशन ह्या शब्दाबद्दल थोडेसे वाचून बघ.
>>>
ज्याचे बालपण सेहवागची बॅटींग बघण्यात गेले... असो
पंतकडे तंत्र नाहीचेय समजूया. जे लोकं त्याच्या तंत्राचे कौतुक करतात ते वेडेच आहेत असेही समजूया
बीसीसीआय अध्यक्ष दादा वेडा, तंत्रशुद्ध फलंदाज समालोचक संजय मांजरेकर वेडा, टीकाकार म्हणून सध्या फेमस असलेला ईँग्लंडचा मायकल वॉनही वेडा समजूया
तसे कौतुक तर हल्ली पंतचे दर दुसरी व्यक्ती करते. पण यांनी खास त्याच्या तंत्राचे कौतुक केले आहे म्हणून यांचे विशेष उल्लेख.
मी सुद्धा यांच्याच पंक्तीत आहे. कारण गाब्बा ईनिंग येण्याआधीच जेव्हा पंतचा स्ट्रगल चालू होता तेव्हा मी त्याच्यातले गुण हेरून त्यावर धागा काढला होता. तिथे काही पंतला नावे ठेवणारेही आलेले. जे पंतने माझा विश्वास सार्थ ठरवताच फिरकलेच नाहीत
एखाद्या सचिन द्रविड कोहलीमधील टॅलेंट ओळखणे फार सोपे असते. ते उघड्या डोळ्यांनीही दिसते. पंतबाबत हे ओळखायला पारखी नजरच हवी. बीसीसीआय अध्यक्ष दादा आणि सध्याचा कप्तान रोहीत शर्मा यांचे यासाठीच कौतुक.
ह्या पोस्ट चा वरच्या वादाशी
ह्या पोस्ट चा वरच्या वादाशी काय संबंध ? नुसता व्हर्बल डायरीया !! पंत चे कौतुक नि पंतच्या तंत्राचे कौतुक नी मूळ मुद्दा जिथून सुरू झाला ह्या तीन भिन्न गोष्टी आहेत हे कळणे एव्हढे कठीण आहे का ?
तुझ्या पंतच्या चमको गिरीबद्दल वाद नाहिये हा. मी ही वर त्याचे कौतुकच केले होते.
पंतच्या तंत्राचे कौतुक आणि
पंतच्या तंत्राचे कौतुक आणि मूळ मुद्दा का वेगळा बरे?
पंतमध्ये तंत्र नाही म्हणालात ना तुम्ही?
बाकी पंतचे कौतुक हा वेगळा मुद्दा आहे हे मान्य. मी कुठे ते मुद्दा म्हणून करतोय. लाडका आहे माझा चुम्मा. विषय निघाला तर भरभरून कौतुक करावेसे वाटते. सगळेच थोडी ना वादासाठी लिहायचे असते. आपल्या आवडत्या खेळाडूव्हे कौतुक करायला काळवेळ बघू नये
"बाझबॉल मला वाटते ईंग्लंडच्या
"बाझबॉल मला वाटते ईंग्लंडच्या लहरी वातावरणात ॲडवांटेज देणारे आहे. पण अर्थात सोबत तंत्रही हवेच. कारण जेव्हा बॉल करामत करत असेल तेव्हा तुम्हाला टिकून राहणे गरजेचे. त्यासाठी तंत्रच हवे. "
नंतर झक्कींछ्या "ऋन्मेऽऽष, तुम्ही हे सगळे लवकरात लवकर द्रवीडला नि सगळ्या भारतीय खेळाडूंना सांगून टाका. जमल्यास भारताचा संघ जिथे असेल तिथे स्वखर्चाने जाऊन त्यांना खेळून पण दाखवा." ह्या उपहासावर ऋ उवाच "चुम्मा आहे आपल्यात. जो ऑलरेडी तसा खेळला आहे शेवटच्या सामन्यात. द्रविडने ऊठून टाळ्याही वाजवल्या आहेत. पण शर्मा राहुल वगैरेंच्या अनुपस्थितीत आणि कोहली पुजारा फ्लॉप जात असल्याने हरलो आपण ती कसोटी."
तुझ्या पहिल्या वाक्यामधे तंत्र म्हणजे पंतचे तंत्र तुला अभिप्रेत नाही हा कॉमन सेन्स आहे. इथे तंत्र हा शब्द जनरली वापरला आहे. तो सर्वसामान्य लोक 'अमका तंत्र शुद्ध खेळाडू आहे ' हा वाक्यप्रयोग करताना जे तंत्र अभिप्रेत धरून करतात त्या तंत्राकडे तो पॉईंट करतो आहेस. इथे हे तंत्र १००% असेल असे नाही पण ५०% असेल तर त्याला कोणी वापरणार नाही. सर्वसाधारणतः कलीस, द्रविड, बॉयकॉट, सचिन, गावस्कर , वॉन, मांजरेकर इत्यादी लोकांना उद्देशून केला जातो तेंव्हा त्यात ७०-८०% हा हाय वॉटर मार्क धरायला प्रत्यवाय नसावा. प्रत्येकाची स्टाईल, पेशन्स इत्यादी बाजूला ठेवूनही ह्या सर्वांमधे जे कॉमन जाणवते ते तंत्र प्रमाण धरतात . पंत ची स्वतःची स्टाईल आहे , उप्परोलेखित तंत्र नाही. "पंतचे तंत्र" हा फसवा शब्द प्रयोग आहे. वर सेहवाग चा उल्लेख केलास म्हणाजे तुलाही जाणवते आहे. धावा काढणे नि तंत्र ह्या वेगळ्या डायमेंशनमधल्या गोष्टी आहे. एक असले/ केले म्हणाजे दुसरे होतेच हे धाडसी विधान होईल. उगाच चौकोनि पेग ("पंतचे तंत्र") गोल भोकामधे (पहिल्या पोस्ट मधे) बसवण्याचा आटापिटा कशाला ?
* विक्रमादित्याचे हे उत्तर ऐकल्यावर वेताळ परत झाडाला जाऊन लटकू लागला
“प्रत्येकाची स्टाईल, पेशन्स
“प्रत्येकाची स्टाईल, पेशन्स इत्यादी बाजूला ठेवूनही” - इथे तुझ्या पेशन्सला दाद द्यायला हवी
फिरून फिरून तेच लिहित आहात
फिरून फिरून तेच लिहित आहात असामी.
तंत्र म्हटल्यावर जे तुम्हाला अपेक्षित आहे ते देखील पंतकडे बरेपैकी आहेच. त्याशिवाय का तो सातत्याने देशात वा परदेशात कसोटी फॉर्मेटला चमकला आहे.
पंतकडे तंत्र नसूनही जर तो हे करत असेल तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघांच्या अकलेवर संशय घेत आहात म्हणावे लागेल.
हल्ली लोकं कसोटी पुर्ण बघत नाहीत पेशन्सने. हायलाईटस बघतात. त्यात त्याचे निव्वळ चौके छक्के बघून समजणार नाही त्याकडचे तंत्र. त्याने टिकून राहण्यासाठी तंत्रावर घेतलेली मेहनत बघायची असेल तर फुल मॅच बघायला हवी.
आता खरच कंटाळा यायला लागलाय
आता खरच कंटाळा यायला लागलाय या प्रकाराचा..... कुणीतरी एकाने तरी थांबा राव!
पटत नसतील तर पोस्ट ओलांडून पुढे जायला शिका
असामी, यष्टीबाहेर हातभर
असामी, यष्टीबाहेर हातभर टाकलेले वाईड किंवा हाफ पीच निरर्थक उसळते चेंडू खुशाल तिरकस बघत सोडून देत जावा म्हणजे तो असे वाईड
बॉल टाकणारा बॉलर आपोआप दमतो! गावस्कर हे तंत्र भारी वापरत.
*गावस्कर हे तंत्र भारी वापरत.
*गावस्कर हे तंत्र भारी वापरत. * - म्हणूनच गावसकरला तंत्रशुद्ध फलंदाज म्हणतात !
शाहरूख सुपर्रस्टार आहे.
शाहरूख सुपर्रस्टार आहे. त्याला आपले स्टारडम कसे वापरायचे हे माहीत आहे. पण त्यामुळे तो एक उत्तम अभिनेताही आहे हे लोकं विसरतात. अर्थात काही लोकं त्याला तो काही अभिनयसम्राट नाही म्हणून चिडवायलाही बघतात. चालायचंच
सचिन क्रिकेटचा देव आहे तर
चुम्मा क्रिकेटचा शाहरूख खान आहे. !
Pages