सर्पानूभव.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 5 August, 2022 - 10:50

सर्पमित्र म्हणून काही दिवस केलेल्या कामाचे अनूभव.

माझ्या घराच्या बाजूला सर्पमित्र रहायचा. मी २००७ साली ९ वीत असताना त्याच्या सोबत साप पकडायला जायचो. कुठेही साप निघाला की त्याला फोन यायचे. मग तो आम्हा पोराटोरांना मदतनीस म्हणून न्यायचा. मी साप ओळखायला शिकलो. कुठला साप कोणत्या जातीचा मी पाहताक्षणी ओळखतो. साप जेवढा मोठा तेवढा पकडायला सोपा. पण लोकांत गैरसमज आहे की जेवढा मोठा साप तेवढा घातक. मी साधारणत: बिनविषारी साप सहज पकडतो. विषारी सापांना आजिबात हात लावत नाही, ऊगाच रिस्क नको. मागे तळजई टेकडी वर फिरायला गेलो तेव्हा सदू शिंदे मैदानात धामन हा बिनविषारी साप निघाला होता. लोकांचा गर्दी होती. मी पकडनार होतो पण बायकोने आरडाओरडा करेन म्हणून धमकी दिली, आमची चर्चा एकनार्या एका काकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला पण काकांचे प्रयत्न वाया गेले. शेवटी ओढत ताणत मला घरी आणण्यात आले.
साप ह्या प्राण्याला बुध्दी नसते, माणूस गाय, म्हैस असं त्याला काहीच समजत नाही. समोर वस्तू हलताना दिसली की तिचा चावा घ्यावा एवढंच त्याला कळतं. त्या सर्पमित्राबरोबर मी बराच फिरलो साप पकडल्यावर आम्ही पेट्रोल खर्च घ्यायचो. (फूकट समाजसेवा का करावी?)
ह्या सर्पमित्राला बोटाला नाग चावला होता. त्याने दंडावर दोरा घट्ट बांधून बोटाला ब्लेड चे काप मारून रक्त वाहू दिलं होतं व दवाखान्यात गेला होता. एकदा नागाचं चूंबन घेण्याचाही स्टंट केला होता. बाजूला ऊभ्या छायाचित्रकारांनी पटापट फोटो काढले. त्याची फ्रेम करून त्याने घरात टांगली. खुप हळूहळू फना काढलेल्या नागाच्या जवळ ओठ न्यायचे, श्वास घ्यायचा नाही तोपर्यंत श्वास सोडला नी नागाला सेन्स झालं की डसलाच. एक नाग डसलेला सर्पमित्र मला काही होत नाही म्हणून फूशारक्या मारत होता, नंतर चार तासात मेलेला मी पाहीलाय. पकडलेल्या सापांचे प्रदर्शनही आम्ही भरवायचो. कुठलं तरी कार्यालय बूक करून त्यात काचेच्या पेट्या ठेवायच्या त्यांच्या पुढे सापाचं नाव लिहायचं. मग शहरातील शाळात जाऊन पाच रूपये/दोन रूपये दराने तिकीट विकून त्या शाळेला ठरलेली तारीख द्यायचो.मग छोटीछोटी मूले यायची साप पहायला. नागा समोर तुफ्फान गर्दी व्हायची. बिचारा नागही दिवसभर फना काढून थकून जायचा मग बॅकप ला दुसरा नाग ठेवायचो. त्याला पेटीतून बाहेर काढून दुसरा ओतायचो. त्याना ऊंदीर वगैरे खायला व्यवस्था करावी लागायची. नाग पिशवीत पकडला असेल ना पिशवी बाहेरून त्याला टच केलं की फूस्स करतो.
विषारी साप हातपायाला चावला तर वाचायचे चान्स जास्त पण शरीराच्या ईतर भागाला चावला तर डाॅकरांचे प्रयत्न नी नशीब.
बिनविषारी प्रमाणे निम्न विषारी सापही असतात. पुर्वी मेलेला माणूस अचानक जिवंत झालेल्या घटना घडायच्या त्या
ह्याच प्रकारातून. निम्न विषारी सापाचे विष ऊतरेपर्यंत माणूस बेशूध्द होतो.
विषारी सापाच्या महाराष्ट्रात चार जाती आहेत. नाग, घोणस, मन्यार आणी फूरसे. सर्वात घातक घोणस. तो कुकरच्या शिटी प्रमाणे आवाज काढतो. मन्यार व फुरसे जास्तीत जास्त फूट सव्वा फूट असतात. फुरसेचं तोंड ईंग्रजीतील ”वी” आकाराचं असतं. मन्यार काळा व वर छोटेछोटे ठिपके असतात. घोणस व नाग बर्यापैकी मोठे असतात. घोणस पिवळा असतो. घोणस सारखाच दिसनारा पण बिनविषारी असलेला नी रंग वेगळा असलेला साप म्हणज डूरक्या घोणस. आवाज सारखाच. एकदा डूरक्या घोणस पकडायला गेलो तो एका खळग्यात शिरला ओढून बाहेर काढायला लागलो तर त्याचा अर्धा तूकडाच बाहेर आला. फार वाईट वाटलं होतं.
धामण हा साधारण बराच मोठी नी जास्त आढळनारा साप. हातातून सुटण्यासाठी तो स्वतभोवती ३६० अंशात फिरतो. मांडूळ हा बिनविषारी साप गुप्तधनासाठी फेमस आहे. ह्याची शेपटी नी तोंड सारखं असल्याने शेपटी वर नकली डोळे लावून दुतोंड्या म्हणून भोंदूबाबा लोकांकडून पैसे ऊकळतात. तस्कर हा सर्वात गरीब बिनविषारी साप, काही केल्या चावत नाही खुप त्रास झाला तरच चावतो. सर्वात जास्त तस्करी केला जानारा साप म्हणून ह्याचं नाव तस्कर असावं असं मला वाटतं. चमकती कातडी कमावन्यासाठी ह्याचा वापर केला जातो. डोक्यात खिळा ठोकून झाडाला अडकवतात नी पोटावर ऊभा चिरा मारून आतलं सर्व काढतात, सूकल्यानंतर कातडी कमावतात ह्याच्या पासून. त्याच्या नंतरचा गरीब साप गवत्या. गवता सारखा हिरवा नी चावायचा कंटाळा हे त्याचं वैशिष्ट्य. मांजर्या हा निम्न विषारी साप त्याचे जोळे मांजरी सारखे म्हणून त्याच नाव हे. कुकरी छोटासा मस्त साप. फार दुर्मीळ. साप निघाल्याचा काॅल आल्यावर माझ्या सर्पमित्र गुरूने मला एकटं जाऊन साप पकडायची मोहीम सोपवली. ही माझी पहीली साईट विसीट, तीचा श्रिगणेशा हा साप पकडून मी केला. पहीलाच साप दुर्मीळ पकडून आणला म्हणून माझी वाहवा झाली. मी अनेक बिनविषारी साप पकडले. पण चावू एकाला ही दिला नाही. चावला तरी काही होत नाही म्हणा. पण तो सापाचा मित्रच कसा? ज्याला साप चावला? असं माझं मत. साप चावला तर टीटी चं ईंजेक्शन घ्यावं लागतं.
साप दिसला तर कधीही मारू नये. कारण ऊंदीर खाऊन हा आपल्यावर उपकारच करत असतो. “मारू नये सर्पा संताचीया दृष्टी, होतील ते कष्टी अनंतपणे.” असं संतं तुकाराम सांगून गेलेत. एक ऊंदीर खाल्ला की साधारण दीड दोन महीणे सापाला काही लागत नाही. ऊंदीर किंवा काहीही खाल्लेला साप पकडला तर तो ऊलटी करतो. सापाने काही खाल्ल असेल तर त्याचं पोट फूगीर दिसतं ज्या भागात साप आहे तिथे.
अजगर ही सापाच जात सर्वानाच माहीत असेल. विदेशात लोक अजगर पाळतात. सापातील सर्वात मोठा प्रकार, भक्षाला पकडून त्याच्या भोवती फेरा मारून त्याचा श्वास बंद करून मग त्याला खातो.
दिवड हा पाण्यात आढळनारा साप, ह्याने चावलं तर लचकाच तोडतो असा समज आहे. पण हा साप लवकर चावत नाही. ह्याला पकडायची एक टेक्नीक असते, खिडकीतून माणूस जसा मान बाहेर काढून असतो तसा हा साप पाण्यातून डोकं बाहेर काढून असतो. मागून दोन बोटं नेऊन बरोबर त्याची मान पकडायची व बाहेर काढायचे. आम्ही साप पकडायला जायचो तेव्हा साप जागेवर नसायचा कुणीतरी कुठेतरी पाहीलेला असायचा मग आम्ही येईपर्यंत साप निघून गेलेला असायचा. तिथे बिळं असतील तर सर्व बिळं पाण्याने भरावे लागायचे. साप पाण्यात थांबत नाही लगेच बाहेर येतो. पावसाळ्यात पहील्या पावसानंतर बाहेर जास्त साप दिसतात ते ह्यामुळेच. लोकांना वाटतं बेडूक खायला साप बाहेर पडलाय. एकदा असेच बिळं पाण्याने भरत होतो सर्व बिळं भरून झाली तरी साप बाहेर आला नाही. हातातून पाईप सूटला नी पायाजवळ पडला नेमका तीथेच बिळात साप होता पाणी लागता बरोबर सळसळ करत बाहेर आला, नाग होता.
एकदा एका ठीकाणी रोज साप निघायचा. तीन दिवस रोज जाऊन पकडला, नागाची पिल्ले होती. मग लक्षात आलं का आजूबाजूलाच कुठेतरी नागाने अंडी घातलीत. थोडी अडगळ बाजूला केली आणी तीथे बाजूलाच अंडी सापडली.
कवड्या हा पण एक छोटा बिनविषारी साप. ऊभी (सपाट नसलेली) भिंत हा चढून जातो.
एकदा पाहुणे घरी आले असताना मी त्याना साप दाखवायला आणला, पण भयानक पळापळ झाली. ईतकी की साप ही बिथरला असेल, तेव्हा लक्षात आलं की साप नाव एकलं तरी लोक घाबरतात. आपण जसं सापांना कुत्रा मांजर हाताळावं तसं हाताळतो तसं ईतर लोक करत नाहीत. नंतर ते पाहुणे पुन्हा कधीही आमच्या घरी आले नाहीत.
साप पकडायला गेलो की लोक खुप आदर द्यायचे. साप पकडन्या आधी कुठला मंत्र म्हणतात म्हणून विचारायचे. घरात साप येऊ नये म्हणून काय करावे? हे पण विचारायचा. साप चावला तर कुठलाही अघोरी ऊपाय न करता सरळ दवाखाना गाठायचा. सापाच्या चावल्याच्या निशानावरून डाॅक्टर ओळखतात की बिनविषारी चावलाय की विषारी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहिती तुम्ही दिली आहे.
साप दिसला की तो विषारी आहे की बिन विषारी हे बघण्यासाठी कोणाचा मेंदू चालत नाही.
माणूस जो पर्यंत त्यांना त्रास देत नाही तो पर्यंत साप माणसाला चावत नाही
माणूस हा काही त्यांचा आहार नाही
उगाचच कोणताच प्राणी जगात नुकसान करत नाही
एकमेव माणूस प्राणी सोडून.
मण्यार, नाग,घोणस ह्यांच्या पासून लांब राहणे उत्तम .
माणसाला वैकुंठाला नक्की च ते पोचवू शकतात.
वाचला तरी शरीरावर दीर्घ कालीन विपरीत परिणाम होतात.
पण त्यांना मारणे हा उपाय नाही.
माणसाने त्यांच्या आयुष्यात हस्तक शेप करू नये.

सकाळी धावायला जाताना स्पायसर कॉलेज जवळ एक मेलेला साप दिसला अगदी ऐन रस्त्यात, त्याला कावळ्यांनी खाऊ नये म्हणून बाजूला गवतात लपवून बाजूला खुणेचा दगड ठेवला, रन संपवून तिकडे गेलो तो साप गुंडाळी करून खिशात घातला आणि घरी आणला.

घरी मुलगी सुस्थितीतला साप पाहून खुश झाली, मग तो teblnwr पसरवून ठेऊन व्यवस्थित निरीक्षण करून झाले, पोटाकडचे खवले, डोक्यावरचे खवले, डोळे, तोंड उचकटून आत पाहणे वगैरे सगळे प्रकार करून झाले.
गूगल केले तर तो दिवड जातीचा बिनविषारी साप होता.

मग मुलीने तो हातात धरून माहिती देणारा छोटा व्हिडिओ बनवला.
त्यांच्या शाळेच्या गृपवर तो हिट गेला.

साप चावला तर कुठलाही अघोरी ऊपाय न करता सरळ दवाखाना गाठायचा.

हो ना. पण दवाखाना असतो चालत दोन तीन तासांवर काही गावांत.
असो.

माझ्या आयुष्यात सर्वात भयानक प्रसंग.
नाग होता त्याचे तोंड आत मध्ये बिळात होते तो बिळात किती आणि बाहेर किती हे नाहीत नव्हते.
गावी असताना घडलेला प्रसंग आहे.
खुचिरा,(तीन तीक्ष्ण टोक असणारा भल्या सारखा प्रकार)त्याच्या शेपटीवर लागला होता.
पण त्याचा दांडा लांबी लं खूप च कमी होता.
अडचण होती खूप.
दुसरा खुचीरा आणतो असे मित्र म्हणाला आणि तो खुच्छिरा माझ्या हातात दिला.
नागा नी तोंड बाहेर काढलं आणि तो उलट फिरला त्याचे तोंड आणि माझा हात काही centi meter चे अंतर.
समोर मरण दिसत होते
तितक्यात मित्र आला आणि माझ्या जीवात जीव आला

दवाखान्यात जावून फक्त भागत नाही
नक्की कोणता साप चावला आहे ह्यांची प्राथमिक माहिती तरी हवी.
प्रतेक सापाचे विष वेगवेगळा परिणाम करते.

हो ना. पण दवाखाना असतो चालत दोन तीन तासांवर काही गावांत.
असो. >>>>>
आता फोनच्या जमान्यात जखमेचा,सापाचा फोटो पाठवून समजून घेता येते विषारी की बिनविषारी ते. पण काही गोष्टींना ईलाज नसतो. दवाखाना जवळ नसेल तर.

बापरे
भारी अनुभव
तस्कर सापाचे हाल वाचून वाईट वाटलं.

मज्जा संस्थेवर सापाचे विष हल्ला करते.हे मी बघितले आहे माझ्या पुहुण्यात एकाला मण्यार चावला होता तेव्हा

लेखाच्या मध्ये फोटो कसे एड करावेत ते कळत नाहीये.
>>>
कॉम्प्युटर वापरत असाल तर सोपे आहे.
मोबाईल वापरत असाल तर ब्राऊसरवरून ओपन करा.
आणि फोटीची साईज छोटी करायची असेल तर मोबाईलवर स्क्रीनशॉट घेऊन क्रॉप करा.

मस्त किस्से आणि खूप छान माहीती. ती सुद्धा चटचट ज्ञान वाढवणारी. अजून वाचायला आवडेल. येऊ द्या Happy

छान लेख!
एकदा पाहुणे घरी आले असताना मी त्याना साप दाखवायला आणला,>>> बापरे! नको असलेल्या पाहुण्यांवर चांगला उपाय आहे. Happy

छान लेख. आणि अनुभवही दुर्मीळ.
मिपावर जॅक स्पॅरो अशा काहीशा नावाचे एक सर्पमित्र होते. तेही असेच वेगवेगळे किस्से लिहीत असत. त्यांची आठवण झाली.

ह्या सर्पमित्राला बोटाला नाग चावला होता. त्याने दंडावर दोरा घट्ट बांधून बोटाला ब्लेड चे काप मारून रक्त वाहू दिलं होतं व दवाखान्यात गेला होता.

दोरा ? दोरा शक्यतो पुडी बांधायला किंवा फुलांचे हार करायला वापरतात, सर्पदंश झाल्यावर जी आवळपट्टी ( इंग्रजीत Torniquet) बांधतात ती दोऱ्याची कशी बांधली जाईल ? तसेच, सर्पदंश झाल्यावर ब्लेडने चिरा मारून रक्त वाहू देणे अतिशय अवैज्ञानिक अन् जीवावर बेतणारे ठरू शकते, असे कधीही करू नये.

एकदा नागाचं चूंबन घेण्याचाही स्टंट केला होता.

हे नक्की सर्पमित्र का ? कारण आदर्श पद्धत ही की जमता जमल्यास साप विषारी असो व बिन विषारी तो टाँग्ज ने पकडुन पिशवीत टाकावा अन् त्यानंतर साक्षात ब्रह्मदेव जरी पिशवी उघडुन दाखव म्हणाले तरी दाखवू नये, साप जेर केलेली पिशवी दुसऱ्या वेळी उघडावी ती फक्त साप जंगलात मोकळा सोडताना असे आम्ही तरी शिकलो होतो बुआ !

हो जेम्स वांड, या दोन्ही गोष्टी जॅक डेनिअल यांनी त्यांच्या ऐका गारुड्याची गोष्ट लेख मालिकेत लिहिल्या होत्या, खूप छान मालिका होती ती--
http://www.misalpav.com/node/25733

हा लेख सुद्धा छान आहे

आदू, मी तरी अजून जॅक ह्यांची लेखमाला मिपावर वाचलेली नाही, जुनी असेल कदाचित....

माझे लेखन (ह्या प्रतिसादातील) बरेचसे माझ्या अनुभवांवर अवलंबून आहे Happy

अरे नाही जेम्स वांड ,,तुम्ही तिथलं वाचून इथे सांगताय असं मला म्हणायचं नव्हतं,लिहिण्यात काहीतरी गोंधळ झाला असेल कदाचित पण डॅनियल सुदधा सर्पमित्र आहेत आणि या गोष्टी त्यांनीही सांगितल्या आहेत असं म्हणायचं होतं

हे नक्की सर्पमित्र का ? कारण आदर्श पद्धत ही की जमता जमल्यास साप विषारी असो व बिन विषारी तो टाँग्ज ने पकडुन पिशवीत टाकावा अन् त्यानंतर साक्षात ब्रह्मदेव जरी पिशवी उघडुन दाखव म्हणाले तरी दाखवू नये, साप जेर केलेली पिशवी दुसऱ्या वेळी उघडावी ती फक्त साप जंगलात मोकळा सोडताना असे आम्ही तरी शिकलो होतो बुआ !
अशी आदर्श पध्दत वगैरे असते हे पहिल्यांदा एकतोय नी पोटधरून हसतोय. साप असलेली पिशवी डायरेक्ट साप सोडतांना ओपन करायची मग नवीन सर्पमित्र कसे तयार करायचे? डमी साप बाळगायचा की नागीन डान्स करनार्या माणसाला पकडून ट्रेनींग द्यायची? प्रदर्शन वगैरे असेल तर लोकांना आत साप असलेल्या पिशव्या दाखवायच्या का?? हे कोणत्या गुरूने शिकवले तुम्हाला? किती साप वगैरे पकडले आपण? साप पकडणे हे शेवेची/वांग्याची भाजी बनवण्याईतके सोपे नाही.

अशी आदर्श पध्दत वगैरे असते हे पहिल्यांदा एकतोय नी पोटधरून हसतोय.
हे सर्वसृत आहे. सापांबद्दल आस्था असणाऱ्यांना हे माहीत आहे. पुण्यातल्या कात्रज सर्पोध्यानात जे सर्पमित्र तयार होतात त्या सगळ्यांना Ethical Rescue चे ट्रेनिंग दिले जाते. लेखातील काही वाक्ये काहीच्या काही आहेत. नागाच्या डोक्याचा मुका घेण्याबद्दल कुठेही खेद जाणवला नाही.

हे सर्वसृत आ आपण कधी सर्पमित्र म्हणून काम केले असेल तर बोलावे.

पुण्यातल्या कात्रज सर्पोध्यानात जे सर्पमित्र तयार होतात त्या सगळ्यांना Ethical Rescue चे ट्रेनिंग दिले जाते.

प्रिसैजली, अण्णांनी दिलेले ज्ञान हे पुस्तकरूपात बद्ध आहे.

अज्ञानी सर, चुक दाखवल्या बद्दल धन्यवाद. खरं तर एक प्रतिसाद लिहीला होता नंतर त्याचा लेखच झाला. मग जास्त स्टडी न करता तसाच टाकला. हा लेख खरं तर सापांची माहीती देण्यापेक्षा साप पकडताना आलेले अनूभव टाकण्यासाठी होता. अणेक मोठमोठ्या सर्पमित्रांना सापांची माहीती देण्यासाठी लेख लिहीलेच आहेत त्यामुळे मी ते काय लिहीनार? शेवटचा साप पकडून तसेही १२ वर्षे झालीत. बदल करतो धन्यवाद.

Pages