सर्पानूभव.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 5 August, 2022 - 10:50

सर्पमित्र म्हणून काही दिवस केलेल्या कामाचे अनूभव.

माझ्या घराच्या बाजूला सर्पमित्र रहायचा. मी २००७ साली ९ वीत असताना त्याच्या सोबत साप पकडायला जायचो. कुठेही साप निघाला की त्याला फोन यायचे. मग तो आम्हा पोराटोरांना मदतनीस म्हणून न्यायचा. मी साप ओळखायला शिकलो. कुठला साप कोणत्या जातीचा मी पाहताक्षणी ओळखतो. साप जेवढा मोठा तेवढा पकडायला सोपा. पण लोकांत गैरसमज आहे की जेवढा मोठा साप तेवढा घातक. मी साधारणत: बिनविषारी साप सहज पकडतो. विषारी सापांना आजिबात हात लावत नाही, ऊगाच रिस्क नको. मागे तळजई टेकडी वर फिरायला गेलो तेव्हा सदू शिंदे मैदानात धामन हा बिनविषारी साप निघाला होता. लोकांचा गर्दी होती. मी पकडनार होतो पण बायकोने आरडाओरडा करेन म्हणून धमकी दिली, आमची चर्चा एकनार्या एका काकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला पण काकांचे प्रयत्न वाया गेले. शेवटी ओढत ताणत मला घरी आणण्यात आले.
साप ह्या प्राण्याला बुध्दी नसते, माणूस गाय, म्हैस असं त्याला काहीच समजत नाही. समोर वस्तू हलताना दिसली की तिचा चावा घ्यावा एवढंच त्याला कळतं. त्या सर्पमित्राबरोबर मी बराच फिरलो साप पकडल्यावर आम्ही पेट्रोल खर्च घ्यायचो. (फूकट समाजसेवा का करावी?)
ह्या सर्पमित्राला बोटाला नाग चावला होता. त्याने दंडावर दोरा घट्ट बांधून बोटाला ब्लेड चे काप मारून रक्त वाहू दिलं होतं व दवाखान्यात गेला होता. एकदा नागाचं चूंबन घेण्याचाही स्टंट केला होता. बाजूला ऊभ्या छायाचित्रकारांनी पटापट फोटो काढले. त्याची फ्रेम करून त्याने घरात टांगली. खुप हळूहळू फना काढलेल्या नागाच्या जवळ ओठ न्यायचे, श्वास घ्यायचा नाही तोपर्यंत श्वास सोडला नी नागाला सेन्स झालं की डसलाच. एक नाग डसलेला सर्पमित्र मला काही होत नाही म्हणून फूशारक्या मारत होता, नंतर चार तासात मेलेला मी पाहीलाय. पकडलेल्या सापांचे प्रदर्शनही आम्ही भरवायचो. कुठलं तरी कार्यालय बूक करून त्यात काचेच्या पेट्या ठेवायच्या त्यांच्या पुढे सापाचं नाव लिहायचं. मग शहरातील शाळात जाऊन पाच रूपये/दोन रूपये दराने तिकीट विकून त्या शाळेला ठरलेली तारीख द्यायचो.मग छोटीछोटी मूले यायची साप पहायला. नागा समोर तुफ्फान गर्दी व्हायची. बिचारा नागही दिवसभर फना काढून थकून जायचा मग बॅकप ला दुसरा नाग ठेवायचो. त्याला पेटीतून बाहेर काढून दुसरा ओतायचो. त्याना ऊंदीर वगैरे खायला व्यवस्था करावी लागायची. नाग पिशवीत पकडला असेल ना पिशवी बाहेरून त्याला टच केलं की फूस्स करतो.
विषारी साप हातपायाला चावला तर वाचायचे चान्स जास्त पण शरीराच्या ईतर भागाला चावला तर डाॅकरांचे प्रयत्न नी नशीब.
बिनविषारी प्रमाणे निम्न विषारी सापही असतात. पुर्वी मेलेला माणूस अचानक जिवंत झालेल्या घटना घडायच्या त्या
ह्याच प्रकारातून. निम्न विषारी सापाचे विष ऊतरेपर्यंत माणूस बेशूध्द होतो.
विषारी सापाच्या महाराष्ट्रात चार जाती आहेत. नाग, घोणस, मन्यार आणी फूरसे. सर्वात घातक घोणस. तो कुकरच्या शिटी प्रमाणे आवाज काढतो. मन्यार व फुरसे जास्तीत जास्त फूट सव्वा फूट असतात. फुरसेचं तोंड ईंग्रजीतील ”वी” आकाराचं असतं. मन्यार काळा व वर छोटेछोटे ठिपके असतात. घोणस व नाग बर्यापैकी मोठे असतात. घोणस पिवळा असतो. घोणस सारखाच दिसनारा पण बिनविषारी असलेला नी रंग वेगळा असलेला साप म्हणज डूरक्या घोणस. आवाज सारखाच. एकदा डूरक्या घोणस पकडायला गेलो तो एका खळग्यात शिरला ओढून बाहेर काढायला लागलो तर त्याचा अर्धा तूकडाच बाहेर आला. फार वाईट वाटलं होतं.
धामण हा साधारण बराच मोठी नी जास्त आढळनारा साप. हातातून सुटण्यासाठी तो स्वतभोवती ३६० अंशात फिरतो. मांडूळ हा बिनविषारी साप गुप्तधनासाठी फेमस आहे. ह्याची शेपटी नी तोंड सारखं असल्याने शेपटी वर नकली डोळे लावून दुतोंड्या म्हणून भोंदूबाबा लोकांकडून पैसे ऊकळतात. तस्कर हा सर्वात गरीब बिनविषारी साप, काही केल्या चावत नाही खुप त्रास झाला तरच चावतो. सर्वात जास्त तस्करी केला जानारा साप म्हणून ह्याचं नाव तस्कर असावं असं मला वाटतं. चमकती कातडी कमावन्यासाठी ह्याचा वापर केला जातो. डोक्यात खिळा ठोकून झाडाला अडकवतात नी पोटावर ऊभा चिरा मारून आतलं सर्व काढतात, सूकल्यानंतर कातडी कमावतात ह्याच्या पासून. त्याच्या नंतरचा गरीब साप गवत्या. गवता सारखा हिरवा नी चावायचा कंटाळा हे त्याचं वैशिष्ट्य. मांजर्या हा निम्न विषारी साप त्याचे जोळे मांजरी सारखे म्हणून त्याच नाव हे. कुकरी छोटासा मस्त साप. फार दुर्मीळ. साप निघाल्याचा काॅल आल्यावर माझ्या सर्पमित्र गुरूने मला एकटं जाऊन साप पकडायची मोहीम सोपवली. ही माझी पहीली साईट विसीट, तीचा श्रिगणेशा हा साप पकडून मी केला. पहीलाच साप दुर्मीळ पकडून आणला म्हणून माझी वाहवा झाली. मी अनेक बिनविषारी साप पकडले. पण चावू एकाला ही दिला नाही. चावला तरी काही होत नाही म्हणा. पण तो सापाचा मित्रच कसा? ज्याला साप चावला? असं माझं मत. साप चावला तर टीटी चं ईंजेक्शन घ्यावं लागतं.
साप दिसला तर कधीही मारू नये. कारण ऊंदीर खाऊन हा आपल्यावर उपकारच करत असतो. “मारू नये सर्पा संताचीया दृष्टी, होतील ते कष्टी अनंतपणे.” असं संतं तुकाराम सांगून गेलेत. एक ऊंदीर खाल्ला की साधारण दीड दोन महीणे सापाला काही लागत नाही. ऊंदीर किंवा काहीही खाल्लेला साप पकडला तर तो ऊलटी करतो. सापाने काही खाल्ल असेल तर त्याचं पोट फूगीर दिसतं ज्या भागात साप आहे तिथे.
अजगर ही सापाच जात सर्वानाच माहीत असेल. विदेशात लोक अजगर पाळतात. सापातील सर्वात मोठा प्रकार, भक्षाला पकडून त्याच्या भोवती फेरा मारून त्याचा श्वास बंद करून मग त्याला खातो.
दिवड हा पाण्यात आढळनारा साप, ह्याने चावलं तर लचकाच तोडतो असा समज आहे. पण हा साप लवकर चावत नाही. ह्याला पकडायची एक टेक्नीक असते, खिडकीतून माणूस जसा मान बाहेर काढून असतो तसा हा साप पाण्यातून डोकं बाहेर काढून असतो. मागून दोन बोटं नेऊन बरोबर त्याची मान पकडायची व बाहेर काढायचे. आम्ही साप पकडायला जायचो तेव्हा साप जागेवर नसायचा कुणीतरी कुठेतरी पाहीलेला असायचा मग आम्ही येईपर्यंत साप निघून गेलेला असायचा. तिथे बिळं असतील तर सर्व बिळं पाण्याने भरावे लागायचे. साप पाण्यात थांबत नाही लगेच बाहेर येतो. पावसाळ्यात पहील्या पावसानंतर बाहेर जास्त साप दिसतात ते ह्यामुळेच. लोकांना वाटतं बेडूक खायला साप बाहेर पडलाय. एकदा असेच बिळं पाण्याने भरत होतो सर्व बिळं भरून झाली तरी साप बाहेर आला नाही. हातातून पाईप सूटला नी पायाजवळ पडला नेमका तीथेच बिळात साप होता पाणी लागता बरोबर सळसळ करत बाहेर आला, नाग होता.
एकदा एका ठीकाणी रोज साप निघायचा. तीन दिवस रोज जाऊन पकडला, नागाची पिल्ले होती. मग लक्षात आलं का आजूबाजूलाच कुठेतरी नागाने अंडी घातलीत. थोडी अडगळ बाजूला केली आणी तीथे बाजूलाच अंडी सापडली.
कवड्या हा पण एक छोटा बिनविषारी साप. ऊभी (सपाट नसलेली) भिंत हा चढून जातो.
एकदा पाहुणे घरी आले असताना मी त्याना साप दाखवायला आणला, पण भयानक पळापळ झाली. ईतकी की साप ही बिथरला असेल, तेव्हा लक्षात आलं की साप नाव एकलं तरी लोक घाबरतात. आपण जसं सापांना कुत्रा मांजर हाताळावं तसं हाताळतो तसं ईतर लोक करत नाहीत. नंतर ते पाहुणे पुन्हा कधीही आमच्या घरी आले नाहीत.
साप पकडायला गेलो की लोक खुप आदर द्यायचे. साप पकडन्या आधी कुठला मंत्र म्हणतात म्हणून विचारायचे. घरात साप येऊ नये म्हणून काय करावे? हे पण विचारायचा. साप चावला तर कुठलाही अघोरी ऊपाय न करता सरळ दवाखाना गाठायचा. सापाच्या चावल्याच्या निशानावरून डाॅक्टर ओळखतात की बिनविषारी चावलाय की विषारी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख खरं तर सापांची माहीती देण्यापेक्षा साप पकडताना आलेले अनूभव टाकण्यासाठी होता. >> ओके

उद्देश नक्कीच छान होता पण काही बेसिक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याने लिखाण थोडं मजेशीर झालंय ते योग्य ते बदल करून पुन्हा प्रकाशित केले तर नक्कीच एक छान मार्गदर्शक लेख म्हणून मायबोली वाचन संग्रहात राहु शकतो.

आवश्यक वाटणारे मुद्दे म्हणजे -

१) बिन विषारी आणि विषारी लांबुन (सुरक्षित अंतर राखून) कसे ओळखावे. चावा कसा आहे, हे साप चावल्यावर त्या व्रणाचे निरीक्षण करण्या इतपत दंश झालेल्या माणसाला भयभीत झाल्यावर धीर नक्कीच नसणार.

२) सापाची लांबी हा मुद्दा मुळातच गैरलागु होतो कारण विषारी साप छोटा असला तरी विषारीच आणि प्राणघातक असतो. त्यामुळे एक सारखे दिसणारे आणि विषारी आहे असा गैरसमज झाल्याने मारल्या जाणाऱ्या बिनविषारी सापांची थोड़ी विस्तृत माहिती त्याना पकड़तानाच्या अनुभवा साहित / सापाच्या बचावात्मक/आक्रमक पवित्र्याच्या वर्णनासह ह्या लेखात आली तर इतराना सावधगिरी नक्की काय बाळगावी ह्याचा बोध होईल.

३) कात नुकताच टाकून तुकतुकित झालेला साप पकड़ताना काही विशेष फरक आढळला असल्यास त्याची नोंद हवी तसेच काही कोब्रा सारखे मोठे साप फुत्कारात विष सोडतात तेव्हा त्याचा अनुभव असल्यास वाचायला आवडले असते.

४) सर्प मित्र म्हणून काम करताना अनेक जणांचे साप चावून झालेले मृत्यु जवळून पाहण्यात आहे तर नक्की काय चुका घडल्या त्याच्या बद्दल लेखामध्ये स्पष्ट लिहिले तर उगीच अनावश्यक चालणाऱ्या स्टंट बाजीला आळा बसेल.

५) एवढी मोठी किनारपट्टी लाभलेल्या देशात समुद्र सापाबद्दल प्रत्यक्ष पकडण्याचा अनुभव नसला तरी ओझरता का होईना उल्लेख असायला पाहिजे होता.

अशी आदर्श पध्दत वगैरे असते हे पहिल्यांदा एकतोय नी पोटधरून हसतोय.

नक्कीच, अज्ञानात सुख असतं म्हणतात ते उगीच नाही.

साप असलेली पिशवी डायरेक्ट साप सोडतांना ओपन करायची मग नवीन सर्पमित्र कसे तयार करायचे? डमी साप बाळगायचा की नागीन डान्स करनार्या माणसाला पकडून ट्रेनींग द्यायची? प्रदर्शन वगैरे असेल तर लोकांना आत साप असलेल्या पिशव्या दाखवायच्या का??

बेसिक में लोच्या हैं जी, सर्पमित्र साप पकडतो ते सापांचे रक्षण व्हावे अन त्यांच्यापासून सामान्य लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून, सापांवर लोकांचे प्रबोधन करायला हरकत नसते पण त्यासाठी दरवेळी परिस्थिती असेल नसेल त्या अनुरूप लाईव्ह साप वापरले पाहिजेतच असे काही नसते. बाकी ते नागीण डान्स करणारा माणूस वगैरे विनोदनिर्मिती करण्याचा क्षीण प्रयत्न असल्यास फसलेला आहे.

हे कोणत्या गुरूने शिकवले तुम्हाला? किती साप वगैरे पकडले आपण?

असेल बुआ एखादी नवीन पद्धत म्हणून ती आत्मसात करण्याचे सोडून वैयक्तिक होऊ लागलाय तुम्ही, ह्याचा अर्थ अजून पोच अन् परिपक्वता हवी आहे. उद्धटपणे बोलणे अन् स्पष्ट बोलणे ह्यात भरपूर अंतर असते, ते आपणांस कळेल तो सुदिन असे वाटत असे, पण आता ते आपणांस कधीच कळणार नाही असे वाटू लागले आहे, टीपिकल २५ लवकर सरो तुमची, आपण बघितलेले जगच खरे बाकी आलम दुनिया गाढव ह्या गैरसमजातून लवकर बाहेर येण्यासाठी आपणांस शुभेच्छा.

बाकी आमचे गुरू अन् आमचे पुस्तक खालीलप्रमाणे...
images (19).jpeg

तुम्ही त्यांचाही आदर वगैरे राखू शकाल असे वाटत नाही, वि वा शिरवाडकर म्हणजे "कोणीही उठून आलेला" तुम्ही म्हणल्याचे आमच्या चांगलेच लक्षात आहे, त्यामुळे अपेक्षा नाहीत खास.

साप पकडणे हे शेवेची/वांग्याची भाजी बनवण्याईतके सोपे नाही.

नक्कीच, पण तुम्हाला तर त्या भाज्याही येत नाहीत अन् लेख लिहिताय तुम्ही साप पकडण्यावर लोल! कुठलासा भात करून काहीतरी भयानक बनवले होते न तुम्ही म्हणे ? लवकर मोठे व्हा, तोवर शुभेच्छा.

ता. क. - जमता जमल्यास साप विषारी असो व बिन विषारी तो टाँग्ज ने पकडुन पिशवीत टाकावा

हे मी लिहिलेले वाक्य वाचलेच नाहीत का सतत भांडणे करण्याच्या खुमखुमीतून आता सिलेक्टिव रीडिंग पण सुरू केलेत म्हणायचे ते कळेना झालं आहे तुम्ही.

सर्पदंशामध्ये पायावरील दंशाचे प्रमाण अधिक असून हातावर दंशाचे प्रमाण कमी आहे. मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीवर दंश झाला व पुरेसे विष गेले तर अशी व्यक्ती २-३ मिनिटांत मरण पावते. फुरशाचे विष रक्ताभिसरण तंत्रात मिसळले, तर ती व्यक्ती चटकन मरण पावते. बिनविषारी सापाच्या चाव्यामुळे मानसिक धक्का व ताण यांमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. विषारी सापाला घाईगडबडीमुळे वा चावा घेताना अंदाज चुकल्याने पुरेसे विष टोचणे शक्य होत नाही. व्यक्तीला विषबाधा झाल्यास पुढील लक्षणे दिसतात.
मराठी विश्वकोश मधून कॉपी पेस्ट

नाग : (१) दंशाच्या जागी सहा ते आठ मिनिटांत तांबूस पुरळ दिसू लागते आणि त्या जागी खाज सुटते व वेदनांची जळजळ सुरू होते. (२) सुमारे २५ मिनिटांनी रोग्यास झोप आल्यासारखे वाटते गुंगी येऊ लागते त्याला हालचाल करण्याची अगर चालण्याची इच्छा राहत नाही. (३) दंशानंतर ३५–५० मिनिटांनी तोंडातून लाळ बाहेर पडते ओकाऱ्या सुरू होतात शरीर जड होते जीभ व घसा सुजतो, त्यामुळे बोलता येत नाही व अन्न खाता येत नाही. (४) सुमारे दोन तासांनी अर्धांगवायूची बाधा होते श्वसनक्रिया मंद होत जाते हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. रुग्ण शुद्घीवर असला, तरी तो बोलू शकत नाही. (५) श्वसनक्रिया आकडी येऊन थांबते व त्यापाठोपाठ हृदयक्रिया बंद पडते.

मण्यार : (१) दंशाच्या जागी तांबूस पुरळ उमटते परंतु त्या जागी सूज किंवा जळजळणाऱ्या वेदना होत नाहीत. (२) आकडीचे झटके सौम्य असतात सुस्ती व गुंगी तीव्र स्वरूपाची असते. (३) रुग्णाच्या मूत्रामध्ये पांढरी खर (श्वतक) सापडते. (४) सुमारे सहा तासानंतर पोटात व सांध्यांना अतिशय वेदना होतात.

घोणस व फुरसे : (१) दंशाच्या जागी सु. आठ मिनिटांत तीव्र वेदना व जळजळ जाणवू लागते. दंशाभोवतालची जागा सुजून लाल व दुखरी होते (२) सुमारे पंधरा मिनिटांच्या आत सूज वाढू लागते जखमेतून रक्त व दूषित स्राव वाहू लागतो. (३) तीव्र वेदना सुरू होतात अंगावर काटा उभा राहतो ओकाऱ्या येतात घाम सुटतो डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात व त्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत. (४) एक-दोन तासांत रुग्णाची शुद्घ हरपते. (५)जखमेतून पुरेसे रक्त वाहून गेल्यावर जखमेच्या जागी सूज येते ती जवळच्या भागात पसरते जखमेच्या जागी पू होतो व त्वचा कुजू लागते. (६) आतड्यातून व दातांच्या हिरड्यांतून रक्त वाहू लागते.
मराठी विश्वकोश मधून कॉपी पेस्ट

हेमंत ३३,

अगदी बरोबर निरीक्षण आहे, म्हणून जीव वाचविण्याच्या निकराच्या प्रयत्नांसाठी torniquet हे उत्तमच हवे, करकचून बांधण्यासाठी, दोरा वगैरे चालत नसतो तिथे Wink

साप किती विषारी अस्तात हे वरील माहिती वरून माहीत पडत आहे.
नागा चा एक योग्य चावा दोन तीन मिनिटात माणसाला मृत्यू चे दर्शन घडवतो.
उपचार करण्यास पण वेळ मिळत नाही.

घोणस आणि फुरसे चावले तर उशिरा मरण येते पण माणूस सडून मरतो

पुस्तके वाचून फक्त भाज्या बनवता येतात साप पकडता येत नाही, ईतकंच वांड यांना सांगू शकेन.
हेमंत सर खुप माहीतीपुर्ण प्रतिसाद देत आहात तुम्ही.

नागा चा एक योग्य चावा दोन तीन मिनिटात माणसाला मृत्यू चे दर्शन घडवतो.
मला वाटते ही माहिती चुकीची आहे. मृत्यू यायला 20 मिनिट ते अर्धा तास लागू शकतो. अर्थात सापाच्या आणि सावजाच्या प्रकृतीवर पण अवलंबून आहे.
अगदी जगातला सर्वात विषारी साप इनलँड टायपान चावला तरी २० मिनिटाच्या आत कोणी मरत नाही.

पुस्तके वाचून फक्त भाज्या बनवता येतात साप पकडता येत नाही. ईतकंच वांड यांना सांगू शकेन.

बरं, घ्या मग नागाचे मुके आनंदभरे, आम्हाला काय, फक्त तुमचे दिव्य hands on ऐकून कोणीतरी प्रॉब्लेम मध्ये सापडू नये इतक्या सदिच्छा आमच्या, इतरांसाठी हो तुमच्यासाठी नाही, तुम्ही सर्वज्ञानी समजत रहा स्वतःला.

बाकी,
साप पकडून पण साप पकडण्यावरची पुस्तके वाचली जाऊ शकतात, त्यातून आपली टेक्निक सुधारली जाऊ शकते.

अर्थात शेलकंच बोलायचं असेल तर कशावरही कधीही बोलता येतं, आता मेरे मुर्गे की एक ही टांग ठरवूनच बोलणाऱ्या अमरेंद्र बाहुबलींना काहीच सांगण्यात अर्थ नाही इतके मी पण सांगू शकेन. Happy

पंचविशीच्या वयाला एक स्पेशल पंचविशी म्हणलं जातं ते आज पटलं.

हेमाशेपो

आवश्यक वाटणारे मुद्दे म्हणजे -
१) बिन विषारी आणि विषारी लांबुन (सुरक्षित अंतर राखून) कसे ओळखावे. >>>>
हे चांगला अनूभवी सर्पमित्रच ओळखू शकतो, नवीन व्यक्तिने हे धाडस करूच नये. जास्तीत जास्त फोटो घेऊन सर्पमित्राला वाट्सअप करावा.

चावा कसा आहे, हे साप चावल्यावर त्या व्रणाचे निरीक्षण करण्या इतपत दंश झालेल्या माणसाला भयभीत झाल्यावर धीर नक्कीच नसणार.>>>

नक्कीच. हे काम त्याच्यासोबत असनार्या ईतरांचे.

२) सापाची लांबी हा मुद्दा मुळातच गैरलागु होतो कारण विषारी साप छोटा असला तरी विषारीच आणि प्राणघातक असतो. त्यामुळे एक सारखे दिसणारे आणि विषारी आहे असा गैरसमज झाल्याने मारल्या जाणाऱ्या बिनविषारी सापांची थोड़ी विस्तृत माहिती त्याना पकड़तानाच्या अनुभवा साहित / सापाच्या बचावात्मक/आक्रमक पवित्र्याच्या वर्णनासह ह्या लेखात आली तर इतराना सावधगिरी नक्की काय बाळगावी ह्याचा बोध होईल. >>>

नीट समजले नाही. ज्याना सापाबद्दल काहीच माहीती नसते असे लोक साप मारन्यालाच प्राधान्य देतात.

३) कात नुकताच टाकून तुकतुकित झालेला साप पकड़ताना काही विशेष फरक आढळला असल्यास त्याची नोंद हवी >>>>
सापाने लगेच कात टाकलीय की नाही हे ओळखू येत नाही. टाकली ही असेल तर त्याच्या हालचालीत काही विशेष फरक नसतो. कात टाकन्यावर आलेला साप मात्र ओळखू येतो.

तसेच काही कोब्रा सारखे मोठे साप फुत्कारात विष सोडतात तेव्हा त्याचा अनुभव असल्यास वाचायला आवडले असते. >>>

फना काढलेला नाग पाहणे हा खरंच मस्त अनूभव असतो पण नेहमी पाहून त्याबद्दल काही वाटत नाही. अनेक सर्पमित्र नाहाला फना न काढू देतात पकडतात, कारण फना काढलाय म्हणजे त्याला धोका जाणवलाय.
कोब्रा\नागाला धोका जाणवला की तो फना काढतो. मोठमोठ्याने श्वासोच्छवास करू लागतो व जवळ काही आलं तर डसतो नी विष सोडतो.

४) सर्प मित्र म्हणून काम करताना अनेक जणांचे साप चावून झालेले मृत्यु जवळून पाहण्यात आहे तर नक्की काय चुका घडल्या त्याच्या बद्दल लेखामध्ये स्पष्ट लिहिले तर उगीच अनावश्यक चालणाऱ्या स्टंट बाजीला आळा बसेल. >>>
पहीली गोष्ट म्हणजे ओवर कोन्फिडंस, साप ईतका चपळ असतो की पापणी लवायच्या आत त्याने चावा घेतलेला असतो, साप पकडण्याचे कसब म्हणजे त्याला धोका आहे असं जाणवू न देता पकडणे, साप तुमच्या हातात असेल तरी त्याला आपण झाडाच्या फांदीवर आहोत असे वाटायला हवे. सापाल घट्ट धरून चालत नाही. त्याच्या हालचालीला वाव द्यावा लागतो. खरं तर आपण सापाला नाही तर साप आपल्याला हाताळत असतो. त्याला धरूनही सैलसर सोडलेलं असावं लागतं. काही लोक ह्यात चूकतात, बिनविषारी असेल तर काही नाही. पण विषारी साप असेल तर जिवानीशी जातात. खरा सर्पमित्र विषारी सापांना हात न लावता पकडतो, पण आजूबाजूला जमलेल्या गर्दीला ईंप्रेस करन्याचा मोह अनेकांना आलरत नाही नी मग…..मी सराईत लेखक नसल्याने ह्या गोष्टी मिसल्या असतील.
५) एवढी मोठी किनारपट्टी लाभलेल्या देशात समुद्र सापाबद्दल प्रत्यक्ष पकडण्याचा अनुभव नसला तरी ओझरता का होईना उल्लेख असायला पाहिजे होता.>>> सदर लेख हा माझ्या मर्यादीत अनूभवाभोवती केंद्रीत आहे, त्यात सापांची माहीती देण्याचा आजिबात प्रयत्न नाही.

ह्या धाग्यावर वांड ह्या आयडीचे प्रतिसाद न येण्यासाठी काही सोय आहे का??

नाही, काहीच सोय नाही Lol Lol

पण टेंशन घेऊ नका हेमाशेपो म्हणजेच

हे माझे शेवटचे पोस्ट (ह्या धाग्यावरील)

त्यामुळे आता सुखाने फेकफाक करा, धागा तुमचाच आहे, अन् उद्धटपणा पण

गोड्या पाण्यातील साप विषारी नसतात समुद्रातील विषारी असतात.
असे पण साप त्यांचे निवास स्थान बदलू शकतात.
जमिनीवर राहणार साप पाण्यात पण असू शकतो.
पाण्यातील साप जमिनीवर पण येवू शकतो.
सर्व च साप पाण्यात पोहतात.
असे वाचनात आले आहे.
विषारी साप ला दोन सुळे वाकडे दात असतात.
बिन विषारी सापला ते नसतात.
जिथे साप चावला आहे तिथे सुळे दातांनी झालेली जखम दिसते ती खोल असते.

भाज्या बनवन्या पलिकडे काहीही माहीती नसेलेले लोक प्रत्यक्ष अनूभवाला फेकाफेकी म्हणत असतील तर कठीण आहे, कोबीवरच्या अळ्या साफ करन्यापलीकडे कुठल्याही सरपटनार्या प्राण्याशी संबंध न आलेले वांडं सापांवरील अनूभवाला फेकाफेकी म्हणताहेत ह्यासारखा दुसरा विनोद नाही. हे तेच लोक असतात जे रूम मध्ये पाल आलीतरी बीपी वाढवून बसतात ना सोमी वर वाघ बनून फिरतात. सापांवरील पुस्तके वाचून साप पकडण्याच्या अनूभवाबद्दल बोलणे म्हणजे बेअर ग्रिल्स चा कार्यक्रम पाहून जंगलात कच्चे मांस खाण्यावर ऊपदेश देण्यासारखे आहे. टर्किश अंड्या नंतर आणखी कुठलं नवीन अंडं देतात ते पाहुयात.

गोड्या पाण्यातील साप विषारी नसतात समुद्रातील विषारी असतात.
असे पण साप त्यांचे निवास स्थान बदलू शकतात.
जमिनीवर राहणार साप पाण्यात पण असू शकतो.
पाण्यातील साप जमिनीवर पण येवू शकतो.
सर्व च साप पाण्यात पोहतात.
असे वाचनात आले आहे.
विषारी साप ला दोन सुळे वाकडे दात असतात.
बिन विषारी सापला ते नसतात.
जिथे साप चावला आहे तिथे सुळे दातांनी झालेली जखम दिसते ती खोल असते.

साप पोहू शकतात, पण सर्वच साप पाण्याखाली राहू शकत नाहीत. ह्या बाबतीत अनेक सर्पतज्ञांनी लिहून ठेवलंय. सर्पमित्र नी सर्पतज्ञ ह्यात फरक असतो.

Pages