चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीने तमिळ भाषेतली वेबसाईट काढली तर इतर भाषिक चित्रपटांबद्दल एकही प्रतिसाद सहन करणार नाहीत तिथले लोक. इथे लोक जसे सर्व भाषांचे कौतुक करतात, आस्वाद घेतात तसे तिथले लोक नाहीत. कर्नाटकात जरा सौम्य आहे. बंगळूरू वरून सांगतो. इतर ठिकाणचे माहिती नाही.

तमिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये साधर्म्य आहे का? अनेक जण या तिन्ही भाषक सिनेमांत कामं करतात . तसंच प्रत्येक भाषे तल्या चित्रपटाला इतर दोन राज्यांतले प्रेक्षकही मिळतच असतील. कावेरीच्या पाण्याचा वाद उफाळला की तामिळनाडू - कर्नाटकात एकमेकांच्या चित्र पटांवर बहिष्काराच्या बातम्या येतात. तसं मराठी चित्रपटांचं होऊ शकत नाही.

दक्षिण भारतात नटनट्यांची देवळं बांधतात. नट मेले तर लोक आत्महत्या करतात. तामिळ नाडू, आंध्रमध्ये अभिनेत्यांच्या नावावर अख्खे राजकीय पक्ष उभे राहिले, तरले. ते मुख्यमंत्री झाले. मग त्यांचे चित्रपट कसेही असले तरी बघत असतील यात नवल काय?
ते फिल्म कल्चर महाराष्ट्रात नाही हे बरंय.

सैराटसारखे १५-२० म्हणजे त्या कथेसारखी कथा सांगणारे का? सैराटचं वेगळेपण फक्त कथेपुरतं होतं का?

सैराट ची जादू कथा लोकांपर्यंत पोहोचण्याआधीही अजय अतुल च्या गाण्यांची, वेड लागलं मधल्या हॉलिवूड ऑर्केस्ट्रा च्या सुंदर कमालीची होती.कथा, कथेतल्या जागा लोकांना नंतर दिसल्या.

सैराट हा काही एकमेवाद्वितीय सिनेमा नाही. >> +१. पण असे कुणी म्हटलेय का ? ( संपूर्ण जगात एकमेवद्वितीय असा कुठला सिनेमा असेल का ?) .
मराठी सिनेमाबाल्यांची घरं चालवायचीत >>> या अर्थाचा कोणता प्रतिसाद आहे वर हे कळेल का ?

आपल्या इथे हीच तर सहीष्णुता आहे. इथे मराठी सिनेमाबाल्यांची घरं चालवायचीत असा कुणीही प्रतिसाद दिलेला नसतानाही तसा विपर्यास करण्याचेही स्वातंत्र्य आहे. मी अनु यांनी मराठी सिनेमा कसा चालेल हा प्रश्न विचारला त्याचे उत्तर मी दिले. यात मराठी सिनेमावाल्यांची घरं आपल्याला चालवली पाहीजेत असा अर्थ कुठून, कसा काढला हे काही समजले नाही. असो, मराठी असून मराठी सिनेमावर टीका करू शकता, इतर लोक ती स्विकारतात हेच कल्चर आहे आपल्याकडे. आणि हेच मराठी सिनेमे न चालण्याचे कारण पण... मराठी सिनेमे का चालत नाहीत याचे आत्मपरीक्षण करा असे सल्ले दिले तर त्याचे आत्मपरीक्षण आहे ते.

त्या काकू जे साउथ सिनेमे बघतात ती लिस्ट बघुनच मला धडकी भरते. दीज आर जस्ट अ‍ॅवरेज मुव्हीज यु कांट रिअली सिट थ्रू. जनतेची एक करमणुकीची गरज भागते म्हणजे क्लासिक सिनेमे नाहीत हो हे. साउथ कल्चर मराठी सिनेमात नाही हे बरं आहे ना. हे केले पाहिजे ते केलेपाहिजे अश्या मदरहुड स्टेट मेंट ने काहीच अचीव्ह होत नाही.

काल अ‍ॅपल टीव्ही वर स्पील बर्ग ने दिग्दर्शित वेस्ट साइ ड स्टोरी बघितला. छान बनवला आहे. संगीतिका आहे.

माझे 2 पैसे.
मराठीत उत्तम चित्रपट काढला तरी तो चालेल ह्याची गॅरंटी नसते.
उदा. नदी वहाते हा चित्रपट मला आशयघन वाटला, मी जिथे शक्य तिथे लोकांना पाहा म्हणून सांगितले.
पण म्हणून जनरल पब्लिक ने पाहिला का तितक्या प्रमाणात?

गोलमाल सिरीज सारखे वाह्यात चित्रपट लोकांना हिंदीत आवडतात, ते तुफान चालतात, पण तसाच मराठी सिनेमा मात्र १० मिनिटात बंद करावासा वाटतो.

दक्षिणेत ले पुष्पा आणि तत्सम चालणारे चित्रपट भारी आहेत अस खरंच वाटत का कंपरिझन करणार्यांना? का चालतात म्हणून ते भारी आहेत?

बर आपण पैसे खर्च करून उत्तम चित्रपट काढला आणि तो नाही चालला तर ते गणित कसे परवडणार?
मग कोण पैसा घालणार? मग बेसिक बजेट च जर लाखात असेल तर कुठे खर्च करायचे ह्यावर लिमिट येणार.
नट नट्या माहीत नसलेल्या घेतल्या तर पुन्हा लोक येणा र नाहीत, मग तिथे पैसा खर्च केला तर बाकी ठिकाणी काटछाट! मग उत्तम स्टोरी असेल तरी दिग्दर्शक, प्रेझेंटेशन अशा ठिकाणी मार. खावा लागणार! (हे उदाहरण आहे).

सिद्धार्थ जाधव हा हिरो असन्यावर आक्षेप असणाऱ्यांना साऊ थ चां सुमार नट चालणार कारण सगळं चकचकीत दिसतंय आणि 10 लोक बघताहेत तर चांगलं असणार!

मागे एका सिरीयल मध्ये एक हिरोईन स्मार्ट आणि दुष्ट सासरच्या ना धडा शिकवणारी दाखवली तर सिरीयल चालली नाही, मग हळूहळू सासरचे वरचढ झाले तर चालू लागली, तर maximum प्रेक्षकांची आवड बघूनच ह्या गोष्टी कराव्या लागतात.
(अर्थात झेपत नसेल तर न बघण्याचा ऑप्शन आपल्याकडे पण आहेच, जस मी सिरीयल बघूच शकत नाही, तर पास देते).

पण हे सगळं दुष्टचक्र आहे.

बाकी अमांच्या पोस्टला मम!

चाहत्यांमुळे सिनेमे हिट होत नाहीत.. सिनेमात दम असावा लागतो.
@वावे, सैराटच्या शेवटापेक्षाही भयानक ट्रैजिडी क्लायमॅक्स वाले सिनेमे आहेत असं म्हणायचं होतं मला.

बॉलिवुड इज ओव्हर... सुमार नेपो किड्स, किंवा मग वयस्क पण तरीही डिनायल मधे असलेले लीड हिरोज अन त्यांचे आउटडेटेड सुमार सिनेमे पटले पण ओव्हर नाही. कोणी नवे येउन चांगला सिनेमा बनवत नाही तो वर हेच चालणार.

लालसिंग (आमिरखान), ब्रम्हास्त्र (रणवीरकपूर), पठाण (शा.खा.) केव्हा येतात व फ्लॉप होतात याची वाट पहात आहे. पठाण फ्लॉप झाला तर माझ्या सारखा आनंदी कोणी नसेल.

बाकी सिद्धार्थ जाधव आवडायचा नाही तितका पण त्याची धुरळा मधली अ‍ॅक्टींग पाहिल्यावर त्याच्याविषयीचे मत बदलले.

पठाण फ्लॉप झाला तर माझ्या सारखा आनंदी कोणी नसेल.
पठाण यायच्या आधीच आणि कथानक माहीत नसताना पण फ्लॉप व्हावा असे का वाटते बरं तुम्हाला?

सैराटच्या शेवटापेक्षाही भयानक ट्रैजिडी क्लायमॅक्स वाले सिनेमे आहेत असं म्हणायचं होतं मला. >>
ओह! माझा गैरसमज झाला. म्हणजे व्हिज्युअली भयानक की ट्रॅजेडी म्हणून भयानक?

ऋ सरांची माफी मागून इथल्या अवांतर चर्चेत माझे अमूल्य योगदान देतो.

अमिताभ बच्चन सरांना आपण आज ग्रेट म्हणतो. पण त्यांचे चारच क्लासिक कल्ट मूवीज आले होते. ते एकाच वर्षी रिलीज झाले होते. त्यातून ते सुपरस्टार झाले. माझ्या धाकट्या गफ्रेची चावट आज्जी म्हणायची कि आम्हाला फक्त अमिताभ बच्चन डोळ्यापुढे पाहीजे असायचा. मग स्टोरी काय पण असो. तिचा चावट मामा पण म्हणायचा कि अमिताभ बच्चनच्या पिक्चरला नावं ठेवली कि आम्ही मुलं जाम भडकायचो. कारण ते एंटरटेनिंग असायचे. मग आम्ही मोठे झालो....
अमिताभ बच्चनचे पिक्चर जसे एकाच वर्षी हिट होऊन सुपरस्टार झाले ते, तसेच एकाच वर्षी गंगा जमना सरस्वती, तुफान , जादूगर , अजूबा असले पिक्चर आले आणि अमिताभ हिरो से झिरो झाले.
आपल्याला कळत नसतं तेव्हां किंवा हिरो किंवा डायरेक्टर किंवा मुझिक डायरेक्टर यांचे फॅन असतो तेव्हां आपण त्याच्यासाठी पिक्चर बघत असतो. पिक्चर हिट पण होतात.
प्यार भुकता नही नावाचा पिक्चर खूप हिट होता आमच्या काळी असे मला नेहमी ऐकायला लागायचे म्हणून बघितला. कसला बेक्कार पिक्चर. गाणी बरी आहेत. पण शब्बीरकुमारचा आवाज ऐकवत नाही.
इन शॉर्ट्स , पीक्चर हिट म्हणजे चांगला असा नियम नाही. आपल्या उत्कलनबिंदूवर आहे सगळं.

दक्षिणेत ले पुष्पा आणि तत्सम चालणारे चित्रपट भारी आहेत अस खरंच वाटत का कंपरिझन करणार्यांना? का चालतात म्हणून ते भारी आहेत? >>> माहीत नाही पण पुष्पा, केजीएफ आणि आर आर आर हे अमर अकबर अ‍ॅंथनी कॅटेगरीतील पिक्चर्स आहेत. पण अ अ अ‍ॅ १९७७ साली चालला. लॉजिक नसलेले (पण तेव्हाच्या दृष्टीने नॉव्हेल) कथानक, १९७७ च्या मानाने चकाचक सीन्स व पडद्यावर काहीही पुल ऑफ करू शकणारा/शकणारे हीरोज हा त्याचा युएसपी होता. आता नव्याने तसाच लॉजिकविरहित पिक्चर कोणी काढला, त्यात स्वॅगर वाले हीरो घेतले, चकाचक सीन्स घेतले तर बॉलीवूड मधे चालणार नाही. पण हे चालले. तो एक्स फॅक्टर नक्की काय आहे माहीत नाही. पण साउथ मधे असे पिक्चर वारंवार निघतात आणि चालतात हे मात्र खरे.

मराठीला इतके दिवस फक्त हिंदीशी स्पर्धा होती. आता साउथशीही आहे. आता महाराष्ट्रात असंख्य फॅन बेस आहे, जो या लोकांशी (अल्लू अर्जुन ई) रिलेट करतो. कदाचित नोकरी वगैरे करता साउथ राहणे व त्यातून स्थानिकांच्या नेहमीच असलेल्या उत्साही प्रमोशन मधून या सृष्टीशी ओळख होणे यातून हे झाले असावे Happy रितेश देशमुख चा डबल रोल असलेला तो "माऊली" गाणे वाला पिक्चर डोक्यावर घेणारे पब्लिक आहे ते असले पिक्चर्स चालवते असा माझा समज आहे. तान्हाजी वालेही तेच.

फारएण्ड >> बहुतेक करून सहमत.
ले पुष्पा आधीही वाचले होते. फ्रेंच रीमेक झाला काय असे वाटत होते. आत्ता सगळा प्रकार ध्यानात आला.

मध्यंतरी 'Y' बघितला.
नावावरुनच स्त्रीभ्रूण हत्या विषयावर आहे. अशक्य त्रास होतो बघताना.
सुरुवातीला येणार्‍या कॅप्शन प्रमाणे 'प्रेक्षकांच्या पचनी पडावं म्हणून चित्रपटात टोन डाउन करुन दाखवलेलं आहे, वास्तव याहुन भयानक आहे' अशी पाटी येते. ती वाचल्यावर चित्रपट बघताना तर हादरायला होतं.
स्त्रीभ्रूण हत्या होतात, सोनोग्राफी करताना जय माता दी किंवा तत्सम कोड वर्ड मधुन जेंडर सांगतात अशा काही कहाण्या चित्रपटातून किंवा बातम्यातून ऐकल्या होत्या. काही गावांत मुली नावाला ही शिल्लक नाहीत इ. इ. त्यामुळे यावर आता परत नवं काय दाखवणार असा थोडा स्केप्टिकल विचार करुनच चित्रपट बघायला गेलो होतो. कदाचित लेखक/ दिग्दर्शकाला असाच विचार होईल हे अपेक्षित असेल... त्यामुळे जे दिसलं ते इतकं रॉ आणि भयानक होतं. सुशिक्षित शहरीमध्यमवर्गीय फुग्याच्या चिन्धड्या झाल्या. चित्रपट बघुन महिना झाला असेल, पण आज हे लिहिताना ती व्हिज्युअल्स आठवली आणि पोटात खड्डा पडला.
मुक्ता बर्वे सरकारी डॉक्टर/ ऑफिसर आहे. तिला मेडिकल माल प्रॅक्टिसेस इ. शोधून त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. तिला पुरुषोत्तम क्लिनिल (नंदू माधव... नाव पण पुरुषोत्तम गायकवाड! ) विषयी संशय आहे. ती त्याचा पर्दाफार्श करायला काय काय करते, किंवा काही टँजिबल करू शकते का? अशी ढोबळ कथा आहे. बरोबर आजुबाजूच्या इतर कथा/ माणसं उलगडत जातात.

आणखी काय आवडलं तर 'प्रेक्षक महामंद आहेत' हे गृहित धरुन त्यांना समजावुन सांगणे प्रकार जवळजवळ टाळला आहे. संवाद नसलेली व्हिज्युअल्स इ. वापरुन स्मार्टली कथा पुढे जाते. जॉईनिंग द डॉट्स हे प्रत्येकाने आपापल्या मनात करावे इतका विश्वास प्रेक्षकावर दाखवला आहे.
दुसरं मराठी चित्रपटात बारकीशी समस्या दाखवुन 'अरे सोप्पं तर होतं सगळं! प्रेमाने बोललं, संवाद साधला इ. इ. केलं की चुटकी सरशी सुटली असती समस्या!' असला काही फालतूपणा नाही. जळजळीत वास्तव मांडायला एका कथेचा आधार घेतला आहे. त्यात कुठे सोल्युशन नाही, ट्रिविअलायझेशन तर अजिबातच नाही. अगदी भकास वाटू नये म्हणून चित्रपटाच्या शेवटी एक पॉझिटिव्ह नोट आहे. पण आशेचा किरण ना_ही!
आणखी एक.... म्हणजे सुरुवातीला काही तुकडे दाखवून ते नंतर जिगसॉमध्ये जोडलेले दिसणे. हे तंत्र मला आवडतं. इथे थोडा सुधारणेला वाव होता, पण इतपत चांगलं ही मराठी चित्रपटात वापरलेलं दिसत नाही. त्यामुळे होईल इव्हॉल्व. इतका त्रास होतो तरीही बघावा असा चित्रपट आहे.
मुक्ता बर्वे, नंदू माधव, ओंकार गोवर्धन आणि इतर कलाकारांनी काम उत्तम केलं आहे.

अर्थात आता चित्रपटगृहात नसेलच. मी भारतात असताना एका आठवड्यात (पहिला आठवडा नसेल. तरी) संपूर्ण मुंबईत फक्त दादरला नक्षत्रमध्ये एक शो होता. मग नंतरच्या आठवड्यात दादरचा शो जाऊन विविआनाला एक शो आला, तेव्हा बघितला.

वायच्या ट्रेलरचा उल्लेख मी त्या ट्रेलर धाग्यावर् केलेला.. डिस्टर्बिंग चित्रपट असेल असे काहीसे तेव्हाही वाचलेले. शक्यतो नाही बघणार मी हा...

मुक्ता बर्वेचे मात्र कौतुक.. मचिची या जनरेशनची स्मिता पाटील आहे ती.. तिला अजून आशयघन चित्रपट आणि सशक्त भुमिका मिळो..

Submitted by अश्विनीमावशी on 27 July, 2022 - 10:55
>>>>
मी कधी म्हटले मी पाहिलेले मुव्हीज क्लासिकल आहेत..एंटरटेनमेन्ट सिनेमे च आहेत.. प्रत्येकालाच आवडले पाहिजेत असं काही नाहीये..

मेजोरिटी लाईकींग आणि प्रॉफिट ठरवतं सिनेमाचं नशिब..कधीकधी फालतू सिनेमे पण हिट होतात.

मृणाली,
"दीज आर जस्ट अ‍ॅवरेज मुव्हीज यु कांट रिअली सिट थ्रू" >> याचा अर्थ मी अ‍ॅवरेज मूव्ही बघत नाही. माझी आवड हाय क्लास आहे हे सांगणे आहे.
"त्या काकू जे साउथ सिनेमे बघतात ती लिस्ट बघुनच मला धडकी भरते" >> याचा अर्थ मी फार महत्त्वाची कामं करते. इतके पिक्चर बघायला कसा काय कोण वेळ काढू शकतं? असा आहे. तरी नशिब समजा की तुमची आणि त्यांची टॅक्स ब्रॅकेट कंपेअर केली नाहिये!

तर थोडक्यात अशा पर्सनल टँजंट कॉमेंटकडे दुर्लक्ष करा. तुमचे प्रांजळ रिव्हू/ दिलेल्या सिनेमांची नावं, कथा मला (आणि इतर अनेक असतील) वाचायला आवडतात. इतक्या भाषेतले सिनेमे, पुस्तकं वाचता त्याबद्द्ल आवर्जुन लिहिता त्याचं खूप अप्रुपही वाटतं. तर लिहित रहा.

हत्या च्या स्पेलिंग बद्दल नव्हतो बोलत.
गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.

Pages