चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुरळा युट्यूबवर आहे तसेच झी५ वर पण आहे. झी५ वरची कॉपी चांगली आहे.
युट्यूबची कॉपी पण चांगली आहे पण शेवटी २-३ मिनीटे आवाज गेला आहे. अर्थात त्याने चित्रपट पहाण्यावर काही फरक पडत नाही. पण एक गाणे बहुतेक मुद्दामहून म्युट केले आहे.

युट्युब वर एक स सासुचा असा भयानक सिनेमा आहे. किती दलिंदर. नवि सोकु उगीच घरंदाज सुनेचे जास्तच अ‍ॅक्टिन्ग करते. तो बर्वे आहे व विनय आप्टे( हा सर्किट सासरा आहे. ) मूल होईपरेन्त सुनेच्या हातचे जेवणार नाही म्हणे. व मूल व्हायचे तर समोर मेलेल्या सासूचे घर आहे तो अडथळा आहे तिथे वाइट शक्ती आहेत. वास्तु वाला खाली पडतो. मी नेटाने पंधरा मिनिटे बघितला. सोकु असह्य आहे. बर्वे आव्डतो मला पण त्याला काहीच काम नाही. विनय आपटे पण जुना आव्डता नट आहे. ( जुना गजरा वगैरे १९७९ - ८०!!) पण रोल अगदीच बकवास. विचित्र च आहे सगळे. बंद करुन जेम्स बाँड सिनेमा लाउन ठेव्ला.

मुंबई टू बँकॉक नागेश कुकनूर, श्रेयस तळपदे अशी नावं बघून पाहिला. वेलकम टू सज्जनपूर सारखी भट्टी जमली नाही. निराशा झाली. मध्यंतरी सुभाष घईने श्रेयस तळपदेला मुक्ता आर्ट्सच्या एका उप-कंपनीचा एम डी केले होते. त्यातलाच हा एक आहे.

१ जुना चित्रपट आहे राजकुमार राव चा.. मेड ईन चायना. एकदम टाईम पास करमणूक आहे, काल पाहिला. मजा आली. खूप गुणी कलाकार वाटतो रा.रा.

१ जुना चित्रपट आहे राजकुमार राव चा.. मेड ईन चायना. एकदम टाईम पास करमणूक आहे, काल पाहिला. मजा आली. खूप गुणी कलाकार वाटतो रा.रा.

>> +१
ते फेमस ' सनेडो सनेडो ' गाणं याच सिनेमात आहे. मला पण आवडला होता सिनेमा.

भयभीत कुणीच पाहिलेला नाहीये का ? प्राईम वर आहे.
हॉरर तर अजिबात नाही. पण सायको थ्रिलर म्हणून वन टाईम वॉच आहे. शक्यतो, आपण असे चित्रपट एकदाच बघतो Lol या चित्रपटाबद्दल जास्त काही सांगत नाही. आवडला कि नाही हे पण नाही. कुणी वेगळा धागा काढलाच तर बोलू.

E1D5E382-DEA7-4A98-A243-F0C087E1FA55.jpeg
प्राईमवर नेब्रास्का नावाचा चित्रपट पाहिला. आवडला.
आपण १०लाख डॅालर्स जिंकल्याचे बोगस पत्र वाचून म्हातारा वूडी आपल्याला खरेच इतकी रक्कम मिळणार असे समजून मोंटाना ते नेब्रास्का असा प्रवास करायला सुरूवात करतो. गाडी नाहीतर चालत पण तिथे जायचेच असे तो ठरवतो. घरातले सगळे त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण तो काही ऐकत नाही. मग त्याचा मुलगा त्याला तिथे घेऊन जातो.
त्यांचा पूर्ण प्रवास खूपच रंजक दाखवला आहे. छान आहे हा चित्रपट.

मध्यंतरी प्राइमवर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' हा मराठी सिनेमा बघितला. ठीकठाक वाटला. अनेक कौटुंबिक इश्यूजची भेळ आहे. स्पृहा जोशीचं मुख्य काम आहे. पण त्यातला गश्मीर महाजनीचा स्क्रीन-प्रेझेन्स आवडला. त्याला कॅमेराची चांगली जाण आहे.

मग त्याचे आणखी कोणते सिनेमे, वेब सिरीज आहेत का शोधलं. त्यात 'बोनस' सापडला. मराठी. 'बोनस'ला आय.एम.डी.बी. रेटिंग ७.५ दिसलं. म्हणून तो सुद्धा पाहिला. पूजा सावंत हिरॉइन.
मराठीच्या मानाने चांगलाय सिनेमा. स्टोरीचं बेसिस स्क्रीनवर दाखवताना जरा तकलादू झालंय. पण काहीही अपेक्षा न ठेवता पाहिल्याने आवडला. आणि गश्मीर महाजनीही आवडला.
सिनेमात एकच छोटासा रोमॅन्टिक म्हणावा असा सीन आहे. आणि मराठीच्या मानाने तो सुद्धा चांगला घेतलाय.
शेवट टिपिकल नाहीये.

(मागे कुणीतरी चिकवा धाग्यावरच गश्मीर महाजनीचं कौतुक केल्याचं आठवतंय. त्याच्या डोळ्यांत हरवलेले भाव असल्यासारखं वाटतं. पण ते क्लोज-अप्सशिवाय स्क्रीनवर फारसं जाणवलं नाही.)

कॅमेराची चांगली जाण - हे असणे म्हणजे काय असतं नक्की? बऱ्याच मुलाखतीत वगैरे ऐकतो पण त्याचा अर्थ कधी कळला नाही.

हपा गुगलवर सर्च द्या. कॅमेरा अँगल म्हणून. कोणत्या शॉटच्या वेळी कोणता अँगल वापरल्याने ते दृश्य प्रभावी होतं हे मिळून जाईल.

मी केलेले गश्मीर महाजनीचे कौतुक. मला आवडतो तो. बोनस बद्दलही चांगलेच लिहीलेले. मलाही टिपिकल स्टोरी असून बरा वाटलेला तो. कारण गश्मीर आणि पूजा सावत दोघे आवडतात.

नुकतेच काही रील्स बघण्यात आले फेसबूकवर. गश्मीर नाचतोही छान.

'बोनस'च्या शेवटी क्रेडिट्स रोल होताना शेजारी डान्स-गाणं दाखवलंय. केवळ हिंदीची कॉपी केल्यासारखं झालंय ते, कारण ग.म.च्या सिनेमातल्या पात्राच्या तुलनेत त्याचा तो डान्स खूपच फंकी आणि विजोड वाटतो.
सिनेमातलं पात्र तिथेही कॅरी करायला हवं असं नाही, पण दोन्ही जरा ब्लेन्ड झालेलं चांगलं वाटलं असतं.

Hit

मुव्ही आलाय

साऊथ चा कॉपी आहे म्हणे

हो

त्याची स्वतःची डान्स अ‍ॅकॅडमी आहे.
>>>>
अच्छा, त्या रीलमध्येही डान्स ॲकॅडमीची पोरे आणि बॅकग्राऊंड होता. त्याचीच असावी मग. मला वाटले भेट दिली होती की काय..

काल Veerumandi तमिळ, कमल हसनचा सिनेमा पाहिला प्राईमवर.
फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांची मुलाखत घ्यायला एक मीडीयावाली स्त्री तुरुंगात येते.पहिला कैदी त्याच्या द्रुष्टिकोणातून काय घडलं ते सांगतो. दुसरा कैदी (कमल हसन) त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने सांगतो.. आपल्याला शेवटपर्यंत वाटत राहतं नक्की काय घडलं होतं..डार्क सिनेमा, रक्तपात, क्लायमॅक्स खतरनाक.

'बोनस' छान आहे..१ टाईम वॉच. गश्मिर म. कडे लूक्स, डान्स, बरा अभिनय असं बरं पॅकेज आहे की. आदिनाथ कोठारे सारखं.

भयभीत पाहिला . यतिन कार्येकर च कॅरेक्टर नीटस कळलं नाही .
बघताना भीती वाटते . बराचसा अ आणि अ वाटला .
नदीकाठी घर असतं त्यांच ? ती काव्या आणि सुबोध नाश्ता करत असतात तो सीट-आउट आवडला .

एक काकू होत्या आमच्या पाईपिंग कॉम्प्लेक्स मधे. कुठला पिक्चर आला, पब्लीक डिस्कस करायला लागलं कि मी नाही बाई बघणार म्हणायच्या.
आणि तीनच्या शो ला तिकीट काढायला गेलं कि या बारा ते तीन चा शुक्रवारचाफर्स्ट डे फर्स्ट शो शो चोरून पाहून येत असायच्या. आठवण आली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Pages