चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निल्सन ,,,
तुमच्या वेदना मी समजू शकते कारण का माहितीये ? मी रीलेट करू शकते ते स्वत: . मीही एक भाऊ आणि बहीणी नंतर तिसरी. त्यावेळी आईचं वय जास्त होतं माझ्या आणि बाबा तिला होणारा त्रास बघून सरळ हे बाळ नको म्हणाले होते. एवढंच नाही तर तिला डॉक्टरांनी पण हाच सल्ला दिला होता, पण तरीही माझा जन्म झाला आणि क्रिटीकल असल्यामुळे मी जगतेय की नाही याची महीनाभर वाट पाहीली आईने.

हे सगळं मला तिने सांगितले आणि प्रेग्नंसीमधे किती त्रास झाला , तिच्या मदतीला कसं कोणीच नव्हते हेही सांगितले. फार वाईट वाटले होते तेव्हा कि आपण यांना काहीही गरज नसताना आणि आईच्या जीवावर बेतलेले असताना जन्मलो. पण खरं सांगू तर तुम्ही म्हणालात तसंच मलाही लहानपणापासून कधीही मुलगा मुलगी भेद जाणवलाच नाही. आम्ही तीनही मुलं आई बाबांना तितकेच प्रिय होतो.

सांगायचं एवढंच आहे की आपले आई बाबा आपल्यासाठी जे करतात ते कुणीही करत नाही ‌, हे मला मनोमन पटते आजही. त्यावेळी जी काही परीस्थिती असते , त्यांची मानसिकता असते त्याची आपण काही कल्पना करू शकत नाही, आणि करूही नये. जे झालं ते आठवत बसण्यापेक्षा आपण आज आहोत त्यांच्यामुळे आणि आपलं एकमेकांवर निर्विवाद प्रेम आहे एवढंच मनात ठेवावं असं वाटतं. निदान माझा तरी तोच प्रयत्न असतो. तुमची पोस्ट वाचून रीलेट झालं म्हणून लिहिलं, तुम्हाला दुखवायचा काही हेतू नाही.

खरयं. ह्या पोस्ट्स वरून जाणीव झाली की माझ्या भावाला काय वाटत असेल. आम्ही दोन बहिणी आणि मग बाबांनी नवस मागवून आणि लिंग चाचणी करून मिळवलेला मुलगा. आईला दोन मुलीच बास असं होतं पण वंशाच्या दिव्याचे फॅमिली प्रेशर. चिडून आई कितीदा म्हणायची नकोच होता तिसरं. पण माझं ऐकतय कोण. पण आमच्या इथे कायम बाबांचा मुलासाठी सॉफ्ट कॉर्नर. ज्या गोष्टी मुलींना नाही द्यायला जमले ते मुलाला मात्र ते मिळवून देणारच ह्या गोष्टीचे तेवढे अजून हि वाईट वाटतं. आई बापाला सगळी मुले सारखीच असं आई म्हणते, पण बाबा मात्र वेगळेच वागतात. आज बहीण भाऊ म्हणून एकत्र आम्ही खुश आहोत पण हे discrimination कायमच झेलावं लागतच.

वेक अप सिड पुन्हा बघितला. अजूनही कोंकणा सेन शर्माचा अभिनय तितकाच फ्रेश वाटतो. रणबीर कोंकणा केमिस्ट्री अजूनही सर्वोत्तम. इकतारा, आजकल जिंदगी, क्या करूं हि गाणी अजूनही आवडती. साधी सरळ गोष्ट पुन्हा बघताना तितकीच आवडली.

अर्थ शास्त्राचा एक सिद्धांत आहे

लॉ ऑफ डिमिनिषड मार्जिनल युटिलिटी

म्हणजे ग्राफवर A पॉईंट वर असतो , मग बी खाली , मग पुढचे अजून खाली

पहिले मूल , त्याचे बारसे , त्याचे लग्न , त्याची मुले ह्यांचे मागच्या पिढीला अप्रूप असते. पण चौथे अपत्य होईस्तोवर त्यातले नावीन्य संपलेले असते, ते फिजिकलिही जास्त म्हातारे बनलेले असतात.

झाडावर एक अर्धे मोठे झालेले फळ आहे आणि एक नंतर उगवलेले फूल आहे , तर शेतकरी कुणाला जास्त जपेल ?

अर्चना 31 नॉट आऊट - मल्याळम प्राईमवर.
स्कूल टिचर अर्चना चे 31 मैरेज प्रपोजल्स फेल झाल्यानंतर फायनली एका एनाराय बरोबर लग्न ठरतं..सगळी तयारी होते, लग्नाच्या आदल्या रात्री एक कॉल येतो आणि अर्चना च्या लाईफमध्ये एक ट्वीस्ट येतो..हलकाफुलका सिनेमा पण फैमिली सस्पेन्स म्हणता येईल.

इथल्या प्रतिक्रिया वाचून दुसऱ्या बाजूने विचार केला न्हवता हे लक्षात आलं. आता चित्रपट वेगळ्या नजरेने मनातल्या मनात बघून ... आणि ख्रिश्चन लोक लहान मुलांच्या तुटलेले हात पायाचे ग्राफिक व्हिज्युअल घेऊन प्रो लाईफ बोंबलत planned Parenthood बाहेर उभे असतात त्यात आणि या स्त्री गर्भपात दृश्यात नक्की काय फरक आहे इ अनेक विचार मनात येत आहेत. इथे प्रतिक्रिया देणाऱ्याचे आणि वेगळा दृष्टीकोन मांडणाऱ्यांना अनेक धन्यवाद.

Reproductive rights हे समाजात लिंग गुणोत्तर समतोल साधण्या पेक्षा नक्कीच वरचढ हवेत. वेळ झाला की काढतो नवा धागा.

अमितव Happy
मोरोबानी लिहिलं नसतं तर मलाही लक्षात आलं नसतं. तुम्ही ओपन माइंडेडनेस दाखवला हे छान!
यानिमित्ताने लिबरलत्वाची झूल पांघरून आतमध्ये कट्टर सनातनी misogyny भरलेले पालथे घडे 'होय ही हत्याच' म्हणत expose झाले ही अजून एक गंमत!

यानिमित्ताने लिबरलत्वाची झूल पांघरून आतमध्ये कट्टर सनातनी misogyny भरलेले पालथे घडे 'होय ही हत्याच' म्हणत expose झाले ही अजून एक गंमत!>>> Whatever...

मोरोबा जे म्हणतायत ते टेक्निकली बरोबर आहे. एक तो हक्क आणि दुसरी ती हत्या असं वाटतं. पण भारतात फक्त मुलींचे गर्भ निवडून ते गर्भपात करणे आणि मूल नकोय म्हणून गर्भपात करणे यात फरक नाही वाटत कुणाला? त्याचे सामाजिक परीणाम दिसत नाहियेत का? मुलगी आहे म्हणून दोन, तीन, चार ते असंख्यवेळा गर्भपात करणे याला काय लॉजिक लावाल? मूल नकोय म्हणून स त त गर्भपात करणारे किती टक्के असतील? WHITEHAT यांना वाटतं की देशात मुलींचे गर्भ काढणार्‍या जोडप्यांना सरकार धमक्या देतंय, जेल मधे टाकतंय. त्याऐवजी समाजा प्रबोधन करा. पण या गोष्टी ऑलरेडी होत आहेत ना? सरकार मुलींसाठी सोयी सवलती देत आहेच ना? त्याबरोबरच मुलगी आहे म्हणून गर्भपात करणे आणि मूल नकोय म्हणून करणे या कितीही पटले नाही तरी फरक आहे.

मला अजून लिहायचे होते या विषयावर. धाग्यासाठी वाट पहात होते.

अंजली+१
हायला! जन्मलेले मूल मुलगी आहे म्हणून तिला तूस खायला घालून किंवा बुडवून मारण्याचे समर्थन करणारे फेमिनिस्ट बघून डोळे निवले. आणि हे सगळं कशासाठी? तर मला बाई मुलगाच हवा म्हणून! अल्ट्रा फेमिनिस्ट झाले हे तर!

गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.
>>
नाहीच आहे. प्रश्ण इथे वेगळा आहे. स्त्री भ्रुण चिकित्सा करण्यावर बन्दी आहे. कारण एकदा ही चिकित्सा झाली की सासरचे लोक मुलगी होणार म्हणुन सुनेवर गर्भपाताचा दबाव आणु शकतात. भ्रुणाचे लिन्ग माहित नसताना, गर्भपात करण्यावर बन्दी आहे का भारतात?

जन्मलेले मूल मुलगी आहे म्हणून तिला तूस खायला घालून किंवा बुडवून मारण्याचे समर्थन करणारे फेमिनिस्ट बघून डोळे निवले.//

हे समर्थन कुठेही कोणीही केलेलं नाही. पण जन्मलेल्या मुलाची हत्या आणि भारतात जो २०-२४ आठवडेपर्यंत गर्भपात करण्याचा नियम आहे त्या मुदतीत केलेलं गर्भपात प्रोसिजर हे सेम आहे , हत्याच आहे- असं म्हणणं तुमचं आहे- जर गर्भ मुलीचा असेल तर. राईट?
हे सेम अमेरिकेतील सनातनी प्रो-लाईफ वाल्यांचं अर्ग्युमेंट आहे. त्यांचा दृष्टीकोन जास्त व्यापक आहे- म्हणजे त्यांना पुरुष गर्भाचाही गर्भपात चालत नाही इतकंच. People without female reproductive organs wanting to control women. No wonder.

अंजली,
Reproductive autonomy एकदा मान्य केली तर "सामाजिक परिणाम" हा निकष कसा लावता येईल?
मुलींची संख्या कमी झाल्यास मुलांना हुंड्याची अपेक्षा न ठेवता लग्न करावं लागेल, विधवा परित्यक्ता यांची लग्न होऊ शकतील आणि अशा प्रकारे समाजात transformation झाल्यास लोकांचा मुलगी नको हा दृष्टिकोन आपोआपच बदलेल.
आणि समजा- हा सर्व भयानक सामाजिक परिणाम आहे असं म्हणणं असेल तरी त्यासाठी forcing people to have a child they don't want to have- हे कसं काय योग्य?
स्त्रीच्या empowerment चे भयावह सामाजिक परिणाम होत आहेत- विवाहसंस्था, कुटूंबसंस्था उध्वस्त होते आहे- आमच्या जातीची/धर्माची/रेसची लोकसंख्या कमी होत आहे- म्हणून तिने आम्ही सांगतो तितकी मुलं जन्माला घालावी , नोकरी करू नये, घटस्फोट घेऊ नये, लेस्बियन असू नये- ही सगळी बंधनं सामाजिक परिणामांच्या नावाखालीच घातलेली असतात.

भारतासारख्या रेप, स्त्रीची असुरक्षितता, हुंडा, स्त्रीला हीन वागणूक हेच कल्चर असलेल्या देशात कोणी मुलगी नको म्हणणं इतकं का वेगळं वाटत आहे?त्याला समाज collectively जबाबदार आहे- ते जोडपं फक्त परिस्थितीला react करत आहे. गर्भपातासाठी- severe birth defects असणं, अनौरसता, कॉलेज कपलच्या 'एक ही भूल का नतिजा', आर्थिकदृष्ट्या असमर्थता असणं- ही सर्व कारणं राजमान्य आहेत. असा फरक का?

ही चर्चा खरंच वेगळ्या धाग्यावर करा. बहुतेक सर्वांना नवीन धागा कुठल्या ग्रूपात कसा उघडायचा हे माहित असेल.

तुम्हीही धागा काढू शकता खरे तर.. अवांतर चर्चा योग्य धाग्यात हलवायला म्हणून..

बाकी मी पहिल्याच फटक्यात काढला असता. पण कोणाला या विषयावर लिहायची ईच्छा असून माझा धागा म्हणून लिहीता येणार नाही असे नको व्हायला म्हणून मोह टाळला. कोणाचा प्रतिसाद जन्म घ्यायच्या आधीच नष्ट करायचे पाप मला माझ्या डोक्यावर नको होते.

नुकताच मी नेटफ्लिक्सवर 'what happened to Monday' असा dystopian थ्रिलर पाहिला. यातल्या जगामध्ये लोकसंख्येचा महापूर झाल्याने प्रत्येक घरटी एकाच मूल जन्माला घालण्याची सक्ती असते. एकापेक्षा जास्त मुले असल्यास त्यांना इंजेकशन देऊन गाढ झोपेत ठेवून preserve करण्यात येत असते. लोकसंख्या कंट्रोल होईपर्यंत. अशा ठिकाणी सात identical जुळ्या मुली जन्माला येतात व त्यांचा आजोबा त्यांना लपवून वाढवतो. त्यांना एकाच व्यक्ती म्हणून बाहेरच्या जगात कशे वावरायचे हे शिकवतो. संडे, मंडे ते सॅटर्डे अशी त्या साती जणींची सात वारांची नावे. त्या एकच विग व ठराविक वेशभूषा वापरून व एक आयडेंटिटी घेऊन आळीपाळीने जगत असतात. त्यातील मंडे एक दिवस कामावरून परत येतच नाही. मग बाकीजणी बाहेरच्या जगात तिचा कसा शोध घेण्याचा प्रयन्त करतात याची कथा आहे. त्यात शेवटी हा एक मूलच हवे वाल्या नियमाचे काय होते हेही दाखवले आहे. सिनेमा अतर्क्य आहे पण नक्की पाहण्यासारखा आहे.
नोट - सिनेमा ऍडल्टसाठीच आहे. (एक nude सीन व हिंसाचार आहे).

वरील चर्चेवरून ह्या सिनेमाची आठवण झाली सहजच.

हो म्हाळसा. बहुतेक चायनाच्या एक मूल पॉलिसीवरून इन्स्पायर आहे पण हे एक वेगळेच विश्व आहे. लोकेशन्स cgi वापरून केलेली असावीत, कलाकार पण सर्व diverse एथनिसिटीचे आहेत. अर्थात हल्ली हॉलीवूडमध्ये व टीव्हीवर असतातच म्हणा.

नवजात बाळ मुलगी आहे म्हणून तिच्या नरडीला नख लावणार्‍यांचा आणि गर्भ स्त्री आहे म्हणून तो पाडणार्‍यांचा उद्देश एकच आहे. त्यामुळे माझ्यालेखी या दोन्ही गोष्टी सारख्याच.
अमेरिकेतले प्रो चॉइस वाले लोकांना गर्भ प्रतिबंधक साधने न वापरता वारंवार गर्भपात करायला उत्तेजन देतात का? तेच स्त्रीभ्रूणहत्येचं समर्थन करणारे मात्र तुम्ही जोवर मुलगा /मुलगे होत नाहीत तोवर गर्भधारणा आणि गर्भपात करत रहा असं म्हणतत.

भारतात मुलीचा जन्म कठीण म्हणून मुलगी नको असं म्हणणारी स्त्री जर स्वतः मुलाला जन्म देऊन इतर कोणाच्या मुलींची छेडछाड , बलात्कार, हुंडाबळी करणारा अपराधी तयार करते. (मूळ त्या पोस्टमधलंच लॉजिक पुढे नेऊन). म्हणूनच मुलींच्या जगण्याबद्दल काळजी वाटणारी विचारी व खरी स्त्रीवादी स्त्री मुलगा वा मुलगी असं कोणतंच अपत्य नको, असं म्हणणारी असेल.

अ‍ॅडमिन, इथले प्रतिसाद हलवून तुम्हीच वेगळा धागा काढाल का?
माझ्या नावावर मी न काढलेला आणि दुसर्‍या धाग्यातून तुम्ही वळवलेला असा एक धागा आहे.

या धाग्यावर तसेही १२०० च्या आसपास प्रतिसाद झाले आहेतच. तर मग 'चिकवा ७' असा एक आणि 'भ्रुणहत्या की भ्रुणनिवारण, लिंगसापेक्ष किंवा/आणि लिंगनिरपेक्ष' असा एक वरील-सर्व-चर्चा-समावेशक धागा - असे दोन नवीन धागे काढले जावेत ही विनंती.

इथले भ्रूणहत्यासंबंधित प्रतिसाद योग्य धागा काढून तिकडे हलवले तर नवीन चिकवा धाग्याची आवश्यकता नाही.

'योग्य धागा' admin नेच काढला तर बरं होईल.

आमच्या चिरजिवांनी (वय वर्षे ५) जुग जुग जियो बघताना अनिल कपूर कडे बोट दाखवून "आई हे एवढ्या मोठ्या माणसाचे बाबा असूनपण म्हातारे कसे नाही झाले?" असा प्रश्न विचारून आम्हाला थक्क केलं आहे.

अनिल कपूरचं वय वाढतच नाहीये हे इतक्या लहान पोट्ट्यांना पण कळायला लागलं बघा.

Pages