तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला आर चा किस्सा खरच कल्चरल शॉक आहे!.....+1.

आता यावरुन परत कोणी म्हणू नये की लाथा खाल्ल्या की बाळंतपण सुकर होते.

शर्मिला, यांचा किस्सा वाचून भटक्या जमातींचे वेगळेच जग असते हे प्रकर्षाने जाणवले. ते लोकं वेगळ्याच मातीचे बनलेले असतात आणि त्यांना हे झेपते असे आपण म्हटले तरी त्यापुढे बालमृत्यु, कुपोषण, व्यंग आणि ईतर कॉम्प्लीकेशन यांचे रेकॉर्ड कोण चेक करायला जाते..

नानबा, ओके ग

माझ्या पोस्टमधून अस काही ध्वनित होत असेल तर ते मी व्यवस्थित न लिहिल्याने! काही शारीरिक/मानसिक कॉम्प्लिकेशन्स नसतील तर आई-बाळाचे रुटीन सुरू व्हायला हवे. खूप pamper करू नये. अस मला म्हणायचे आहे.
माझ्याकडे पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी आई वडील आले होते आणि दुसऱ्या मुलीच्या वेळी सासूबाई होत्या. देवाच्या कृपेने दोन्ही वेळा सगळं सुरळीत पार पडले. तरी दोन्ही वेळी घरात ज्ये ना असल्याने खूप छान वाटलं आणि त्यांचा आधार वाटला हे मी नाकारत नाही.
पण प्रेग्नन्सी आणि चाईल्ड birth चा आपल्याकडे मोठा बाऊ केला जातो. प्रेग्नंट असताना वाकू नका, हेच खा, तेच खा, बाळाला अस करा तस करा हे बघितलं की ते खरंच ओव्हर हाइपड वाटतं. त्यामानाने इथे सुटसुटीत वाटतं. एव्हढंच.
असो. या विषयावर हेमाशेपो.

माझ्या कलीगला भारत आणि पाकिस्तान हे हजारो वर्षांपासून वेगवेगळे देश आहेत असं वाटायचं. तिला आज फाळणी वगैरे बद्दल माहिती दिली. ते ऐकून तिला धक्का बसला आणि तिला हे सगळं कसं काय माहित नाही हा विचार करून मला पण धक्का बसला! Lol

वत्सला पोस्ट शी सहमत... हे थर्ड आणि फोर्थ डिग्री खूप अनफॉर्च्युनेट आहे पण जास्त पॅम्पर केलेल्या बायकांना होतात असे वाटते... काही लिटरली दोन माणसाचे जेवतात आणि स्थूल होतात... व्यायाम सोडून आराम चालू असतो... पेल्विक मसल लूज होतात मग...

नानबा शीही सहमत आहे... ज्याला त्रास होतो त्याला समजून घेणे महत्वाचे... पोस्ट पोर्टम डिप्रेशन भयानक प्रकार आहे...

वत्साला तुझ्या पोस्ट laa नव्हतं ते स्पेसिफिकली, ओवरोल कल पाहून वाटल तेव्हाच्या पोस्ट्स चां...

Chraps, हेच generalization बरोबर नाहीये. माझी बाकीची पोस्ट वाचा प्लीज एकदा

हे थर्ड आणि फोर्थ डिग्री खूप अनफॉर्च्युनेट आहे पण जास्त पॅम्पर केलेल्या बायकांना होतात असे वाटते

>> तुझी पोस्ट वाया गेली नानबा Sad

शर्मिला आर चा किस्सा भयंकर आहे.

वरच्या सगळ्या मुलींना अनुमोदन. बाळंतपणात वाट लागते, शारिरिक व मानसिक (नॉर्मल झाले तरी). कधी काय त्रास होईल सांगता येत नाही. मदत नसेल तर अजुन हाल.

परवाच्या शाळा हत्याकांडातील शिक्षिका ज्या वारल्या त्यांच्या पतीला पन धक्क्याने हार्ट अ‍ॅटेक आला व तो ही वारला.. चार मुले पदरी जी आता अनाथ झालेली आहेत. कंप्लीटली अवॉइडेबल ट्रॅजेडी. हे वाचुनही मला कल्चरल शॉक बसला आहे. ए आर १५ बंदुक विकत घेणे किती सोपे आहे!!
कर्म करायचे पण जबाबदारी घ्यायची नाही कल्चर आहे का त्या देशात!! हॉरिफाइड.

कर्म करायचे पण जबाबदारी घ्यायची नाही कल्चर आहे का त्या देशात!!>>>आहे पण समहाऊ गनक्रन्ट्रोल करायची एकाही राजकारण्याची इच्छाशक्ती नाही, राजकारण आणी पॉवर पुढे जनसामान्याच्या मताला आणी जिवाला काडिचि किम्मत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे मग तो भारत असो की अमेरिका.

वर सुहागरात उल्लेख वाचुन सहज आठवले.

माझ्या नणंदेचा नवरा नवरा गुवाहाटी स्थाइक बन्गाली. आणि बन्गाल्यांचे लग्न चालते तिन दिवस. तर पहिल्या दिवशी लग्न लागल्यावर त्यानी होटेलातच उरलेला दिवस व रात्र घालवली. दुसरा दिवस असाच इथे तिथे फिरत घालवला. मला हे अगदी शॉकिन्ग नाही पन थोडे विचित्र वाटले होते, नवे जोडपे स्वतःच्या घरी न जाता बाहेरच फिरत बसलेय. तिसर्या दिवशी सन्ध्याकाळी रिसेप्शन करुन रात्री बिदायी करायला त्यांच्या घरी गेलो. तिकडच्या पद्धतीप्रमाणे त्यांचे भले मोठे एक मजली घर होते. मी फिरुन खोल्या पाहिल्या. एका खोलीत मध्यभागी अगदी हिन्दी चित्रपटात दाखवतात तसा व तितकाच भारी सजवलेला पलन्ग पाहुन अगदी ‘आऽऽऽऽ’ झाले. असली सजावट केलेला सुहाग रात पेशल पलन्ग मी केवळ हिन्दी चित्रपटातच पाहिलेला. म्छोटासा धक्काच होता माझ्यासाठी. Happy

आणि नवरी गाडीतुन उतरुन वर तिच्या खोलीत जाइपर्यन्तच्या मार्गात तिच्या पायाखाली बन्गाली साड्या अन्थरल्या होत्या.. इतक्या छान साड्या अशा जमिनीवर पसरलेल्या पाहुन जीव जरा गलबलला होता Happy Happy

जनमानसाला गन कंट्रोल नकोच आहे. राजकारण्यांच्या नावे कशाला बोटं मोडायची? अमेरिकेला गन व्यसन आहे. आणि ते तिला सोडायचं नाही.
ज्या देशांत जनमानसाला गन कंट्रोल हवा असतो त्या सगळ्या प्रगत देशांत तो झालेला आहे. अमेरिकेत नाही त्याला तिकडचे लोकच जबाबदार आहेत. उगा स्कोटस आणि सिनेट आणि अमेंडमेंट आणि एनआरए ब्ला ब्ला बोलण्यात अर्थ नाही. लोकांना बदलायचं असतं तर एव्हाना झालं असतं. लोकांना गन हव्याच आहेत. पूर्णविराम.
प्रत्येक मास शूटिंग नंतर फायर आर्म ची विक्री भरमसाठ वाढते. लोकांना गन कंट्रोल हवा असता तर कमी झाली असती. असे अनेक चावून चोथा झालेले मुद्दे सांगता येतील. जे आहे ते पथेटिक आहे! दुसरा काही शब्दच नाही. मेंटल इश्यू म्हणे! बंदूक रिकामी करून झाल्यावर यांना दरवेळी साक्षात्कार होतो की अरे याला तर मेंटल प्रॉब्लेम होता. रंगाने काळा, धर्माने दुसरा असेल तर त्याला टेररिस्ट म्हणायचं. बाकी सगळ्यांना मेंटल प्रॉब्लेम. लोन वूल्फ. वगैरे वगैरे.

हे शुटिन्ग इतक्या वेळा झालेय आणि
त्यात मेन्टल इश्युचा मुद्दा इतक्या वेळा वाचलाय की पुर्ण अमेरिका मेन्टल इश्यु ग्रस्त आहे असा माझा (गैर) समज झालेला आहे. आणि अशा मेन्टल लोकन्च्या हाती भारी गन्स? अरे तुम्हाला भिती वाटते तर .३०३ टाइप एखादी रायफल ठेवायची परवानगी द्या.. युद्धावर वापरतात तसल्या मोठ्या शक्तीच्या बन्दुका घरात १५ वर्षन्च्या पोरान्च्या हातात? कठिण आहे सगळे.

बंगालमधे कशाला? इथे महाराष्ट्रात पण आमच्या एका मैत्रिणीने मला सांगितले होते की त्यांच्याकडे असा सुहागरात स्पेशल फोर पोस्टर बेड असतो आणि तो सजवतात. नंतर एकदा तिच्या घरी गेलो असताना तिने (त्यावेळी न सजवलेला) तो बेड दाखवलाही. तिने विडा तोडणे, लवंग तोडणे वगैरे लग्नानंतरचे खेळ सांगितले होते. आम्ही मैत्रिणींनी आ वासला होता.

आमच्याकडे तोपर्यंत दुधात का तांदळात अंगठी शोधणे एवढेच पाहिले होते. त्यातसुद्धा रोमॅंटिक का कायसे दिसण्याऐवजी कॉंम्पिटिटीव स्पिरिट जास्त दिसायचे.

अरे लग्न झाल्या रात्री तर आम्ही पण हॉटे लातच गेलेलो. कारण जिमखान्यावरचे घर वट्ट दोन खोल्या त्यात सासु बाईंच्या खंडीभर मैत्रीणी लग्नाला म्हणून आलेल्या त्या कल्ला करत होत्या. एक किचन एक बाहेरची खोली. त्यात एक बॉक्स दिवाण. व एक लोखंडी बारकी साबांच्या मापाची खाट.

भांडारकर रोड्वर रविराज हॉटेल आहे तिथे आमचे बुकिन्ग होते.

ह्या बायकांनी आम्हाला घालवून नंतर इतका राडा केला गप्पा व दंगा करून की तो बॉक्स दिवाण त्याचे वरचे कव्हर तुटले व आत पडले. पलंग तोड बट इन अ डिफरनंट सेन्स. ह्यावरही नंतर विनोद होत राहिले.

आमच्या कडे पण लई भारी करतात सुहागरात पलंग.
आणि मग आत नवरदेवाचा मित्र किंवा शाळकरी अगाऊ पोरगं लपून बसतं पलंगाखाली नाहीतर कपाटात वगैरे अन् फोअरप्ले रंगात येऊ लागला की त्यांना दचकवतात.

जिवाला काडिचि किम्मत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे मग तो भारत असो की अमेरिका.......+१.

पलांगतोड किस्सा भारीच अमा!

कपाटात वगैरे अन् फोअरप्ले रंगात येऊ लागला की त्यांना दचकवतात.>>>>

हे खुप वाईट आहे. माझ्या जवळच्या मैत्रिणीला हा वाईट अनुभव घ्यावा लागला. तिचे (प्रेम)लग्न तिच्या चुलत आतेभावाशी झाले, तिची नणन्द अशीच पलन्गाखाली लपुन बसली आणि नन्तर हसत बाहेर येउन आतेभाउ काय बोलला वगैरे ते सगळे सान्गत बसली.. मला ऐकुन चिड आलेली… मैत्रिण बिचारी रडकुन्डीला पण आलेली आणि रागावलेली सुद्धा..

ते आवडणारे लोक आहेत. पैल्यांदा असे पलंग सजवणारे कोणी लपायचं कुठे लपायचं याच प्लॅनिंग करताना पाहिलं तेव्हा खूप आश्चर्य वाटल होतं.
ज्याची त्याची आवड. त्यात वाईट बरोबर आपण विचार नाही करत.

कपाटात वगैरे अन् फोअरप्ले रंगात येऊ लागला की त्यांना दचकवतात.>>>

मुळात सेक्स ही क्रिया खूप गुंतागुंतीची आहे.
आणि ह्याचा उगम च अनेक घटकतून होतो.
मेंदू मधून तशा भावना निर्माण होण्या पासून अनेक घटक तिथे active असतात
मस्करी ह्या मूर्ख लोकांची होईल लपून बसून(ही रीत माहीत आहे त्यांना धक्का बसणार नाही ) पण ज्यांना ही रीत माहीत नसेल तर दीर्घ कालीन परिणाम सेक्स भावनेवर होवू शकतो

बकवास पद्धत आहे ती.
नक्की देशाच्या कोणत्या भागात अशी पद्धत आहे.

हे खुप वाईट आहे. >> हो, म्हणजे ती दचकवणारी व्यक्ती बाहेर यायच्या आत प्रणय सुरू झाला तर.. आचरट प्रकार आहे. दहात एक वा शंभरात एक केस अशी घडतही असेल वा लपणारा गैरफायदा घेतही असेल. मुलीच्या दृष्टीने ते ही नववधूच्या दृष्टीने तर फारच वाईट आहे हे.

पाळलेला कुत्रा जरी असेल आणि तुमच्या वर प्रेम पण करत असेल त्याच्या समोर चे अन्न तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करा .
हल्ला करेल तो.
मालक आहे हे पण विसरून जाईल
सेक्स ऐन रंगात असताना कोणी डिस्टर्ब केले तर पुरुष खूप हिंसक होवू शकतो.
तो मित्र आहे की bhavu हे बघणार नाही.

मस्त रुंमेश , हेमंत
माझ्या कडून पन भर :
समजा दोघांपैकी कुणाला अन् डिटेक्टटेड हार्ट दीसिज आहे, आणि दचकून मेले तर!
लपणारा बाहेर आलाच नाही सगळा व्हिडिओ रकॉर्ड करून मग ब्लॅकमेल करू लागला तर!

अजुन येऊ द्या अशी यादी.

अन् तो प्रेंत तुम्ही माणसं गोळा करा हेमंत राव.
मग मी सांगतो भागाचं नाव मग जाऊन हाणू लेकाच्यांना.

ही पद्धत माहीत असेल तर .
संयम ठेवला जाईल. सेक्स केला जाणार नाही.
बसा किती लपून बसत आहात तेवढे.
हरियाणा सारखी दारू पिण्याची रीत असेल तर नवरा नशेत असेल तो इतका संयम ठेवू शकणार नाही.
ह्या दोन शक्यता तर आहेत च.
प्रतेक कपाट ,प्रतेक मोकळी जागा तपासली जाईल
ही दुसरी शक्यता..
ज्याला ही रीत माहीत नसेल.दोघे नशेत नसतील ( ते असणार च नाहीत)आणि कोणी ऐन रंगात आल्यावर उगवला आणि लपून बघत होता हे माहीत पडले तर.. खून होण्या सारखा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता खूप जास्त आहे.

हरियाणा सारखे दारू पिने ही रीत असेल नवरा नशेत असेल. रीत त्याला माहीत असेल.
पण दारू मुळे विचार शक्ती कमजोर झाली असेल.
पण लपून बसणारे होष मध्ये असतील..
ते अशा स्थिती चा फायदा घेवून नव वधु वर rape पण करू शकतात.
किंवा बाहेर न येता ते खासगी क्षण रेकॉर्ड करू शकतात
ते पुढे खूप भयंकर रूप घेवू शकते.

हरियाणा सारखी दारू पिण्याची रीत असेल
साहेब हरियाणातला प्रत्येक लग्नातला नवरा दारु पिवुनच असतो हे कोणी सांगितलं तुम्हाला? की आपलं असच......

Pages