Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13
हा धागा खास लोकाग्रहास्तव
भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही अगदी दहीभेळसुद्धा
रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............
पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही
चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही....
चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक
हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा...
चटक मटक खाणार्या सर्व भेळकरांना अर्पण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हि घ्या तमिळवाली तिखट
हि घ्या तमिळवाली तिखट ग्रेव्ही आणि आंबटपाणीवाली पापू...पण मला पुण्याचेच आंबटगोड चाट आवडते, काय करणार याचीच सवय करून आवडून घेतले.
काश्मीर ला जाऊन भेळ खाल्ली
काश्मीर ला जाऊन भेळ खाल्ली कारण मी भेळप्रेमी आहे <3
अगागागा. पाणीपुरीत गाजर!
अगागागा. पाणीपुरीत गाजर! बंगलोरमध्ये पण हे करतात.
पाणीपुरीच्या पुरीत किंचित
पाणीपुरीच्या पुरीत किंचित शेवफरसाण् टाकून ती चहात बुडवून खायलाही छान वाटते. फक्त थोडे फू फू करावे. बेसावध तोंडात टाकल्याने चहाचा चटका बसू नये. गेल्यावेळचे शिल्लक पुरीचे पाकिट मी असेच संपवले.
इथे चाटचे अचाट प्रकार चाललेत.
इथे चाटचे अचाट प्रकार चाललेत.
या धाग्यावर संभा भेळचे नाव
या धाग्यावर संभा भेळचे नाव आले आहे काय ? पहिल्या काही पानांवर दिसले नाही.
संभा भेळ सांगलीतली सगळ्यात पॉप्युलर भेळ आहे. मला आवडते, पण सांगली/पश्चिम महाराष्ट्रात चिरमुरे भेळेसाठी चांगले असतात- त्यामुळे संभा मस्तच असले तरी इतर भरपूर भेळवाले सुद्धा छान आहेत. पण कोणीही बाहेरून सांगलीत आले की संभा वारी पक्की असते. आता तर विश्रामबागेत सुद्धा औटलेट आहे.
संभा भेळेला सेलेब्रिटी एंडोर्समेन्ट सुद्धा आहे- स्मृती मंधानाने खूप कौतुक केलेले संभाचे- In Sangli, there is special Bhel called the Sambha Bhel. I always tell them, “Left to me, I will take your cart.
सांगलीतल्या भेळेची मी ६-६
सांगलीतल्या भेळेची मी ६-६ महीने वाट पाहते. खाल्ली तर सांगलीचीच , नाही तर नाही.
मी फक्त ऐकेकदा कोल्हापूर, पूणे, बंगलोर मधे तिथल्या प्रसिद्ध भेळ खाउन वरील बाणा बाळगला आहे
तमिळनाडुमधे मसाला पाणीपुरी
तमिळनाडुमधे मसाला पाणीपुरी छान मिळते.रसम पाणीपुरीही बरी लागते.पण मला भेळ आणी वडापाव खूप आवडते जे ईकडे मिळत नाही.सांगलीकडील भागात चिरमुरे छान मिळतात म्हणून भेळ आणी भडंग जास्त चविष्ट लागते.
सांगली प्रतापसिंग उद्यान भेळ
सांगली प्रतापसिंग उद्यान भेळ मस्त असते
खाऊन शतक उलटले , म्हणजे 2000 पूर्वी खाल्ली होती.
मला वाटते भेळ मिसळ अन वडापाव लहानपणी जे आपण सतत खातो तेच छान वाटत असते
शिवाजीनगर ला एक झटका भेळ
शिवाजीनगर ला एक झटका भेळ मिळायची.. फर्ग्युसन ला असताना तिकडे चक्कर व्हायचीच...
पूर्वीचे भेळवाले भडनग व
पूर्वीचे भेळवाले भडनग व फरसाण घरी बनवत होते
त्यामुळे ते अगदी सुंदर लागत होते
वस्तू दर्जेदार असायच्या
कोल्हापूर भवानी मंडप भेळवाला त्या काळात इन्कम टॅक्स भरत होता म्हणे
आमच्या गावी मी लहान असताना
आमच्या गावी मी लहान असताना सायकलवर एक चिरमुरेवाला विकायला यायचा गुराबग्रेम चिरमुरे अशी हाक ऐकू आली की आम्ही एक ग्लास शाळू घेऊन जायचो आणी तो दोन ग्लास चिरमुरे वर थोडे काबुली चणे द्यायचा.अशी चिरमुरयाची चव आजपर्यंत मला कुठेही मिळाली नाही. केवळ अप्रतिम.
पूर्वी अस्सल देशी खात होतो
पूर्वी अस्सल देशी खात होतो आता सगळे हायब्रीड.
तांदूळ वेगळे असतील चिरमुर्यासाठी वापरत.
पोहेही खूप चवदार असतात ईकडे.(तांदूळ वेगळे असणार).
चिरमुरे हा शब्दही तिकडचाच आहे
चिरमुरे हा शब्दही तिकडचाच आहे. पुण्यामुंबईत चुरमुरे म्हणतात.
आम्ही कुरमुरे बोलतो
आम्ही कुरमुरे बोलतो
कुरमुरे
कुरमुरे
आम्ही पोरी(तमिळ) म्हणतो किंवा
आम्ही पोरी(तमिळ) म्हणतो किंवा बोरूगुलु(तेलुगू) किंवा मुरमुरे.
शिवाजीनगर ला एक झटका भेळ
शिवाजीनगर ला एक झटका भेळ मिळायची.>>>> येस्स मी पण खाल्ली आहे ती कित्येक वेळा. ते आजोबा मानेला झटका देत भेळ कालवायचे.
मुरमुरे
मुरमुरे
हो आमच्याकडे चिरमुरे म्हणतात
हो आमच्याकडे चिरमुरे म्हणतात बुटके आणी गोल.तमीळ मधे पोरी (चव कमीच)लांबडा आकाराने.
जयसिंगपूर टोलनाक्याजवळ अंबा भडंग मिळतो छान असतो चवीला.खायला द्यायला सांगितले की कांदा आणी कोथिंबीर घालून देतात (10ला)मस्तच लागते.आता माहीत नाही.
आंबा भडंग करोडपती आहे
आंबा भडंग करोडपती आहे
आंबा भडंग प्रचंड टेस्टी आहे,
आंबा भडंग प्रचंड टेस्टी आहे, तो खाल्यावर मला ते गोरे बंधु भडंग आवडेनासं झालं (माफ करा सांगलीकरानो) .
नेमके कोल्हापुरचे भडंग जास्त येत नाहीत.
चुरमुरे , कुरमुरे म्हणतात आमच्याकडे भेळेसाठी वापरतात गाडीवर त्याला.
आंबा भडंग कॅनडात हमखास मिळतात
आंबा भडंग कॅनडात हमखास मिळतात. चांगले आहेत.
अंबा भडंग अलिकडेच मलाही इकडे
अंबा भडंग अलिकडेच मलाही इकडे मिळाले (बे एरिया). मस्त आहेत.
>>पूर्वीचे भेळवाले भडनग व फरसाण घरी बनवत होते
त्यामुळे ते अगदी सुंदर लागत होते
यावरुन अनिल अवचटांनी भेळ किंवा चिवडा बनवणार्या एका माणसाबद्दल लिहिलेला लेख आठवला. परत वाचायला हवा.
आंबा भडंग प्रचंड टेस्टी आहे>>
आंबा भडंग प्रचंड टेस्टी आहे>>>+१ इथे पटेल ब्रदर्स मधे मिळतात. मी बरेचदा घ्यायचे टाळते. नाहीतर माझे काही खरे नाही. त्यातले शेंगदाणे, लसूण आहाहा! तोंडावर ताबाच राहत नाही.
जयसिंगपूर टोलनाक्याजवळ अंबा
जयसिंगपूर टोलनाक्याजवळ अंबा भडंग मिळतो छान असतो चवीला.खायला द्यायला सांगितले की कांदा आणी कोथिंबीर घालून देतात (10ला)मस्तच लागते.आता माहीत नाही. >>> अजूनही मिळतात. आणि 10 रु ला च. फक्त क्वांटीटी थोडी पहिल्यापेक्षा कमी येते. सांगलीत सुद्धा वखार भागात मिळतात. कांदा, कोथिंबीर , लिंबू पिळून अफाट चव येते. मला कपाले आणि अंबा दोन्ही आवडतात.
वर सम्भा भेळेविषयी उल्लेख आलाय. खूप च प्रसिद्ध आहे. आता विश्रामबागला ही शाखा झालीय. इतर भेळेपेक्षा महाग असते. पण मला ती गीज्ज वाटते जरा , बटाटा ही असतो त्यात. मला फार नाही आवडली ती. हे ऐकलं की बऱ्याच सांगलीकराना धक्का बसतो. भेळ जरा अर्धवट कुरकुरीत च आवडते मला. इतर बरीच ठिकाणची आवडते बाकी. सावरकर कॉलनी तली महाराजा भेळ, मार्केट यार्डच्या कोपर्यावरची, प्रतापसिंह उद्यान जवळची गणेश भेळ, आणि घराजवळच्या कॉर्नर वरची मातादी भेळ.
काहींनी आंबा भडंग लिहिलंय. मी
काहींनी आंबा भडंग लिहिलंय. मी विचार करत बसलो की भडंगमध्ये आंबा कशाला घालतील आणि कसा लागेल? की आंब्याचंच भडंग?
https://www.ambabhadang.com/
एक श्री जय अंबा भडंगही दिसतोय. कॉपीकॅट असावा.
मुंब ईत कुठे मिळएल अंबा भडंग?
मुंब ईत कुठे मिळएल अंबा भडंग?
बिगबास्केट वैगेरे वर आहे का?
अंबा भडंगच असेल, चुकुन लिहीलं
अंबा भडंगच असेल, चुकुन लिहीलं मी. अंबाबाईवरुन नाव.
ही भावाच्या एका मित्राने कोल्हापुरहुन खाऊ म्हणून आणलेली आणि नंतर सहज कोपऱ्यावरच्या दुकानात मिळू लागली, आता माल येत नाही म्हणे, गोरे भडंग दिसते पण मी घेत नाही. दुसरीकडे मिळते का बघायला हवं.
अंबा आहे
अंबा आहे
Pages