Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13
हा धागा खास लोकाग्रहास्तव 
भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही
अगदी दहीभेळसुद्धा 
रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............
पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही 
चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... 
चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक 
हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... 
चटक मटक खाणार्या सर्व भेळकरांना अर्पण 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंबा भडंग मस्त आहे. आमचा दीर
अंबा भडंग मस्त आहे. आमचा दीर सांगली स्न जयसिंगपुरास त्या जागी आणून घेउन येतो.
सांगलीलाच विश्राम बागेत घराच्या मागे एक फूड स्ट्रीट आहे. तिथे एक चाट वाला आहे भली मोठी बसायची जागा आहे. भेळ पापु इतर व्हरायटी मस्त आहे.
आमची संभाजी पार्कची कल्पना भेळ.
आता मुलुंडची वीणा नगरची चौकातली भेळ पापु. बेस्ट.
व्वा अमा, मस्त आठवण काढलीत
व्वा अमा, मस्त आठवण काढलीत कल्पना भेळ
1 दशक तरी उलटलं असेल तिथे भेळ खाऊन..अजून आहे की नाही ते बघावं लागेल.
अरे वा !सगळ्यांना अंबा भडंग
अरे वा! सगळ्यांना अंबा भडंग आवडतो.पहिले आम्ही भोरे भडंग खायचो आणी ईकडे येताना घेऊनपण यायचो.एकदा amazon वर मिळतो का चेक केले तर अंबा आणी जय अंबा दोन्हीही मिळाले तेव्हापासून amazon वरुन मागवितो. आणी गणेश फरसाण ही छान मिळते.मुलाला आवडते म्हणून तेही मागवितो.आणी घरी instant भेळ करुन खातो.छान लागते.
कपाले भडंग ही छान आहे.गोरे बंधू भडंग नाही आवडला.संभा भेळ गावी आल्यावर नक्की टेस्ट करेन.
जयसिंगपूर टोलनाक्याजवळ अजुनही भडंग मिळतो.छान.मी तिथे खाऊन 18 वर्षे झाली.पण चव अजुनही जिभेवर आहे.
अंबा भडंग हिच का?https://www
अंबा भडंग हिच का?
https://www.amazon.in/s?k=Amba+Bhadang&ref=bl_dp_s_web_0
इथे 300 आहे
इथे 300 आहे
त्यांच्या स्वतःच्या साईटवर 250 आहे
https://www.ambabhadang.com/
हो हाच तो भडंग .दोन्हीची
हो हाच तो भडंग .दोन्हीची टेस्ट थोडीशी वेगळी पण छान आहेत.(अंबा आणी जय अंबा).आम्हाला आवडला.
सांगलीत दांडेकरांचे Dawn
सांगलीत दांडेकरांचे Dawn ब्रँड खाली शेव चिरमुरे आणि लसूण भडंग उर्फ लभंग मिळते- ते सुद्धा आवडते. नेट वर नाही दिसले.
अंबा भडंग हेच असते का ?
अंबा भडंग हेच असते का ?
जयसिंगपूरचा ब्रँड आहे का ?
ह्यावेळी जर सहकाऱ्यांपैकी कोणी सांगलीला गेला तर मागवून घेईन
हेच ते. मी सुरूवातीला नाव
हेच ते. मी सुरूवातीला नाव ऐकलं तेव्हा आंबा भडंग वाटलेलं मला. मग ते आंबा आणि भडंग कसं लागेल वगैरे तारे तुटले होते मनात. खाऊन बघितलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं.
आता मिळतं की सगळीकडेच. डीमार्टमधे पण बघितलं मी.
थोडे प्रयत्न केलेत तर असे
थोडे प्रयत्न केलेत तर असे घरी जमू शकेल
https://youtu.be/6JXYEUBuI-I
मी मागवलं . छान आहे. झणझणीत.
मी मागवलं . छान आहे. झणझणीत.
ओगले आजींच्या कृतीने करून पाहिलंय. तेही छान लागतं.
झणझणीत >>> अगदी अगदी ,
झणझणीत >>> अगदी अगदी , म्हणूनच फार आवडले . बाकी सपक वाटायला लागले त्यापुढे.
आता यात कांदा,टोमॅटो आणी
आता यात कांदा,टोमॅटो आणी कोथिंबीर बारीक चिरुन आवडीनुसार घाला. चिंच गूळाची चटणी/पातळ पाणी जसे लागेल तसे घ्या मिक्स करा आणी झणझणीत अशी instant भेळ तयार.पटकन खा नाहीतर शेसामेल.
शेसामेल म्हणजे?
शेसामेल म्हणजे?
पहिल्यांदा ऐकला हा शब्द
कुरकुरीत राहणार नाही आकसेल
कुरकुरीत राहणार नाही आकसेल सॉगी रे थोडक्यात
जेम्स वांड, तेच आहे अंबा
जेम्स वांड, तेच आहे अंबा भडंग. पण ते जयसिंगपूर कोल्हापुरात आहे ना?
अरे कुठे का असेना
जयसिंगपूर शहर
कोल्हापूर जिल्ह्यात येते.
ऑन लाईन मिळते म्हणजे मग ते धारावीत का असेना
आता यात कांदा,टोमॅटो आणी
आता यात कांदा,टोमॅटो आणी कोथिंबीर बारीक चिरुन आवडीनुसार घाला. >>> फक्त एवढं पुरेसं होतं अंबा भडंगसाठी. बाकी नाही घालत.
शेमासेल म्हणजे सॉगी होणे
शेमासेल म्हणजे सॉगी होणे असणार. मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलाय शब्द !
सांगली कोल्हापूर साईडला
सांगली कोल्हापूर साईडला वापरतात बहुदा. 'चकली, शेव , भेळ, बिस्कीट इ डब्याचं झाकण नीट लाव, नाहीतर ते ते पदार्थ शेसामतील इति आई / आजी. पावसाळ्यात हा धोका जास्त
(No subject)
अंबा भडंगेत लसूण, लाल तिखट,
अंबा भडंगेत लसूण, लाल तिखट, मीठ, हळद, कढीपत्ता , शेंगदाणे एवढंच आहे.
ओगले आजींच्या कृतीत याशिवाय सुक्या खोबर्याचे काप, मेतकूट, काळा मसाला, लवंग-दालचिनी-धने -जिरे यांची पूड हे सगळं आहे.
शेसामने म्हणजे saugy
शेसामने म्हणजे मऊ आणी लगदा होणे.वरती बरोबर अर्थ लिहिला आहे.आमच्याकडे सर्रास वापरतात.
घरी दिवाळीला आम्ही भडंग बनवतो.कलर एवढा लाल नाही येत पण टेस्ट छान लागते.आवडीप्रमाणे
बारीक शेवही घालू शकता(घरी बनवलेली) आणी फुटाणा डाळं पण.
प्रतिशब्द - सादळणे
प्रतिशब्द - सादळणे
घरचे भडंग, मस्तच सोना.
घरचे भडंग, मस्तच सोना.
सुक्या खोबर्याचे काप, >>> मला नाही आवडत, मी काढते. शेंगदाणेही नाही आवडत, तेही मी काढते.
घरी भडंगात मिक्स करण्यासाठी
घरी भडंगात मिक्स करण्यासाठी आधी तळून ठेवलेले सुक्या खोबऱ्याचे काप मी बरेचसे लंपास करायचो
मला खूप आवडतात सुकं खोबरं काप
मला खूप आवडतात सुकं खोबरं काप
शेंगदाणे किंवा तळलेले लसूण अजिबात आवडत नाहीत.
दांडेकरांच्या डॉन भडंग
दांडेकरांच्या डॉन भडंग इन्स्टंट मसाला वापरून भडंग घरी केले तर कपाले भडंग सारखी चव आणि रंग येतो. तसेच मुक्त हस्ते शेंगदाणे घालायचे. ते स्वस्त ही पडतं. मीठ, साखर, तिखट सगळं परफेकट प्रमाणात असतं.
आता यात कांदा,टोमॅटो आणी कोथिंबीर बारीक चिरुन आवडीनुसार घाला. >>> नुसता बारीक कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून घेतलं तरी पुडकं केव्हा सम्पलं कळायचं नाही.
बरंच झणझणीत आहे. मला वाटतं
बरंच झणझणीत आहे. मला वाटतं दुसर्या दिवशी तरी कळेल की पुडकं सावकाश संपवायला हवं होतं
अरे हो की! अंबा पाहिजे.
अरे हो की! अंबा पाहिजे.
आंबा लिहायची बोटांना सवय झाली बहतेक
आता पुढच्यावेळी इंग्रो मधुन आणलं की कां टो लिं घालुन खाईन. ते पाकिट एकदा उघडलं की कधी संपतं कळत नाही. त्यातली तळलेली लसुण, दाणे फारच भारी लागतात अधेमधे दाताखाली आले की.
Pages